Fulache Atmavrutta essay in Marathi language | फुलाचे आत्मवृत्त मराठी निबंध

Fulache Atmavrutta essay in Marathi language – फुले हे आपल्या जीवनातील किती महत्वाचा भाग बनला आहेत.  त्यागामील कारण आहे ते म्हणजे फुले हे आपण घरात देवांना चढवतो. काही कार्यक्रम असेल तर आपण फुलांनी घराला सजावत असतो. यासाठी आपण जास्तीत जास्त फुलांचा वापर करत असतो. हे आपण जुन्या काळापासून करत आलो आहेत कारण यापासून आपल्या घराला सौंदर्य आणि छान सुघंद मिळत असतो. फुलांचा औषध देखील बनवले जाते. आपण लग्नात किंवा काही कार्यक्रम असेल तेव्हा आपण लोकांना फुले सुद्धा देत असतो.

अनंत काळापासून फुलणारी विविधरंगी, विविधढंगी फुले आपल्या सौंदर्याने केवळ पशुपक्ष्यांना आणि किंटकांनाच नव्हे तर माणसालाही नेहमीच मोहात पाडत आली आहेत. काही फुलांचा रंग, काहींचा आकार, तर काहींचा सुगंध तर काहींचे सगळेच गुण निसर्गातील विविध घटकांना आकर्षित करणारे असतात. शास्त्रीयदृष्ट्या फूल म्हणजे वनस्पतींचे पुनरुत्पादनाचे रचनात्मक अवयव होय. अंकुराचा मुख्यत्वेकरुन पुनरुत्पादनाकरिता रुपांतरीत भाग आहे. तर आपण फुलांचे आत्मवृत्त विषयी मराठी निबंध पाहूया.

मी सर्वांच्या मनाला मोहून टाकणारा आणि सुगंधाने परिसर दरवळून टाकणारा असा सर्वांचा आवडता, लाडके फुल आहे. मी एक फुल बोलतोय मी तुम्हाला माझी कथा सांगतोय…! माझा जन्म एका सुंदर बागेमध्ये झाला होता. जेव्हा मी पहिल्यांदा डोळे उधडले तेव्हा मी पहिले की मी माझ्या आईच्या कुशीत म्हणजेच फांदीच्या कुशीत बसलो होतो. खूप प्रेमाने माझी आई मला झोके देत होती. त्या दिवसांमध्ये माझ्या पाकळ्यांमध्ये बालपणाची मस्ती होती आणि माझ्या ओठांवर कायम हास्य असायचे.

हिवाळ्याच्या ऋतूमधील वाऱ्याच्या आणि सूर्याच्या कोमल किरणांच्या स्पर्शाने मी दिवसा दुपट्टीने आणि रात्री त्यापेक्षा जास्त वेगाने वाढू लागलो. हळू-हळू माझा सुगंध चारही दिशांना पसरू लागला. भुंगे त्यांच्या आवाजाने मला मोहून टाकत असत. विविधरंगी फुलपाखरे माझ्यामधले मध घेण्यासाठी माझ्या आजूबाजूला फिरू लागली. वाऱ्याची झुळूक मला आनंद देत असे. माझ्या सौंदर्यामुळे सगळा बगीचाच खुलून गेला होता.

आता मी पूर्णपणे फुललो होतो. बागेचा माळी एक दिवस माझ्याकडे येताना मला दिसला. माझ्यावर त्याचे लक्ष जाताच त्याने त्याचा कठोर हात माझ्या दिशेने सरसावला आणि मला माझ्या आईच्या कुशीतून वेगळे केले. त्याचबरोबर, सुखी जीवनची माझी सगळी स्वप्ने मातीमोल झाली. एका टोपलीमध्ये माझ्या सारख्या असंख्य फुलांच्या मध्ये मला ठेऊन माळी मला त्याच्या घरी घेऊन गेला. माझे काही मित्र आधीच तेथे उपस्थित होते.

माळ्याच्या टोपलीमध्ये भुंगे नव्हते, मधमाश्या नव्हत्या आणि नव्हती ती फुलपाखरे. तिथे मी एक मोठी सुई आणि दोरा पहिला. थोड्या वेळाने तेथे माळीण आली आणि ती टोपलीमधील एक एक फुल उचलून हार बनवायला लागली. निर्दयतेने तिने मलाही त्या हारामध्ये गुंफले. माझे सौभाग्य म्हणजे संध्याकाळी माळ्याने तो हार देवाच्या मंदिरात घेऊन गेला. मंदिराच्या पवित्र वातावरणात माझी सगळी निराशा दूर झाली.  पुजाऱ्याने जेव्हा तो हार देवाच्या गळ्यात घातला तेव्हा मी धन्य झालो. पण दुसऱ्या दिवशी पुजाऱ्याने मला गळ्यातून काढून एका बाजूला ठेवले. हळू-हळू मी पूर्णपणे सुकून गेलो.

मनुष्याच्या दैनंदिन जीवनात फुलांचा वापर पूर्वीपासून होत आलेला आहे. फुलांचा फक्त उपयोग केला जातो परंतु त्यानंतर कोमेजलेल्या अवस्थेत कोणी ढुंकून सुद्धा पाहत नाही. माझ्याबरोबर घडलेल्या प्रसंगांचे वर्णन म्हणजेच माझी आत्मकथाच मला तुम्हाला सांगायची आहे. मला सर्वजण गुलाब म्हणून ओळखतात. माझा रंग गुलाबी आहे. परंतु सध्या लाल, पांढरा, केशरी, पिवळा अशाही रंगांचे गुलाब अस्तित्वात आहेत. अनेकांचे गुलाब हे आवडते फूल असते पण ज्यांना ते आवडते तेच मला तोडतात आणि माझा वापर करतात.

मी जेव्हा कळी होतो तेव्हा माझी खूप स्वप्नं होती. मी उमलावे, सुगंधित व्हावे आणि वाऱ्यासोबत इकडे तिकडे डोलावे! त्यानंतर दोन ते तीन दिवसात पूर्णपणे जीवनाचा आनंद घेऊन मिटून जावे. जवळजवळ प्रत्येक गुलाबाचे असेच स्वप्न असते. मनुष्य मात्र हे स्वप्न पूर्ण होऊन देत नाही. मी कळीतून फूल म्हणून विकसित होत होतो. मला असंख्य किरणांची अनुभूती होत होती. माझा विकास पूर्णत्वास जात होता. माझ्या कायेला सुगंध प्राप्ती होत होती. एके दिवशी पहाटे पहाटे मी पूर्ण बहरात आलो आणि एकदाचा उमललो.

तो दिवस माझ्यासाठी खूपच सुंदर व्यतित होत होता. परंतु ते सुख काही क्षणांचे होते. ज्या घरासमोर मी उमललो होतो त्या घरातील स्त्री आली आणि मला तोडले. माझे प्राण माझ्या झाडापासून वेगळे केले. मी तिच्या केसातील शोभा बनून राहिलो परंतु माझे जीवन मात्र शोभनीय राहिले नाही. सर्व पूजाविधी तसेच मंगल प्रसंगी माझा वापर केला जातो. मला फुलांचा राजा म्हणून संबोधले जाते. ते माझ्यात असलेल्या गुणांमुळेच! मला सुगंध आणि सौंदर्याचे प्रतिक मानले जात असल्याने मनुष्य माझे अस्तित्व सतत त्याच्या घराच्या अंगणात जपत असतो.

सध्या मानवाच्या जीवनामध्ये फुलाला खूप महत्त्व आहे. माझा प्रत्येक ठिकाणी उपयोग मानव करत असतो. मानवाच्या जीवनात ती उपयोगी पडतो. सर्वत्र माझा उपयोग होतो जसे की ऑफीस शाळा लग्न समारंभ कार्यक्रम. शोभेच्या वस्तू म्हणून मला वापरतात. मुली व  महिला माझा गजरा म्हणून उपयोग करतात. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आणि मला आपल्या जॉकेटमध्ये वापरत असेल. तेव्हा मला खूप अभिमान व्हायचा.

माझा उपयोग विविध कामासाठी केला जातो. जसे की हार बनवण्याकरिता गुलदस्ते बनवला करिता देवपूजेसाठी स्वागत समारंभ लग्नामध्ये आणि औषधे बनविण्याकरिता सुद्धा माझा वापर होतो. एवढेच नव्हे तर माझ्यापासून विविध खाद्यपदार्थ सुद्धा बनवले जातात. जसे की गुलकंद आणि मसाल्यांच्या पदार्थांमध्ये ही माझा वापर होतो. आज-काल माझ्यामुळे अनेक जणांना रोजगार सुद्धा उपलब्ध झाले आहे. अनेक जण फुलांची शेती वरून उत्पन्नदेखील मिळवतात. कुणाच्या उपयोगी पडत असले कारणाने मला अतिशय चांगले आणि अभिमान वाटते.

मनुष्य पूर्वीपासून माझ्या कायेचा उपयोग करीत आलेला आहे. सुगंधी अगरबत्ती, अत्तर, गुलाबजल, गुलकंद तसेच साबण बनवण्यासाठी माझा उपयोग होतो. परंतु तो फक्त उपयोग झाला, माझे जीवन आणि माझी सुंदरता मनुष्याने कधीच अनुभवली नाही
परंतु आत्ता मी त्या हरापासून वेगळा होऊन रस्त्यावर लोकांची धक्के खात आहे. कुठे बागेतील ते आनंदाचे दिवस, कुठे मंदिरातील देवाचे सानिध्य आणि कुठे हे दुर्भाग्य! मी माझे सारे जीवन या जगाला अर्पण केले, पण साऱ्या जगाने मला मला काय दिले?

मी माणसाच्या खूप उपयोगी पडतो म्हणून मला याची खूप खुशी वाटते पण कधी कधी दुःख सुद्धा होतं कारण तुम्ही कधी बागेमध्ये आला की, मला फुललेले पाहून माझ्याकडे तुम्ही पटकन आकर्षित होतात आणि कुणालाही न विचारता तुम्ही पटकन तोडून घेतात. त्यामुळे मला खूप दुःख होते. तुम्ही मला माझ्या परिवारांपासून दूर करतात आणि मग मी सुकून जातो तेव्हा तुम्ही मला दूर फेकून देता. यामुळे मला अतिशय दुःख आणि वेदना होतात. यापुढे माझी काळजी घेत चला अशी मला तुमच्याकडून अपेक्षा आहे.

‘फुलाचे आत्मवृत्त’ मराठी निबंध कसा वाटला ते कमेंट करू नक्की सांगा.

Fulache atmavrutta essay in Marathi language.

Leave a Comment