Amli padarthache dushparinam essay in Marathi language | अमली पदार्थाचे दुष्परिणाम मराठी निबंध

Amli padarthache dushparinam essay in Marathi language आजची तरुण पिढी ही अम्ली पदार्थांच्या खूप आहारी गेलेली आहे. आपल्या समाजामध्ये विविध प्रकारचे मादक पदार्थ पाहायला मिळत आहे,  जसे की, दारू, गुटखा, तंबाखू, सिगारेट इत्यादी. मादक पदार्थाचा वापर मानवी जीवनामध्ये नवीन आहे असे म्हणता येणार नाही. कारण, मादक पदार्थांचा प्राचीन काळापासूनच उपयोग करता झालेला पाहायला मिळतो.

प्राचीन काळामध्ये गांजा, अफू, भांग इत्यादींचा उल्लेख केलेला आढळतो. आजकाल मादक पदार्थांन मध्ये हीरोइन, चरस, कोकेन यांसारख्या पदार्थांचा समावेश केला जातो. पूर्वी फक्त श्रीमंत वर्गालाच मादक पदार्थांचे व्यसन होते परंतु आजच्या काळामध्ये हे व्यसन सामान्य होत चालले आहे. यामध्ये तरुण पिढी ही जास्त बाधित झालेली आहे. त्याचा परिणाम भावी पिढीवर पडतो. मादक पदार्थ हे जीवनाचा शत्रू आहे. त्यामुळे मादक पदार्थांचे दुष्परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होत आहेत.

कोणत्याही अमली पदार्थाच्या सेवनामुळे त्या व्यक्तीमध्ये व्यसनासक्ती निर्माण होते. ती व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या त्या अम्ली पदार्थाच्या मात्रेवर अवलंबून राहते. शरीराच्या पेशींना त्या अमली पदार्थाची सवय लागते. अमली पदार्थ हे प्रामुख्याने मेंदूवर परिणाम करतात. त्यामुळे मेंदूच्या पेशींच्या कार्यात बिघाड होतो. अमली पदार्थाचे सेवन माणसाला जनावराच्या पातळीपर्यंत घेऊन जाते.

अमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या व्यक्ती या एकलकोंडय़ा असतात. कुटुंबातील सदस्य किंवा मित्र-मैत्रिणींमध्ये त्यांचा संवाद नसतो. काही ना काही कौटुंबिक समस्या त्यांना असतात. अमली पदार्थामधील काही द्रव्यांमुळे व्यक्तीला वेगवेगळे भास होतात. त्याला आपण हॅल्युसिनेशन असे म्हणतो. हे भास इतके तीव्र स्वरूपाचे असतात की त्यामुळे हे पदार्थ सेवन केलेली व्यक्ती खूप सैरभैर होते.

काही ‘स्टिम्युलन्स’ असे असतात की त्यामुळे त्या व्यक्तीला आपण हवेत तरंगत आहोत, असे वाटते आणि त्यामुळे या अमलाखाली असताना या व्यक्ती उंचावरून खाली उडी मारतात आणि स्वत:चा जीव गमावतात. जर ठराविक कालावधीत हे अमली पदार्थ त्या व्यक्तीला मिळाले नाहीत तर त्या व्यक्तीच्या शरीरांतर्गत आणि मेंदूतील पेशींच्या कार्यात विस्कळीतपणा निर्माण होतो. त्याचे शारीरिक आणि मानसिक पश्चात परिणाम वेगळे असतात.

हे इतके तीव्र असतात की ते परिणाम शमविण्यासाठी व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत अमली पदार्थ हवा असतो. तो मिळविण्यासाठी चोरी आणि एखाद्याचा खून करण्यापर्यंतही मग त्या व्यक्तीची मजल जाते. तरुण वय असेल तर अमली पदार्थ मिळविण्यासाठी ते शरीरविक्रयालाही तयार होतात.

काही काळासाठी आनंद देणारे हे पदार्थ सतत सेवन केल्याने एखाद्याचे शरीर आणि मन सुस्त होते, पचनशक्ती कमी होते तसेच दृष्टी क्षीण होते आणि या पदार्थांचा परिणाम हृदय आणि फुफ्फुसांवर होतो. अशा मादक पदार्थाच्या सेवनामुळे आरोग्याचा नाश होतो. एवढेच नसून या पदार्थांचे सेवन अतिप्रमाणात झाल्यात अकाली मृत्यू होण्याची शक्यता सुद्धा असते.

एवढेच नसून मादक पदार्थाचे सेवन करणाऱ्या व्यक्तीं सहानुभूतीचे पात्र ठरत नाही. सर्वजण अशा लोकांचा तिरस्कार करतात. त्यांची प्रतिष्ठा धुळीत मिळते. मादक पदार्थाचे सेवन करणाऱ्या व्यक्तीचे वैयक्तिक जीवन तर खराब तर होतेच त्या सोबत त्या व्यक्तीच्या संपूर्ण कुटुंबाची आनंद आणि शांती नष्ट होते. व्यसनावर पैशांचा पाऊस पडल्याने घरची परिस्थिती हलाखीची होण्यासाठी कारणीभूत ठरते.

घरातील कलाह कुटुंबात तणाव आणि संभ्रम वाढते. दारूच्या बाटल्यांमुळे आपल्या समाजातील कित्येक कुटुंब नष्ट झाल्याच्या बातम्या आपण ऐकल्या असतील.  दारूच्या नशामध्ये असलेल्या व्यक्तींच्या अत्याचाराला कंटाळून कित्येक स्त्रिया आत्महत्या करतात. अंम्ली पदार्थाचे सेवन असलेले वडील आपल्या मुलांचे उज्वल भविष्य अंधारामध्ये घालवण्यासाठी भाग पाडतात. तरुण पिढी वाईट मार्गाला लागते. अंमली पदार्थाच्या अवैध वापरामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गंभीर धोका होतो तसेच अम्ली पदार्थाच्या सेवनामुळे कार्यक्षमतेवर तीव्र परिणाम होतो.

भावी तरूण पिढीला वाचविण्यासाठी शासनच सरसावले आहे. राज्यघटनेतील अनुच्छेद 47 मध्ये सार्वजनिक आरोग्य आणि जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी मादक पदार्थावरील बंदीची मार्गदर्शक तत्वे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यानुसार राज्याचे व्यसनमुक्ती धोरण निश्चित करण्यात आले असून या विभागाच्या दिनांक 17 ऑगस्ट 2011 च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्याचे व्यसनमुक्ती धोरण जाहीर करण्यात आले आहे.

आपले जीवन खूप सुंदर आहे. ते पुन्हा मिळत नसते. अम्ली पदार्थांपासून दूर राहून आपले जीवन सुंदर बनवा. आरोग्याची काळजी घ्या …व्यायाम करा…खेळ खेळा…पण अम्ली पदार्थांना थारा देऊ नका !

Amli padarthache dushparinam essay in Marathi language. अम्ली पदार्थाचे दुष्परिणाम मराठी निबंध कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment