भारतात असे कोणीच नाही, की जे अंजली तेंडुलकर Anjali Tendulkar यांना ओळखत नसेल. अंजली तेंडुलकर ह्या एक भारतातील स्त्री चरित्र्याशी संबंधित आदर्श व्यक्तिमत्व आहे. सचिन तेंडुलकर हे भारतीय क्रिकेट संघातील उत्कृष्ट खेळाडू आहेत. सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर हे खूप फेमस जोडप आहे. अंजली तेंडुलकर हे उत्कृष्ट क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांची पत्नी आहे. त्या मुंबईतील जे जे हॉस्पिटलमध्ये काम करतात. अंजली तेंडुलकर यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1967 रोजी, मुंबईतील एक अत्यंत श्रीमंत गुजराती कुटुंब यांच्यामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव आनंद मेहता आहे.
अंजली तेंदुलकर Anjali Tendulkar
ते एक उद्योगपती आहेत आणि त्यांची आई मुळ ब्रिटिश आहे. तिचे नाव अंनाबेन हे आहे. डॉ. अंजली यांचे आजोबा एक श्रीमंत जमीन मालक होते. त्यामुळे तिचे आजोबा तसेच त्यांचे वडील खूप श्रीमंत होते. त्यांच्याकडे मुंबईतील सर्वात महागड्या निवासी झोन ब्रिज होत्या. अंजली हे त्यांच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. त्यांनी त्यांचे शिक्षण मुंबईमधील “इंटरनॅशनल स्कूल बॉम्बे”मध्ये पूर्ण केले. अंजली तेंडुलकर ह्या अभिनेत्री पेक्षा कमी नाहीत. दिसायला सुंदर आणि आकर्षक आहेत.
परंतु ज्यांची जास्त सेलिब्रिटी नसते. अंजली तेंडुलकर ह्या एक भारतीय बालरोगतज्ञ आहेत. अंजली तेंडुलकर यांनी त्यांच्या पतीच्या स्वप्नांच्या आणि मुलांच्या संगोपनासाठी त्यांचे समर्थन करण्यासाठी त्यांच्या पालनासाठी स्वतःच्या कारकिर्दीचे बलिदान दिले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सचिनचा निरोप कसोटी सामन्या दरम्यान आयकॉनिक फलंदाजाने आपल्या कारकिर्दीला आकार देण्यासाठी अंजलीच्या प्रमुख भूमिकेविषयी बोलले जाते आणि बेस्ट भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांनी हे मान्यही केले आहे. सर्व तिच्यामुळेच झाले.
जेव्हा जेव्हा तो क्रिकेटच्या मैदानावर असेल तेव्हा त्याला सर्व देईल. अंजली एक आकर्षक व्यक्ती आहे. ती आकर्षक व्यक्तिमत्व सुद्धा आहे. डॉ अंजली परोपकारी कार्य करण्याव्यतिरिक्त ती आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवते. सारा आणि अर्जुन या दोन मुलांची काळजी घेणारी आईसुद्धा आहे.
आपल्याला माहित आहे की, सचिन तेंडुलकर हे असे एक व्यक्तिमत्त्व आहे. जे केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिनच्या कर्तृत्वाची आपल्याला सर्वांना जाण आहे. सचिनच्या संपूर्ण कारकिर्दीत योगदान देणारी सचिन तेंडुलकर यांची पत्नी अंजली तेंडुलकर यांना ओळखणारे फारच कमी लोक आहेत. परंतु या दोघांची प्रेम कथा एखाद्या चित्रपटाचा पेक्षा कमी नाही.
आज आपण सचिन आणि अंजली यांच्या प्रेमकथांची ओळख पाहूया.
प्रेमाचे अनेक किस्से आपण एकले, पाहिलेत परंतु स्वतः सचिन आणि अंजली यांच्या प्रेमाविषयी ची गोष्ट आपण ऐकले नसेल, परंतु हे खरं आहे की या दोघांनाही पहिल्याच नजरेत प्रेम झालं. सचिन आणि अंजली मेहता यांची प्रेम कथा अशाच एका चित्रपटाच्या पद्धतीने सुरू झाली. त्यांच्या भेटीची ही गोष्ट खूप रोमांचक आहे. त्यावेळी अंजली डॉक्टर बनली होती आणि ती रुग्णालयात सराव करत होती. ही गोष्ट 1990 ची आहे. जेव्हा सचिन हा इंग्लंड दौरा पूर्ण करून भारतात परतला होता.
तेव्हा प्रथमच अंजलीने सचिनला मुंबई विमानतळावर पाहिले. अंजली आईला नेण्यासाठी मैत्रिणींसह तेथे पोहोचली होती. सचिनला पाहिल्यावर अंजली तिच्या मैत्रिणीला म्हणाली किती गोंडस? त्यावेळी सचिन क्रिकेटर आहे, हे तिला माहीत नसल्यामुळे तिने विमान -तळावरच सचिनचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. ती त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न होती. त्याच वेळी सचिनही अंजलीला पाहिले पण कडक सुरक्षेमुळे तो अंजलीला भेटू शकला नाही.
गमतीची गोष्ट अशी की, सचिनला भेट देण्याच्या प्रयत्नात अंजली आपल्या आईला भेटायलाच विसरली. सचिन हा भारताचा क्रिकेट संघाचा सर्वात तरुण क्रिकेटपटू आहे आणि तेव्हाच इंग्लंडमध्ये सचिनने शतक झळकवले याची महिती अंजलीच्या मैत्रिणीने तिला सांगितली. पण या सर्व गोष्टीमुळे अंजलीला काहीही फरक पडला नाही. कारण तिला क्रिकेटबद्दल फारशी माहिती नव्हती. परंतु तिने सचिनशी बोलण्याचा निश्चय केला आणि तिने सचिनचा दूरध्वनी क्रमांक घेतला. त्यानंतर तो दिवस आला, जेव्हा सचिन आणि अंजली पहिल्यांदा एकमेकांशी बोलले.
अंजली म्हणाली माझं नाव अंजली आहे आणि तू कदाचित मला ओळखत नाहीस, काल मी तुला पहिल्यांदा एअरपोर्टवर पाहिले होते. हे एकूण सचिन उत्तरात म्हणाला हो मला आठवत आहे. यावर अंजली म्हणाली, “की चला सांगा, आम्हाला काल मी काय परिधान केले होते.” त्यावर सचिन म्हणाला की, “ऑरेंज कलर टी-शर्ट.” तिथूनच दोघांची मैत्री सुरु झाली त्यानंतर पुढे आणखीन काही दिवस निघून गेले आणि जेव्हा सचिन पहिल्यांदा अंजलीला त्याच्या घरी घेऊन गेला.
ती गोष्ट पण बरीच रोमांचक आहे. कारण सचिन हा एक अतिशय लाजाळू मुलगा आहे. हे घरच्यांना माहित होते. पण जेव्हा त्याने अंजलीला व त्यांच्या कुटुंबीयांची ओळख करून दिली तेव्हा ती म्हणाली की, ती एक पत्रकार आहे आणि ती माझी मुलाखत घेण्यासाठी आली आहे. परंतु हे प्रकरण केवळ आहे. हे घरातील सदस्यांना समजले होते.
याबरोबरच हे देखील समजले की, सचिनसाठी अंजली खूप खास आहे. दोघांना एकमेकांना पाच वर्ष डेट केले पण सोशल मीडियाचा त्यावेळी प्रभाव नव्हता म्हणून अंजली आणि सचिन यांच्या प्रेमाची बातमी कुणालाही कळली नाही. सचिन आणि अंजलीने त्यांचे संबंध उघड केले. हे 1994 मध्ये जेव्हा न्यूझीलंडमध्ये त्यांचे साक्षगंध झाले. एंगेजमेंट नंतर लवकर दोघांना 1995 मध्ये लग्नही केले आणि आज हे जोडपे लोकांसाठी एक उदाहरण आहे.
अंजली तेंडुलकर यांनी आपला व्यवसाय डॉक्टरकी मध्ये सुरू केला होतात. परंतु आपला पती आणि मुलांसाठी वेळ देण्याचे जेव्हा त्यांनी ठरवले, तेव्हा त्यांनी हा व्यवसाय सोडला व आपल्या कुटुंबीयांसाठी आपला वेळ दिला. अंजली तेंडलुकर ह्या सचिन तेंडुलकर यांची लाइव्ह मॅच पाहू शकत नसल्यामुळे त्या मॅचची रेकॉर्ड पाहात असत. भारतातील आदर्श स्त्री पत्नी म्हणून अंजली तेंडुलकर यांना ओळखले जाते. त्यांनी आपला मोलाचा वेळ आपल्या कुटुंबासाठी मुलांसाठी खर्च केला.
याव्यतिरिक्त त्यांनी त्यांच्या जीवनातील काही वेळ शेतकऱ्यांच्या पाहणी करिता व्यतीत केला. अहमदनगर येथील आदर्श गाव हिवरे बाजार येथे पाणी नियोजनातून केलेली कृषीक्रांती देशाला मार्गदर्शक ठरेल, असे डॉक्टर अंजली सचिन तेंडुलकर यांनी आपल्या हिवरे बाजार भेटीत व्यक्त केली होती. तेंडुलकर यांनी नुकतीच हिवरे बाजारला भेट देवून गेली.
28 वर्षे लोकसभागातून झालेल्या विविध कामांची पहाणी करून माहिती घेतली. तेंडुलकर म्हणाल्या, हिवरे बाजारने पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले ग्रामविकासाचे काम अदभूत आहे. प्रत्येक शेतक-याच्या बांधापर्यंत योजनांचे जाळे या गावाने निर्माण केले आहे. ठराविक काळासाठी व विशिष्ठ कामासाठी गावाला एकत्र आणणे व काम करणे कदाचित सोपे आहे परंतु संघटनात्मक कामातील सातत्य हे या गावाचे खरे वैशिष्ठ्य आहे.
सचिन तेंडुलकर यांनी दत्तक घेतलेल्या उस्मानाबाद जिल्यातील डोणजे गावात सुध्दा पोपटराव पवार यांनी ग्रामस्थांना केलेले मार्गदर्शन मोलाचे ठरले असून तेथे काम करण्यास वेगळी दिशा मिळाली आहे. तेंडुलकर फौंडेशन वतीने करंजी ता.पाथर्डी व कोकणात काही गावात ग्रामविकासाचे काम चालू आहे. त्यासाठी पोपटराव पवार यांच्या अनुभवाचा फायदा घेवून काम करण्यास निश्चित आनंद होईल.
गावागावातील मतभेद दूर करण्यासाठी व संघटन मजबूत करून इतर गावांमध्ये पोपटरावांच्या मदतीने प्रत्येक गोष्ट शेतक-यांपर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न असेल. या भेटीत डॉ.अंजली तेंडूलकर त्यांच्यासोबत मृण्मय मुखर्जी व झोया कजरी उपस्थित होते. व त्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना सहाय्य करण्यास प्रोत्साहन दिले.
“तुम्हाला आमचा लेख Anjali Tendulkar याविषयी कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”