Nivrutti Nath information in Marathi language समाजात आपल्या मुलांना मान सन्मान मिळावा यासाठी श्री विठ्ठल पंत कुलकर्णी आणि त्यांची पत्नी रुक्मिणी यांनी आत्महत्या केली. संत निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई हे चारही भावंडे आई-वडिलांपासून दुरावली. तेव्हा निवृत्ती महाराज हे सर्वात मोठे असल्यामुळे त्यांनी या तिघांवर ही आपल्या मायेची चादर पसरविली. त्यांना सुसंस्कार दिलेत. वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक मानले जातात. या चारही भावंडांचा समाजाकडुन खूप छळ झाला.
संत निवृत्तीनाथ | Nivrutti Nath information in Marathi language
जुन्या रुढी, परंपरा यांनी ग्रासलेल्या समाजाला त्यांनी नवीन मार्ग दाखविला. संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज हे वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक आहेत. म्हणून श्री त्रंबकेश्वर हे वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ मानले जाते. तर चला मग आपण संत निवृत्तीनाथ बद्दल माहिती पाहूया.
जन्म
संत ज्ञानदेवांचे बंधू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ यांचा जन्म शके 1195 माघ वद्य प्रतिपदेला म्हणजेच दिनांक 29 जानेवारी 1195, वार सोमवारला झाला.
जीवन कथा
निवृत्तीनाथांचे वडील श्री विठ्ठलपंत हे मूळचे श्री क्षेत्र आपेगाव येथे राहणारे होते. तीर्थयात्रेच्या निमित्ताने ते त्रंबकेश्वर वरून आळंदी येथे आले असताना, श्री सिद्धोपंत आपल्या गावात आलेल्या अतिथींची विचारपूस करावी या हेतूने त्यांनी श्री विठ्ठल पंत यांची भेट घेतली व त्यांना आपल्या घरी निवास करण्यास विनंती केली. त्याच दिवशी रात्री त्यांना आपली कन्या रुक्मणीचा विवाह श्री विठ्ठल पंतांशी करण्याबाबत ईश्वरी दृष्टांत प्राप्त झाला. परंतु विठ्ठलपंतांना हे मान्य नव्हते. त्याच रात्री विठ्ठलपंतांना देखील याच कन्येशी विवाह करावयाचा असा ईश्वर दृष्टांत झाला व त्यांचा विवाह संपन्न झाला.
त्यानंतर विठ्ठल पंत रुक्मिणी यांचा संसार आळंदी क्षेत्रांमध्ये चालू होता. पण त्यांना संतती मात्र होत नव्हती. श्री विठ्ठलपंत हे वैराग्यवाण असल्यामुळे त्यांचे मन संसारात रमत नव्हते. म्हणून ते सतत पत्नीकडे संन्यास घेण्याविषयी परवानगी मागत असत. शेवटी एक दिवस उद्वेगाने त्यांना जा म्हणून सांगितले असता, श्री विठ्ठलपंतांनी काशीक्षेत्री जाऊन संन्यास आश्रमाचा स्वीकार केला व ते नृसिंहआश्रम स्वामींकडे त्यांच्या मठामध्ये राहू लागले. परंतु इकडे माता रुक्मिणी अतिशय दुःखी अवस्थेमध्ये व्रतस्थ जीवन जगू लागले. रोज इंद्रायणीचे स्नान सिद्धेश्वराचे दर्शन व सुवर्ण पिंपळाच्या प्रदक्षणा हा त्यांचा नित्य नियमच झाला होता.
मात्र काशीक्षेत्री श्री विठ्ठलपंत चैतन्य आश्रम या नवीन नावाने मठामध्ये राहत होते. तेव्हा एक दिवस स्वामी नृसिंहआश्रम स्वामींना भगवान विश्वेश्वर यांचा दृष्टांत झाला. या चैतन्याची भार्या त्याची घरी वाट पाहत आहे. त्या वेळी स्वामींनी स्वतः आळंदी येथे माता रुक्मिणीची भेट घेतली व तिला काशीक्षेत्री नेऊन पुन्हा दोघांची भेट घडवून आणली. त्या दोघांना संसारात प्रवेश करण्याची आज्ञा दिली. त्याप्रमाणे श्री विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणी यांचा संसार पुन्हा सुरू झाला.
पण त्यावेळी आळंदी मधील समाजसुधीर यांना धर्ममार्तंडाना हे मान्य झाले नाही. समाजातील लोकांनी श्री विठ्ठलपंत याना वाळीत टाकले व श्री विठ्ठलपंत सिद्ध बेटामध्ये राहू लागले. यानंतर त्यांना श्री निवृत्तीनाथ, श्री ज्ञानदेव, श्री सोपान आणि मुक्ताबाई अशी चार अपत्ये झाली. यामध्ये श्री निवृत्तीनाथ हे शंकराचे, श्री ज्ञानदेव हे विष्णूचे व सोपानदेव ब्रह्मदेवाचे अवतार असून मुक्ताबाई आदिशक्ती आहेत. अशा प्रकारे सिद्ध बेटांमध्ये राहत असताना श्री विठ्ठलपंतांना त्रंबकेश्वर येथे जाऊन ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करायची इच्छा झाली व ती सर्वांना घेऊन त्रंबकेश्वर आले.
त्यावेळी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या परिसरामध्ये सर्वत्र घनदाट जंगल होते. त्यावेळी ही प्रदक्षिणा करणे म्हणजे अतिशय अवघड कार्य होते. तेव्हा जंगलामधून जात असताना एक वाघ त्यांच्या मागून आला. त्यावेळी त्यांची पळापळ झाली व त्यांच्यात ताटातूट झाली. तेव्हा तो वाघ श्री निवृत्तीनाथांच्या मागे लागला. श्री निवृत्तीनाथ पळत पळत एका गुहेमध्ये शिरला असता, तो वाघ निघून गेला. ती श्री गहिनीनाथांची गुफा होती. श्री गहिनीनाथ हे नाथ संप्रदायाचे श्री विष्णूचे अवतार होते. ते श्री निवृत्तीनाथ यांवर अनुग्रह करण्यासाठी तेथे त्यांची वाट पाहत होते. तेथे त्यांनी श्री निवृत्तीनाथांना ‘नाथ’ संप्रदायाची दीक्षा दिली व पुढील कार्यासाठी त्यांना आज्ञा दिली. तेथे श्री विठ्ठलपंत आणि परिवार श्री निवृत्तीनाथांची वाट बघत याच क्षेत्रामध्ये थांबले होते.
श्री निवृत्तीनाथांनी परत आल्यावर घडलेला सर्व प्रसंग आपल्या माता पित्याला सांगितला. हे सर्व ऐकल्यावर श्री ज्ञानेश्वर महाराजांनी श्री निवृत्तीनाथ महाराजांचे शिष्यत्व पत्करले आणि तेथूनच त्यांच्या कार्यास सुरुवात झाली. पुढे श्री विठ्ठलपंत यांनी आपल्या मुलांचे मौंजीबंधन व्हावे यासाठी धर्मपीठ आकडे परवानगी मागितली असता, आळंदी येथील धर्मसभेने त्यांना उभयतांना देहांत प्रायश्चित्त घेण्यास सांगितले व या भावंडांना पैठण येथील शुद्ध पत्र आणण्यास सांगितले. त्यासाठी हे चारही भावंडे पैठण क्षेत्रांमध्ये आले. तेथे धर्म सभेपुढे आल्यावर तेथील ब्राह्मणांना त्यांचे महत्त्व समजले नाही.
म्हणून त्यांनी या भावंडाची अवहेलना केली. तेव्हा तेथील विद्वानांचा अहंकार मोडून काढण्यासाठी श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या आज्ञेने श्री ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद बोलविले व सर्व जगाला स्वतःची ओळख करून दिली. यानंतर नेवासा येथे जाऊन श्री निवृत्तीनाथ महाराजांनी श्री ज्ञानेश्वर महाराजांना गीतेचा अर्थ मराठीत सांगण्याची आज्ञा केली व या ठिकाणी श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ‘ज्ञानेश्वरी’ व ‘अमृतानुभव’ या दोन्ही ग्रंथांची रचना केली.
त्यानंतर ती चारही भावंडे आळंदी क्षेत्रांमध्ये आली. येताना रस्त्यामध्ये पैठण क्षेत्रापासून त्यांच्याबरोबर असलेला रेडा श्रीक्षेत्र आळे येथेच मरण पावला. त्याची समाधी श्रीक्षेत्र आळे येथे आहे. आळंदीमध्ये आल्यानंतर त्यांना कोणत्याही शुद्धीपत्राची गरज नव्हती पण श्री वीसोबाचा अहंकार काही जात नव्हता.
त्यावेळी मांडे भोजनाची इच्छा श्री निवृत्तीनाथ यांनी व्यक्त केली व पाठीवर मांडे भाजण्याच्या निमित्ताने श्री ज्ञानेश्वर महाराजांनी विसोबा खेचर यांना अनुग्रह दिला. त्याचप्रमाणे चांगदेव महाराजांनाही भिंती चालवून चांगदेव-पासष्टीच्या द्वारा अनुग्रह दिला. या चारही भावंडांनी आपल्या अभंग रचनेच्याद्वारे पंढरपूरची वारी करून सर्व समाजाचे प्रबोधन केले. यामध्ये श्री निवृत्तीनाथांनी 357 अभंगाची रचना केली आहे. अशा प्रकारे वारकरी संप्रदायाची सुरुवात श्री निवृत्तीनाथ महाराजांनी बसवली व श्री ज्ञानेश्वर महाराजांनी या संप्रदायाचा पाया रचला.
बालपण
त्यांच्या वडिलांनी म्हणजेच विठ्ठलपंतांनी संन्यास घेऊन परत गृहस्थाश्रम स्वीकारला. संन्यासाची मुले म्हणून तत्कालीन समाजाने या भावंडांचा फार छळ केला. त्यांना लहानपणा पासूनच पूर्व संस्कारांमुळे उत्तम प्रबोध झाला होता. निवृत्तीनाथांनी लहान वयातच प्राप्त झालेले ज्ञान ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई आपल्या लहान भावंडांना दिले. ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांचे मोठेपण तथार्थपणे जाणले होती. त्यांनी ज्ञानदेवांना गीतेवर टीका करण्याची टीका भाषण लिहिण्याची प्रेरणा दिली.
निवृत्तीनाथांचे चारशे अभंग उपलब्ध आहेत. त्यामधील काही अभंग योगपर, अद्वैतपर व काही कृष्णभक्तिपर, विठ्ठलभक्ती परीही आहेत. ज्ञानेश्वरांनी आपल्या गुरुचा गौरव आपल्या ‘ज्ञानदेवी’ या ग्रंथात अनेक ठिकाणी अतिशय भावपूर्ण शब्दात केला आहे.
समाधी
शेवटी श्री निवृत्तीनाथ यांनी आपल्या हातांनी भगवान पांडुरंगाच्या उपस्थितीत श्री ज्ञानेश्वर महाराजांना कार्तिक वद्य त्रयोदशी शके 1218 रोजी आळंदी येथे संजीवन समाधी दिली. त्यानंतर मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी शके 1218 रोजी सोपान महाराजांना श्री क्षेत्र सासवड येथे संजीवन समाधी दिली. त्यानंतर वैशाख वद्य दशमीच्या दिवशी तापी तीरावर भुसावळ येथील अलाहाबाद येथे श्री मुक्ताबाई आकाशात गुप्त झाल्या.
त्यानंतर संत निवृत्तीनाथांचे ब्रह्मगिरीच्या सानिध्यात ज्येष्ठ वद्य शके 1219 रोजी संजीवन समाधी घेतली. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करत असताना, योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह संत निवृत्तीनाथांना लाभला. तो गुरुप्रसाद त्यांनी धाकटे बंधू संत ज्ञानेश्वरांना दिला. यानंतर अखिल विश्वाला मानवतेचा समतेचा संदेश देणारा वारकरी संप्रदाय स्थापन झाला. संत निवृत्तीनाथ यांनी ज्येष्ठ वद्य द्वादशी येथे संजीवन समाधी घेतल्याचे वर्णन संत नामदेव महाराज यांच्या अभंगात आहे.
Sant NivruttiNath information in Marathi language तुम्हाला आमचा लेख संत निवृत्तीनाथ विषयी कसा वाटला त्या मला कमेंट करून नक्की