Dhondo Keshav Karve information in Marathi language | धोंडो केशव कर्वे

Dhondo Keshav Karve information in Marathi language धोंडो केशव कर्वे हे आधुनिक भारतातील एक श्रेष्ठ व कर्ते समाजसुधारक होते. महर्षी अण्णासाहेब कर्वे या नावानेच ते सर्वांना परिचित आहेत.  त्यांनी महिलांचे शिक्षण त्यांचे हक्क विधवा-पुनर्विवाह यासाठी आपले 104 वर्षाचं जीवन वाहिलेलं आहे.
तसेच आधुनिक महाराष्ट्रातील स्त्री समाज सुधारक असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे तर चला मग त्यांच्याविषयी माहिती पाहूया.

जन्म :
धोंडो केशव कर्वे यांचा जन्म 18 एप्रिल 1858 साली रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील शेरवली या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव केशव तर त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. धोंडो कर्वे यांना अण्णासाहेब या नावानेही ओळखली जाते. हे त्यांचे टोपण नाव होते.

बालपण व शिक्षण.

रत्नागिरी जिल्ह्यातील मुरूड हे अण्णांचे गाव होते. शिक्षणासाठी त्यांना खूप पायपीट करावी लागत असे. 1881 मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्या मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजातून त्यांनी गणिताची पदवी संपादन केली.

वैयक्तिक जीवन

वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा विवाह राधाबाई झाला. राधाबाई त्या वेळी आठ वर्षाच्या होत्या. वयाच्या 27 व्या वर्षी म्हणजेच 1891 साली राधाबाईचा मृत्यू झाला. त्याच वर्षी अण्णा साहेबांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणित शिकवायला सुरुवात केली. त्यानंतर 1914 पर्यंत त्यांनी ही नोकरी केली आणि अण्णा गणिती होते. लोकमान्य टिळक हे फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन करीत होते. पण राजकारणाच्या रणधुमाळीत ते उतरल्यानंतर त्यांच्या रिकाम्या जागी गणिताचे प्रमुख असणारे गोपाळ कृष्ण गोखले यांना अण्णांनी बोलावून घेतले. 1891 ते 1814 पर्यंतच्या कळात गणित हा विषय शिकविला.

पुनर्विवाह

मृत्यूनंतर अण्णा हे 45 वर्षाचे असताना त्यांनी आपला पुनर्विवाह करण्याचा निर्णय घेतला. प्रौढ वयात विधुर झालेल्या पुरुषानेही अल्पवयीन कुमारिकेशी लग्न  करण्याची त्या काळात प्रथा होती. लहान वयात मुलींची लग्ने होत, पण दुर्दैवाने पती लवकर मरण पावला तर त्या मुलीला मात्र त्याची विधवा म्हणून उर्वरित आयुष्य घालवावे लागे. अण्णा या गोष्टीचा विरोध करत होते म्हणून त्यांनी पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन संस्थेत शिकणाऱ्या गोदूबाई या विधवा मुलीशी पुनर्विवाह केला. ही गोष्ट काळाला मानवणारी नव्हती. अण्णा पत्‍नीसह मुरूडला गेल्यानंतर अण्णांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा ठराव संमत झाला. याच गोदूबाई पुढे आनंदी कर्वे या नावाने प्रसिद्ध झाल्या. अण्णा साहेबांच्या कार्यात आनंदी कर्वे यांचा सक्रिय वाटा होता.

कार्य

धोंडो केशव कर्वे यांनी महिलांचे शिक्षण त्यांचे हक्क विधवा-पुनर्विवाह यासाठी आपल्या आयुष्यातील 104 वर्षाचे जीवन वाहिले आहे. 1960 साली त्यांनी महाराष्ट्रात पुण्याजवळ घेण्याच्या माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे जीवन म्हणजे सामाजिक सुधारणा विशिष्ट स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांनी वाहिलेले आधुनिक ऋषितुल्य जीवन त्यांच्या कार्याचा प्रारंभ हा विधवा विवाहापासून झाला आणि त्याची परिमिती स्त्रियांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र विद्यापीठ काढण्यामध्ये झाले. स्त्रियांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी त्यांनी अविरत परिश्रम केले .

पुनर्विवाहासाठी लोकमताचे जागरण करावे, या उद्देशाने 21 मे, 1894 या दिवशी अण्णांनी पुनर्विवाहितांचा एक कुटुंबमेळा घेतला. या काळात अण्णांनी विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळाची स्थापना केली. विधवा-विवाहाला विरोध करणाऱ्या प्रतिगामी प्रवृत्तींवर आळा घालणे हे या मंडळाचे काम होते. बालविवाह, जरठ-कुमारी विवाह, केशवपन यासारख्या अनिष्ट रूढींत अडकलेल्या अनेक स्त्रियांना मोकळा श्वास मिळावा म्हणून 1896 मध्ये अण्णांनी सहा विधवा महिलांसह ‘अनाथ बालिकाश्रम‘ काढला. विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली. विधवाविवाह न्याय संमत मानला जात नव्हता. अशा काळामध्ये अण्णांनी विधवा विवाहाचा आग्रह धरून समाजाच्या मानसिकतेमध्ये बदल करण्यासाठी चळवळ उभी केली. या चळवळीचा एकूणच परिणाम म्हणजे या काळामध्ये पुनर्विवाहासाठी समाजाची मानसिकता तयार होऊ लागली.

रावबहादूर गणेश गोविंद गोखले यांनी अण्णांचे हे उदात्त कार्य पाहून हिंगणे येथील आपली सहा एकरांची जागा आणि 750 रुपये मध्ये संस्थेच्या उभारणीसाठी अण्णांकडे सुपूर्द केली. या उजाड माळरानावर अण्णांनी एक झोपडी बांधली. ही झोपडी हिंगणे स्त्रीशिक्षण संस्थेची गंगोत्री आहे. आज अनेक वास्तूंनी गजबजून गेलेल्या या वैभवसमृद्ध परिसरात अण्णांची झोपडी त्यांच्या तपाचे महाभारत जगाला सांगत उभी आहे.

सन 1900 मध्ये बालिकाश्रमाचे स्थलांतर हिंगण्यास करण्यात आले. याच परिसरात अण्णांनी विधवांसाठी एक हक्काची सावली निर्माण केली. विधवांचे हे वसतिगृह ही एक सामाजिक प्रयोगशाळा होती. स्त्रियांवर होणारे अत्याचार, त्यांना दिली जाणारी दुय्यम दर्जाची वागणूक यांचा त्यांना खूप राग येत असे. पंडिता रमाबाई आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या जीवनकार्यांमुळे अण्णासाहेब खूपच प्रभावित झाले होते. थोर तत्त्वज्ञ हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारांचाही त्यांच्यावर पगडा होता.

अण्णासाहेबांनी 1896 मध्ये पुण्याजवळील हिंगणे या गावी विधवा महिलांसाठी आश्रम स्थापन केला. या आश्रमात याच ठिकाणी इ.स. 1907 साली महिला विद्यालयाची स्थापना त्यांनी केली. अण्णासाहेबांची 20 वर्षांची विधवा मेहुणी पार्वतीबाई आठवले. या विद्यालयाच्या पहिल्या विद्यार्थिनी आहे. आश्रम आणि शाळा या दोन्हींसाठी लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी त्यांनी निष्काम कर्म मठाची स्थापना 1910 साली केली. स्त्रियांना आपल्या आवडीनुसार शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी आरोग्यशास्त्र, शिशुसंगोपन, गृहजीवन शास्त्र, आहार शास्त्र असे विषय अभ्यासक्रमामध्ये ठेवले. यामुळे स्त्रियांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली. ग्रामीण भागातही स्त्री शिक्षणाची गरज ओळखून कर्वे यांनी स्त्री शिक्षणाचा प्रसार व प्रचार करण्यावर भर दिला. ग्रामीण भागात त्यांनी ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ स्थापन केले व त्याद्वारे अनेक शाळा सुरू केल्या.

कर्वे यांनी एका जपानी महिला विद्यापीठाचे माहितीपत्रक पाहिले होते. त्यांच्या मनात भारतीय महिला विद्यापीठ स्थापन करण्याचा विचार येत होता. विद्यापीठाची प्रस्तावना म्हणून त्यांनी माध्यमिक विद्यालयाची स्थापना केली. शिक्षण संस्थांभोवती कार्यकर्त्यांची तटबंदी असावी म्हणून 1910 मध्ये ‘निष्काम कर्ममठ’ या संस्कार पीठाची स्थापना केली. इंग्लंड, जर्मनी, जपान, अमेरिका या देशांना भेटी देऊन अण्णांनी आपल्या संस्थांची आणि संकल्पांची जाणीव जगाला करून दिली. बर्लिनमध्ये असताना सापेक्षता वादाचे प्रणेते प्रा.अल्बर्ट आइनस्टाईन यांची त्यांनी भेट घेतली. त्यांनी बर्लिनमधली गृहविज्ञान शाळा पाहिली. टोकियोतील महिला विद्यापीठ पाहिले. अनेक राष्ट्रांत स्त्रियांनी चालविलेल्या संस्था पाहिल्या. हे पाहिल्यानंतर त्यांना अनेक नव्या योजना सुचल्या व त्यात त्यांनी पूर्णत्वास नेल्या.

सन 1915 मध्ये भरलेल्या अखिल भारतीय सामाजिक परिषदेचे अध्यक्षस्थान अण्णांनी भूषविले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी ‘महिला विद्यापीठ’ या कल्पनेचा पुनरुच्चार केला.
3 जून 1916 रोजी महिला विद्यापीठाची स्थापना झाली. स्त्री शिक्षणाची ही धारा विद्यापीठाच्या माध्यमातून सकार झाली. स्त्रियांना शिक्षणापासून दूर ठेवणाऱ्या समाजांना कर्वे यांनी प्रत्युत्तर दिले.

धोंडो कर्वे यांना मिळालेले पुरस्कार

धोंडो केशव कर्वे यांनी भारतात स्त्रियांसाठी खूप मोलाचे कार्य केलेले आहे त्या कार्य निमित्त त्यांना भारत सरकारने विद्यापीठाने पुरस्कार दिले आहेत. अनेक भारतीय विद्यापीठांनी त्यांना डी.लिट. पुरस्कार देऊन सन्मानित केले. पद्मविभूषण हा किताब त्यांना सन 1955 साली प्रदान करण्यात आला, तर लगेच 1958 साली त्यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्‍न देऊन सन्मानित करण्यात आले.
व त्यांना 104 वर्षाचे दीर्घायुष्य देऊन निसर्गानेही त्यांना सन्मानित केले. अशाप्रकारे धोंडो केशव कर्वे यांच्या कार्याला कोटी कोटी नमन.

मृत्यू

धोंडो केशव कर्वे यांचा पुण्यात वृद्धापकाळाने 9 नोव्हेंबर, 1962 ला निधन झाले. स्त्रियांना आपल्या आवडीने शिक्षण घ्यावे याकरिता त्यांनी विविध विद्यालयाची स्थापना केली. स्त्रीयांसाठी त्यांनी महत्त्वाचे कार्य करून त्यांना स्वातंत्र्य दिले आहे. स्त्रियांच्या शिक्षण व पुनर्विवाह संबंधित धोंडो केशव कर्वे यांनी मोलाची कामगिरी केली आहे.

Dhondo Keshav Karve information in Marathi language. धोंडो केशव कर्वे ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

 

Share on:

Hey there! This is Supada Bochare, a student of engineering and a blogger. Blogging is my Passion. I love to write articles on different topics. I also like to do things related to WordPress, Digital Marketing and Latest technologies.

Leave a Comment

x