Alasa ha mansacha Shatru aahe essay in Marathi language आळस हा माणसाच्या अंगी असलेला एक दुर्गुण आहे. आळशी वृत्तीमुळे माणसाला कोणतीही कामे करावीशी वाटत नाही, त्यामुळे अनेक कामे खोळंबून राहतात. शिस्तबद्ध जीवन यशाची चव एका वेगळ्या प्रकारे चाखते. बेशिस्त माणसाचे यशदेखील सदोष असते. आळस ही जीवनातील सर्वात मोठी बेशिस्त आहे. सध्याचे जग पैशाच्या मागे धावते आहे. धनाचे वास्तव रूप अचूक प्रकारे समजून घ्यायचे असेल तर स्वत: बेशिस्तीपासून मुक्त झाले पाहिजे व स्वत:चा पैसा वैचारिक दारिद्र्यापासून मुक्त ठेवायला हवा. पैसा कमावण्यासाठी दोन गोष्टींची गरज पडते. पहिली विशिष्ट मानसिक परिस्थिती आणि दुसरी गोष्ट परिश्रम.
आपली मानसिकता पाच पाय-यांशी जोडा. या पाच टप्प्यांत पैसा मिळवा, थेट उडी मारण्याचा प्रयत्न चुकीचे मार्ग आणि गुन्हेगारीच्या सुरुंगातून घेऊन जाऊ शकतो. आपली मनोवृत्ती शिक्षणाशी संलग्न करा. ही पहिली पायरी आहे. दुसरी पायरी आहे पात्रता. कारण सुशिक्षित माणूस योग्य असेलच असे काही नसते. तिसरी पायरी आहे परिश्रम आणि चौथी सद्विचार तर पाचवी पायरी आहे आत्मबल. संपत्तीच्या बळासोबत आत्मबल नसेल तर ते अशांतीला कारणीभूत होईल.
माणसाचा उजवा भाग तर्क, गणित व भर टाकण्याच्या समीकरणांवर चालतो. डावा भाग जास्त विचार करीत नाही, तो संवेदना व भावनांशी ताळमेळ राखतो. मानसशास्त्रज्ञ सांगतात की पुरुष बहुतांशी उजव्या बाजूच्या भागाने जीवन जगतात, तर स्त्रिया डाव्या भागाने. यामुळे स्त्री व पुरुषातील वैचारिक ताळमेळ बिघडतो. दोन्हींचे संतुलन साधले तर मानसिकता स्वस्थ बनते. त्यामुळे पैसा या चार स्वस्थ मनोवृत्तींशी संलग्न असायला हवा.
आपण नेहमी सांसारिक, स्वास्थ्योन्मुख किंवा आध्यात्मिक उन्नतीसाठी कार्यान्वित होतो तेव्हा तो येण-केण-प्रकारेण आपल्याला त्याच्या जाळ्यात ओढतो. उदाहरणार्थ, जेव्हा आपण एखादे पुसतक घेऊन ते वाचू लागतो त्याचवेळी काही वेळातच मन विचलित होऊ लागते आणि आलस झोपेच्या रुपात आपल्या डोळ्यांवर स्वार झालेला असतो, याचा परिणाम असा होतो की, आपण पुस्तक बाजूला ठेवून झोपी जातो.
शरीराला चांगले ठेवण्यासाठी आम्ही संध्याकाळी संकल्प करतो की, सकाळी उठल्यावर व्यायाम करू, योगा करू आणि पहाटे 4.30 ला गजर होतो, तेव्हा आपण झोपेच्या तंद्रीत असल्याने आपल्या मनाची समजूत काढून गजर बंद करून झोपी जातो आणि म्हणतो एवढी घाई का आहे, एक तासभर आणखी झोपूया. एक तास झोपायच्या नादात सकाळी सात वाजता जाग येते. हाच आळस आहे, ज्याच्या चक्रात अडकल्याने आपले सर्व संकल्प हे संकल्पच राहतात.
आळशी लोकांचा भाग्यावर प्रचंड विश्वास असतो. आपले अपयश आणि पुरुषार्थ हिनतेला हे लोक असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी असे म्हणत समर्थन देतात. खरं पाहता आळशी व्यक्ती प्रत्येक काम नशीबावर सोडून परिश्रमांपासून दूर पळते आणि जीवनात काहीही न करता जीवन जगण्यात धन्यता मानत असते.
आळस हा असा राजयोगी रोग आहे, ज्याचा रोगी हा कधीही बरा होत नाही असं कथाकार मुंशी प्रेमचंद म्हणतात. आळसाचे दुष्परिणा फक्त विद्यार्थी जीवनातच नाही तर जीवनाच्या अंतापर्यंत भोगावे लागतात हे कटू सत्य आहे, आळसामुळे दारिद्र्य येते. एवढं सगळं होऊनही आपण आळस झटकून त्याला कायमचे दूर करत नाही, तर याच्या दुष्परिणामांसाठी आपणच जबाबदार असणार आहोत. जीवनात यश आणि अपयश ह्या दोन्ही गोष्टी वेळेवर अवलंबून आहेत.
कारण जीवनात प्रत्येकाजवळ एक सीमित वेळ उपलब्ध आहे, ते अश्या प्रकारे, आपण गरीब असो की श्रीमंत एका दिवसाला फक्त 24 तासांची वेळच आपल्याला मिळते, आपण या वेळेचा सदुउपयोग कश्या प्रकारे करतो हे आपल्यावर अवलंबून आहे. जर आपण वेळेचा योग्य वापर केला तर आपण जीवनात यशस्वी होणार आणि याच वेळेचा दुरुपयोग केला तर अपयशाचा सामना करावा लागेल. म्हणून वेळेचा सदुउपयोग करणे गरजेचे आहे.
Alasa ha mansacha Shatru aahe essay in Marathi language. आळस हा माणसाचा शत्रू आहे मराठी निबंध तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.