शेतकरी निबंध Shetkari Nibandh in Marathi Essay on Farmer in Marathi -शेतकरी हा भारतामधील सर्वात अभागी जीव आहे. शेतकरी भारतातील सर्वांना अन्न पुरवठा करतो मात्र तो स्वतः कुपोषित आहे. ऊन, वारा, पाऊस, थंडी या कशाचीही पर्वा न करता काबाडकष्ट करून, मेहनत करून तो आपल्या पोटासाठी पैसा मिळवतो. परंतु आजपर्यत तो पैसा त्यास श्रीमंत करून शकला नाही किंवा शेतकऱ्यांची चिंता मिटवू शकला नाही. चला तर मग आज आपण शेतकरी निबंध पाहू या.
Shetkari Nibandh in Marathi
शेतकरी स्वतः कापूस पिकवतो, मात्र त्याच्या अंगावर कपडे नसतात. लाखो रुपयांच्या शेतीचा तो मालक असतो. परंतु खिशात त्याच्या दमडीही नसते. लाखो रुपयांची स्थावर मालमत्ता असलेल्या शेतकऱ्याकडे कर्ज घेण्यावाचून पर्याय नसतो. जमीन विकला जात नाही कारण ती मुलांसाठी लागते. कसेही उसने पासने करून तो त्याचा उदरनिर्वाह करतो.
कारण दरवर्षी पीक चांगले येईलच असे नाही .उत्पादन होईलच असे नाही, आणि शेती मालास भाव मिळेल असेही नाही, त्यामुळे भाव ठरवण्याचा अधिकार जर शेतकऱ्याला मिळाला तर शेतकऱ्यांची परिस्थिती ही वाईटाकडून चांगली होईल.
आमच्या अद्भुत माराठी ब्लॉगला पण भेट द्या
भारतातील शेतकरी फक्त शेती पिढ्यानपिढ्या पिकवत आहे त्या पिकवण्याचा मोबदला शेतकऱ्यास अजून पर्यंत मिळालेला नाही कारण शेतमालाचे भाव शेतकऱ्यांच्या मनासारखे कधीच नसतात.
सर्व वस्तूंचे भाव वाढतील परंतु शेतकऱ्याच्या मालाचे भाव कधीच वाढत नाही आणि त्यामुळे पिढ्यानपिढ्या शेतकरी हा दरिद्री राहतो ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर व्यापारी मात्र श्रीमंत होत असतो कोणताही घाम न गाळता व्यापारी कापड कष्ट न करता शेतकऱ्यांच्या जीवावर भरमसाठ पैसे कमावतात शेतकऱ्यांचा छळ करतात बियाणे कंपन्या कीटकनाशके किंवा खाते हे बोगस देतात आणि त्यामुळे उत्पादन हे कमी होते भावात असलेली चढ-उतार शेतकऱ्यांचा जीव खालीवर करते
शेतकऱ्यांकडून मातीमोल किमतीने धान्य कापूस सोयाबीन ऊस केली घेतल्या जाते. त्यातच आता वनसंरक्षण कायदा हा शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे कारण निघायचे कळप डुकरांचे कळप हरिणांच्या कळपावर शेतामध्ये घेऊन हजारो हेक्टर पीक फस्त करत असतात परंतु कोणीही त्याची तक्रार न करता निमुटपणे ते सहन करत राहतो.
त्यात अनियमितपणे बरसणारा पाऊस शेतकऱ्यांच्या पिकाचे फार मोठे नुकसान करतो अतिवृष्टी आहे अवकाळी पाऊस आहे वादळ वाऱ्यासह गारपीट आहे पूर आहे पिकांवर येणारी कीड आहे विविध रोग आहेत इत्यादी कारणांमुळे पिकांचे फार मोठे उत्पन्न घटते आणि एक प्रकारे निसर्ग हा शेतकऱ्यांची परीक्षा पाहतो.
Essay on Farmer in Marathi
शेतकरी या सर्व अडचणींवर मात करून आपला आयुष्य जगत असतो अन्नाची गरज भागवत असतो आणि कष्टाने आपलं जीवन फुलवत असतो.
भारत हा खेड्यात आहे असे म्हटले जाते कारण ग्रामीण जीवन हे शेतकऱ्यांविना अपुरे आहे. त्यांच्या शिवाय ग्रामीण जीवन असू शकत नाही कारण या ग्रामीण भागातूनच मोठे कलेक्टर डॉक्टर वकील इंजिनिअर चांगले राजकारणी निर्माण झालेले आहेत यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी वर्गांचे मुल आहेत.
परंतु आपल्या भारतामध्ये सावकार वकील असतील कारकून असतील असे सर्वांकडून शेतकऱ्याच्या अज्ञानाचा फायदा घेतला जातो म्हणूनच आज शेतकरीवर्गाला शिक्षणाची गरज आहे या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी त्यांना शिक्षण मिळाले पाहिजे हाच त्यांच्यासाठी सर्वात मोठा उपाय आहे अशाप्रकारे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुचवला आहे.
लालबहादुर शास्त्री यांनी जय जवान जय किसान असा नारा दिला आणि शेतकऱ्यांचा एक प्रकारे गौरवच केला महात्मा गांधीजींनी ही स्वातंत्र्यापूर्वीच समर्थ होतील ‘खेड्याकडे चला’ कारण खरा भारत हा खेड्यातच आहे. शेतकरी हा आता पूर्वीसारखा आला आला नाही चांगली बी-बियाणे खते वापरून बऱ्यापैकी उत्पन्न काढू शकला आहे.
शेतकरी निबंध
अशा शेतकऱ्यांच्या घरात आणि शेतीमध्ये विजा हे सौर पंपा आहेत त्यामुळे शेतकऱ्याला पाहिजे तसे उत्पन्न काढता येऊ शकते परंतु शेतकरी मित्रांनी सुद्धा नवीन आधुनिक साधनांचा वापर करून आपल्या शेतातील उत्पन्न वाढवले पाहिजे तरच ची शेतकऱ्यांकडे बघण्याची नजर आहे ती बदलेल शेतकर्यांकडे हि पैसे असतील त्यामुळे त्यांना सुद्धा मानपान मिळेल
शेतकरी आज जगाचा पोशिंदा म्हटल्या जाते शेतकऱ्यांमध्ये साक्षरता ही 25 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे उलेले 75 टक्के शेतकरी अजूनही अशिक्षित आहेत अंधश्रद्धाळू आहेत त्यामुळे यावर मात करणे शेतकऱ्यांना खूप आवश्यक आहे
जास्त शेती असणारे शेतकरी श्रीमंत आहेत परंतु कमी शेती असणारे शेतकरी अजूनही गरीबच आहेत. त्यांच्याकडून कवडीमोलाने माळ घेतला जातो, आणि शहरांमध्ये सोन्याच्या भावाने हे व्यापारी शेतकऱ्यांचा माल विकतात आणि त्या मालावरच ते स्वतः गर्भश्रीमंत होतात आणि त्यामुळेच शेतकरी शहराकडे वळतो आहे.
काबाड कष्ट करून, मेहनत करून आपल्या सर्वांचे पोट भरणाऱ्या शेतकर्यास माझा मानाचा मुजरा! तुम्हाला विविध योजनांबद्दल माहिती हवी असेल तर आमच्या शेतकरी या ब्लोग ला नक्की भेट द्या