essay on kabaddi in Marathi भारतामध्ये अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात. जसे की खो-खो, क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, टेनिस त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचा आपला एक आवडता गेम किंवा खेळ असतो. कोणाला क्रिकेट आवडते तर कोणाला खो-खो आवडते, तर कोणाला फुटबॉल आवडतो. परंतु कबड्डी हा खेळ महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय खेळ आहे. हा खेळ भारतीय उपखंडात खेळला जाणारा सुद्धा आहे. हा महाराष्ट्राच्या मातीतला एक रांगडा खेळ आहे. या खेळापूर्व भारतामध्ये हुतूतू या नावाने ओळखला जात होता.
प्रत्येकाला आपले शरीर निरोगी सुदृढ ठेवण्यासाठी खेळाची नितांत गरज असते आणि आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी कबड्डी हा खेळ अतिशय उपयुक्त आहे. कबड्डी हा माझा आवडता खेळ आहे. खेळाचे सर्व नियम आमच्या क्रीडा शिक्षकांनी समजावून दिले आहेत. कबड्डी या खेळाची सुरुवात आम्ही नाणेफेक करून करतो. नाणेफेक यशस्वी होणाऱ्या संघाला आम्ही चढाई किंवा अंगण निवडण्याचा मान देतो. कबड्डी खेळताना ‘कबड्डी’ या शब्दाचा सलग व स्पष्ट उच्चार आम्ही करतो. कबड्डी खेळताना चढाई करणार्या जर विरुद्ध संघातील खेळाडू ला स्पर्श करून मध्ये रेषीला स्पर्श केला तर त्याला एक गुण मिळतो. कबड्डी या खेळात खूप बारकावे आहेत. कबड्डीमध्ये मध्यरेषा, टच लाईन, लांबी खूप महत्त्वाची असते. कबड्डीसाठी काही साहित्य लागत नाही. हा खेळ खेळताना खेळाडूंमध्ये वेगळाच उत्साह आपल्याला दिसून येतो. या खेळामध्ये स्वतःच्या अंगाला टच न होऊ देता, स्वतःचे रक्षण करायचे कसे हे शिकता येते आणि या खेळामुळे शरीराच्या सफलतेचे ही लक्षणे आपल्याला दिसून येते.
आपल्या देशात बरेच खेळ खेळल्या जातात. कित्येक खेळांची सुरुवात सुद्धा भारतातच झालेला आहे. खेळामुळे शरीराचा व्यायाम तसेच शरीराची हालचाल होत असते आणि ते मैदानी खेळांच्या माध्यमातून होत असल्यामुळे कबड्डीसारख्या खेळाचे फार महत्त्व आहे. आज-काल व्यायामाच्या अभावामुळे बऱ्याच प्रमाणात आपल्याला दुष्परिणाम दिसून येतात. या दुष्परिणामांपासून जर युवा पिढीला दूर ठेवायचे असेल तर त्यांना मैदानी खेळ आणि खेळाचं महत्त्व कळायला हवा आपल्या भारतातील असाच एक पूर्वीपासून चालत आलेला खेळ म्हणजे कबड्डी. परंतु आज काल धावतयुग आले आणि मैदान पडताना आपल्याला दिसून येऊ लागले आहेत. युवा पिढी हातात मोबाईल घेऊन तासन् तास एकाच ठिकाणी एकाच जागेवर बसू लागली. त्याचे सुद्धा बरेच दुष्परिणाम आपल्याला दिसू लागले आहेत. मेंदू दगड झाला आणि शरीर अस्ताव्यस्त वाढत गेलं.
कबड्डी या खेळाची सुरुवात कधी आणि कशी झाली. या बाबतीत आपल्याला खात्रीने सांगता येत नसलं तरी काही तज्ञांच्या मते, महाभारताच्या काळात अभिमन्यूने या खेळाची सुरुवात केली असे म्हटले जाते. काही जणांच्या मते कबड्डी हा खेळ खूप जुना आहे. आपल्या भारतातील प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या नावांनी आणि वेगवेगळ्या पद्धतीने हा खेळ खेळला जातो. महाराष्ट्रात हुतूतू… बंगालमध्ये हुडूडू… चेन्नईत चेडूयुडू… केरळमध्ये वंडीवडी… उत्तर भारतात कोनवरा, साबरगण्णा… पंजाब राज्यात झाबर गंगा, सौची पक्की अशा वेगवेगळ्या नावांनी आणि वेगवेगळ्या पद्धतीने खेळला जात होता. पण या खेळाला सर्वदूर एकच नाव असावा याकरिता जर कोणी प्रयत्न केले असतील तर ते महाराष्ट्र राज्याने केले आहे. अनेक भाषांची ही प्रादेशिकता जाणून भारतात हा खेळ कबड्डी या नावाने ओळखला जातो. त्याचे श्रेय आपल्या महाराष्ट्र राज्याला द्यायला हवं मराठी माणसांनी प्रयत्नपूर्वक कबड्डी खेळातल्या विविधतेतून आपल्या राज्यात एकता निर्माण केली.
अखिल महाराष्ट्र शिक्षण परिषदेचे अधिवेशन 1931 महाराष्ट्रातील अकोला येथे पार पडले. भारतातील देशी खेळांचे नियम ठरविण्यासाठी या अधिवेशनात एक समिती नेमण्यात आली होती. भारतातील देशी खेळांचे नियम या समितीने तयार केले.
ज्याप्रमाणे खेळणे हे आरोग्यासाठी खूपच उपयोगाचे असते. तो खेळ कोणताही असो, तो तंदुरुस्ती आणि ताजेपणा निर्माण करतो. ज्या विद्यार्थ्यांना आयुष्यात यशस्वी व्हावे असे वाटते, त्यांनी मैदानी खेळ खेळायला जावे. एकीकडे क्रिकेट, टेनिस, फुटबॉल, हॉलीबॉल इत्यादी विदेशी खेळ आहेत. हे खेळ महागडे आहेत. त्यांना पैशाची आवश्यकता असते तर दुसरीकडे कोणताही खेळ खर्च न करता खेळता येणारे खेळ म्हणजे कबड्डी, खो-खो, कुस्ती इत्यादी. मला इतर खेळांच्या तुलनेत कबड्डी हा खेळ अतिशय प्रिय आहे. कबड्डी खेळण्यासाठी जास्त जागेची आवश्यकता नसते. कमी जागेत देखील हा खेळ खेळता येतो.
लहान मैदानात मधोमध एक रेषा मारली जाते. खेळाडूंना दोन संघात वाटले जाते. प्रत्येक संघामध्ये आठ खेळाडू असतात. दोन्ही संघ रेषेच्या दोन्ही बाजूंना उभे राहतात. आधी कोणत्याही एका बाजूचा खेळाडू दुसऱ्या बाजूला जातो. विरुद्ध पक्षाच्या खेळाडूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. तर दुसऱ्या संघातील खेळाडूंनी त्याला पकडून घेतली तर तो आऊट धरला जातो. पण जर तो कोणत्याही एका किंवा एकापेक्षा जास्त खेळाडूंना हात लावून रेषेच्या पलीकडे घेऊन गेला तर त्यांच्याद्वारे स्पर्श झालेले सर्व खेळाडू बाद होतात.
कबड्डी हा खेळ खेळण्यामागे खूप सारी कारणे आहेत. या खेळाला खेळण्या साठी जास्त जागेची गरज पडत नाही. घराच्या मोकळ्या जागेत देखील आपण हा खेळ खेळू शकतो. याला खेळण्यासाठी काहीही साहित्य खर्च लागत नाही. आरोग्यासाठी हा खेळ खूप चांगला आहे. या खेळाडूंना निरंतर पळत रहावे लागते. ज्यामुळे शरीराचा चांगला व्यायाम होऊन जातो. मला असं वाटते की कबड्डीला शाळा व कॉलेजमध्ये अनिवार्य करायला पाहिजे. विदेशी खेळ खेळण्याची भारतीय खेळांना महत्त्व जास्त द्यायला पाहिजे. आपण सर्वांनी कबड्डी या खेळाला अधिक प्रोत्साहन दिले पाहिजे. हा खेळ जास्त प्रमाणात मातीमध्ये खेळला जातो. जर सगळीकडे लोक क्रिकेट सारखे खेळ खेळत राहिले तर मातीतील पारंपरिक कबड्डीला विसरून जातील म्हणून सर्वांनी काळाची पावले उचलून वेळेवर उपाययोजना केली पाहिजेत.
कबड्डी खेळ खेळण्याच्या मागे अनेक प्रकारचे लाभ होतात. त्यामध्ये आपल्याला जास्त पैशांची गरज भासत नाही. कबड्डी खेळ आणि शरीर सुदृढ व निरोगी राहते. निर्णयक्षमता सुद्धा वाढते. कबड्डी हा खेळ भारत देशाचा लोकप्रिय खेळ आहे. परंतु त्याचबरोबर हा खेळ भारताच्या शेजारील देश म्हणजेच नेपाळ बांगलादेश श्रीलंका आणि पाकिस्तान या देशांचा पण लोकप्रिय खेळ आहे. बांगला देशाचा राष्ट्रीय खेळ आहे.
आमच्या लहानपणी शाळेतून संध्याकाळी घरी आल्यानंतर हा खेळ खेळायला जात होतो. आम्ही ग्राउंडवर कबड्डी खेळ असो. खेळत असताना खूप मजा यायची. आनंद व्हायचा खूप मजा यायची. आपला मित्र दोन गटात वाटून घ्यायचा आणि दोन गटांमध्ये विभाजन करून घ्यायचं. त्या खेळामध्ये कोणतेही नियम नसायचे फक्त नियम व अटी हीच असायची की रेषेच्या पलीकडे जाऊन कोणालाही हात लावून परत आपल्या गड्याकडे धावत यायचं.
खेळ खेळताना दोघांचे भांडणही व्हायचे मग भांडण झाले की, त्यामध्ये एखादा मित्र मध्यस्थी करायचं आणि नंतर पुन्हा खेळायला सुरुवात करायचो. जेव्हा विरुद्ध गटावर मी चालून जात होतो, तेव्हा दोन गडी बाद करूनच परत येत होतो. मला कबड्डी या खेळाची लहानपणापासूनच खूप आवड आहे त्यानंतर मी हा खेळ शाळेतही मित्रांसोबत खूप खेळलो. तुम्ही हा खेळ खेळा आपल्या मित्रांसोबत आनंद घ्या व आपले शरीर सुदृढ ठेवा आनंदी ठेवा.
“तुम्हाला essay on kabaddi in Marathi कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”