आपली शाळा ...मराठी शाळा

एक पाऊल पुढे

मराठीशाळा परिपूर्ण परिपाठ  आज .....
Today ...
Tuesday, 23 October 2018 08:49 am  

सुविचार ...
Good Thought ...
ज्ञानसागर ...
महाराष्ट्र देशा.....
महाराष्ट्र माझा
संगणक मित्र.....
श्लोक ...


त्वं नो॑ अग्ने पि॒त्रोरु॒पस्थ॒ आ दे॒वः दे॒वेष्व॑नवद्य॒ जागृ॑विः ।
त॒नू॒कृद्बो॑धि॒ प्रम॑तिश्च का॒रवे॒ त्वं क॑ल्याण॒ वसु॒ विश्व॒मोपि॑षे ॥ ९ ॥

त्वं नः अग्ने पित्रोः उपस्थे आ देवः देवेषु अनवद्य जागृविः ॥
तनूऽकृत् बोधि प्रऽमतिः च कारवे त्वं कल्याण वसु विश्वं आ उपिषे ॥ ९ ॥

हे निष्कलंक अग्निदेवा, सर्व देवांत तूं श्रेष्ठ देव आहेस. तुझा निवास अगदी मातापितरांच्या सन्निध असतो. तूं आमचेकरितां जागृत रहा. सर्वांची शरीरें निर्माण करणार जो तूं तो आपली भक्ति करणाऱ्या संबंधाने अतिशय प्रेम बाळग व जागरूक रहा. तूं प्रत्यक्ष कल्याणच आहेस; तूं सर्व प्रकारचें द्रव्य सर्वत्र पेरून ठेवीत असतोस. ॥ ९ ॥
बोधकथा ...


उंदीर आणि चिचुंद्री

एका धान्याच्या कणगीस एक लहानसे भोक होते. त्यातून एक अशक्त व भुकेलेला उंदीर आंत शिरला आणि तेथे बरेच दिवस राहिला. यथेच्छ धान्य खाऊन तो इतका धष्टपुष्ट झाला की, त्यास त्या भोकातून बाहेर पडता येईना.

एक चिचुंद्री त्याची ती धडपड पाहात बसली होती, ती त्यास म्हणाली, ‘गडया, ह्या भोकातून बाहेर पडण्यास एकच युक्ति आहे. तू पहिल्याने आत शिरलास त्यावेळी जितका बारीक होतास, तितकाच बारीक तू पुनः होशील तेव्हाच तुला या भोकातून बाहेर पडता येईल.’

तात्पर्य

अविचाराने किंवा अधाशीपणाने मनुष्य संकटांत पडतो.
दिनविशेष ...
 दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहीतीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा 

दिनविशेष : २३ आक्टोबर

हा या वर्षातील २९६ वा (लीप वर्षातील २९७ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९९७ : सामाजिक कार्यासाठीचे जर्मनीचे योजेफ ब्यूज पारितोषिक किरण बेदी यांना प्रदान
१९७३ : संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) निर्बंध घातल्यामुळे इस्त्रायल व सीरीयामधील युद्ध संपुष्टात आले.
१९४४ : दुसरे महायुद्ध – सोविएत लाल सैन्याने (Red Army) हंगेरीत प्रवेश केला.
१८९० : हरी नारायण आपटे यांनी ’करमणूक’ या आपल्या साप्तहिकातून स्फूट गोष्टी लिहिण्यास प्रारंभ केला आणि मराठी लघुकथेचा पाया घातला गेला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९४५ : शफी इनामदार – अभिनेते व नाट्यनिर्माते (मृत्यू: १३ मार्च १९९६)
१९२४ : ’संगीतभूषण’ पं. राम मराठे – संगीतकार, गायक व नट (मृत्यू: ४ आक्टोबर १९८९)
१९२३ : दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी – प्रकाशन व्यवसायात नवनवीन प्रयोगांसाठी ख्याती मिळवलेले प्रकाशक, ’श्री विद्या प्रकाशन’चे संस्थापक (मृत्यू: २२ फेब्रुवारी २०००)
१९०० : डग्लस जार्डिन – इंग्लिश क्रिकेटपटू (मृत्यू: १८ जून १९५८)
१८७९ : शंकर रामचंद्र तथा ’अहिताग्नी’ राजवाडे – वैदिक धर्माचे पुरस्कर्ते, पाश्चात्य व पौर्वात्य तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, मीमांसक व भाष्यकार (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९५२)
१७७८ : चन्नम्मा – कित्तूरची राणी (मृत्यू: २१ फेब्रुवारी १८२९)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१२ : सुनील गंगोपाध्याय – बंगाली कवी व कादंबरीकार (जन्म: ७ सप्टेंबर १९३४)
१९२१ : जॉन बॉईड डनलॉप – वाहनांच्या रबरी धावांच्या आत हवा भरलेली नळी (tube) वापरण्याच्या तंत्राचा शोध लावणारे स्कॉटिश संशोधक (जन्म: ५ फेब्रुवारी १८४०)
१९१५ : डब्ल्यू. जी. ग्रेस – इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म: १८ जुलै १८४८)
१९१० : चुलालोंगकोर्ण तथा राम (पाचवा) – थायलँडचा राजा (जन्म: २० सप्टेंबर १८५३)

आज विशेष ...
भेटीगाठी -