Batminton Essay in Marathi

Batminton Essay in Marathi आजच्या काळात मैदानी खेळ फार दुर्लभ झालेले आहेत आणि मुले केवळ मोबाईल, व्हिडिओ गेम, टीव्ही यांच्यात दंग झालेले आहेत. मात्र त्या व्यतिरिक्त कबड्डी, बॅडमिंटन, हॉलीबॉल, खो-खो यांसारखे मैदानी खेळ नाहीसे होतील की काय अशी भीती मनाला वाटते.

तर आपण पाहूया बॅटमिंटन विषयी माहिती आजच्या काळातील जगातील लोकप्रिय खेळ म्हणजे बॅडमिंटन आहे आणि हा खेळ अठराव्या शतकापासून खेळला जातो. बॅडमिंटन हा खेळ खेळण्यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी लागतात आणि त्या म्हणजे रॅटर आणि शटलकॉक. बॅडमिंटन हा खेळ बंदिस्त जागेमध्ये खेळला जातो. या खेळाच्या मैदानाला कोर्ट असे म्हणतात. बॅडमिंटन हा खेळ महिला आणि पुरुष या दोघांमध्येही खेळला जातो. हा खेळ ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट आहे. बॅडमिंटन या खेळांमध्ये जर एकेरी खेळ खेळत असेल तर या खेळामध्ये दोन खेळाडू असतात. जर हाच खेळ दुहेरी खेळ असेल तर यामध्ये एकूण चार खेळाडू असतात. हा खेळ तीन भागांमध्ये विभागलेला असतो आणि या मधील प्रत्येक 21 अंकांचा असतो .

बॅडमिंटन खेळाचा इतिहास खूप जुना आहे. परंतु या विषयीचा इतिहास काय आहे. हे कोणीही मोडू शकले नाही. इतिहासकारां च्या मते, हा खेळ पंधराशे बीसीच्या काळात भारतामध्ये खेळला जायचा असे म्हटले जाते. बॅडमिंटन या खेळाला पूर्वीच्या काळी पुन्हा या नावाने ओळखले जात होते. या खेळाची सुरुवात पुणे शहरातून झाली. त्यानंतर भारतामध्ये असणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी 1770 मध्ये हा खेळ भारताबाहेर नेला. असे म्हणतात की बॅडमिंटन हा खेळ ड्युक ऑफ ब्युफर्टनने हा खेळ पहिल्यांदा आपल्या मित्रांसोबत खेळला होता म्हणून ड्युक ऑफ ब्युफर्टला बॅडमिंटन या खेळाचाजनक मानले जाते.

बॅडमिंटन खेळण्यासाठी एक आयताकृती मैदान वापरले जाते. या मैदानाला मधोमध जाळी लावून दोन भागात विभागली जाते.
बॅडमिंटन खेळण्यासाठी वापरले जाणारे रॅकेट आणि शटल कॉक अतिशय महत्वाचे असते. हे अंडाकृती असते आणि ते धातूपासून बनवलेला असते. त्याला खाली धरण्यासाठी एक मूठ असते आणि रॅकेटमध्ये छोटे छोटे चौकोन असतात. फायबरची लांबी साधारण 650 ते 730 मिली मीटर आणि रुंदी 200 ते 230 मिलिमीटर असते आणि रॅकेटचा वापर यासाठी केला जातो. बॅडमिंटनचे फूल किंवा बर्डी या नावाने देखील ओळखले जाते. हे शटल कॉक दिसायला फुलासारखे असते आणि हे खूप लहान हलके असते. याला 16 पंख लावलेले असतात आणि हे चार ते पाच ग्रॅम वजनाचे असते.

हा खेळ खेळण्याच्या सुरुवातीला खेळाडूने आपल्या बाजूला उजव्या अर्ध्या ग्राउंडमधून प्रत्येक पक्षाच्या उजव्या अर्ध्या प्रांगणात कर्णाच्या दिशेने फुल मारायची असते. या प्रतिपक्षाच्या खेळाडूने ते फूल जमिनीवर न पडू देता. आधारितच फटका मारायचा असते. अशा रीतीने झाडावरून फुल अधांतरी जमिनीवर पडू न देता मागेपुढे टोलवत राहणे हे या खेळाचे मुख्य सूत्र आहे. सुरुवातीला चुकल्यास त्या खेळाडूची आरंभखेळी रद्द होते व गिरीमध्ये त्याच्या प्रतिपक्षी खेळाडूस तर दुहेरी मध्ये त्याच्या साथीदारांसह मिळते. तो आपल्या बाजूच्या डाव्या अर्ध्या प्रांगणातून प्रतिपक्षाच्या डाव्या अर्ध्या प्रांगणातून करण्याच्या दिशेने फुल मारतो. एकेरी मध्ये खेळाडूच्या गुणाची समसंख्या 0 -2-4 असल्यास उजव्या प्रांगणार्धातून तर विषम संख्या 1-3-5 असल्यास डाव्या प्रांगणार्धातून आरंभखेळी करावी लागते. संपूर्ण खेळा तांबडा आरंभखेळी अशी आडून पाडून उजव्या-डाव्या प्रांगणातून चालते दुहेरीमध्ये मात्र सामान्य खेळणी डावाची सुरुवात करतो.

त्यास प्रारंभी फक्त एकदाच आरंभ खेळण्याची संधी मिळते. आरंभ खेडामध्ये चूक पुढील प्रकारांनी होत असते. सुरुवातीला खेळताना फुल रॅकेट वरेकेड धरलेला हात कमरेच्यावर गेल्यास ओव्हर हॅन्ड धरतात. आरंभ खेळीनंतर फुल करण्याच्या दिशेने प्रतिपक्षाच्या योग्य त्या प्रांगणात न पडल्यास तसेच ते तोडक्या आरंभ खेळीच्या रेषेच्या अलीकडे व जाळ्याकडील बाजूस म्हणजे शॉर्ट पडले तर ती चूक होईल त्याचप्रमाणे फुल कक्षेबाहेर पडले तरीही चूक आहे. योग्य आरंभ खेळी करणाऱ्या संघास त्याच्या प्रतीपक्षाने चुका केल्यास गुण मिळतात. त्या चुका अशा फुल जमिनीवर पडणे, अंगाला लागणे, जाळ्यामध्ये व जाळ्या खालून मारणे सीमारेषेबाहेर मारणे इत्यादी या खेळात फटाक्याच्या पूर्व व पार्श्व हस्त अशा दोन्ही शैली अनुसरला जातात.

याशिवाय क्लियर, स्मॅश, ड्रॉप ,ड्राईव्ह असे चार प्रमुख घटक यांचे प्रकार वापरले जातात. यामध्ये स्मॅश म्हणजेच रॅकेट उंचावरून अतिशय वेगाने खालच्या दिशेने वारलेला जोरदार फटका असतो. तर ड्रॉप या प्रकारात फुल जायला लगटून पार करून जाळ्या जवळचं वेगाने व सफाईने खाली पडते. ड्राइव्ह हा साधारण कमी उंचीवरून वेगाने मारलेला आडवा फटका होय. वरील प्रकारांमध्ये चलाखी करून व खूप वैविध्य आणून हा खेळ प्रत्येक पक्षाला फसविण्याच्या काही टिप्स आहेत. तसेच एकूण शारीरिक हालचालींचा चपळपणा व तत्परता अचूक अंदाज व गती नियंत्रण फुल प्रतिपक्षाच्या हद्दीत व खेळाडूंच्या आवाक्या पलीकडे नेमक्या जागी टाकण्याची क्षमता हे गुण खेळाडूच्या पूरक ठरतात. हा खेळ कोणत्याही वयाच्या स्त्री-पुरुषांना कोणत्याही ऋतूमध्ये खेळता येतो.

बॅडमिंटनची पुरुषांची आंतरराष्ट्रीय थॉमस चषक सांघिक स्पर्धा इंडोनेशिया आणि एकूण सहा वेळा जिंकून विक्रम स्थापित केलेला आहे. तर स्त्रियांची उबेर स्पर्धा जपानने चार वेळा जिंकली आहे. ऑल इंग्लंड पुरुषांची एकेरी स्पर्धा इंडोनेशियाच्या रूडी हार्टोनो जिंकून जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.

भारतातही हा खेळ खेळणारे खेळाडू मोठ्या प्रमाणावर आहेत. जसे लुईस, देविंदर, मोहन, दिवाण सेट, गोयल, दिपू व रोमन, घोष बंधू, नंदू नाटेकर, मोहन बोपर्डीकर, प्रकाश पादुकोण, सईद मोदी इत्यादी दर्जेदार खेळाडू झाले आहेत. महिलांमध्ये ग्लास देवधर, भगिनी, मुमताज, सुशीला रेगे, मीना शहा, शशी भट, सरोजिनी आपटे इत्यादी खेळाडू उल्लेखनीय आहेत. 1965 मध्ये लखनऊला झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताचा दिनेश खन्ना विजेता ठरला होता.

बॅडमिंटन या खेळाविषयी काही मनोरंजक तथ्य आहेत. बॅडमिंटन हा खेळ जगातील दुसऱ्या क्रमांकावर लोकप्रिय खेळ आहे. बॅडमिंटन हा खेळ टेनिस खेळाविषयी तीव्रपणे खेळावा लागतो. सुरुवातीला बॅडमिंटन खेळ पायाशी खेळला गेला म्हणजे रॅकेटच्या एवजी शटलकॉक मारण्यासाठी पायाचा उपयोग करत होते. या खेळाच्या शोधामध्ये भारताने आपली महत्त्वाची भूमिका बजावली आहे. शटलकॉकला बऱ्याचदा पक्षी फूल किंवा बर्डी म्हणूनही संबोधले जाते.

बॅडमिंटन रॅकेट बनवण्यासाठी वापरला जाणारा तारांची लांबी दहा मीटर लांब असते. पुरुष आणि महिला एकेरी तसेच दुहेरी सामन्यांसाठी 1992 मध्ये बॅडमिंटनला ऑलिंपिक खेळ म्हणून मान्यता मिळाली होती. जगातील सर्वात मोठा बॅडमिंटन सामना डेनमार्क व चीनमध्ये खेळण्यात आला होता. हा सामना 124 मिनिटे चालला होता. बॅडमिंटनच्या खेळात सर्वात जास्त यश मिळवणाऱ्या देशांमध्ये चीन आणि इंडोनेशिया पुढे आहे. संघाची स्थापना 1934 मध्ये करण्यात आली. त्याकाळी त्यामध्ये फक्त नऊ देश सहभागी होते. परंतु आज जगभरातील दीडशे देश यामध्ये सहभागी आहेत.

बॅडमिंटन खेळल्याने शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतात. बॅडमिंटन खेळल्याने शारीरिक क्षमता वाढते. खेळाडूची शारीरिक क्षमता वाढवता व्यक्तीच्या स्नायुंना बळकट करतो. बॅडमिंटनच्या खेळात इकडून तिकडे पळत रहावे लागते. त्यामुळे शरीराचा स्टॅमिना वाढतो. बॅडमिंटनमध्ये हृदयरोगाचा धोका सुद्धा कमी होतो. बॅडमिंटनमधील लगातार हालचालींमुळे हृदय मजबूत होते. हृदयाला योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होतो. ज्यामुळे व्यक्ती निरोगी राहून रुदयाचा धोका कमी होतो. मानसिक तणाव कमी होतो. बॅडमिंटन शारीरिक फायदे आहेत. तसेच या खेळाचे मानसिक फायदे सुद्धा आहेत. या खेळाला खेळ आणि शरीरातील ताण निर्माण करणारे हार्मोन्स कमी होतात. बॅडमिंटनमध्ये उड्या मारल्यामुळे पाठीचा कणा लवचिक होतो व यामुळे शरीराची लवचीकता वाढते.

“Batminton essay in Marathi कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

Leave a Comment