Ganesh Chaturthi Essay in Marathi | गणेश चतुर्थी निबंध

Ganesh chaturthi essay in marathi हिंदू धर्मामध्ये गणेश चतुर्थी व्रत बरेच लोक करतात. गाणंपत्य संप्रदायाचे लोक गणेश चतुर्थी व्रत पाळतात. श्रावण शुक्ल चतुर्थी व भाद्रपद शुक्ल चतुर्थी असे महिनाभर करायचे हे व्रत आहे. नदी किनारी जाऊन स्नान करून आपल्या हाताच्या अंगठ्या एवढी मातीची गणेश मूर्ती हातावरच तयार करावे. तिचे सोळा उपचारांनी पूजन करून ती एका नदीतच विसर्जन करावे हे व्रत आहे. याला पार्थिव गणेश व्रत असेही म्हटले जाते.

Ganesh Chaturthi Essay in Marathi | गणेश चतुर्थी निबंध

महिनाभर जमले नाही तर किंवा शेवटच्या दिवशी तरी पार्थिव मूर्तीची पूजा करावी यामागे धारणा आहे. गणेश चतुर्थीला गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. श्रीगणेशाची प्रतिष्ठापना विधीमध्ये माती मूर्तीचे आवाहन, स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, फुले, पत्री, नैवेद्य इत्यादी सोळा उपचारांनी पूजन केले जाते. त्यामध्ये त्याला विविध एकवीस पत्री अर्पण केल्या जातात. पावसाळ्यात या सर्व पत्री सामान्यता उपलब्ध असतात आणि ते प्रत्येक वनस्पती औषधी गुणधर्म आहे.

तुम्हाला जर मराठी मध्ये सर्व माहिती जाणून घ्यायची असल्यास Marathi Jeevan ब्लॉग ला अवश्य भेट द्या

मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी तिची उत्तर पूजा करतात. मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी हा मंत्र सुद्धा म्हटले जाते . यान्तु देवगणा: सर्वे पूजा मादाय | पार्थिवीम इष्टकाम प्रसिध्यार्थ पुनरागमनाय च || श्री महागणपती पूजन केलेल्या नारळावर तसेच उमामहेश्वर आणि श्री सिद्धिविनायक यांच्यावर अक्षता वाहून मूर्ती स्थानापासून थोडी हलवावी होता. त्यानंतर जलाशयात तिचे विसर्जन करतात. काळाच्या ओघात हे व्रत कुटुंबाच्या पद्धती नुसार दीड, पाच, सात, दहा दिवस केले जाते. काही कुटुंबात 21 दिवस हे व्रत करतात. तर काही ठिकाणी हे व्रत वार्षिक स्वरूपाचे असते.

गणपती हा संघटनेची देवता आहे. ऋग्वेदात ब्रह्मणस्पती देवतेची स्तुती केलेली आहे. तो सर्व गणांचा अधिपती आहे असे त्यात म्हटले आहे. या देवतेचा विकास होऊन पुराणकाळात तिला गणपती हे रूप प्राप्त झाले असे मानले जाते. भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होत असतो.

गणेश चतुर्थी हा हिंदू लोकांचा सण आहे. हा सण उत्सव पूर्ण भारतात भक्तिभावाने साजरा केला जातो. गणरायाचे आगमन भाद्रपद शुध्द चतुर्थीस होते. सर्व घरांमध्ये व सार्वजनिक मंडळांमध्ये श्री गणेश मूर्तीची स्थापना केली जाते. गणपतीला दुर्वा व लाल फुले अर्पण केली जातात. मोदक तयार करून गणपतीबाप्पांना नैवेद्य दाखवून दिले जाते व नंतर प्रसाद वाटला जातो. गणरायाचे भक्त मोठ्या उत्साहाने गणेशमूर्तीची पूजा व आरती करतात. पुर्वी हा उत्सव घरगुती स्वरूपात साजरा केला जायचा.

मात्र 1893 सालापासून लोकांमध्ये एकता निर्माण व्हावी म्हणून लोकमान्य टिळकांनी हा सण सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्याची पद्धत चालू केली. गणेश चतुर्थी हा सण दहा दिवस आनंदाने साजरा केला जातो व अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशमूर्तीचे विसर्जन तलाव, नदी किंवा समुद्रात केले जाते. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत सारेजण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देतात.

सर्व देवतांमध्ये महान असलेले महादेव हे आणि त्या महादेवाचे पुत्र श्री गणेश हे आहेत गणेश जी यांच्या आईचे नाव पार्वती माता आहे. माता पार्वतीने आपल्या अंगाच्या मळापासून श्रीगणेशाची निर्मिती केली आहे असा उल्लेख पुराणांमध्ये आपल्याला दिसून येतो. श्री गणेश मूर्ती जी देवता मानली जाते तसेच कितीही संकट आले तरी श्री गणेश आपल्या संकटांना हरतो अशी कल्पना सर्व प्रचलित आहे. त्यामुळे श्री गणेश हे वंदनीय आहेत. श्री गणेश यांना रिद्धी सिद्धी अशा 2 पत्नी आहे.

सर्वप्रथम पूजनीय आहेत. श्री गणेशाची वेगवेगळी नावे आहेत. कोणी त्यांना गजानन म्हणून हाक मारते, तर कोणी गणपती म्हणून हाक मारते, मोरया, मोरेश्वर, गणेश, एकदंत, विनायक, सुमुख, भालचंद्र, लंबोदर इत्यादी नावांनीही श्री गणेशजी यांना ओळखले जाते. कोणतेही शुभ कार्य असताना किंवा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना सर्वप्रथम श्रीगणेशाची आराधना पूजा केली जाते. श्री गणेश यांना विधिवत वंदन पूजन करूनच त्या कार्यक्रमाची सुरुवात केली जाते. सर्व देवी-देवतांमध्ये

श्री गणेशजी सर्वांचे लाडके आहेत. तसेच श्री गणेश यांना मोदक अतिशय प्रिय आहेत. त्यांचे वाहन उंदीर आहे. म्हणून गणपतीला व त्यांचे वाहन उंदीर यांना मोदकांचे भोग लावण्यात येतो. संकट चतुर्थीस चंद्राचे दर्शन घेऊ नये, चंद्राचे दर्शन घेतल्यास विघ्न येतात. या मागे एक पौराणिक कथा आहे. श्री गणेश एकदा आपले वाहन उंदीर यावरून जात असताना पडले होते.

त्यामुळे चंद्र व त्यांना हसला व श्री गणेश यांचा अपमान झाला व त्यामुळे श्री गणेश यांनी चंद्राला शाप दिला. ज्यावेळेस संकट चतुर्थीला तुझं तोंड कोणी पाहिल त्यावेळेस त्याच्यावर विघ्न येतील म्हणून संकट चतुर्थीस चंद्राला कोणीही पाहत नाही. प्रत्येक वर्षी वर्षातून एकदा गणेश उत्सव मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा केला जातो. गणेशोत्सव हा एकूण दहा दिवसाचा असतो तर कोणी कोणी दीड दिवसाचा, पाच दिवसाचा सुद्धा हा उत्सव बनवत असतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी विविध रुपात गणेशाची पूजा केली जाते.

या मूर्ती तयार करणे ही एक अद्वितीय अशी कला आहे. ज्यातून निराकारापर्यंत पोहोचता येते. गणेश स्तोत्र ही गणेशाच्या स्तुतीवर वर्णन होतात हे सांगितले आहे. आपण आपल्या बुद्धीने श्री गणेशाची प्रार्थना करतो की त्यांनी आपल्यासमोर मूर्तीच्या रूपात यावे, जेणेकरून आपण काही काळ त्याच्याशी रममाण होऊ आणि हसत-खेळत संवाद साधू शकतो. ठराविक दिवसांनंतर त्याची प्रार्थना करतो की, जिथून आले तिथे म्हणजे आपल्या जागी निघून जावे. आपण गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून त्याची पूजा करतो म्हणजे त्यांच्याकडून मिळालेल्या गोष्टी आपण त्यालाच अर्पण करत असतो.

काही दिवसांनी म्हणजे दहा दिवसांनी गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. सर्वव्यापी असलेल्या ईश्वराला साकार रूपात अनुभवणे आणि त्याचा आनंद घेणे ही गणेश चतुर्थी मागची मूळ भावना आहे. गणेश चतुर्थी म्हणजे उत्सव आणि पूजा तसेच उत्साह आणि मग तिचा समन्वय आहे. आपल्या मधला चांगुल पणाचा गुण इतरांमध्ये जागृत करण्याचा हा उत्सव आहे. तसेच गणपती यायच्या आधीच एक महिना पूर्ण तयारी करण्यामध्ये जात असते. गणपतीसाठी घरामध्ये छान डेकोरेशन लाइटिंग वेगवेगळे मोहक सुंदर आणि गोड पदार्थ बनविले जातात. सगळीकडे गाण्यांचा मोठा आवाज असतो. आपल्या त्या घरांमध्ये सुद्धा गणपतीचे आगमन मोठ्या थाटामाटात होते. आपल्या बाप्पासाठी आपण मोदक लाडू यांचा नैवेद्य ही दाखवत असतो.

तसेच गणेश चतुर्थी हा दिवस सर्वांसाठी खूप आनंदाचा असतो. आमच्या गावांमध्ये लहान गणपतीचे मंडळ आहेत. आम्ही सर्वजण तेथे गणपती बसवितो व पाहायला जातो. बाप्पाची स्थापना केली जाते. खूप आनंद असतो आमच्या गावांमध्ये लहान गणपतीचे मंडळ हे दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम घेत असतात व तेथे दररोज गणपतीच्या आरतीलाही आम्ही जात असतो. मोठ्या श्रद्धेने गणपतीला नमन करतो आणि मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी गणपतीला साकड घालतो. नवस बोलतो आणि तो नवस पूर्ण झाला की, पुढच्या वेळी तो नवस पूर्ण ही करतो. जे लोक तेथे दर्शनाला येतात.

मंडळाच्या वतीने दररोज महाप्रसादाचा कार्यक्रम आम्ही ठेवत असतो. लहान मुलांच्या स्पर्धा असतात जसे की वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, संगीत खुर्ची, डान्स आणि गीत गायन यांसारख्या स्पर्धांचे आयोजन केले जाते आणि ह्या स्पर्धा पाहण्यासाठी खूप मज्जा येत असते. लहान मुले खूप आनंद घेत असतात. अशाप्रकारे गणेशचतुर्थीची महिमा दिवसेंदिवस वाढत आहे. गणेश चतुर्थीची पोथी ही आहे. त्याचे श्रवण वाचन मन प्रसन्न होते. गणेश चतुर्थी धरणाऱ्या भाविक भक्तांच्या मनोकामना श्री गणेश जी पूर्ण करतात व श्री गणेश जी हे विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाते.

तुम्हाला “Ganesh chaturthi essay in Marathi कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

 

Leave a Comment