संत कान्होपात्रा | Sant Kanhopatra

Sant Kanhopatra संत कान्होपात्रा ह्या वारकरी संप्रदायातील 15 व्या शतकातील एक प्रमुख संत कवयित्री होऊन गेल्या. कान्होपात्रा यांचे अभंग त्यांच्या रचना आजही आपणास ऐकावयास मिळतात. संत कान्होपात्रा ही एका गणिकेची मुलगी होती. ती लहानपणापासूनच भक्तिरसात रमली होती.

संत कान्होपात्रा Sant Kanhopatra

कान्होपात्रा दिसायला अतिशय सुंदर होती. तिने आपल्या आईचा व्यवसायाचा स्वीकार केला नाही. तिने विठ्ठल भक्तिमार्गाने आपले जीवन मंगलमय केले. तर मग पाहूया संत कान्होपात्रा विषयी माहिती.

जन्म

संत कान्होपात्रा यांचा जन्म पंधराव्या शतकात पंढरपूर जवळ असलेले मंगळवेढा या गावी एका गणिकेच्या पोटी झाला. तिच्या आईचे नाव शामा आहे. शामा हे नाच-गाणं करणाऱ्या स्त्रियांमधील एक स्त्री आहे आणि शामा या गणिकीकडे अनेक प्रतिष्ठित लोकांचे येणे-जाणे होते. स्थानिक धनदांडग्यांना, मुस्लिम सरदारांना, अमीर-उमराव यांना खुश करण्याचे कामही शामा नायकीण करीत असे. यामुळे लांबून लांबून श्रीमंत धनवान लोक तिच्या घरी भेटण्यासाठी येत असत. अशा या शामा नर्तकीच्या पोटी सुरेख अशी कन्या जन्माला आली जणू चिखलातच कमळ उमलले. तिचे नाव कान्होपात्रा असे ठेवले. चंद्राच्या कलेप्रमाणे कानोपात्रा हळूहळू मोठी झाली. अप्रतिम लावण्य आणि गोड गळा यामुळे कान्होपात्रेने आपल्या प्रमाणे व्यवसाय करून श्रीमंत आणि धनवान मंडळींना खुश ठेवावे अशी तिच्या आईची इच्छा होती परंतु ते तिला मान्य नव्हते.

बालपण

कान्होपात्रा ही लहानपणापासूनच विठ्ठलाच्या भक्तीत रमली होती. तिला विठ्ठल भक्तीची ओढ लागली होती. पूर्व पुण्याईमुळे कानोपात्राला हे विठ्ठल भक्तीचे वैभव प्राप्त झाले असावे. कान्होपात्रा गावातील वारकऱ्यांच्या समवेत पंढरपूरला जात असे. त्यामुळे आईचा व्यवसाय पुढे न्यावा असा विचार तिच्या मनात कधीही आला नाही. वारीमध्ये गेल्यानंतर कान्होपात्रेला सत्संग लाभला. प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलींची भेट झाली आणि त्यांचा सहवास लाभला. या संत संगतीमुळे ती पूर्ण बदलली आणि तिच्या आयुष्यात सुद्धा आमूलाग्र बदल घडला. सतत हरी नामात दंग राहणे आणि किर्तन करणे या तिच्या अत्यंत आवडीच्या गोष्टी झाल्या.

योगिया माझी मुगुट मनी |
त्रिंबक पहावा नयनी ||
माझी पुरवावी वासना |
तू तो उद्धारच राणा ||

करुनिया गंगा स्नान |
घ्यावे ब्रह्मगिरीचे दर्शन ||
कान्होपात्रा म्हणे पंढरीराव |
विठ्ठलचरणी मागे ठाव ||

बिदरचा बादशहापर्यंत कान्होपात्राच्या सौंदर्याची ख्याती पोहोचली. तिला पकडून आणण्याकरता त्याने आपले सरदार मंगळवेढ्यास पाठवले होते. स्वतःच्या शीलाचे रक्षण करण्याकरता कानोपात्रा वेश बदलून वारीत सहभागी झाली आणि पंढरपुरी पोहोचली. विठ्ठलाच्या चरणी डोके ठेवून आपले रक्षण करण्याचे आर्त विनवणी तिने केली. विषाचा घोट पिणे मला योग्य वाटत नाही. पण भीक मिळालीच नाही, तर मी भगवंताचे नाम घेऊन पडून राहील. पण आपला धर्म व्यस्थित व समाजातील वाईट लोकांच्या हाती पडू देणार नाही. मनातील पवित्र भावनांना दाबून टाकून मी वासनाच्या चिखलात पडणार नाही. तेव्हा तिने म्हटले,

नको देवराया अंत आता पाहू |
प्राण हा सर्वथा जाऊ पाहे ||
हरिणीचे पाडस व्याघ्रे धरीयेले |
मजलागी झाले तैसे ||
देवा मोकलूनी आस |
जाहले उदास घेई कान्होपात्रेस हृदयात ||

बादशहाच्या सरदाराने तिचा पंढरपूरपर्यंत पाठलाग केला. तसेच मंदिराच्या व्यवस्थापकांना कान्होपात्रेला हवाली करण्यास फर्मावले, अन्यथा मंदिर उध्वस्त करण्याची धमकी दिली. आपल्या भगवंताचे आपल्या विठ्ठलाचे मंदिर उद्ध्वस्त होताना कानोपात्रा कसे पाहू शकणार होते. तिने सोबत जाण्याची तयारी दर्शवली परंतु शेवटचे विठ्ठलाच्या चरणावर तिचे डोके ठेवण्याची विनंती केली. विठ्ठलाच्या पायाला पकडून मिठी मारून तिने आपले प्राण त्याक्षणी त्यागले. पण आपल्या आणि पांडुरंगाच्या भक्तीत अडसर ठरू पाहणाऱ्या कुणासोबत गेलीच नाही. मंदिराच्या दक्षिण दरवाज्याजवळ तीला पुरविण्यात आले. त्या ठिकाणी वृक्ष उगवला तो वृक्ष आजही अक्षय हिरवा असून संत कान्होपात्रेच्या भक्तीची साक्ष देत उभा आहे.

साहित्य

संत कान्होपात्रा यांचे दुर्मिळ ओवीबद्ध चरित्र उपलब्ध झाले आहेत. मंगळवेढा येथील बसविलग यांनी 238 वर्षांपूर्वी 36 ओव्यांमध्ये कानोपात्रा यांचे आत्मचरित्र मांडले. जुन्या हस्तलिखितांचे अभ्यासक आणि संग्राहक मंजुळ यांना मंगळवेढा येथे कान्होपात्रा यांचे हे ओवीबद्ध चरित्र सापडले आहे. तेथील धार्मिक ग्रंथांचे संकलन करणाऱ्या एका व्यक्तीकडे हे छोटेखानी बाड उपलब्ध झाले आहे. मात्र ज्यांच्याकडे हे चरित्र आढळून आले आहे, त्यांनी आपले नाव प्रसिद्ध करू नये अशी इच्छा मंजुळ यांच्याकडे प्रदर्शित केली आहे.

महाराष्ट्राच्या संत परंपरेतील मंदियाडीमध्ये कान्होपात्रा या महत्त्वाच्या संत असून सकल संत गाथामध्ये कान्होपात्रा यांचे 23 अभंग आहेत. बसविलग यांचे काव्य रचना हे चरित्र शके 1699 म्हणजे 1777 मधील आहे. पूर्वी मंगळवेढा या भागाला ‘मंगळा’ असे म्हटले जात असे. केवळ छत्तीसगडमध्ये कान्होपात्रा यांचे चरित्र काव्यबद्ध केले आहे. हे काव्य देवनागरी लिपीमध्ये असून सुमारे दोनशे पन्नास वर्षांपूर्वीच्या मराठी भाषेचे वैभव त्यातून दिसते.

कान्होपात्राचे वर्णन

कान्होपात्रा विषयीचे जे साहित्य सापडले, त्या अभंगांच्या ओव्यांमध्ये कान्होपात्राचे वर्णन अशी केली आहे की, सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेली कान्होपात्रा यांच्या सौंदर्याचे वर्णन सुरुवातीच्या ओविमध्ये आहे. त्यांनी सेवन केलेल्या पानाच्या विड्याचा रस गळ्यातून जाताना दिसे. नृत्यकला आणि गंधर्व गायनामध्ये पारंगत कानोपात्रा मातेसह पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनास आलेल्या भीमेच्या पात्रांमध्ये त्यांना कान्हो म्हणजेच कृष्णाची आठवण झाली. कृष्णाचे स्वरूप असल्याने कान्होपात्रा यांनी विठ्ठलाची भक्ती केली. बिदरच्या बादशहाने मागणी घातल्यानंतर देवाच्या पायी मस्तक ठेवून कान्होपात्रा गतप्राण झाली.

समाधी

जेव्हा तिच्या सौंदर्याची किर्ती, गुण पसरले. तेव्हा बिदरच्या राजाने तिला आपल्याकडे आणावयास सेवक पाठवले. तिने जाण्यास नकार दिला व तिने ईश्वराला आठवणीत विठ्ठलासमोर आपले प्राण सोडले ती म्हणाली, आपले मृत शरीर राजाकडे घेऊन जाऊ दे, पण जिवंतपणी मी राजाकडे जाणार नाही. अशी प्रतिज्ञा तिने केली व ते तिने पूर्ण करून दाखवले. पंढरपूरच्या मंदिराच्या दक्षिणेस तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जिथे तिचे शरीर पुरवले तेथे एक विलक्षण वृक्ष उगवला आहे. आजही तो वृक्ष तेथे उभा असून भाविक यात्रेकरू त्याला भक्तिभावाने वंदन करतात.

अशाप्रकारे भगवंत आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येतात. भगवंत केवळ खऱ्या भक्तीचा भुकेला असतो. देवाकडे जात-पात हा धर्म नसतो, सर्वांसाठी समानतेने वागत असतात. म्हणून आपणही अशीच सेवा व भक्ती केली तर देवही आपल्या हाकेला धावून येईल  “Sant Kanhopatra “संत कान्होपात्रा विषयी माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा”. आणि हो आमच्या आई मराठी Aai MarathiBatmi Marathi

Leave a Comment