Mother Teresa information in Marathi language | मदर टेरेसा

Mother Teresa information in Marathi language मदर टेरेसा ह्या एक समाजसेविका आहे. त्यांनी त्यांच्या काळात कुष्ठरोग रुग्णालये अनाथालय महिला अपंग वृद्धांची आश्रम ग्रुप हे फिरते दवाखाने इत्यादी प्रकारच्या शाळा संस्था उभ्या केल्या.

Mother Teresa information in Marathi language | मदर टेरेसा

भारतात स्थायिक झालेल्या अँल्बेनियन महिला व शांततेच्या नोबेल पारितोषिकाच्या मानकरी ठरल्या आहेत. तिचा जन्म रोमन कॅथलिक अँल्बे-नियन कुटुंबात स्कॉपये यूगोस्लाव्हिया येथे झाला. टेरेसाचे वडील किराणामालाचे दुकानदार होते आणि आई शेतकर्‍याची मुलगी होती.

जन्म

मदर तेरेसा यांचा जन्म 26 ऑगस्ट 1910 ला युरोपमधील मॅसिडोनिया या देशात झाला. त्यांचे वडील निकोला बोयाजू एक साधारण व्यवसायिक होते. आठ वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. यामुळे मदर तेरेसा, त्यांची मोठी बहीण आणि भावाच्या संगोपनाची जबाबदारी त्यांच्या आईवर आली. वडिलांच्या मृत्यूनंतर  व त्यांच्या कुटुंबाला आर्थिक समस्यांमधून दिवस काढावे लागले.  मदर तेरेसा या लहानपणापासून अतिशय सुंदर, अभ्यासू व मेहनती होत्या.

बालपण व शिक्षण

अभ्यासासोबत त्यांना गाणे गाण्याच्या देखील छंद होता. त्यांच्या आईने लहानपणापासून त्यांना चांगली शिकवण दिली होती. त्यांच्या आईचे म्हणणे होते कि, जे काही मिळेल ते सर्वांना वाटून खावे, स्वतःसाठी तर सर्वच जगतात पण दुसऱ्यांच्या सेवेसाठी जे आपले आयुष्य लावतात ते खरे महान असतात. मदर टेरेसा यांचे बालपण सुखात गेले. स्कॉपथे येथील सरकारी शाळेत शिक्षण घेत असताना ती सेवाकार्यांत रस घेत असे. अठराव्या वर्षी सिस्टर्स  ऑफ लॉरेटो या आयरिश संघात तिने प्रवेश केला. नंतर एक वर्ष डब्लिन आयर्लंड येथे तिने इंग्रजी भाषेचा अभ्यास केला. त्यानंतर तिने जोगीण बनून पूर्णतः मिशनरी कार्यास वाहून घेतले. त्या कार्यानिमित्त ती भारतात कलकत्ता येथे लॉरेटो मिशनच्या सेंट मेरी हायस्कूलमध्ये 1929 मध्ये भूगोल विषयाची अध्यापिका म्हणून रूजू झाली.

सामाजिक कार्य

स्पॅनिश योगिनी संत टेरेसाच्या नावाने तिचे नामान्तर झाले आणि पुढे मातृवत सेवाधर्मामुळे ती ‘मदर तेरेसा’ या नावाने ओळखली जाऊ लागली. तिने 19 वर्षे अध्यापन केले. ती प्राचार्य झाली, अध्यापन करीत असताना शाळेजवळील मोती झील झोपडपट्टी-तील गरिबांच्या दीन जीवनाचे तिला अनेक वेळा दर्शन होत असे.  त्यामुळे तिच्या मनात अपंग, पददलित, शोषित, पीडित, दीनदुबळे इत्यादींची सेवा करावी, हे विचार येत. किंबहुना हीच ईशसेवा होय,  असे विचार तिच्यात दृढमूल झाले. एकदा दार्जिलिंगला जात असताना ‘तू गरिबांच्या सेवेला लाग’ असा जणू दैवी संदेशच तिला मिळाला.  तेव्हा शैक्षणिक जबाबदारीतून मुक्त होऊन तिने केवळ निराश्रित व दीनदुबळे यांच्या सेवेस आमरण वाहून घेतले.

या कार्यासाठी तिने पोपची परवानगी मिळविली आणि कलकत्ता येथे मिशनरिज ऑफ चॅरिटी ही सेवाभावी संस्था स्थापन केली. पुढे या संस्थेचे रूपांतर संघात झाले. तिच्या विचारांशी सहमत असणार्‍या स्त्री-अनुयायीही कार्यकर्त्या म्हणून तिला लाभल्या. सुरूवातीस समाजातील उच्चभ्रू लोकांकडून तेरेसासह सेवाभावी महिलांची खूप हेटाळणी व अवहेलना झाली. टेरेसाला तर लोक सेंट ऑफ द गटर्स म्हणत. तथापि या टीकेला न जुमानता तिने सेवाकार्य अखंड चालू ठेवले. विशेषतः मृत्युशय्येवरील व्यक्तीस अन्न, वस्त्र व निवारा या प्राथमिक गरजांबरोबर सहानुभूती, सांत्वन व प्रेम यांची नितांत गरज असते, हे टेरेसाने जाणले आणि इतरांनाही दाखवून दिले.

संस्थेच्या जोगिणी गटारात, उकिरड्यात व इतरत्र टाकून दिलेल्या उपेक्षित मुलांचे मातृप्रेमाने संगोपन करू लागल्या. मुलांसाठी तिने स्वतंत्र अनाथ आश्रम काढले. तसेच बेवारशी, निर्वासित, निराश्रित व रोगीपीडित मरणोन्मुख व्यक्तींसाठी 1952 मध्ये होम्स फॉर द डायिंग डेस्टिट्यूट्स (निर्मल हृदय) हे आधार आश्रम स्थापन केले.

1964 मध्ये टेरेसाने पश्चिम बंगालमध्ये कुष्ठगृहाची स्थापना केली. या लोकांची सेवा करण्यात ती स्वतःस कृतार्थ मानू लागली. कारण त्यांची सेवा म्हणजे येशूचीच सेवा होय, अशी तिची धारणा आहे. ती स्वतःस ख्रिस्ताची विनम्र दासी मानत असे. टेरेसा यांच्या कार्याचा काळानुसार व्याप वाढला आणि कुष्ठरोग रूग्णालये, अनाथालये, महिला-अपंग- वृद्धांची आश्रमगृहे, फिरते दवाखाने, मरणोन्मुखांसाठी आधारगृहे, शाळा इ. विविध संस्था भारतात व भारतेतर देशांत पसरल्या. तेव्हा कार्यकर्त्यांची उणीव भासू लागली. या संस्थांत 1962 पर्यंत फक्त सेविकांनाच प्रवेश होता. परंतु टेरेसाने मिशनरी ब्रदर्स ऑफ चॅरिटी ही वेगळी संघटना स्थापन करून पुरूष सेवकांना त्यात प्रवेश दिला. या संघात 2000 जोगिणी व 400 ब्रदर्स कार्य करतात.

मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या शाखा व उपशाखा जगभर 52 देशांत प्रसृत झाल्या असून एकूण 227 ठिकाणी संस्थेची सेवाकेंद्रे आहेत. भारतात व इतर देशांत संस्थेने चालविलेल्या 98 शाळा, 425 फिरती रूग्णालये, 102 कुष्ठरोग उपचार केंद्रे, 28 शिशुभवने, 48 अनाथा-लये व 62 आश्रमगृहे आहेत. महाराष्ट्रात पुणे, औरंगाबाद, विलेपार्ले या ठिकाणीही सेवा केंद्रे आहेत. मुंबई येथे आशादान नावाचे स्वीकार- गृह 1976 मध्ये सुरू करण्यात आले. त्यात शिशुभवन, निर्मल हृदय व रूग्णांची सेवा या तिन्ही शाखा एकत्र केल्या आहेत. या संस्था-साठी लागणारा खर्च विविध देणग्यांतून तसेच तेरेसाला मिळालेल्या पारितोषिकांच्या रक्कमेतून करण्यात येतो.

1946 मध्ये त्यांनी गरीब, बिमार आणि असहायांची सेवा सुरू केली. 7 ऑक्टोंबर 1950 मध्ये त्यांना चैरीटी साठी मिशनरी बनवण्याची परवानगी मिळाली. सुरुवातीला या संस्थेत 12 कर्मचारी नन होते. पण आताच्या काळात 4000 पेक्षा जास्त नन या संस्थेत आहेत. या संस्थेद्वारे अनाथाश्रम, नर्सिंग होम, वृद्धाश्रम या सारख्या सेवा संस्था सुरू करण्यात आल्या. त्यामुळे त्यांची किर्ती कोलकत्यात खूप वेगाने पसरली.

पुरस्कार व सन्मान

मदर टेरेसा यांच्या सेवाकार्याची दखल घेऊन 1979 चे शांततेचे नोबेल पारितोषिक तिला दिले. तसेच 43 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानसन्मान लाभले.

मागसाय-साय पारितोषिक 1962,

पोपचे शांतता पारितोषिक (1971),

नेहरू पुरस्कार ( 1972 ),

पद्मश्री देशिकोत्तमा, नॉर्वे लोकपारितोषिक   (1979), भारतरत्न (1980) इ. महत्त्वाची व मानाची आहेत.

विविध मान्यवर विद्यापीठांनी तिला डॉक्टरेट ही सन्मान्य पदवीही दिली आहे.

‘ऑर्डर ऑफ मेरिट’ हा अत्युच्च ब्रिटिश पुरस्कार,

राणी दुसरी एलिझाबेथ हिने 24 नोव्हेंबर 1983 रोजी तिच्या मानवतेच्या श्रेष्ठ सेवेबद्दल दिला.

मदर तेरेसाचे विचार स्फुटलेखांद्वारे ए गिफ्ट फॉर गॉड (1975) या पुस्तकात संकलित केले आहेत.

मदर टेरेसा अनमोल विचार :

एकटेपणा सर्वात मोठी गरिबी आहे.

प्रेम हे प्रत्येक ऋतूत येणारे फळ आहे आणि प्रत्येक व्यक्ती याला प्राप्त करू शकतो.

शांतता ही चेहऱ्यावरील एका हास्याने सुरू होते.

लहान सहान गोष्टी मध्ये इमानदार रहा, कारण याच्याने तुमची शक्ती वाढते.

शिस्त ही ध्येय आणि उपलब्धते मधील पूल आहे.
जर आपल्या मनाला शांती नाही तर याचा अर्थ आहे की आपण विसरलो आहोत की आपण एक दुसऱ्यासाठी बनलेले आहोत.

प्रेम कधीही मोजून दिले जात नाही ते फक्त दिले जाते.
साधे पणाने जागा.

जिथे जाणार तिथे प्रेम पसरवा. जो पण तुम्हाला भेटेल तो खुश होऊन जायला हवा.

जर तुम्ही 100 लोकांना जेवू घालू शकत नसाल तर एकालाच खाऊ घाला.

जे जीवन दुसऱ्यासाठी जगले नाही ते जीवन नाही.

आपण सर्व परमेश्वराच्या हातातील एका पेनाप्रमाणे आहोत.

तुम्ही किती दिले हे महत्त्वाचे नाही, पण देताना तुम्ही किती प्रेम दिले हे महत्त्वाचे आहे.

सुंदर लोक नेहमी चांगले नसतात. पण चांगले लोक नेहमी सुंदर असतात.

दया आणि प्रेम हे शब्द लहान असू शकतात पण वास्तव मध्ये त्यांची प्रतिध्वनी अनंत आहे.

तुम्ही जगात प्रेम पसरवण्यासाठी काय करू शकतात, घरी जा व सर्वांना प्रेम करा

मदर टेरेसा मृत्यू

मदर टेरेसा यांना उतरत्या वयात किडनीची समस्या निर्माण झाली. 73 वर्षाच्या वयात त्यांना पहिल्यांदा हृदय विकाराच्या झटका आला. या नंतर 5 सप्टेंबर 1997 मध्ये त्याचा मृत्यू झाला. मृत्यूच्या 6 महिण्याआधीच त्यांनी मिशनरीचे अध्यक्षपद सोडून दिले.

Mother Mother Teresa information in Marathi language. मदर टेरेसा यांच्या विषयी माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आमच्या अद्भुत मराठी Adbhut Marathi आणि योगा टिप्स Yoga Tips  या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

Leave a Comment