Visoba Khechar information in Marathi language आपल्या भारत देशाची भूमी ही पवित्र भूमी मानली जाते. कारण येथे वेगवेगळ्या संतांनी सांगितलेल्या रूढी, नीती, परंपरा व त्यांच्या पासून चालत आलेला वारसा हा भारत भूमीला लाभला आहे. असे एक संत होऊन गेले ते म्हणजे विसोबा खेचर.
विसोबा खेचर Visoba Khechar information in Marathi language
संत विसोबा खेचर हे संत ज्ञानेश्वर व त्यांची भावंडे यांचा द्वेष करणारी व्यक्ती होती. परंतु संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या द्वेषाचे निराकरण कसे केले व विसोबा खेचर हे संत ज्ञानेश्वरांना कसे शरण गेले. त्याविषयी आपण माहिती पाहूया.
जीवन
तेराव्या शतकातील वारकरी संप्रदायातील आद्य संत नामदेवांचे गुरू म्हणून परिचित असणारे मुळचे नाथ संप्रदायातील महानयोगी म्हणजे विसोबा खेचर हे होत. खेचर हे त्यांचे आडनाव नव्हते. देह आकाश गमन करण्याइतका हलका तरल करण्याची सिद्धी प्राप्त असलेल्या योगी म्हणजेच खेचर होय. विसोबा खेचर हे उपनाव मिळालेले आहे. योगमार्गात खेचरी मुद्रा याला विशेष महत्त्व असते. त्या टप्प्यावर पोहोचलेला असल्यामुळे खेचर त्यांना उपनाव मिळाले.
विसोबा खेचर यांची ख्याती व व्यवसाय याबाबत मतभिन्नता आहेत. संत चरित्रकार महिपतीच्या भक्तविजय ग्रंथात ते काटी म्हणजे कापड व्यापार करणारे ब्राह्मण मानले आहेत. आंबेजोगाई येथील दत्त संप्रदायी कवी दासो दिगंबर यांच्या संतविजय ग्रंथात विसोबा खेचर हे ख्रिस्ती म्हणजे सावकारी करणारे व्यापारी याचा उल्लेख आढळतो.
विसोबा खेचर हे संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचा खूप द्वेष करत होती. परंतु एकदा संत मुक्ताबाई यांनी संत ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे भाजले आणि ते सर्व दृश्य विसोबाखेचर यांनी पाहिले तेव्हा पासून ते श्री संत ज्ञानेश्वर यांचे शिष्य झाले व त्यांना शरण गेले.
संत नामदेवांचे गुरु लिंगायत साहित्यातील आद्य लेखक तसेच लिंगायत आणि वारकरी संप्रदायात समन्वय साधणारे महापुरुष अशी संत विसोबा खेचर यांची कार्यकर्तृत्वाची ओळख आपल्याला दिसून येते. तसेच संत विसोबा खेचर यांच्या प्रभावाच्या आळंदी, बार्शी, औंढानागनाथ या ठिकाणी बरीच अभ्यासक आपल्याला दिसून येतात. असे दाखवून दिले आहे.
संत नामदेवांचे अभंगातून मिळालेल्या माहितीच्या आधारे असे म्हणता येते की, बारा ज्योतिर्लिंगाच्या यादीतील आठवे प्रसिद्ध स्थान औंढा नागनाथ हे विश्व यांचे मूळ गाव आहे. औंढा नागनाथ हे पंढरपूर पासून 366 किमी दूर हिंगोली जिल्ह्यात आहे. संत नामदेवांनी तेथे जाऊन विसोबा यांची भेट घेतली. तेव्हा ते मंदिरातील शिवलिंग यांवर पाय ठेवून निवांत झोपले होते. त्यांना विचारल्यावर ते उत्तरले जिथे देव नाही तिथे माझे पाय उचलून ठेव यावर विचार करतांना नामदेवांना साक्षात्कार झाला. या घटनेने डोळे उघडलेल्या नामदेवांना विसोबा नि सर्वव्यापी निर्गुण निराकार परमेश्वराची जाणीव करून दिली. त्यामुळेच नामदेवांनी आपल्या अनेक अभंगातून विसोबा यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केलेला आढळतो.
गुरु परंपरा
विसोबा खेचर यांनी लिहिलेल्या शडूस्छळी ग्रंथांच्या हस्तलिखितांचा शोध जेष्ठ संशोधन ढेरे यांना सासवड येथील सोपानदेव समाधी मंदिरातील कागदपत्रांच्या गाठोड्यात 1969 मध्ये लागला. या ग्रंथात विसोबा खेचर त्यांची गुरुपरंपरा आदिनाथ, चंद्रनाथ, गोरक्षनाथ, मुक्ताई, चांगा वटेश्वर, कृष्णनाथ, रामकृष्ण नाथ खेचर, विसा अशी आलेली आहे. या परंपरेतील मुक्ताई म्हणजे ज्ञानेश्वर भगिनी मुक्ताबाई नव्हे. या 677 ओवी संख्या व तीन अध्याय असलेल्या ग्रंथात वीरशैव तत्वज्ञानाचे दर्शन घडते. त्यामुळे वीर्शैवलींगायात मध्ये या ग्रंथाला महत्त्व आहे.
नामदेवाला शिकवण
संत विसोबा हे महाराष्ट्रातील खूप मोठे संत होऊन गेले. संत ज्ञानेश्वर हे त्यांचे गुरु, तर संत नामदेवांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. संत विसोबा खेचर हे शैव पंथीय होते; परंतु त्यांचा वारकरी आणि नाथ संप्रदाय यांच्याशीही जवळचा संपर्क आला. विसोबा खेचर हे खरेतर संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचा द्वेष करत असत; परंतु एकदा संत ज्ञानेश्वर यांच्या पाठीवर संत मुक्ताबाई यांनी मांडे भाजले. त्या वेळी तेथे उपस्थित असलेले संत विसोबा संत ज्ञानेश्वरांना शरण गेले. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !
एकदा संत नामदेव महाराजांना पांडुरंग म्हणाला, तुझ्या जीवनात सद्गुरु नाहीत. जोपर्यंत तुझ्यावर सद्गुरूंची कृपा होत नाही, तोपर्यंत तुला माझ्या निर्गुण निराकार सत्य स्वरूपाची ओळख पटणार नाही. तू विसोबा खेचर यांना भेट. ते मोठे सत्पुरुष आहेत. ते तुला दीक्षा देतील.
संत नामदेवांना शिकवण
संत विसोबा हे महाराष्ट्रातील खूप मोठी संत होऊन गेलेत संत विसोबा खेचर हे शेव पंथी होते परंतु त्यांचा वारकरी आणि नाथ संप्रदाय यांच्याशी जवळचा संपर्क आला संत ज्ञानेश्वर हे त्यांचे गुरू तर संत नामदेव हे त्यांचे शिष्य होते.
संत नामदेवांना साक्षात पांडुरंगाने सांगितले की, “तुझ्या जीवनात सद्गुरु नाहीत. तोपर्यंत तुझ्यावर सद्गुरूची कृपा होत नाही. तोपर्यंत तुला माझ्या निर्गुण, निराकार सत्य स्वरूपाची ओळख पटणार नाही. तू विसोबा खेचर यांना भेट ते मोठे सत्पुरुष आहेत. ते तुला दीक्षा देतील”.
विसोबा खेचर आणि नामदेव यांची भेट
पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथील श्री सप्तकोटेश्वर मंदिरातील शिवपिंडी संत नामदेव महाराज यांची भेट झाली. पांडुरंगाच्या सांगण्याप्रमाणे नामदेव महाराज विसोबा खेचर यांना भेटण्यासाठी गेले. ते एका ज्योतिर्लिंग मंदिरात त्यांचे सद्गुरु विसोबा खेचर पाय पसरून बसले होते. त्यांची अवस्था स्वीका
र वृद्ध पुरुषाप्रमाणे होती. ज्यांच्या अंगाला ठिकाणी जखमा झाल्या होत्या आणि त्यातून पू वाहत होता. त्यांच्या अंगावर असलेल्या सर्व जखमां वरून माशा फिरत होत्या. तसेच त्यांच्या अंगातून दुर्गंधी सुटली होती. पायात तेलाने मढवलेल्या वाहना असून शंकराच्या पिंडीवर त्यांनी आपले चरण ठेवले होते. आपल्या भावी सद्गुरूंची अशी दुरावस्था पाहून नामदेव महाराजांना खूप दुःख झाले; पण संत विसोबा खेचर नाटकच करत होते. हे नामदेव महाराजांना माहीत नव्हते. नामदेव महाराज संत विसोबा यांच्यापाशी गेले आणि म्हणाले अहो तुम्ही शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून बसला आहात.
चला, उठून बसा नीट त्यावर संत विसोबा खेचर नामदेव महाराजांना म्हणाले, “बाबारे काय करू? इतका देह क्षीण झाला आहे कि मी हलू शकत नाही. ती वात्रट मुला आली आणि त्यांनी माझे पाय धरले व पिंडीवर नेऊन ठेवले. पाय हलवायचे सुद्धा त्राण उरले नाहीत. त्यामुळे तूच आता माझ्यावर कृपा कर आणि जिथे पिंडी नाही तिथे माझे पाय उचलून ठेव. नामदेव महाराजांना त्यांचे बोलणे स्वभाविक वाटले आणि त्यांनी त्यांचे चरण उचलून बाजूला केले. तर तिथे पुन्हा पिंडी तयार झाली.
ज्या दिशेने पाय हलवावीत त्या दिशेने पिंड निर्माण होत असे. हा सर्व चमत्कार पाहून नामदेव महाराज आश्चर्यचकित झाले. श्री सप्तकोटेश्वर मंदिराच्या परिसरात असलेल्या या शिवपिंड म्हणजे नामदेव महाराजांना संत विसोबा नि ईश्वर सर्वत्र असल्याची अनुभूती दिल्याचे पवित्र स्थान आहे. जेव्हा नामदेव महाराजांनी आश्चर्याने विसोबाकडे पाहिले, तेव्हा त्यांच्या शरीराची सर्व दुर्गंधी नाहीशी झाली होती. अगदी तप्त मुद्रांकित ब्राह्मण असे एकदम तेजस्वी शरीर नामदेव महाराजांना दिसले.
संत विसोबा यांनी नामदेव महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला. त्यावेळी नामदेव महाराजांना सगळीकडे पांडुरंग पांडुरंग दिसायला लागले. पांडुरंगांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर हे अधिकारी पुरुष आहेत. याची खात्री पटताच नामदेव महाराजांनी ताबडतोब संत विसोबा यांचे चरण धरले आणि त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले.
श्री नामदेव महाराज गाथेमध्ये विषयांचे दोन अभंग आपल्याला पहायला मिळतात. विसोबा नामदेवांचे नाते गुरु शिक्षणापेक्षा सदस्यत्वाचे, मित्रत्वाचे अधिक असल्याचे जाणवते. जरी नामदेवांनी काही अभंगात आदरपूर्वक गुरु म्हणून उल्लेख केला असला तरी त्यांनी विसोबांचा योग्य मार्ग स्वीकारलेला नाही. उलट विसोबा पुढे वारकरी संप्रदायाचा एक भाग झालेले आपल्याला आढळतात.
Visoba Khechar information in Marathi language विसोबा खेचर यांच्या विषयी माहिती कशी वाटली, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.