Bahujan hitaya Bahujan sukhay essay in Marathi language बहुजन हिताय सुखाय! हे एक सुत्र आहे. जे ऋग्वेदात आढळते. अधिकाधिक लोकांच्या हितासाठी आणि अधिकाधिक लोकांच्या आनंदासाठी काम करणे असा या छोट्या वाक्याचा अर्थ आहे. हे वाक्य लोकांना, इतरांना मदत करण्यासाठी, इतरांना मदत करण्यास प्रवृत्त करते. जी व्यक्ती या सूत्राचे ज्ञान घेऊन इतरांच्या भल्यासाठी कार्य करते. ती व्यक्ती यशस्वी बनते. बहुजन हिताय बहुजन सुखाय हा वाक्प्रचार अनेक महापुरुषांनी वापरला आहे. ज्या सूचना द्वारे त्या सर्व महापुरुषांनी जगाच्या कल्याणासाठी त्यांना जागृत केले आहे.
बहुजन हिताय बहुजन सुखाय! हे सूत्र गौतम बुद्धांनी वापरले आहे. जेव्हा गौतम बुद्ध आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत असत तेव्हा गौतम बुद्ध या सूत्राचे पालन करायचे आणि आपल्या सर्व शिक्षकांना या सूत्राचा अर्थ सांगून त्या सर्व शिक्षकांना लोककल्याण करण्यास सांगायचे या वाक्याला अनुसरून गौतम बुद्धांचे सर्व विद्यार्थी जनहितासाठी सदैव तत्पर असायचे. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे वाक्य मनातून समजून घेण्याची इच्छा असली पाहिजे. ज्या व्यक्तीला बहुजन हिताय बहुजन सुखाय हे वाक्य समजते, तो लोकांच्या कल्याणासाठी काम करू लागतो. कारण प्रत्येक जण स्वतःसाठी काम करतो. जो माणूस दुसऱ्याच्या सुखासाठी आयुष्यभर काम करतो. तो जीवनभर यशाच्या मार्गावर चालतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय या सूत्राचा उपयोग गौतम बुद्धांनी तसेच अनेक महापुरुषांनी केलेला आहे.
तसेच स्वामी विवेकानंद यांनीही या सूत्राचा उपयोग केला आहे. यातून त्यांनी आपल्या शिष्याला या वाक्याचा अर्थ समजावून सांगितला आहे. त्यांच्या शिष्यांनी सुद्धा हा अर्थ समजावून घेतला व बहुजनांच्या हितासाठी आपले आयुष्यभर त्यांनी कार्य केले आहे. जो माणूस स्वतः साठी जगतो, त्याच्या मनात कधीही इतरांबद्दल दया येत नाही. बहुजन हिताय बहुजन सुखाय सूत्र हे भारत देशात ऑल इंडिया रेडिओने वापरले आहे. ऑल रेडिओ वर कार्यक्रम सुरू झाले. यानंतर आकाशवाणीचे एक ब्रीदवाक्य निश्चित करण्यात आले आणि ते ब्रीद वाक्य म्हणजे बहुजन हिताय बहुजन सुखाय! याचा शाब्दिक अर्थ लोकांच्या हितासाठी लोकांच्या सुखासाठी काम करणे असा होतो. आपले जीवन यशस्वी बनवायचे असेल तर बहुजन हिताय बहुजन सुखाय या सूत्राचे पालन केले पाहिजे.
जेव्हा आपण बहुजन हिताय बहुजन सुखाय या वाक्याचे पालन करू तेव्हा आपले जीवन यशस्वी होईल आणि आपण लोकांच्या सुखासाठी कार्य करू. परंतु मराठा विद्या प्रसारक समाजाचा लौकीक वाढीस लागायला संस्थेचे सभासद, कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी वर्गही कारणीभूत आहे. पण या तीनही घटकांचा विचार न करता केवळ संचालक मंडळच संस्थेचे उद्धारकर्ते आहेत, असे कसे म्हणता येईल? संस्थेत शिरलेल्या राजकारणाच्या किड्याने आता संस्थेचा पायाच पोखरायला सुरुवात केलीय आणि म्हणूनच संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं संस्थेच्या भवितव्याविषयीची भीती आता अनेक संस्थाप्रेमींना डाचू लागलीय.
केवळ विरोधाला विरोध करण्यापायी संस्थेचे नुकसान करण्यापेक्षा सर्वांनीच एकत्र येऊन ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या ब्रिदाप्रमाणे कार्यपद्धती स्वीकारल्यास त्यातून बहुजनांचे हित खरोखरच साध्य होऊ शकते. शेतकऱ्याच्या मुलांनी शीलभ्रष्ट पदवीधर किंवा दानतभ्रष्ट श्रीमंत बनू नये, तर समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी अविरत कष्ट करावेत, अशी शिकवण देणाऱ्या कर्मवीर रावसाहेब थोरात यांनी भाऊसाहेब हिरे, अण्णासाहेब मुरकुटे, काकासाहेब वाघ आणि कीर्तिवानराव निंबाळकर या सहकाऱ्यांसमवेत मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेची स्थापना केली. 1914 साली केवळ पाच विद्यार्थ्यांवर उदोजी मराठा वसतिगृहाच्या रूपाने संस्थेचे रोपटे लावले गेले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात शिक्षण घेता यावे व त्यांची शहरात निवासाची व्यवस्था व्हावी, हे स्थापनेमागचे प्रमुख प्रयोजन होते. काळाप्रमाणे संस्थेची ध्येय-धोरणं बदलत गेली. संस्थेची शाळा, कॉलेजेस ग्रामीण भागापर्यंत जाऊन पोहोचली. तिचा विस्तार वाढला आणि शताब्दीकडे पावले टाकणारी ही संस्था जिल्ह्यातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था बनली. अर्थात काळ बदलत गेला तसे संस्थेत काही गुण-अवगुणही अवतरले.
राजकारणाबद्दल बोलायचं झालं तर माणसं बदलली येथील समाजकारणानं राजकारणाचं स्वरूप धारण केलं. संस्थेत पैसा पाण्याप्रमाणे वाहू लागला तसतसा येथील लोकांच्या वृत्तीतही बदल होत गेला. आज संस्था यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचलीय. अत्याधुनिक इमारती उभ्या राहिल्यात, नवनवीन अभ्यासक्रम सुरू झालेत. पण संस्थेत शिरलेल्या राजकारणाच्या किड्याने आता संस्थेचा पायाच पोखरायला सुरुवात केलीय आणि म्हणूनच संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं संस्थेच्या भवितव्याविषयीची भीती आता अनेक संस्थाप्रेमींना डाचू लागलीय.
खरं तर च्या तळमळीतून कर्मवीर थोरात यांनी मविप्रची स्थापना केली, त्याच तळमळीतून दिवंगत डॉ. वसंत पवार यांनी संस्थेच्या रहाटगाडा ओढला. 1981 साली मराठा विद्या प्रसारक समाजाच्या माध्यमातून त्यांनी समाजकारणात प्रवेश केला आणि अल्पावधीत या संस्थेत त्यांनी मांड पक्की केली. अवघ्या चारच वर्षात ज्येष्ठ नेत्यांनी सरचिटणीस म्हणून संस्थेची सूत्रे स्वीकारल्यानंतर तब्बल 13 वर्षे ही संस्था डॉ. पवारांनी चालवली. पण या काळात त्यांच्यासह संचालक मंडळात वाढलेला अहंभाव आणि एककल्ली कारभार यामुळे सदस्य काहीसे नाराज झाले आणि त्याचा परिणाम 1997 सालच्या पंचवार्षिक निवडणुकीतून दिसला.
या निवडणुकीत डॉ. पवार यांचा पराभव झाल्याने संस्था त्यांच्या हातून गेली. अर्थात, त्यानंतर आलेल्या नव्या संचालक मंडळाला फारशी देदीप्यमान कामगिरी करताच आली नाही. संस्थेचा लौकीक वाढण्याऐवजी त्यात घट होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. ही बाब संस्थेच्या सभासदांना रूचली नाही आणि सन 2002 मध्ये पुन्हा एकदा डॉ. पवार यांच्याकडेच संस्थेची सूत्रे आली. डॉ. पवार हयात असेपर्यंत संचालक मंडळ त्यांच्या विरोधात बोलायला फारसे तयार नव्हते आणि तशी संधीही मिळू न देण्याची काळजी डॉ. पवार घेत होते.
डॉ. पवार यांच्या निधनानंतर काही अपवाद वगळता अन्य संचालक मंडळाच्या आग्रहास्तव डॉ. निलीमा पवार यांच्याकडे संस्थेच्या सरचिटणीसपदाची सूत्रे सोपवली गेली. पण नियुक्तीची ही प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा दावा करीत धर्मादाय आयुक्तांकडे काही मंडळींनी धाव घेतली. सरचिटणीसपद हे निवडणुकीतूनच भरता येते हा या दाव्याचा गाभा आहे. कोर्ट-कचे-यांमध्ये कधी पवार यांना दिलासा मिळाला तर कधी याचिकाकर्त्यांच्या बाजूने सुनावणी झाली. अशा परिस्थितीत पवार यांनी थोडीशी सबुरीने भूमिका घेत काही काळापुरता पदाचा त्याग केला असता तर पुढील पाच वर्ष त्यांच्याच हातात सत्ता येणे सहज शक्य होते. जे गुण डॉ. पवारांमध्ये होते तेच गुण निलीमाताईंमध्येही आहेत. किंबहुना त्यापेक्षा किंचित अधिकच. परंतु निलीमाताई न्यायालयीन दाव्यांमध्येच अडकल्या आणि संस्थेच्या इतिहासात झाली नाही इतक्या कोर्टबाजीला त्यांना सामोरे जावे लागले.
निलीमाताईंनी स्वत:हून काही काळांपुरते पद सोडले असते तर त्यातून काय झाले असते? त्यांचा लौकीक वाढला असता, सभासदांशी मोकळेपणाने बोलायला त्यांना संधी मिळाली असती आणि त्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन नंतर पुन्हा एकदा संस्थेची धुरा सांभाळता आली असती. अर्थात केवळ पद सोडून विरोधकांचे समाधान झाले असते, असे म्हणनेही धाडसाचेच आहे. संस्थेचा कारभार आपल्या हाती घेण्याची स्पर्धाही या विरोधातून बाहेर आलीय आणि ती संस्थेच्या हितासाठी घातक ठरू शकते.
आज मराठा विद्या प्रसारक समाजाचा लौकीक वाढीस लागायला संस्थेचे सभासद, कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी वर्गही कारणीभूत आहे. पण या तीनही घटकांचा विचार न करता केवळ संचालक मंडळच संस्थेचे उद्धारकर्ते आहेत, असे कसे म्हणता येईल? संस्थेचा आज जो कारभार सुरू आहे तो अशाच ट्रॅकने. लौकीक वाढल्याने विद्यार्थीवर्ग संस्थेकडे मोठ्या प्रमाणात आकृष्ट होतो आणि त्यांच्या भावनांचा गैरफायदा घेत संस्थेत प्रवेश प्रक्रियेचा अक्षरश: बाजार मांडला जातो. अशा प्रसंगी पालकांची अक्षरश: लुबाडणूक होते. इमारत निधी आणि विकास निधीच्या नावाने रांगा लावून बेकायदेशीर वसुल्या होतात.
आज अनेक दिग्गज मंडळी संस्थेत शिरकाव करू पाहताहेत. परंतु या मंडळींच्या प्रवेशाने समाजकारण आणि शैक्षणिक विकास या मुलभूत कर्तव्यापासून संस्था दूर गेली नाही म्हणजे मिळवले. दुसरीकडे, केवळ विरोधाला विरोध करण्यापायी संस्थेचे नुकसान करण्यापेक्षा सर्वांनीच एकत्र येऊन ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या ब्रिदाप्रमाणे कार्यपद्धती स्वीकारल्यास त्यातून बहुजनांचे हित खरोखरच साध्य होऊ शकते.
Bahujan hitay Bahujan sukhay essay in Marathi language.”बहुजन हिताय बहुजन सुखाय” हा मराठी निबंध तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.