Pradushan Essay in Marathi Language आज आपण प्रदूषण या विषयावरती निबंध पाहणार आहोत. कारण प्रदूषणामुळे वेगवेगळे आजार उद्धभवतात हे आपल्याला माहित आहेत किंवा आजूबाजूचे वातावरण सुद्धा हे दूषित झाल्याचे आपल्याला दिसते. प्रदूषण म्हटले की, आपल्यासमोर येते ती म्हणजे जलप्रदूषण, वायू प्रदूषण आणि हवा प्रदूषण. प्रदूषणाचे तीन भागात विभाजन केले गेले आहे. दिवसेंदिवस प्रदूषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहे. त्यामुळे पृथ्वीवरचे वातावरण हे विषारी बनत आहे.
प्रदूषण निबंध 100 शब्दांत | Pradushan Essay in Marathi Language
अशा वातावरणामुळे आरोग्यावर मोठा परिणाम दिसून येत आहे. त्यांची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. मोठ-मोठी शहर वेगवेगळ्या आजारांनी व मोठ्या प्रदूषणाच्या समस्यांमुळे वेढले गेले आहेत. वातावरणातील सर्व हवा म्हणजेच वायूही प्रदूषणाने भरलेली आपल्याला जाणवते. त्यामध्ये श्वासही घेताना आपल्याला गुदमरल्यासारखं वाटतं. त्यामुळे हृदय आजार, दमा यांसारख्या वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण दिल्या जात. प्रदूषण हे एक प्रकारचा व्हायरस म्हणजेच वातावरणात पसरणारा विष आहे. याचा प्रभाव आपल्याला हळूहळू जाणवून येतो. दिवसेंदिवस ते आपल्या जीवनाला नष्ट करीत आहे. प्रदूषण नैसर्गिक वातावरणाला दूषित करून पर्यावरणात अस्थिरता निर्माण करते.
आजचे युग हे विज्ञान युग म्हणून ओळखले जाते. जसे विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रगत होत आहे, तसतसे त्याचे दुष्परिणाम सुद्धा आपल्याला पृथ्वीवर जाणवून येत आहेत. प्रदूषण हा असाच तंत्रज्ञानाचा एक दुष्परिणाम आहे असे म्हटल्यास हरकत नाही. पृथ्वीवर आज तीन प्रकारचे प्रदूषण आपल्याला दिसून येते. विकसनशील देश जसे भारत थायलंड पाकिस्तान आणि इतर अनेक देश प्रदूषणाच्या समस्येला सामोरे जात आहेत. नैसर्गिक स्त्रोतांचा योग्य वापर न केल्यामुळे आणि अधिक तांत्रिक माहिती माहित नसलेले देश आपल्या नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यास असमर्थ आहेत.
याचा परिणाम नागरिकांना अशुद्ध पाणी पिल्याने अनेक रोग होतात आणि ही रोग त्यांच्या आरोग्याला खूप मोठी हानी करून बसतात, म्हणून अशुद्ध पाणी हा प्राणघातक शत्रूच आहे. याचे विभाजन आपण जलप्रदूषणा मध्ये करू शकतो. मोठमोठ्या कारखान्याचे दूषित पाणी हे समुद्रात सोडले जाते. त्यामुळे समुद्राच्या पाण्यात वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक द्रव्य सोडून समुद्रातील जीवजंतूंना मोठ्या प्रमाणावर हानी सोसावी लागते. अनेक मासे मृत्युमुखी पडून समुद्राच्या किनाऱ्यावर येऊन पडतात. त्यांच्या जीवनावर या रासायनिक द्रव्यांचा खूप मोठा प्रभाव पडतो. तसेच कारखान्यातून निघणारा धूर हा सुद्धा वायू प्रदूषण वाढण्यास मदत करतो.
मोठमोठ्या शहरांमध्ये प्रत्येकाजवळ आपापल्या वाहने मोटरसायकल चार चाकी वाहने व इतर वाहने असल्यामुळे तेथे वायू प्रदूषणाचा सामना करावा लागतो. विकसित झालेल्या शहरात तर औद्योगीकरणाचा हा दर खूप अधिक असतो. यामुळे निसर्ग आपले संतुलन वाचवण्यात यशस्वी ठरते व या वाहनांमधून निघणारा धूर तसेच कारखान्यांच्या धुराड्यातून निघणारा कार्बन डाय ऑक्साईड वायू वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी करतो आणि ऑक्सिजनच्या अभावी लोकांना किंवा इतर प्राण्यांना सुद्धा श्वासा संबंधी रोग उद्भवतात प्रदूषण अधिक झाल्याने हृदयविकाराचा झटका सुद्धा येतो.
प्रदूषणामध्ये Pradushan Essay in Marathi Language आणखीन एक प्रकार आहे, तो म्हणजे ध्वनी प्रदूषण ध्वनी प्रदूषण हेसुद्धा वायू प्रदूषणाऐवढे घातक असते. मोठमोठ्या शहरांमध्ये वाहनांचे हॉर्न आणि कारखान्यांमुळे ध्वनी प्रदूषण वाढते. बहिरेपणा मानसिक गोंधळ आणि मानसिक असंतुलन हे ध्वनी प्रदूषणाचे काही दुष्परिणाम आहेत. आज ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी कायदे तयार करण्याची आवश्यकता आहे. मोठ्या आवाजात स्पीकर बँड वाजविण्यावर बंदी आणायला हवी.
इमारतीच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारा यांत्रिक हा थोड्या कॉंक्रीट मिश्रक यंत्रे बुलडोजर सुतारकाम लोहारकाम करणाऱ्या मशीन व कारखान्यातील विविध यंत्र, रेडिओ ध्वनीक्षेपक, रस्त्यावरील लोक व फेरीवाले यांसारखे शहरी घटक सातत्याने गोंगाट निर्माण करीत असतात. या गोंगाटामुळे कित्येक लोकांचा मानसिक तोल घसरतो. मनस्ताप वाढतो. पुष्कळांना तर हृदयविकार सुद्धा जळतो. श्रवणेंद्रिय बधिर होतात व त्याचा परिणाम काही वर्षानंतर माणूस पूर्णपणे बहिरा होतो.
सतत गोंगाट ते वातावरणात राहिल्यामुळे माणसांना मज्जा विकृती भीषणता उद्वेग भावना, विभंग, शोभ सर्वसामान्य व चिंता, मनोवृत्ती लहरी बद्दल, उच्चरक्तदाब, मळमळ, तीव्र डोकेदुखी पोटशूळ, दमा, निद्रानाश, नपुसकता व विविध शरीरक्रियात्मक विकार जडतात. हा गोंगाट प्रतिदिन सारखाच वाढत गेला तर तीस वर्षानंतर हाच गोंगाट प्राणघातक ठरू शकतो.
धोक्याची सूचना कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधक व्हर्न नुडसेन यांनी अनेक प्रयोगांनंतर केली आहे. प्रयोगशाळेत ठेवलेल्या अन उंदरांचा 175 डीसीबल तीव्रतेच्या आवाजामुळे मृत्यू ओढवतो, असे निश्चितपणे आढळून आले आहे. तसेच 100 डीसीबल तीव्रतेच्या आवाजाच्या परिसरात काही आठवडे राहिल्यास त्यांना योग्य संरक्षण जर मिळाले नसेल तर अशा कारखान्यातील कामगार शेवटी बहिरे होतात. त्यांना हृदयविकार, नाक, कान आणि घसा यांचे विकार मोठ्या प्रमाणावर होतात.
तसेच विमानतळावरील जेट विमानाचे 115 डेसिबलपेक्षा अधिक तीव्रतेने आवाज पंधरा मिनिटानंतर आपत्तीची मुळे ठरतात. जीवनातील विमाने आवाजाचा वेग पार करताना वातावरणात आघात तरंग निर्माण करून 140 डेसिबलपेक्षा अधिक तीव्रतेचा आवाज उत्पन्न करतात. ही सर्व कारणे ध्वनी प्रदूषण निर्मित आहेत .
मनुष्य निसर्गाला विषारी करीत आहेत. जर मनुष्य स्वतः वेळीच सावध झाला नाही तर त्याचे दुष्परिणाम त्यालाच भोगावे लागणार आहेत व या दुष्परिणामांपासून त्यांना कोणीही वाचवू शकणार नाही. याव्यतिरिक्त दिवाळीच्या फटाक्यांची आतिषबाजी हे सुद्धा एक ध्वनि प्रदूषणाचे परिणाम आहे. यात वायुप्रदूषण सुद्धा होतो. दिवाळीच्या फटाक्यांचा आनंद घेत असताना एकीकडे हवा दूषित होते. मात्र यावरही सरकारने निर्बंध लावायला हवेत माणूस एक सुजाण नागरिक म्हणून त्याला स्वतःला समजायला पाहिजे. पृथ्वीवर वाढत जाणार असलेल्या या प्रदूषणाच्या अनेक समस्या असल्या तरी या समस्यांना आपण आळा घालण्याचा प्रयत्न केल्यास ती प्रदूषण कमी होऊ शकते. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त झाडे लावा झाडे वाचवा स्वच्छता राखावी लागेल.
प्रदूषणाचे परिणाम
जल प्रदूषण water pollution वायू प्रदूषण व ध्वनी प्रदूषणाचे आपल्याला परिणाम दिसून येतात. कचरा व जलप्रदूषण याचे खूप मोठे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतो. जेव्हा विषारी पदार्थ तलाव, ओढा, नद्या, समुद्र व इतर जलाशयांमध्ये टाकला जातो तेव्हा पाण्यामध्ये विरघळून ते पाणी दूषित करतात किंवा तळाशी जाऊन कुजतात व पाण्यावर अवक्षेपित होतात. याचा परिणाम जलप्रदूषण होतो. त्यामुळे पाण्याच्या गुणवत्तेचा ह्रास होतो व जलपर्यावरण प्रणालीवर मोठ्या प्रमाणात हानी होते. प्रदूषक पदार्थ जमिनीखाली देखील जाऊन बसू शकतात.
यामुळे भूजल पातळीवर दुष्परिणाम होऊ शकतो. जलप्रदूषण हे फक्त मानवासाठीच नाही तर जनावरे मासे आणि इतर पक्षांसाठी सुद्धा विनाशकारी आहे. प्रदूषित झालेले पाणी हे पिण्यासाठी यात खेळण्यासाठी शेती आणि उद्योग यांसाठी देखील वापरणे अयोग्य आहे त्याच्यामुळे सरोवरे आणि नद्यांच्या सौंदर्यात्मक गुणवत्तेचा नाश होतो व त्यामुळे वेगवेगळे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात.
याच बरोबर आपल्याला रासायनिक प्रदूषण सुद्धा पहायला मिळते.
रासायनिक प्रदूषण chemical pollution हे वेगवेगळ्या कारणांमुळे उद्भवते जसे घरगुती निर्मूलन, औद्योगिक निचरा, समुद्रातील अपघात व फैलाव तेलाच्या रिगमधून होणारी गळती, खाण कामातील गडती, शेतीसंबंधी निस्सारण ही काही रासायनिक प्रदूषणाची उदाहरणे आहेत. प्रत्येक विचार करायला लावण्यासारखे बाब म्हणजे हे स्थाई प्रदूषण घटक आहेत. असे पदार्थ समुद्री अन्नसाखळ्यामध्ये प्रवेश करतात आणि शेवटी ह्या साखळीतून समुद्री खाद्य पक्ष काम मध्ये वाढत्या प्रमाणात प्रवेश करतात. स्थायी प्रदूषण घटकांमध्ये कीटकनाशके जशिकी डीडीटी आणि औद्योगिक रसायने तसेच सध्याच्या जनसामान्यात यांचा समावेश आहे.
जे रासायनिक पदार्थ समुद्रात सोडले जातात. ते रासायनिक पदार्थ माशांच्या पोटात जातात व तेच मासे मानवी समाजामध्ये खाल्ले जातात. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. रसायनिक प्रदूषणाची विल्हेवाट सुद्धा लावता येते. रासायनिक खतांच्या ऐवजी जैविक खतांचा वापर. पॉलिथिनच्या ऐवजी कागदाचा वापर केला तर ही रासायनिक प्रदूषण कमी होऊ शकते. सर्वांना जलप्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्यास सांगावे. जास्तीत जास्त झाडे लावा व ते जगवा. झाडांमुळे ऑक्सिजनची पातळी वाढेल व वायू प्रदूषण कमी होईल.
“तुम्हाला आमचा प्रदूषण निबंध Pradushan Essay in Marathi Language कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”