Ajcha Vidyarthi ani shist essay in Marathi language – आजचा विद्यार्थी हा मोबाइल, इंटरनेट यांमुळे शिस्त भंग झाली आहे. त्यांचा स्वभाव बदलण्या मागे आजच्या मुलांच्या हातात आलेली साधनं असली, तरी बेसिक माहितीही त्यांना नसते. ते फारसे वाचत नाहीत. वाचलंच तर वरवरचं असतं. उथळ माहितीवर निष्कर्ष काढून मोकळे होतात. जगाची सोडून द्या, पुण्याचीही माहिती धड नसणारे अनेक विद्यार्थी आहेत. पुण्यात लहानाचे मोठे झालेल्यांनाही इथली प्रसिद्ध ठिकाणं माहीत नाहीत. साहित्य परिषदेचं कार्यालय कुठं आहे, असा प्रश्न परवाच एकानं मला विचारलं! सांगा काय करायचं? काळ बदलला, तंत्रज्ञान हाताशी आले तरी परिस्थितीत फार बदल नाही. त्यामुळे या तंत्रयुगातही विद्यार्थ्यांना अगदी मुळापासूनच शिकवावं लागतं.
चांगला माणूस बनण्यासाठी विद्यार्थ्यांनी वागण्याची योग्य पद्धत आत्मसात केली पाहिजे. उदा. शिक्षकांना, वडीलधाऱ्यांना योग्य मान देणे, दुसर्याला मदत करणे इ. विद्यार्थ्यांनी आपला उत्साह, सळसळत्या तारुण्याचा योग्य प्रकारे सकारात्मकदृष्ट्या वापर करावा व अंगी शिस्त बाणवून विद्यार्थ्यांवर असलेल्या बेशिस्त वर्तनाचा शिक्का पुसून टाकावा. विद्यार्थ्यांमधील बेशिस्त हा आजचा एक ज्वलंत प्रश्न आहे.
आजच्या विद्यार्थ्यांची दिसणे त्यांचे भडक कपडे, वाढलेले केस या सार्या गोष्टी बेशिस्तपणाच्या असतात. त्यांचे शिक्षकांशी वागणे, लेक्चर्सला न बसणं, परीक्षांमध्ये कॉपी करणे, पेपर विकत मिळवणे हे सारे वर्तन बेशिस्त तिचेच असते, पण हे विद्यार्थी बेशिस्त का आहेत? याचा आपण नीट विचार करायला हवा. एक तर कॉलेजमध्ये आल्यावर शाळेपेक्षा जास्त स्वातंत्र्य मिळते आणि त्याचा उपयोग कसा करावा ही विद्यार्थ्यांना कळत नाही. शिवाय एका वर्गात शंभर-सव्वाशे विद्यार्थी असतात व शिक्षकांना प्रत्येकाकडे लक्ष देणे शक्य नसते. मग विद्यार्थी बोलत राहतात किंवा गैरहजर राहतात दिलेल्या काम पूर्ण करीत नाही. या गोष्टींमुळे विद्यार्थी बेशिस्त होतात.
आजची शिक्षण पद्धतीही खूप बदलली आहे.
निकाल जाहीर करायला परीक्षा झाल्यावर चार महिने लागतात त्यातही संगणकामुळे अनेकदा गोंधळ असतात. शिक्षण विशेषतः डॉक्टर शिक्षण महाग होत चालले आहे. जिकडेतिकडे वशिलेबाजी आणि भ्रष्टाचार या विद्यार्थ्यांना दिसतो. चांगले शिकले तरी चांगली नोकरी मिळेल याची खात्री नसते. आपल्या गुणांचे चीज होत नाही असे पाहिल्यावर विद्यार्थी बेशिस्त वर्तन करायला लागतात.
शिक्षकांना विद्यार्थ्यांकडून उत्तम कामाची अपेक्षा असेल तर त्याचे कौतुक होणेही गरजेचे असते. खास करून ज्या शाळा फक्त अभ्यास शिकवण्याचे कार्य करत नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करण्याची धडपड करत असतात आणि त्यासाठी सातत्याने नवनवीन अॅक्टिविटीचे आयोजन करत असतात. अशा ऍक्टिव्हिटी घेण्यासाठी मुख्याध्यापकांना उत्तम नियोजनाबरोबर शिक्षकांचे सहकार्य अपेक्षित असते. हे सहकार्य हळू हळू कमी होते.
तेव्हा बेशिस्तीबद्दल केवळ विद्यार्थ्यांना दोष देता येणार नाही.
काही दोष बदलती सामाजिक परिस्थिती कडे जातो. बरेच शिक्षक ही पूर्वीसारखीच जीव ओतून शिकवणारे नसतात. आज विद्यार्थ्यांसमोर खास आदर्श आहेत. या साऱ्याचा परिणाम म्हणजे विद्यार्थी बेशिस्त वागू लागतात. पण त्यांना अगदीच वैशिष्ट म्हणता येणार नाही समाजातील असंख्य घडामोडींचे बदलत्या, वास्तवाचे त्याला भान आहे. इंटरनेट संगणक अशा गोष्टीतून सहजपणे हाताळू शकतो, शिकून घेतो, देशावर नैसर्गिक संकट आहे श्रमदान रक्तदान अशा गोष्टींसाठी अनेक विद्यार्थी पुढे मदतीसाठी येतात.
आपल्या शिस्तीने अडचणींचे डोंगर पार करतात. शिवाय काही थोडे विद्यार्थी बेशिस्त असतात. सर्व विद्यार्थ्यांना बेशिस्त ठरवणे हे योग्य नाहीच. त्यामुळे विद्यार्थ्यांना माझी शिस्त वाढविण्यासाठी सामाजिक परिस्थितीत बदल घडून आणणे आवश्यक आहे. तसेच पालकांनी आपल्या पाल्यांना नैतिक मूल्ये शिकून, त्यांना योग्य मार्गदर्शन करावे. मग शिस्तीत वागणाऱ्या विद्यार्थ्यांचे चित्र आपल्याला अनुभवायला मिळेल.
कालच्या विद्यार्थ्यांमध्ये जेवढे वैविध्य होते, तेवढेच वैविध्य आजच्या विद्यार्थ्यांत आहे. तंत्रज्ञानामुळे आजचा विद्यार्थी सुदैवी आहे. त्याद्वारे तो माहितीसंपन्न होऊ शकतो. आजच्या आणि कालच्या विद्यार्थ्यांतील महत्त्वाचा फरक आहे तो हा! माहितीची साधने जशी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत, तशीच ती शिक्षकांनाही. त्यामुळे शिक्षकांनीही त्यांचा वापर करणे गरजेचे ठरते.
Ajcha Vidyarthi ani shist essay in Marathi language विद्यार्थी आणि शिस्त हा निबंध कसा वाटला, ते कमेंट करून नक्की सांगा.