Prakash Amte information in Marathi language प्रकाश प्रकाश आमटे हे एक समाज सेवक आहेत. तसेच ते बाबा आमटे यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी आदिवासींच्या जीवनातील अंधार दूर करण्याचे ध्येय हाती घेतले आहे तसेच यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केलेला आहे. तर चला मग पाहुयात यांच्या विषयी माहिती.
जन्म
प्रकाश आमटे यांचा जन्म 26 डिसेंबर 1948 रोजी झाला. त्यांचे वडील बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या ‘आनंदवन’ या आश्रमात त्यांचा जन्म झाला. प्रकाश आमटे यांचे वडील बाबा आमटे हे गांधीवादी तत्त्वांचे समर्थक होते आणि त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे महाराष्ट्रातील कुष्ठरोग्यांसाठी वाहिले होते.
जीवन व शिक्षण
प्रकाश नागपुरात जीएमसीमध्ये दाखल झाले. येथून मेडिसीनात पदव्युत्तर पदवी घेतली आणि शहरात सराव सुरू केला. 1974 मध्ये एक संदेश आला. त्यांचे वडील व ते त्या आदिवासी भागात पोचले. व त्यांच्या वडिलांसोबत त्यांनी त्या आदिवाशांची परिस्थिती स्वतः पाहिली. यामुळे माडिया, गोंड जात आदिवासी हितासाठी काम सुरू केले पाहिजे. असे त्यांना वाटले म्हणून वडिलांच्या या हाकेवरून प्रकाशने आपली नवविवाहित पत्नी मंदाकिनी आमटे हिच्याशी लग्न केले आणि आपली शहरी प्रथा विसरून हेमल्स्काकडे निघाले. त्यांची पत्नी मंदाकिनी देखील पदव्युत्तर डॉक्टर होती आणि त्यावेळी सरकारी रुग्णालयात कार्यरत होती. तिनेही आपल्या पतीबरोबरची नोकरी सोडली आणि हेमलस्काला निघून गेली.
प्रकाश आमटेंना एकदा विचारलं, तुम्ही आदिवासींच्या आरोग्यासाठी काम करत होतात, तर मग प्राण्यांचं अनाथालय कसं सुरू झालं. त्यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, “एकदा आम्ही जंगलातून जात होतो. आदिवासी माकडाची शिकार करून घेऊन चालले होते. त्या मेलेल्या मादीला बिलगून माकडाचं जिवंत पिल्लू दूध पित होतं. तोपर्यंत आम्हाला माहित नव्हतं की माणसं माकडाचीही शिकार करून खातात.”
भारतीय समाजात माकड खाण्याची प्रथा नाही. आमटे पुढे म्हणाले, “आम्ही पहिल्यांदाच माकडाची शिकार केलेली पाहात होतो. त्या आदिवासींकडे आम्ही माकडाचं पिल्लू मागितलं. त्यांनी घरात मुलं उपाशी आहेत असं सांगितलं. तेव्हा आम्हाला कळलं की भूक किती पराकोटीची असू शकते. आम्ही मुलांना खायला तांदूळ दिले आणि त्या बदल्यात ते माकडाचं पिल्लू घेतलं.”
पुर्वी येथील आदिवासी लोक प्राण्यांची शिकार करीत असत त्या प्राण्यांवर डॉ. आमटे उपचार करीत. आदिवासींकरता हेमलकसा येथे या आमटे दाम्पत्यांनी रूग्णालयाची स्थापना केली आहे. आदिवासींवर मोफत उपचार केले जातात. या व्यतिरीक्त येथे मातृत्व सदन देखील उभारण्यात आले आहे, स्वास्थ्यासंबंधी माहिती या सदनात दिली जाते.
कार्य
प्रकाश आमटे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी आमटे स्वतः डॉक्टर आहेत. ते दोघेही बाबा आमटेंच्या परंपरेला जोपासत आणि पुढे नेत आदिवासींच्या सेवार्थ आपले पुर्ण लक्ष केंद्रीत करून आहेत. बाबा आमटेंनी महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हयात हेमलकसा इथं लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना केली होती. या शिवाय ते स्थानिक आदिवासींच्या विकासाकरता आणि आरोग्याकरता देखील कार्य करीत होते. विशेषतः बाबांनी कुष्ठरोग्यांकरता कार्य केलं, त्यांच्याकरता आनंदवनाची स्थापना केली. बाबांच्या निधनानंतर त्यांच्या पश्चात आज ही जवाबदारी डॉ. प्रकाश आणि त्यांचे दोन चिरंजीव अनिकेत व दिगंत फार चांगल्या प्रकारे चालवत आहेत.
पुर्वी जेव्हां डॉ. प्रकाश आणि त्यांच्या पत्नी हेमलकसा येथे वास्तव्याला आल्या, त्यावेळी दरवाजा नसलेली एक छोटी झोपडी व खोली त्यांनी बांधली आणि तेथे राहु लागले. तेव्हां तेथे वीज नव्हती, आणि स्वतःचे असे काही खाजगी आयुष्य जगता येईल अशी देखील परीस्थिती नव्हती. माडिया गोंड आदिवासी समुदायाकरता या डॉक्टर दांपत्याने आरोग्याची आणि योग्य शिक्षण देण्याची जवाबदारी उचलली.
सुरूवातीला हे सर्व अशक्यप्राय आणि प्रचंड कठीण वाटावे असेच होते. पण पुढे पुढे त्यांच्यात राहुन त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर, त्यांची सेवा करत करत आदिवासींच्या मनात त्यांनी जागा निर्माण केली.
गडचिरोली जिल्हयातील या हेमलकसा इथं 1975 साली स्वित्झरलॅंडच्या आर्थिक मदतीने एक छोटेसे रूग्णालय स्थापीत करण्यात आले, यात औषधांची चांगली सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. यामुळे डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी यांना या ठिकाणी काही शस्त्रक्रिया करणे शक्य होऊ लागले.
या ठिकाणी डॉक्टर दांपत्यानी मलेरिया, क्षयरोग, दाह, यांसोबत भाजलेल्या रूग्णांवर यशस्वी उपचार केले. याशिवाय साप, विंचु यांच्या दंशाने मरणासन्न अवस्थेत पोहोचलेल्या रूग्णांवर देखील उपचार केले. ते पाहाता या आदिवासींचा विश्वास वाढीस लागला आणि मोठ्या संख्येने रूग्णं येथे उपचार घेण्याकरता येऊ लागले.
डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी यांनी आदिवासींच्या शिक्षणाकरता देखील मोठं कार्य केलं. त्यांच्या अधिकारांची जाणीव त्यांना करून दिली. या व्यतिरीक्त लालची आणि भ्रष्ट वन अधिकाऱ्यांना या भागातुन हाकललं.
1976 साली त्यांनी हेमलकसा इथं एका शाळेची स्थापना केली. सुरूवातीला आदिवासी आपल्या पाल्यांना या शाळेत पाठवण्यास तयार होत नव्हते पण पुढे पुढे मुलं शाळेत येऊ लागली. या ठिकाणी आदिवासी मुलांना शिक्षणासोबतच स्वयंरोजगार करण्याकरता देखील प्रशिक्षीत केल्या जातं.
हेमलकसा येथील या शाळेत आदिवासींना शेतीविषयी, फळं, भाज्यांच्या उत्पादनाविषयी प्रशिक्षण दिल्या जात होतं. या व्यतिरीक्त आदिवासी बांधवांना वनांच्या संरक्षणासंबंधी जागरूक करण्यात या दांपत्यानी मोलाची भुमिका पार पाडली. या शाळेतुन शिक्षण घेतलेले विदयार्थी आज डॉक्टर, वकील, अधिकारी, शिक्षक झाले असुन आपले आयुष्य चांगल्या तऱ्हेने व्यतीत करत आहे. यांच्या मुलांनी देखील याच शाळेतुन शिक्षण घेतले आहे.
डॉ. प्रकाश आमटेंनी वन्य प्राण्यांकरता एक प्राणी संग्रहालय देखील बनविले आहे. या ठिकाणी अनाथ झालेल्या लहान प्राण्यांना ठेवले जाते. प्राण्यांचे हे निवासस्थान डॉ. आमटेंच्या घरी अंगणातच तयार करण्यात आले आहे. येथे अस्वल, बिबटया, मगर यासारखी 60 पेक्षा अधिक जातीची जनावरं अगदी गुण्यागोविंदाने राहातात. डॉ. प्रकाश आमटे या प्राण्यांना स्वतःच्या हाताने जेऊ घालतात. अनाथालयातील प्राण्यांना राहण्यासाठी अधिक मोठे पिंजरे करण्याच्या सरकारच्या सूचनेनुसार नवा मास्टरप्लॅन केंद्राकडे संमतीसाठी पाठवण्यात आला आहे. त्यासाठी 10 कोटी इतका खर्च येणार असून टप्प्याटप्प्याने नवं अनाथालय बांधण्यात येईल.
केंद्रीय झू ऑथोरिटीचा आणखी एक आक्षेप आहे. तो जंगली प्राण्यांना हाताळण्याविषयी. जंगली प्राण्यांना हाताळणं आणि आमटे आर्कमधील प्राण्यांचे फोटो आमटे यांनी सोशल मीडिया, वेबसाईट, वर्तमानपत्रं, लेटरहेडवर वापरणं हे 2009 च्या झू अधिनियमाचं उल्लंघन आहे, असं सेंट्रल झू ऑथोरिटीचं म्हणणं आहे. इथले सगळे प्राणी अनाथ आहेत. लहान पिल्लं आहेत ज्यांनी आई बघितलीच नाही. माणसांमुळे या प्राण्यांची आई मरण पावली. जंगलात त्यांना आई सगळं शिकवते. शिकार कशी करायची आणि स्वत:ला कसं वाचवायचं हे शिकवते. त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणं गरजेचं आहे. त्यांना आई नव्हती, म्हणून प्रेम केलं असं आमटे यांचं स्पष्टीकरण आहे.
कायद्याच्या नियमांचं उल्लंघन झाल्या प्रकरणी आम्ही त्यांना विचारलं. ‘जखमी प्राण्यांवर उपचार करा आणि त्यांना जंगलात सोडून द्या असा रेस्क्यू सेंटरचा कायदा सांगतो. पण हे अनाथालय आहे आणि अनाथ प्राण्यांच्या गरजेनुसार कायदा भारतात अस्तित्वात नाही’, असं त्यांनी सांगितलं. पण यापुढे नवीन दाखल होणाऱ्या प्राण्यांना हात लावणार नाही, असंही ते म्हणाले. अनाथालयात बिबट्या, तरस, हरणाच्या पाच प्रजाती, नीलगाय, अस्वल, मगरी, साळींदर, कोल्हे, घुबड, घोरपड, मोर, साप असे जवळपास शंभर प्राणी-पक्षी आहेत. आजूबाजूच्या आदिवासी गावांमधील आणि भारतभरातून सहली इथे येत असतात.
पुरस्कार
2008 साली आमटे दाम्पत्याला त्यांच्या सामाजिक दातृत्वाकरीता, ‘मॅगसेसे’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
1984 मध्ये आदिवासी सेवक पुरस्कार, महाराष्ट्र सरकार, इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे डॉ. एम.जे. जोशी आय.एम.ए.भूषण’ पुरस्कार
2009 गॉडफ्रे फिलिप्स जीवनगौरव पुरस्कार
2002 पद्मश्री पुरस्कार, भारत सरकार
2008 मॅगसेसे पुरस्कार
2014 मदर तेरेसा पुरस्कार
श्रीमंत मालोजीराजे स्मृति पुरस्कार
2012 लोकमान्य टिळक पुरस्कार
2017 पिंपरी (पुणे) येथील संस्कार प्रतिष्टानतफे श्री स्वामी विवेकानंद जीवनगौरव पुरस्कार. आकुर्डी येथील डी.वाय.पाटील शैक्षणिक संकुलाच्या वतीने डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांचा सन्मान समारंभ. अशाप्रकारे त्यांची परंपराही कायम ठेवून आमटेंनी बाबांचा मान ठेवला.
Prakash Amte information in Marathi language. प्रकाश आमटे ही माहिती कशी वाटली, त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.