Anna Hazare information in Marathi language – अण्णा हजारे हे भारतीय जन आंदोलनातील चळवळीतील ज्येष्ठ समाजसेवक आहेत. त्यांनी भ्रष्टाचाराविरोधी आपले उपोषण बर्याचदा मांडले आहे. त्यांनी भ्रष्ट राजकारण आणि प्रशासन या विरुद्धही जनआंदोलन छेडले होते.
संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी चळवळी सुरू केल्या व प्रशासकीय कामकाजाची माहिती सामान्य लोकांनाही मिळावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. तर पाहू या अण्णा हजारे यांच्या विषयी माहिती.
जन्म
अण्णा हजारे यांचा जन्म 15 जून 1937 साली महाराष्ट्रातील भिंगार जिल्हा अहमदनगर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बाबुराव आणि आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. त्यांचे आजोबा हे सैन्यात होते. तसेच त्यांचे वडील हे भिंगार मधील एका औषधालयात नोकरीस होते. त्यानंतर ते नोकरी सोडून राळेगण सिद्धी येथे आपल्या मूळ गावी आले. अण्णांना एकूण सात भावंडं होती. मुलांचा खर्च झेपावत नसल्यामुळे यांच्यामुळे त्यांच्या वडीलांवर कर्ज झाले होते. त्यानंतर अण्णा मुंबईला आपल्या आत्याकडे गेले.
जीवन व शिक्षण.
अण्णा यांनी आपले सातवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर ते फुलांच्या दुकानात काम करू लागले. त्यानंतर त्यांनी स्वतःचे फुलाचे दुकान काढले. पण त्यामध्ये त्यांचा गुजारा होत नसे म्हणून ते सैन्यात वाहनचालक म्हणून 1963 मध्ये दाखल झाले. भारत पाकिस्तान युद्ध दरम्यान खेमकरण येथील हवाई हल्ल्यात त्यांच्या युनिटमधील सर्व सहकारी मारले गेले. परंतु अण्णा हे किरकोळ जखमी झाले होते त्यानंतर आपल्या गावची दैन्यावस्था पाहून त्यांनी सैनिकी सेवेतून स्वच्छ निवृत्ती घेतली.
गावातील दुरुस्ती
अण्णा आहे आपल्या गावाकडे परत आल्यानंतर गावाकडे शेतकऱ्यांच्या व्यथा, पाण्याचे दुर्भिक्ष, भ्रष्ट कर्मचारी अधिकारी यामुळे इथे अस्वस्थ होत. त्यांना आत्महत्या करावीशी वाटे. विवेकानंदाच्या ‘कॉलिंग टू द फॉर नॅशनल’ या ग्रंथामुळे त्यांना नवचैतन्य मिळाले. त्यांनी स्वतःची जमीन गावातील शाळेच्या वसतिगृहासाठी दिले. तसेच निवृत्तीनंतर मिळालेले सर्व रक्कम गावातील यादवबाबा मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी वापरून गावकऱ्यांचा विश्वास संपादन केला. गावाच्या सामाजिक परिवर्तनासाठी गावातील व्यसनाधीनता दूर करण्यासाठी दारूबंदीचा कार्यक्रम यशस्वीरीत्या हाताळला.
भ्रष्टाचार विरोधी कार्य
अण्णा यांनी सामाजिक परिवर्तनाला बरोबरच भ्रष्ट राजकारणी आणि प्रशासन या विरुद्ध अण्णांनी जनआंदोलन छेडले होते. कार्यकर्त्यांची फळी उभी केली. संपूर्ण महाराष्ट्रात व्यापक चळवळ सुरू केली. प्रशासकीय कामकाजाची माहिती सामान्य लोकांना मिळावी प्रशासन कामात पारदर्शकता असावी. यासाठी त्यांनी माहितीचा अधिकार, ग्रामसभांचे समीकरण, दप्तर दिरंगाई, बदल्यांचा कायदा या संदर्भात प्रदीर्घ संघर्ष केला आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी उपोषणा मोर्चे आंदोलने या मार्गांचा अवलंब केला. माहितीच्या अधिकारासाठी त्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर बारा दिवस अखंड उपोषण केले. त्यांच्या अथक परिश्रमामुळे अखेर माहितीचा अधिकार प्रथम महाराष्ट्र व नंतर देशात सर्वांत झाला. त्यांच्या भ्रष्ट आचार विरोधी जन आंदोलनामुळे अनेक भ्रष्ट नेत्यांना राजीनामा द्यावा लागला आणि चारशे अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती.
सामाजिक कार्य
अण्णांनी बरीच सामाजिक कार्यही केलेले आहे. त्यामध्ये दारूबंदी तसे जन आंदोलने चळवळी उभारल्या आहेत. सैन्यातील नोकरी सोडल्यावर अण्णांनी गावातील युवकांना संघटित केले व तरुण मंडळाची स्थापना केली. यादवबाबा मंदिरात सर्वांना दारू न पिण्याची शपथ देण्यात आली मद्यपींना मंदिराच्या खांबाला बांधून तरुणांनी फटकेही मारले व त्याचाच परिणाम म्हणून व्यसनाधीन राळेगण व्यसनमुक्त झाले.
आंदोलने आणि चळवळी
अण्णा हजारेंनी भ्रष्टाचाराचा निपटारा करण्याकरिता वेळोवेळी आंदोलने केली व प्रसंगी कारावासही स्वीकारला. 1980 पासून आतापर्यंत अण्णा हजारे यांनी 16 उपोषणे केली आहेत. प्रत्येक वेळी सरकारला त्यांच्यासमोर नमते घ्यावे लागले. त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या. अण्णाची 16 पैकी 13 उपोषणे ही महाराष्ट्र सरकारच्या विरोधातील तर 3 उपोषणे केंद्र सरकारच्या विरोधात करण्यात आली आहेत. यांतील 15 वे आणि 16 वे उपोषण हे जनलोकपाल विधेयकासाठीचे होते. अण्णांनी एकूण आतापर्यंत 116 दिवसापेक्षा जास्त काळ उपोषण केले आहे. अण्णाच्या या उपोषणांमुळे आणि आंदोलनामुळे महाराष्ट्र सरकारला 450 अधिकार्यांवर कारवाई करावी लागली तर 6 मंत्र्यांना आपले पद गमवावे लागले होते.
पहिले आंदोलन
आपले पहिले उपोषण 1979 मध्ये केले. शासकीय यंत्रणेकडून हेळसांड होऊन गावास वेठीस धरणार्या प्रशासनाविरुद्ध गावातील शाळेला मान्यता मिळण्यासाठी, या आंदोलनादरम्यान अहमदनगर जिल्हा परिषदेसमोर अण्णांनी 1980 साली
पहिले यशस्वी उपोषण केले. अण्णांच्या उपोषणाने एका दिवसातच सरकारी यंत्रणेला झुकविले. अण्णांची मागणी मान्य झाली. अण्णांच्या सक्रिय सामजिक चळवळीच्या जीवनातला हा पहिला प्रसंग होता. सत्याग्रहाच्या आणि अहिंसेच्या मार्गाच्या लढ्याने अण्णांना पहिल्यांदाच मोठे यश मिळविता आले होते. उपोषण केले, प्रशासन झुकले आणि शाळेला मान्यता मिळाली. ‘नापासांची शाळा’ म्हणून ही शाळा प्रसिद्ध आहे.
दुसरे उपोषण
अण्णांनी दुसरे उपोषण 7 जून 1983 सुरु केले. ग्राम विकास योजना अंमलात आणत असताना सरकारी अधिकार्यांची टाळाटाळ आणि निवडणूक यांच्या विरोधातील हे आंदोलनही यशस्वी झाले. दोषी अधिकार्यांवर कारवाई करण्यात आली. ग्राम विकास योजनांच्या मंजुरीबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकार्यांनी लिखित आश्वासन दिले. याचा परिणाम म्हणून ग्रामविकासात सरकारचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला.
तिसरे उपोषण
20 ते 24 फेब्रुवारी 1989 या काळात केले होते. हे उपोषण शेतकर्यांकरिता होते. गावाला पाणी पुरवठा करण्याचे धोरण व व ठिबक सिंचन अनुदान धोरण यांत फार त्रुटी होत्या. त्या त्रुटी दूर करण्यासाठी हे उपोषण होते. सरकार पुन्हा झुकले 4 कोटी रुपये मान्य करत सिंचन योजनांना मंजुरी देण्यात आली.
चौथे उपोषण
अण्णांना पुढील 9 महिन्यातच पुन्हा पुकारावे लागले. शेतकर्यांना सिंचनासाठी वीज पुरवठा मिळवून देण्यासाठीच्या प्रश्नासाठी 20 ते 28 नोव्हेबर या दरम्यान 1989 मध्ये ते पुकारण्यात आले होते. हे उपोषण 9 दिवस चालले. अखेरीस सरकारवर दबाव वाढला. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांनी लिखित आश्वासन दिले. वीज पुरवठ्यासाठी 250 केव्हीच्या लाईन आणि इतर सुविधांसाठी 5 कोटी रुपये मंजूर झाले. दरम्यानच्या काळात अण्णांच्या कामाला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळू लागली होती.
पाचवे उपोषण
सन 1994 साली अण्णांनी वन विभागातील योजनामधील भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करण्याच्या निर्णय घेतला. सरकारशी अनेक वेळा संपर्क करुनही सरकारकडून कोणतही उत्तर मिळत नव्हते. अण्णाचे हे भ्रष्टाचाराविरोधातील पहिले उपोषण. महाराष्ट्र दिनी म्हणजे 1 मे रोजी या उपोषणाला सुरुवात झाली.
सहावे उपोषण
अण्णांनी 1996 साली केले. त्यातही त्यांना यश आले. राज्यातील शिवसेना-भाजपा युती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात ते करण्यात आले. 20 नोव्हेंबर 1996 रोजी त्यांनी उपोषणाला सुरुवात केली होती. मंत्र्याविरोधातील आरोप असल्याने लढाई मोठी होती. त्यामुळे उपोषणाचा कालावधीही वाढणार होता. उपोषण 12 दिवस चालले. आतापर्यंतचे अण्णाचे हे सर्वात मोठे उपोषण होते. 3 डिसेंबर 1996 ला युतीच्या दोन मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले. जलसंधारण मंत्री होते महादेव शिवणकर आणि पाणी पुरवठामंत्री शशिकांत सुतार.
अण्णांनी 1997 सालीसुद्धा उपोषण केले. हे उपोषण दहा दिवस चालले. त्यावेळेस युती सरकारमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा उठवताना त्यांनी युती सरकारमधील समाज कल्याणमंत्री बबनराव घोलप यांना राजीनामा द्यावा लागला. तर 18 अधिकार्यांना निलंबित करण्यात आले.
पुरस्कार
2007 जिट गिल मेमोरिअल अवॉर्ड वर्ल्ड बॅंक
2005 मानद डॉक्टरेट गांधीग्राम रूरल युनिवेर्सिटी
2003 इंटिग्रिटी पुरस्कार ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल
1998 केअर इंटरनॅशनल पुरस्कार केअर (संस्था)
1997 महावीर पुरस्कार
1996 शिरोमणी पुरस्कार
1992पद्मभूषणराष्ट्रपती
1990 पद्मश्रीराष्ट्रपती
1989 कृषिभूषण पुरस्कार महाराष्ट्र सरकार
1986 इंदिरा प्रियदर्शिनी वृक्षमित्र पुरस्कार भारत सरकार
2015 मोहन धारिया राष्ट्रनिर्माण इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
अशाप्रकारे अण्णा हजारे यांनी समाज कार्य आपल्या जिवाची पर्वा न करता शेतकऱ्यांसाठी व इतर समाजातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी कार्य केलेले आहे.Anna Hazare information in Marathi language. “अण्णा हजारे ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”