Jagtik Paryavaran Divas essay in Marathi language | जागतिक पर्यावरण दिवस

Jagtik Paryavaran Divas in Marathi language 1972 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी पर्यावरण परिषदेच्या निमित्ताने जागतिक पर्यावरण दिनाची घोषणा करण्यात आली.  ही मोहीम प्रथम 5 जून 1973 रोजी साजरी करण्यात आली.  हा दरवर्षी साजरा केला जातो आणि त्याचा कार्यक्रम विशेषतः संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेल्या वार्षिक थीमवर आधारित असतो. दरवर्षी 5 जून हा  दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो.  पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे,  पर्यावरणाच्या समस्या व पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरण विषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी, म्हणून सुयोग्य पोषक वातावरणाची निर्मिती करणे हा पर्यावरण दिवस साजरा करण्यामागचा हेतू आहे. तर चला मग पाहुया जागतिक पर्यावरण दिवसा विषयी माहिती.

नक्की वाचा –

पर्यावरण हा शब्द मूळ फ्रेंच शब्दापासून तयार झालेला आहे. सजीव व निर्जीव यांच्यामधील क्रिया प्रतिक्रिया व आंतरक्रिया मधून निर्माण झालेली सजीवांच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होईल पहिल्या महायुद्धानंतर मानवाच्या निसर्गावरील अत्याचाराचे भयावह परिणाम शास्त्रज्ञांच्या लक्षात आले.  त्याचप्रमाणे औद्योगिक क्रांतीच्या चांगल्या
स्वरुपाबरोबरच त्याचे दूरगामी व गंभीर परिणाम मानवाला भेडसावू लागतील ह्याची जाणीव झाली.  म्हणून इ.स. 1960
मध्ये पर्यावरणशास्त्र  किंवा पर्यावरण विज्ञान हे विषय अभ्यासासाठी स्वतंत्रपणे  लागू करण्यात आले. तसे पाहिले  तर मानव हा पर्यावरणाचाच एक  अत्यंत बुद्धिमान सजीव भाग म्हणा किंवा सजीव घटक आहे. मात्र पर्यावरणाच्या इतर बहुतांशी सर्वच सजीव असोवा निर्जीव अशा प्रत्येक घटकात  मानवी  हस्तक्षेप वाढत चालला आहे.  म्हणून   पर्यावरणीय आपत्तीचे शास्त्रीय पद्धतीने अध्ययन व  त्यावर परिणामकारक उपाययोजना करण्यासाठी शिक्षण महत्वपूर्ण बनले आहे.

पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी आम्ही सारे वसुंधरा पुत्र मानव कटिबद्ध आहोत. याचे सदैव भान राखून आपआपल्या परीने आम्ही थोडे का होईना हातभार लावू असा पर्यावरणाचा वसा घेतल्यास, नक्कीच आपण खऱ्या अर्थाने आजचा जागतिक पर्यावरण दिवसासाठी संकल्प केला असे म्हणता येईल.

जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्याची दरवर्षी थीम ठरवली जाते. पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांमध्ये लॉकडाऊन असल्यामुळे हा दिवस यावेळी वेगळ्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. कारखाने, वाहनांची वाहतूक यासह सगळ्याच गोष्टी लॉकडाऊनमुळे बंद असल्याने प्रदूषण आपोआपच काहीसे कमी झाले आहे. त्यामुळे पर्यावरणाबाबत लोकांच्या मनातील चिंताही कमी झाली आहे. त्यामुळे यंदाचा पर्यावरण दिवस मागील वर्षांपेक्षा वेगळा झाला असे आपल्याला म्हणता येईल. संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार, 2020 ची थीम ‘वेळ आणि निसर्ग’ अशी होती.

आज मनुष्य, प्राणी-पक्षी, किटक यांचे जीवन पर्यावरणामुळेच शक्य आहे. या दिवसामागील पर्यावरणाशी संबंधित समस्यांना मानवी चेहरा देण्यासोबतच, लोकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरुकता निर्माण व्हावी हा उद्देश्य आहे. पर्यावरणाप्रति लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांद्वारे आयोजित केला जाणारा जागतिक पर्यावरण दिवस हा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम आहे.

जागतिक पर्यावरण दिवस हा कार्यक्रम एखाद्या शहराद्वारे आयोजित केला जातो, जिथे पर्यावरणाशी संबंधित विषयांवर चर्चा केली जाते, ज्यामध्ये अनेक उपक्रम समाविष्ट केले जातात.  आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी जगभरातील काही सकारात्मक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि लोकांना जागृत करण्यासाठी हा दिवस संयुक्त राष्ट्रांसाठी सर्वात महत्त्वाचा दिवस आहे.  आता, 100 हून अधिक देशांतील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे एक प्रमुख जागतिक व्यासपीठ बनले आहे.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित करण्यात येणारे उपक्रम जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रम विशेषत: भारतात शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रमांद्वारे साजरा केला जातो.  विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी काही प्रभावी कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आखली आहे.  जसे की निबंध लेखन, भाषण देणे, शिक्षण, विषय चर्चा, स्लाइड शो, प्रश्नमंजुषा स्पर्धा, कला स्पर्धा, बॅनर प्रदर्शन, चर्चासत्रे, परिसंवाद, निर्धारित विषयावरील कार्यशाळा, चित्रकला स्पर्धा, संबंधित विषयावरील व्याख्याने, थीमवर आधारित सादरीकरण, चित्रपट शो, निवेदन, लेखन, इ. आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या संदर्भात, विद्यार्थ्यांना सकारात्मक क्रियाकलाप करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.

सध्या शहरात आणि ग्रामीण भागातही दुचाकी आणि चारचाकी वापरण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशिष्ट शहरातील प्रदुषणाची आकडेवारी पाहून आपण तेवढ्यापुरते आश्चर्य व्यक्त करतो, मात्र पुन्हा पहिले पाढे पंचावन्न असे होऊन जाते. त्यामुळे वाहतुकीच्या सार्वजनिक साधनांचा जास्तीत जास्त वापर करा. तसेच शक्य असेल त्याठिकाणी चालत जा. यामुळे पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी होऊन पर्यायाने पर्यावरणाचा ऱ्हास कमी होईल.

घरातील ओला कचरा साठवून त्यापासून खतनिर्मिती करता येते. त्याविषयी हल्ली अनेकठिकाणी सहज माहिती मिळते. सोसायटीमध्ये एकत्रित मिळून हा प्रकल्प करता येतो. अन्यथा अगदी लहानशा जागेतही हा प्रकल्प करणे शक्य आहे. त्यामुळे घरच्या घरी खत तयार करुन कुंडीतील फुलांच्या रोपांसाठी हे खत तुम्ही वापरु शकाल. येत्या काळात जे युद्ध होईल ते पाण्यावरुन असेल असे आपल्या कानावर पडत आहे. त्यामुळे आपल्या देशात, राज्यात आणि गावात ही परिस्थिती उद्भवू नये यासाठी पाण्याचा जपून वापर करा.

समुद्र, नद्या सरोवर यांचे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित होत आहेत. त्यामुळे मानव आणि इतर प्राणी, पशु-पक्षी तसेच निसर्गातील वातावरणावर देखील त्याचा परिणाम होत असतो म्हणून सरोवरांचे संरक्षण व संवर्धन तसेच सरोवरातील वन्यजीवांचे संरक्षण व विकास यावर भर देऊन त्याचे महत्त्व जनमानसात पटवून देण्यासाठी चर्चासत्रे आयोजित करणे. नद्यांचे प्रदूषण शहरी सांडपाण्यामुळे होत असल्याने त्या विषारी बनत आहेत. त्यासाठी त्या ठिकाणी पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. पर्यावरण व प्रदुषणासंदर्भात केंद्र व राज्य शासनाने संमत केलेल्या अधिनियम व नियमावलीचे काटेकोर पालन करणे या प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबविल्यास आपण खर्‍या अर्थाने पर्यावरणाच्या समृद्धीचा दिशेने वाटचाल करु, यात शंका नाही.

पर्यावरण दिनानिमित्त आपल्या हाती असलेले कार्य आपल्या घरुनच सुरुवात करुया. पुन्हा पुन्हा वापरात येऊ शकणार्‍या वस्तू जसे पेपर, काचेच्या वस्तू, अल्युमिनियम, मोटरऑईल अशांची पनुर्निर्मिती करुया. हातांनी जे काम करु शकतो ते काम इलेक्ट्रीक उपकरणा- शिवाय करुया. शक्य असल्यास गरम पाण्याऐवजी थंड पाण्याचा वापर करुया या. प्लॅस्टीक पिशव्यांऐवजी परत परत वापरता येणार्‍या कागदी पिशव्या वापरु या. अन्न आणि भाजीपाला प्लॅ‍स्टीकमध्ये न ठेवता अल्युमिनियम पापुद्र्यात ठेवूया. पाण्याचा गैरवापर करणे थांबवूया. घरातील रुम हिटरचा वापर न करता स्वेटर घालून इलेक्ट्रीक ऊर्जेचा वापर टाळूया. गरज नसल्यास घरातील टी.व्ही., बल्ब तसेच अन्य इलेक्ट्रीक उपकरणाचा वापर थांबवूया. घरातून बाहेर पडताना पाण्याचा हिटर, पंखा, विजेचा दिवा बंद करुया. याशिवाय आणखी एक पाऊल पुढे जाऊन, पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे काम करणार्‍या एखाद्या स्वयंसेवी संस्थेचे सभासद होऊन पर्यावरण वाचविण्यासाठी विविध मोहिमा राबवूया आणि या माध्यमातूनच जनजागृती करुया.

आपला देश सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर असताना आपण पर्यावरणाच्या प्रगतीकडे डोळेझाक करुन चालणार नाही. निसर्गावर अन्याय करतो हे आपण त्सुनामी, नरगिससारखी सागरी वादळे, भूकंप, ढग फूटी, महापूर, दुष्काळ रोगराई अशा अनेक नैसर्गिक प्रकोपाद्वारे जाणवला आहे. हे सर्व लक्षात घेऊन प्रत्येक व्यक्तीने वरीलप्रमाणे उपक्रम राबविल्यास आपण पर्यावरणाचा समतोल राखू आणि खर्‍या अर्थाने समृद्धीच्या दिशेने वाटचाल करु.

पर्यावरणाच्या जैविक घटकांमध्ये सूक्ष्मजीवांपासून कीटक, प्राणी आणि वनस्पती आणि सर्व जैविक क्रियाकलाप आणि त्यांच्याशी संबंधित प्रक्रियांचा समावेश आहे. वातावरणाच्या अजैविक घटकांमध्ये निर्जीव घटक आणि त्यांच्याशी संबंधित प्रक्रिया असतात, जसे की पर्वत,खडके, नदी, वारं आणि हवामान घटक. सर्वसाधारणपणे, हे सर्व जैविक आणि अजैविक घटक, तथ्य, प्रक्रिया  आपल्या जीवनावर परिणाम पाडणाऱ्या घटनांचा समावेश असलेले एक घटक आहे. हे आपल्या सभोवताली व्यापलेले आहे. आपल्या जीवनातील प्रत्येक प्रसंग या पर्यावरणावर अवलंबून आहे आणि तसेच ते संपादित केले जाते. मानवांनी केलेल्या सर्व कृतींचा पर्यावरणावर थेट किंवा अप्रत्यक्ष परिणाम होतो. अशा प्रकारे, जीव आणि पर्यावरणामध्ये देखील एक संबंध आहे,जो परस्पर अवलंबून आहे.

मानवी हस्तक्षेपाच्या आधारे, पर्यावरणाची दोन भागात विभागणी केली जाऊ शकते, पहिली नैसर्गिक किंवा नैसर्गिक वातावरण आणि मानवनिर्मित वातावरण. ही विभागणी नैसर्गिक प्रक्रिया आणि परिस्थितीत मानवी हस्तक्षेपाच्या अत्यधिक प्रमाणात आणि कमतरतेनुसार आहे. प्रदूषण, हवामान बदल इत्यादी पर्यावरणीय समस्या मानवाला  त्यांच्या जीवनशैलीबद्दल पुनर्विचार करण्यास प्रवृत्त करत आहे आणि आता पर्यावरण संरक्षण आणि पर्यावरण व्यवस्थापन करणेआवश्यक आहे. आज आपल्याला सर्वात जास्त गरज आहे. ती म्हणजे सर्वसामान्यांना आणि सुशिक्षित वाचकांना पर्यावरणाच्या संकटाची जाणीव करुन देण्याची आणि पर्यावरणाच्या रक्षणाची प्रतिज्ञा घेण्याची आपण आपल्या पर्यावरणाचा सांभाळ करू व पर्यावरणाची काळजी घेऊया. अशी शपत घेऊ आणि आपल्या पर्यावरणाचे रक्षण करू या.

“जागतिक पर्यावरण दिवस” ही माहिती कशी वाटली, ते कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment