Subhas Chandra Bos information in Marathi Language | नेताजी सुभाष चंद्र बोस

Subhas Chandra Bos information in Marathi Language “तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा”. हे वाक्य ऐकताच आपल्या समोर सुभाष चंद्र बोस यांचे व्यक्तिमत्त्व उभे राहते.

Subhas Chandra Bos information in Marathi Language नेताजी सुभाष चंद्र बोस

भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी अनेकदा तुरुंगवासही भोगला. नेताजी सुभाषचंद्र बोस हे देशभक्त होते. तर त्यांच्या विषयी आपण माहिती पाहूया.

जन्म

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म ओडिशा राज्यातील कटक शहरात 23 जानेवारी, 1887 ला झाला. हे एका बंगाली हिंदू परिवारात जन्माला आले. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस व आईचे नाव प्रभावती असे होते. जानकीनाथ बोस हे कटक शहरातील प्रसिद्ध वकील होते. प्रभावती आणि जानकीनाथ बोस यांना एकूण चौदा अपत्ये होते. त्यात सहा मुली व आठ मुलं होते. तर सुभाषचंद्र बोस हे त्यांचे नवे पुत्र होते. सुभाष चंद्र बोस यांना त्यांचे भाऊ शरदबाबू हे खूप अधिक प्रिय होते. ते प्रभावती व जानकीनाथ ह्यांचे दुसरे पुत्र होते.

बालपण व शिक्षण:

लहानपणी सुभाष बाबू कटक मध्ये रॅवेन्शॉ कॉलिजिएट हायस्कूल शाळेत शिकत होते. त्या शाळेत त्यांच्या एका शिक्षकाचे नाव वेणीमाधव दास असे होते. वेणीमाधव दास आपल्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग जागवत होते. त्यांनी सुभाष मधली सुप्त देशभक्ती जागृत केली. वयाच्या पंधराव्या वर्षी सुभाष गुरूच्या शोधात हिमालयात गेले होते. गुरूचा हा शोध असफल राहिला, त्यानंतर स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून सुभाष त्यांचे शिष्य बनले.

महाविद्यालयात शिकत असताना, अन्यायाविरूद्ध लढण्याची त्यांची प्रवृती झाली. कोलकात्त्यातील प्रेसिडेंसी महाविद्यालयात इंग्रज प्राध्यापक हे भारतीय विद्यार्थ्यांशी उर्मटपणे वागत असे म्हणून सुभाष चंद्रबोसने महाविद्यालयात संप पुकारला होता. 1921 साली इंग्लंडला जाऊन सुभाष बॉस भारतीय नागरी सेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. परंतु इंग्रज सरकारची चाकरी करण्यास नकार देऊन त्यांनी राजीनामा दिला व ते मायदेशी परतले.

स्वातंत्र्यलढ्यात योगदान

सुभाषचंद्र बोस हे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक देशबंधू चित्तरंजन दास ह्यांच्या कार्याने प्रभावित झाले व त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा होती म्हणून त्यांनी दासबाबूंना पत्र लिहून त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली. रविंद्रनाथ ठाकूर ह्यांच्या सल्ल्यानुसार भारतात परतल्यानंतर ते सर्वप्रथम मुंबईला जाऊन महात्मा गांधींना भेटले आणि मुंबईत गांधींजी मणिभवन नामक वास्तुमध्ये वास्तव्य करत होते. 20 जुलै 1919 रोजी महात्मा गांधी आणि सुभाष चंद्र बोस सर्वप्रथम एकमेकांना भेटले.

गांधीजींनी देखिल कलकत्त्याला जाऊन दासबाबूं- बरोबर काम करण्याचा सल्ला दिला. मग सुभाषबाबू कोलकात्त्याला आले व दासबाबूंना भेटले दासबाबूंना पाहून त्यांना खूप आनंद झाला होता. त्या वेळी गांधीजींनी इंग्रज सरकारच्या विरोधात असहकार आंदोलन चालवले होते. दासबाबू बंगालमध्ये ह्या आंदोलनाचे नेतृत्व करत होते. त्यांच्याबरोबर सुभाषबाबू ह्या आंदोलनात सहभागी झाले.

स्वराज्य पक्षाची स्थापना

दास बाबूंनी काँग्रेसच्या अंतर्गत 1922 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना केले. विधानसभेच्या आतून इंग्रज सरकारला विरोध करण्यासाठी कोलकाता महानगरपालिकेचे निवडणूक स्वराज पक्षाने लढवून जिंकली स्वतः दासबाबू कोलकात्त्याचे महापौर झाले. त्यांनी सुभाषबाबूंना महानगरपालिकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी बनवले.

सुभाषबाबूंनी आपल्या कार्यकाळात महानगरपालिके -चे कामे करण्याची पद्धत बदलून टाकली. त्यांनी कोलकात्त्यातील रस्त्यांची इंग्रज नावे बदलून भारतीय नावे दिली. स्वातंत्र्यलढ्यात प्राणार्पण केलेल्या क्रांतिकारकांच्या कुटुंबियांना महापालिकेत नोकरी मिळू लागली.

काही काळानंतर सुभाषबाबू देशातील एक अग्रेसर युवा नेता म्हणून ओळखले जाऊ लागले. पंडित जवाहरलाल नेहरूंसह सुभाषबाबूंनी काँग्रेस अंतर्गत इंडिपेंडन्स लिगची स्थापना केली. 1928 आली जेव्हा सायमन कमिशन भारतात आले तेव्हा काँग्रेसने त्याला काळे झेंडे दाखवले होते. कोलकात्त्यात सुभाषबाबूंनी ह्या आंदोलनाचे नेतृत्व केले.

सायमन कमिशनला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने भारताच्या भावी घटनेचा आराखडा तयार करण्यासाठी आठ सदस्यांची समिती नेमली त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू ह्या समितीचे अध्यक्ष होते. तर सुभाषबाबू त्याचे एक सदस्य व या समितीने नेहरू रिपोर्ट सादर केला. 1928 साली कॉंग्रेसचे वार्षिक अधिवेशन पंडित मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली कोलकत्यात झाले. ह्या अधिवेशनात सुभाषबाबूंनी खाकी गणवेश घालून पंडित मोतीलाल नेहरूंना लष्करी पद्धतीने सलामी दिली.

गांधीजी त्याकाळी पूर्ण स्वराजच्या भूमिकेशी सहमत नव्हते. या अधिवेशनात त्यांनी इंग्रज सरकारकडून वसाहतीचे स्वराज्य मागण्यासाठी ठराव मांडला होता. मात्र सुभाषबाबू व पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांना पूर्ण स्वराजच्या भूमिकेशी तडजोड मान्य नव्हती. तिची मागणी मान्य करण्यासाठी इंग्रज सरकारला एक वर्षाची मुदत देण्याचे ठरले. जर एका वर्षात इंग्रज सरकारने ही मागणी मान्य केली नाही तर काँग्रेस पूर्ण स्वराजची मागणी करेल असे ठरले. इंग्रज सरकारने ही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे 1930 चे काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली लाहोरला झाले तेव्हा असे ठरवले गेले की, 26 जानेवारी स्वातंत्र्य दिन म्हणून पाळला जाईल.

सुभाषबाबू हे 26 जानेवारी, 1931 ला कोलकत्ता तिरंगी ध्वज फडकावत होते. एका विराट मोर्चेचे नेतृत्व करत असताना, पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात ते जखमी झाले. सुभाषबाबू तुरूंगात असताना, गांधींजीनी इंग्रज सरकारबरोबर तह केला व सर्व कैद्यांची सुटका करून घेण्यात आले. परंतु सरदार भगतसिंग व इतर क्रांतिकारकांची सुटका करण्यास इंग्रज सरकारने नकार दिला. भगतसिंगांची फाशी रद्ध करावी.

ही मागणी गांधींजीनी इंग्रज सरकारकडे केली. सुभाषबाबूंची इच्छा होती की, ह्याबाबतीत इंग्रज सरकार जर दाद देत नसेल तर गांधींजीनी सरकारबरोबर केलेला करार मोडावा पण आपल्या बाजूने दिलेला शब्द मोडणे, गांधींजीना मान्य नव्हते. इंग्रज सरकारने आपली भूमिका सोडली नाही व भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना फाशी देण्यात आले. भगतसिंगांना वाचवू न शकल्यामुळे सुभाषबाबू गांधींजी व काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर फार नाराज झाले. त्यानंतर 22 जुलै, 1940 रोजी मुंबई येथे सुभाषचंद्र बोस यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भेट झाली व दोघांमध्ये देशाचे स्वातंत्र्य आणि देशातील जातीयता व अस्पृश्यता यावर चर्चा झाली.

कारावास शिक्षा

सुभाषचंद्र बोस यांना आपल्या संपूर्ण जीवनात एकूण अकरा वेळा कारावास भोगावा लागला. सर्वप्रथम 1921 साली त्यांना सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागला. एक क्रांतिकारी पोलीस अधीक्षक चार्लस टेगार्ट यांना मारण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याने चुकून अर्नेस्ट डे नावाच्या एका व्यापाऱ्याला मारले. ह्यासाठी त्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली. गोपिनाथ फाशी गेल्यावर सुभाषबाबू जाहीरपणे जोरात रडले. त्यांनी गोपीनाथचा पार्थिव देह मागून घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. ह्यावरून इंग्रज सरकारने अर्थ लावला की सुभाषबाबू ज्वलंत क्रांतिकारकांशी संबंध तर ठेवतातच पण ते ह्या क्रांतिकारकांचे स्फूर्तीस्थान आहेत. ह्या कारणास्तव इंग्रज सरकारने सुभाषबाबूंना अटक केली व कोणताही खटला न चालवताच त्यांना अनिश्चित कालखंडासाठी म्यानमारच्या मंडाले कारागृहात बंदिस्त करून टाकले.

चित्तरंजन दास मृत्यू

5 नोव्हेंबर 1925 ला देशबंधू चित्तरंजन दास कोलकत्ता यांची यांची देहावसान झाले. सुभाषबाबूंनी त्यांच्या मृत्यूची बातमी मंडालेच्या कारागृहात रेडियोवर ऐकली. मंडाले कारागृहातील वास्तव्यात सुभाषबाबूंची तब्येत बिघडली त्यांना क्षयरोगाने ग्रासले परंतु इंग्रज सरकारने तरीही त्यांची सुटका करण्यास नकार दिला. सरकारने त्यांची सुटका करण्यासाठी अट घातली की, त्यांनी औषधोपारासाठी युरोपला यावे पण औषध उपचारानंतर ते भारतात कधी परत येऊ शकतात हे सरकारने स्पष्ट केले नाही. शेवटी परिस्थिती एवढी कठिण झाली की, कदाचित तुरूंगातच सुभाषबाबूंचा मृत्यू ओढवेल असे वाटू लागले.

इंग्रज सरकारला हा धोकाही पत्कारायचा नव्हता त्यामुळे सरकारने त्यांची सुटका केली. सुभाषबाबू औषधोपारासाठी डलहौसी येथे जाऊन राहिले. 1930 – 1940 मध्ये सुभाषबाबू कारावासात असताना, त्यांची कोलकत्याच्या महापौरपदी निवड झाली. त्यामुळे सरकारला त्यांची सुटका करणे भाग पडले. 1932 साली सुभाषबाबू पुन्हा कारावासात होते. ह्या वेळेस त्यांना अलमोडा तुरूंगात ठेवण्यात आले होते. तुरुंगात असताना त्यांची तब्येत आणखीन बिघडली. वैद्यकीय सल्ल्यानुसार सुभाषबाबू ह्यावेळी औषधोपारासाठी युरोपला जायला तयार झाले.

मृत्यू

जपानला जात असताना, त्यांच्या विमानाचा अपघात 18 ऑगस्ट 1945 रोजी झाला व ते विमान खाली कोसळले. त्यामध्ये नेताजी मृत्यूपासून सुखरूप सुटले की, नाही याबद्दल काहीही स्पष्ट झाले नाही. Subhash Chandra Bos information in Marathi language.
” सुभाषचंद्र बोस ही माहिती कशी वाटली, ते कॉमेंट करून नक्की सांगा.”

Leave a Comment