Junya ghadyalche atmavrutta essay in Marathi language | जुन्या घड्याळाचे आत्मवृत्त मराठी निबंध

Junya ghadyalche atmavrutta essay in Marathi language – दिवाळीच्या सुट्टीमध्ये माझ्या घरची कामे करण्यासाठी मी एका जुन्या स्टोअर रूम मध्ये गेलो. तेथिल बरीच काम मी आटोपली होती. एका बॉक्समध्ये काहीतरी असल्यासारखे मला वाटले म्हणून मी तो बॉक्स उघडून पाहिला. तेव्हा मला त्यामध्ये एक जुने घड्याळ आढळले व ते घड्याळ दिसायला खूप सुंदर लाल रंगाचे होते. ते पाहून माझ्या मनाला खूप आनंद झाला. मनात इच्छा व्यक्त झाली की, ही घड्याळ आपण आपल्या घरातच लावायला पाहिजे परंतु या बॉक्समध्ये ही कोणी ठेवली हे मला माहीत नव्हते. मी तिला बॉक्समधून काढून टेबलावर ठेवले, टेबलावर ठेवताच त्या मधून आवाज ऐकू येऊ लागला, मी आश्चर्यचकित झालो.

घड्याळ बोलायला लागली ती म्हणाली, “माझे काम सर्वांना वेळ सांगून वेळेचे महत्त्व  समजावणे आहे. आजच्या धावपळीच्या काळात प्रत्येकजण पुन्हा पुन्हा माझ्याकडे पाहून आपली कामे करीत असतो. मित्रांनो मी एक घड्याळ आहे. मला एका खाजगी कार्यालयाच्या भिंतीवर लावण्यात आले आहे. या कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची दृष्टी माझ्या वर पडते. मी देखील चारही बाजूंना काय चालले आहे ते पाहू शकते.

माझा रंग लाल आहे व मी दिसायला खुप सुंदर आहे. मला एका घड्याळाच्या कारखान्यात तयार करण्यात आले होते. प्लास्टिक, स्टील इत्यादींचा वापर करून मला तयार केले. यानंतर तेथून काही लोक मला इतर घड्याळींसोबत बाजारात घेऊन आले. बाजारातील एका प्रसिद्ध घड्याळ दुकानात मला पाठवण्यात आले. दुकानदार मला इतर घड्याळीं सोबत काचेच्या पेटीत ठेवत असे.  काही दिवस दुकानात तसेच पडून होते मात्र एके दिवशी मला तुझ्या आजोबांनी पाहिले व त्यांनी मला खरेदी करून या घरात आणले, तेव्हा माझे केवढे कौतुक झाले होते ! माझे सर्व अवयव हे परदेशात म्हणजे स्विझरलँड मध्ये तयार झाली होती. ‘लक्झरी वॉच कंपनी’ या माझ्या जन्मदात्री कंपनीचं नाव माझ्यावर कोरले गेले.

तुझे आजोबा खरे रसिक. त्यांना चांगल्या वस्तू आणायची आवड होती. या घराच्या दिवाणखान्यात मी रुबाबात सोबत होतो. दर तासाला मी ठोके देत असे आणि त्या तालावर सर्वांचे काम चाली. तुझे आजोबा दर आठवड्याला मला न विसरता चावी देत. ते माझी काळजी घेत. त्यांना माझ्याविषयी अभिमान होता. घरी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांना ते मला दाखवत. परंतु आता आमच्या मध्ये खूप अविष्कार पाहायला मिळतो. पूर्वीच्या घड्याळांमध्ये आणि आता तयार होणाऱ्या घड्याळांमध्ये जी तफावत आहे ती म्हणजे पुढील प्रमाणे व्हॉइस कॉलिंगसह स्मार्ट घड्याळांना मोठी मागणी आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांच्याकडे मायक्रोफोन आणि स्पीकर असल्यामुळे सामान्य स्मार्टवॉचच्या तुलनेत त्यांना कॉल करण्याची आणि रिसीव्ह करण्याची सुविधा त्यात मिळते.

व्हॉइस कॉलिंगसह स्मार्ट वॉचचे दोन प्रकार आहेत. पहिला- ई-सिमसह स्मार्ट वॉच आणि दुसरा- ब्लूटूथ कॉलिंग फीचरसह. त्याबद्धल थोडे- ई-सिम एक पूर्णपणे डिजिटल आहे. भौतिक सिममध्ये उपलब्ध असलेल्या सर्व सुविधा ई-सिममध्ये आहेत. स्मार्टफोन असो किंवा स्मार्ट घड्याळ, त्यांच्यामध्ये प्री-इंस्टॉल केलेली चिप येते. दूरसंचार सेवा प्रदात्याच्या जवळच्या कार्यालयाला भेट देऊन त्याची नोंदणी आणि सक्रिय करणे आवश्यक आहे. इंटरनेट सुविधा: घड्याळाद्वारे तुम्ही व्हॉट्सअॅप, ईमेल इत्यादी पाठवू आणि प्राप्त करू शकता.

“काही काळानंतर तुझे आजोबा देवाघरी गेले. त्यावेळी मला खूप वाईट वाटले. आजोबा गेल्यावर सर्वांचे माझ्याकडे दुर्लक्ष झाले. बरीच वर्षे सेवा केल्यावर मी सुद्धा थकलो, गात्रे थांबली. वारंवार तक्रारी करूनही मी व्यवस्थित काम करू शकेना, तेव्हा मला एका बॉक्समध्ये पॅक करून या जागी ठेवण्यात आले. “आता तू असे कर मला एखाद्या जुन्या वस्तूंच्या संग्रहालयात नेऊन ठेव व नवीन वर्जनमधील घड्याळ घेऊन ये. मी तृप्त आहे” आवाज बंद झाला घड्याळ बोलणे थांबले होते.

junya ghadyalche atmavrutta essay in Marathi language.

“जुन्या घड्याळाचे आत्मवृत्त” हा निबंध तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment