Gopal Hari Deshmukh information in Marathi language | गोपाळ हरी देशमुख

Gopal Hari Deshmukh information in Marathi language गोपाळ हरी देशमुख हे एक थोर समाजचिंतक होते. त्यांचे नाव गोपाळ हरी देशमुख हे आहे तसेच त्यांना लोकहितवादी असे म्हणूनही ओळखले जाते.

Gopal Hari Deshmukh information in Marathi language गोपाळ हरी देशमुख

गोपाळरावांच्या निपजणे विश्वनाथ यांच्याकडे 12 गावांची देशमुखी असल्यामुळे देशमुख हे नवे अडनाव या घराण्याला मिळाले होते. त्यांनी आपल्या कार्यातून, निबंधातून आपली राजकीय मते तसेच विद्या प्रसार हा धर्म, परमार्थ, अनिष्टचाली, समाजसुधारणा इत्यादी विषयांवर विचार स्पष्ट केले आहेत. त्यांच्याविषयी माहिती पाहूया.

जन्म

गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1823 मध्ये पुणे या शहरात झाला.
गोपाळराव देशमुख यांचे वडील हरिपंत देशमुख हे पुण्यात दुसर्‍या बाजीराव पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांची फडणीस म्हणून काम करीत होते. तसेच त्यांचे घराणे हे कोकणातले वतनदार होते. गोपाळराव देशमुख यांना ग्रंथसंग्रह व वाचनाची खूप आवड होती. इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय होता. त्यांनी त्या अनेक विषयावर पुस्तके लिहिली आहेत.

शिक्षण

पुण्यातील बुधवारच्या वाड्यात भरणाऱ्या सरकारी मराठी शाळेत गोपाळरावांचे शिक्षण झाले असावे. इंग्रजी भाषेचा अभ्यास त्यांनी खाजगी रीत्या सुरु केला होता. कोर्टात काही दिवस उमेदवारीही केली. वयाच्या 18 व्या वर्षी, ते पुण्यातील सरकारी इंग्रजी शाळेत जाऊ लागले. 1844 साली त्यांनी ही शाळा सोडली. सुरुवातीच्या काळात इंग्रजी शिक्षणामुळे घडलेल्या पहिल्या काही नवशिक्षित त्यांपैकी एक म्हणजे गोपाळ हरी देशमुख आहेत. त्यांनी मराठी शाळेत शिक्षण घेत असतानाच इंग्रजीचा अभ्यास केला. वयाच्या 21 व्या वर्षी ते न्यायालयात भाषांतरकार झाले.

जीवन

ज्या वर्षी त्यांनी शाळा सोडली त्याच वर्षी म्हणजे 1844 मध्ये त्यांना दक्षिणेकडील सरदारांच्या एजंटच्या कार्यालयात त्यांना अनुवादकाची नोकरी मिळाली. 1846 साली ते मुन्सफीची परीक्षा उत्तीर्ण झाले. 1852 मध्ये वाई जि. सातारा येथे फर्स्ट क्लास मुन्सफ म्हणून त्यांची नेमणूक झाली. 1853 मध्ये ‘ॲक्टिंग प्रिन्सिपल सदर अमीन’ आणि सातारा येथील अदालतीचे प्रमुख म्हणून काही महिने त्यांनी काम पाहिले.

1855 मध्ये पुणे येथे उत्तर विभागाचे ‘सब-असिस्टंट इनाम कमिशनर’ म्हणून ते नेमले गेले. पुढे 1861 साली हिंदू व इस्लामी कायद्यांचा गोषवारा तयार करण्याचे काम त्यांच्यावर सोपविले गेले. त्यानंतर सातारा, अहमदाबाद, सुरत, अहमदनगर, मुंबई, ठाणे, नाशिक अशी विविध ठिकाणी न्यायखात्यात सेवा देऊन 1879 साली ते सेवानिवृत्त झाले.

लोकहितवादींनी कोणाची मजुरी पत्करली नाही. लोकांनी ज्ञानी व्हावे आणि ज्या जुन्या रूढी परंपरा आहेत, त्या बाजूला ठेवाव्या. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असावे असे लोकहितवादींना वाटायचे श्रमातून संपत्ती निर्माण होते. या सूत्रातून गोपाळराव देशमुख यांना दारिद्र्य निर्मूलनासाठी काय करायला पाहिजे याची दिशा समजली.

विचार

इंग्रजी राजवटीबरोबर आलेली नवीन विद्या उपयोगी आहे आणि ती सगळ्यांनी मिळवली पाहिजे, हे सांगताना ती विद्या कशी मिळवावी याबद्दलही लोकहितवादींनी विचार मांडले आहेत.

हिंदुस्थानात पूर्वी भूर्जपत्रावर म्हणजे झाडांच्या वाळलेल्या पानांवर ग्रंथ हाताने लिहिले जात. राजाच्या, श्रीमंतांच्याकडे असे ग्रंथांची नकल करणारे म्हणजे ग्रंथांच्या भूर्जपत्रावर प्रती तयार करणारे लेखनिक कामाला असत. पण अर्थातच अशा किती प्रती तयार करणार ? त्यामुळे सगळ्या लोकांना ग्रंथ वाचता येत नसत. इंग्रजांनी छापाईची यंत्रे येथे आणली आणि भारतात छापखाने चालू झाले. यंत्रांवर छापल्यामुळे पाहिजे तेवढे ग्रंथ छापता येऊ लागले आणि छापील ग्रंथ किंवा छापलेली पुस्तके हा विद्या मिळवण्याचा मार्ग झाला.

लोकहितवादी माहीत होते की, खरे तर देशी भाषांतून नवीन ग्रंथ तयार करवून घेऊन ते शाळांतून शिकवावे व मोठ्या लोकांनी वाचावे. त्यांच्या पिढीचे मोठे लोक संसारात पडून पोट भरण्याच्या मार्गाला आधीच लागलेले आहेत. ते यापुढे काही तरी शिकतील अशी फारशी आशा नाही. तरूण पिढीच्या हातूनच काही झाले तर होईल अशी आमची आशा आहे. आपल्या 93 व्या पत्रात ते म्हणतात की, ‘विद्याभ्यास जो करविणें तो चांगली समजूत पटेल, लोक विचार करणारे होतील अशा प्रकारचे त्यास पंतोजी व शाळा पाहिजेत.

जी भाषा व जे ग्रंथ प्रथम मुलांचे हातीं पडतात व ज्या मनुष्यची संगत त्यांस असते, तशी त्यांची समजूत होते. म्हणून मुलांस ग्रंथ वाचावयास द्यावयाचे ते प्रथम चांगले पाहिजेत. त्यांस सुबुद्धी होऊन त्याची समजूत चांगली पटावी व त्यांनी बहुत वाचण्यावर लक्ष द्यावें व त्यांच्या मनांत जुन्या ज्या समजुती येतात, त्या सर्व लबाड आहेत. असे त्यास कळले पाहिजे व त्यांस ग्रंथांची गोडी लागून ग्रंथ वाचावे असे त्यांस वाटले पाहिजे.

ग्रंथ हेच गुरू

ग्रंथ लिहिणे हे लोकहितवादी विद्वत्तापूर्ण काम समजतात. बेकन, गॅलिलिओ, देकार्त, कोपरनिकस, केप्लर यांना अर्वाचीन युरोपचे जनक असे म्हणतात, हे तुम्हाला माहीत असेलच. ह्या सगळयांनी पुस्तके लिहिली. खूप निरीक्षण करून, संघोधन करून त्यांनी भोवतीची भौतिक सृष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून हाती लागलेले सिद्धांत पुस्तकांच्या रूपाने जगासमोर ठेवले. ‘छापण्याची कला’ या पत्रात लोकहितवादी म्हणतात.

‘वृत्तपत्रे म्हणजे बृहत्तर जिव्हा असे समजले पाहिजे. याचा उपयोग इंग्रज लोक जसा करितात तसा आपले लोक करून शहाणपणा वाढवतील तर फार चांगले होईल. हा समय आला आहे की, आता आपले मनातील गोष्ट उघडपणीं व निर्भयपणाने सांगतां व कळवतां येते. असे पूर्वी नव्हते.’

लोकहितवादींचे हे विचार आज आपण ज्याला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, बोलण्याचे स्वातंत्र्य म्हणतो तेच आहेत. मुद्रणकला आणि वर्तमानपत्र यामुळे एक प्रकारचे निर्भीड लेखन सुरू झाले. त्याचे महत्त्व लोकहितवादींना समजले होते. मुद्रण, वर्तमानपत्र तसेच उत्तम ग्रंथ यामाध्यमातून समाजसुधारणा घडवून आणता येईल हे त्यांना माहित होते.

इंग्रज केवळ धर्मावर विश्वास न ठेवता बुद्धिवर विश्वास ठेवतात. ते अधिक कर्तबगार आणि प्रामाणिक आहेत असे समाजसुधारकांना वाटत होते. इंग्रज हे खरेतर युरोपातून म्हणजेच बाहेरून आलेले. त्यांचे राज्य म्हणजे परक्यांचे राज्य होते. पण तरीसुद्धा आपल्या समाजाची सध्याची दुरवस्था, निर्नायकी अवस्था या सगळ्यात आपल्या समाजाला योग्य त्या मार्गाला लावण्याची क्षमता फक्त इंग्रज लोकांच्यात आहे. असे मत लोकहितवादींनी सुद्धा त्यांच्या वेगवेगळ्या पत्रांमधून मांडले आहे.

साहित्य

लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी मराठीत 36 ग्रंथांची निर्मिती केलेली आहे. त्या व्यतिरिक्त त्यांनी खालील साहित्य लिहिले आहेत.

पानिपतची लढाई,

हिंदुस्तान चा इतिहास (1842)

ऐतिहासिक गोष्टी भाग 1 (1877)

ऐतिहासिक गोष्टी भाग 2 (1878)

ऐतिहासिक गोष्टी भाग 3 (1880)

हिंदुस्थानचा इतिहास : पूर्वार्ध (1878)

गुजरात देशाचा इतिहास (1881)

लंकेचा इतिहास (1888)

सौंराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास

उदेपूरचा इतिहास

ग्रंथांतील सुभाषितांचे भाषांतर, (1878)

प्राचीन आर्यविद्यांचा क्रम, विचार आणि परीक्षण (1880)

आश्वलायन गृह्यसूत्र (अनुवाद,1880)

आगमप्रकाश (गुजराती, 1884). या ग्रंथाचे मराठी भाषांतर पुढे रघुनाथजी यांनी केले.

निगमप्रकाश (1884)

राज्यशास्त्र-अर्थशास्त्र :

लक्ष्मीज्ञान, हिंदुस्थानात दरिद्रता येण्याची कारणे आणि त्याचा परिहार, व व्यापाराविषयी विचार.

स्थानिक स्वराज्य व्यवस्था (1883)

ग्रामरचना त्यातील व्यवस्था आणि त्यांची हल्लीची स्थिती (1883)

स्वदेशी राज्ये व संस्थाने (1883)

समाजचिंतन

जातिभेद (1887)

भिक्षुक

प्राचीन आर्यविद्या व रीती (1877)

कलियुग

निबंधसंग्रह (1866)

विद्यालहरी

होळीविषयी उपदेश 1847

महाराष्ट्र देशातील कामगार लोकांशी संभाषण 1848. सरकारचे चाकर आणि सुखवस्तू हिंदुस्थानातील साहेब लोकांशी संभाषण 1850,
यंत्रज्ञान, पदनामा, पुष्पयन, शब्दालंकार इ.

पुरस्कार

ब्रिटिशांनी गोपाळराव देशमुखांना ‘जस्टिस ऑफ पीस’ या पदवीने आणि 1877 मध्ये ‘रावबहाद्दूर‘ या पदवीने सन्मानिले.
1881 मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना ‘फर्स्ट क्लास सरदार’ म्हणून मान्यता दिली.

मृत्यू

पुण्यामध्ये 9 ऑक्टोबर 1892 रोजी गोपाळ हरि देशमुख यांचा मृत्यू झाला. Gopal Hari Deshmukh information in Marathi language. “ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

Leave a Comment