Sant Damaji Pant Information in Marathi Language – मंगळवेढा हे एक तालुक्याचे स्थान आहे आणि तेथे अनेक संत होऊन गेले आहेत. संत कान्होपात्रा, संत चोखोबा, संत गोपाबाई आणि त्यातीलच एक संत दामाजीपंत हे आहेत. संत दामाजीपंत हे एक मंगळवेढा गावातील थोर संत होऊन गेलेत. पंधराव्या शतकातील दामाजीपंत हे विठ्ठलाचे भक्त होते आणि ते मंगळवेढ्याचे रहिवाशी होते. मंगळवेढा या गावामध्ये दुष्काळ पडला होता आणि त्या दुष्काळामध्ये लोक अन्नासाठी पाण्यासाठी त्रासले होते. दामाजी पंथ यांनी धान्याची कोठारे गावकऱ्यांसाठी खुले केले होते. मात्र त्यांना राजाने बंदी बनवण्यासाठी पाठवले असता, ईश्वर पांडुरंगाने त्यांची जमानत घेतल्याचे आपल्याला दिसून येते. त्यांच्या विषयी माहिती पाहूया.
इतिहास
पंधराव्या शतकात होऊन गेलेले दामाजीपंत हे मंगळवेढा या गावचे रहिवासी होते. मंगळवेढा हे तालुक्याचे ठिकाण असून मंगळवेढ्याचे नाव चालुक्य सम्राट मंगलेशाच्या नावावरून पडले असा त्याचा संदर्भ आहे. दामाजीपंत हे बिदर येथील मोहम्मद शहाच्या दरबारात धन्याचे सेनापती होते. त्यांनी अब्दुल शहाशी झालेल्या लढाईत विजय मिळवल्यामुळे त्यांना खजिनदार पद देण्यात आले. त्यात हुशारी दाखवल्यामुळे त्यांची मंगळवेढ्याच्या मामलेदार पदी नेमणूक झाली. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला पण अंगच्या हुशारीमुळे त्यांना ती पदे मिळाली. शक 1376 मध्ये भयंकर दुष्काळ पडला. पुन्हा 1377 साली पाऊसही नाही झाला.
त्या पुढच्या वर्षात पण भीषण दुष्काळ पडला. जनता हवालदिल झाली. जनता भुकेने त्रासली, पाण्यासाठी तडफडत होती. दामाजीपंत हे राज्याचे महसूल अधिकारी होते. त्यांचे उदारमतवादी व शूर असे होते. पंढरपूर जवळील मंगळवेढे येथे राहत होते, तेथे सुद्धा विठोबाचे एक मंदिर आहे. एकदा एक ब्राह्मण दामाजी यांच्या घरी भिक्षा मागण्यासाठी आले. दामाजीपंत देशपांडे त्याला आपल्या घरी आमंत्रित करून आणि रात्रीचे जेवण दिले. ते अन्नधान्य पाहून ब्राह्मण दुःखाने खाली पडला आणि आपल्या भुकेलेल्या कुटुंबाच्या दुःखा विषयी त्या ब्राह्मणाने दामाजीपंत यांना सांगितले. नंतर दामाजीपंत यांनी त्यांना पंढरपुरात नेऊन सोडले व त्यांच्या कुटुंबासाठी अन्न पाठवण्याची सुद्धा आश्वासन दिले. दामाजीचे सेवक पंढरपुरातल्या ब्राह्मणाच्या कुटुंबासाठी दोन भारी धान्य देण्यासाठी गेले.
पण दुष्काळग्रस्त शहरातील लोकांनी धान्य पळवून लुटले. पंढरपुरातील इतर ब्राह्मणांची शिष्टमंडळ दामाजीकडे जाऊन त्यांची उपासमारीची समस्या सोडविण्यासाठी विनंती करत होते. दामाजींचा विचार असा झाला की, त्यांनी ते धान्याचे कोठार यांचे वाटप लोकांमध्ये केले. त्यामुळे ते उपासमारी पासून वाचतील असे त्यांचे मत होते. परंतु सुलतान यांना ते सहन झाले नाही व त्यांना शिक्षा देतील म्हणून त्यांनी असा विचार केला. की, आपला प्राण गेला तरी चालेल परंतु इतर लोकांचे जीव वाचतील म्हणून लोकांसाठी दोन शाही धन्याची कोठार भांडार उघडले. त्यांनी जात-पात किंवा उच्चनिच वर्गाच्याकडे दुर्लक्ष करून ते धान्याचे वाटप केले होते. ही माहिती सुलतानला त्याच्या एका सैन्याकडून मिळाले, तेव्हा परवानगीशिवाय दामाजीनी धान्य कसे वाटून घेतले.
यावर सुलतानला खूप राग येतो. तो खूप चिडतो, दामाजी कडून धान्य घेण्यासाठी पैसे परत करण्यासाठी किंवा दामाजीला बिदरला बंदी बनवण्यासाठी त्याने आपले सैनिक पाठवले. जेव्हा दामाजी सुलतानच्या भेटीसाठी निघतात. तेव्हा ते पंढरपूरात थांबण्यासाठी सैनिकांना विनंती करतात व विठोबाच्या मंदिरात जातात आणि देवाची उपासना करतात. ते विठोबाला म्हणतात की, त्याने सुलतानवर अन्याय केला आहे. परंतु आपल्या उदांत कृत्याचा परिणाम त्यांना भोगायला तयार आहेत आणि विठोबाची उपासना करून त्यांचे जीवन पूर्ण झाले असेही म्हणतात. दामाजीपंत हे बादशहा पर्यंत पोहोचले, तेव्हा बादशहाने त्यांना मिठी मारली. कारण त्यांनी जे धान्य विकले होते. त्या धान्याच्या बदल्यात पुणे एका महाराचे रूप घेऊन त्याबद्दल त्यांना पैसे दिले होते.
त्यांच्याविषयीची दंतकथा अशी आहे की, त्या प्रवासादरम्यान पांडुरंगाने दामाजीपंतांच्या विठू महार या नोकराचे रूप घेऊन बादशहाला सव्वा लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या मोहरा देऊन त्याची पावती घेतली. त्यामुळे दामाजीपंतांना बीदर दरबारात हजर करतात त्याचा सत्कार करून त्यांना बंधनमुक्त केले व तुमचे विठू महाराने पैसे पोहोचते केलेले बादशहाने सांगितले. श्री संत दामाजी पंत यांना आश्चर्य वाटले व कोण विठू महार आपणास सोडवण्यासाठी कोण आले होते? याबद्दल त्यांना आश्चर्य वाटले, पंढरीच्या पांडुरंगाचे त्यांना खात्री पटताच त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला व राहिलेले आयुष्य पांडुरंगाच्या सेवेत खर्च केले. प्राणाची पर्वा न करता दुष्काळ पिडीत लोकांची त्यांनी सेवा केली, म्हणून त्यांचे नाव अजरामर झाले.
समाधी
दामाजी पंत 1382 मध्ये मरण पावले. त्यांची समाधी सध्या स्वरूपात आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांचा धाकटा पुत्र राजाराम यांनी ते घुमट वजा छोटे मंदिर बांधले. त्यात विठ्ठल रखुमाई व दामाजीपंतांची मूर्ती स्थापन केली आहे.
मंगळवेढा येथे भौगोलिक विविधता आढळते. मंगळवेढ्यातील लोकांना सतत दुष्काळाचे चटके सहन करायला लागले आहेत. मंगळवेढ्याची जमीन ही बहुतेक करून जिराईत आहे. त्यामूळे त्यांना पावसाच्या पाण्यावरच पिके घ्यावी लागतात. प्रामुख्याने ज्वारी, बाजरी, करडई, हरभरा, सुर्यफूल ही पिके मुख्यता घेतली जातात. ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. मंगळवेढा तालुका ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे. मंगळवेढ्याच्या मालदांडी ज्वारीस जी.आय. मानांकन प्राप्त झाले आहे. तसेच मंगळवेढा तालुका हा ज्वारीचे कोठार असलेल्या ज्वारी वर संशोधन करणारे केंद्र आहे.
मंगळवेढा या गावात सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. प्रत्येक जण आपापला सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या मारोळी या गावांमधील दर्ग्याला मुस्लिमांबरोबर हिंदू भाविकही जातात. तसेच हिंदूच्या सर्व सणांमध्ये मुस्लिम बांधव आनंदाने सहभाग घेतात. नवरात्र महोत्सव मंगळवेढ्यात अतिशय आनंदाने साजरा केला जातो. जवळजवळ पंचवीस नवरात्र मंडळ हे या गावात आहेत. डेकोरेशन, हालते देखावे, सजीव देखावे पाहण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील लोक येतात. या तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी या गावांमध्ये सर्वधर्मीय दुर्गा माता नवरात्र महोत्सव तरुण मंडळ आहेत.
सर्व समाजाचे लोक एकत्रितपणे सण उत्सव साजरे करत असताना संत दामाजीपंत हे याच गावाचे रहिवासी होते येथेच शैक्षणिक संस्था म्हणजेच मंगळवेढा इंग्लिश स्कूल, दामाजी हायस्कूल, जवाहरलाल हायस्कूल, ताराबाई गर्ल्स हायस्कूल, नूतन विद्यालय इत्यादी प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. मंगळवेढे नगरीने अनेक गुणवंत विद्यार्थी दिले आहेत. काही विद्यार्थी विदेशात वास्तव्य करीत आहेत. मंगळवेढ्यात सन 2011 पासून सप्तर्षी प्रकाशन संस्था कार्यरत आहेत. ही संस्था अनेक विषयांवरील मराठी,हिंदी, इंग्रजी पुस्तके प्रकाशित करत आलेली आहे. येथे सप्तर्षी सामाजिक आणि शैक्षणिक संस्था सुद्धा आहे. मंगळवेढा येथे फार पूर्वीपासून शहर असले तरी येथे अतिशय महत्त्वाची काही ठिकाणं आहेत. त्यामूळे मंगळवेढ्याला नगरपरिषद आहेत. शहरांप्रमाणे या तालुक्यातील काही धार्मिक स्थळ आहेत. तसेच येथे पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, नगर परिषद कार्यालय सुद्धा आहेत. येऊन या गावाला भेट द्या व संत दामाजी यांच्या मंदिराला भेट द्या.
Sant Damaji pant information in Marathi language. “संत दामाजीपंत ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”