Mahatma Jyotiba Phule information in Marathi language | महात्मा ज्योतिबा फुले

Mahatma Jyotiba Phule information in Marathi language महात्मा ज्योतिबा फुले एक समाज सुधारक, समाज प्रबोधक, विचारवंत, लेखक आणि क्रांतिकारी होते. त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी अतोनात परिश्रम घेतले आहे. तसेच सत्यशोधक समाजाची त्यांनी निर्मिती केली आहे. शेतकरी आणि बहुजन समाजाचे अन्यायाविरुद्ध प्रबोधन केले आहे. जाती व्यवस्थेचा विरोध त्यांनी केला आहे. त्यांच्या महान कार्याचा गौरव करण्यासाठी मुंबईतील एका सभेत त्यांना समाजाकडून ‘महात्मा’ ही पदवीसुद्धा देण्यात आलेली होती. तर आपण महात्मा फुले यांच्या विषयी माहिती जाणून घेऊया.

जन्म

महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल, 1827 रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुन गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव फुले तर आईचे नाव चिमणाबाई असे होते. ज्योतिबा फुले यांचे मूळ आडनाव गोरे होते. परंतु ते फुलाचा व्यवसाय करत असल्यामुळे त्यांचे आडनाव गोरे वरून फुले असे पडले. जोतिबांच्या जन्मानंतर ते नऊ महिन्यांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले.

बालपण व शिक्षण

ज्योतिबा फुले यांचा विवाह तेराव्या वर्षी सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला. त्यांना प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी भाजी विकण्याची हे काम करीत असत. ज्योतिरावांना इंग्रजी शिक्षण घेण्याची इच्छा होती. 1842 मध्ये ज्योतीबांनी माध्यमिक शिक्षणासाठी पुण्यातील स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. घरात बेताची परिस्थिती असूनही केवळ तल्लख बुद्धिमत्ता मुळे त्यांनी हा अभ्यासक्रम पाच-सहा वर्षातच पूर्ण केला. त्यानंतर त्यांची ओळख सदाशिव बल्लाळ गोवंडे या ब्राह्मण मुलाशी झाली. जे पुढे त्यांचे आयुष्यभर जिवलग मित्र होते. शैक्षणिक काळात त्यांचे सखाराम यशवंत परांजपे, मोरे पंत विठ्ठल वाळवेकर त्यांना भेटले. या मित्रांनीही जोतिबांच्या सामाजिक सुधारणेच्या चळवळीत त्यांना नेहमी सहकार्य केले. शिक्षणासोबत त्यांनी दांडपट्टा मल्लविद्या हे देखील संपादन केल्या होत्या.

ज्योतिबा फुले लहानपणापासूनच हुशार, करारी, शिस्तप्रिय अभ्यासू होते. त्यामुळे पुण्यात कबीरपंथी फकिर ज्योतिबा फुले यांच्याकडून कबीरांची ग्रंथ वाचून घेत असत. त्यामुळे लहानपणापासून महात्मा फुले यांच्या मनावर कबीर यांच्या विचारांची शिकवण बिंबवली गेली होती .

शैक्षणिक कार्य

महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या आणि त्या म्हणजे

 

विद्येविना मती गेली |
मतीविना नीती गेली ||
नीतीविना गती गेली |
गतीविना वित्त गेले ||
वित्ताविना शूद्र खचले |
इतके अनर्थ एका अविद्येने केले ||

 

बहुजन समाजाचे अज्ञान दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी हाती घेतला. महात्मा फुले यांनी सर्व समाजातील स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. परंतु सर्वप्रथम त्यांनी आपल्या पत्नीला शिक्षण देऊन पहिली शिक्षिका हा मान मिळवून देण्यासाठी महात्मा फुले अग्रेसर ठरले. महिला आणि मुलींना शिक्षणाचा हक्क मिळावा. यासाठी फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांनी आयुष्यभर कार्य केले.

मुलींना शिक्षण देण्यासाठी त्यांनी आधी त्यांची पत्नी सावित्रीबाई यांना साक्षर बनवले. पुढे 1840 मध्ये मुलींनी शिक्षण घेणे म्हणजे धर्मभ्रष्ट करणे, असे वातावरण असलेल्या समाजात त्यांनी पुण्यातील बुधवार पेठेतील एका वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. समाजातील विरोधात कृती बंद पडल्यामुळे पुढे पुन्हा त्यांनी मुलींची दुसरी शाळा सुरु केली. अशाप्रकारे मुलींच्या शिक्षणासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.

मुलींसोबत अस्पृश्य समाजातल्या समजल्या जाणाऱ्या मुलींनाही शिक्षण मिळावे. यासाठी त्यांनी शाळा सुरू केली. मानवी हक्कावर त्यामुळे स्पेन यांनी लिहिलेले पुस्तक महात्मा फुलेचे भाषणात आलो होतो. त्यांच्या विचाराने प्रेरित झाल्यामुळे त्यांच्या मनात सामाजिक न्यायाचे विचार येऊ लागले आणि समाजातील विषमता दूर करण्यासाठी त्यांनी स्त्री शिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी स्वतःला वाहून घेतले.

सत्यशोधक समाजाची स्थापना

महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 साली महिला शूद्र आणि दलित समाजाच्या हक्कांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुरोहितांकडून होणाऱ्या अन्यायापासून अत्याचारापासून व गुलामगिरीतून दलित समाजाची मुक्तता करणे आणि त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. या माध्यमातून त्यांनी त्या काळात असलेल्या जातीभेदाने जातीव्यवस्थेचा निश्चिद केला.

महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाच्या स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई फुले यांनी केले. शाहू महाराजांनीही त्यांच्या या चळवळीला नेहमी पाठिंबा दिला. समाजाने तर्कशुद्ध विचारसरणीचा प्रसार आणि प्रचार केला गेला. ज्यात अस्पृश्यतेचा विरोध करणारी मानवी कल्याण आनंद समानता आणि दुर्लभ धार्मिक तत्वे मांडण्यात आली. पुण्यातील दीनबंधू या साप्ताहिकाच्या माध्यमातून त्यांनी वेळोवेळी समाजात जनजागृती केली.

ज्योतिराव फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांचे कार्य प्रेरणादायी आहे. त्यांनी आयुष्यभर ज्योतिबांना सहकार्य केले. स्त्रीमुक्ती आंदोलनाची महाराष्ट्रातील पहिली अग्रणी म्हणून त्यांची इतिहासात दखल घेण्यात येत आहे. मुलींना शिक्षणासाठी ज्योतिबाकडून आधी सावित्रीबाईंनी स्वतः शिक्षण घेतले. जोतीरावांची संपूर्ण विचारसरणी त्यांनी आत्मसात केली. एवढेच नाही तर निधनानंतर त्यांनी त्यांच्या कार्याची धुरा सांभाळली.

सामजिक कार्य

महात्मा फुले यांनी धर्म, जात मानली नाही. ते सर्वांना समान दृष्टीने पाहत होते. त्यांच्या मतानुसार कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि जातिभेद ही केवळ मानवाची निर्मिती आहे. असं रोखठोकपणे मांडतांना विश्वाची निर्मिती जाणार नैसर्गिक शक्तीवर ही त्यांचा विश्वास होता. फक्त समाजात माणसाने सर्वांसोबत गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांना वाटत असे. यासाठी ज्योतीबांनी रूढीवादी तत्कालीन समाजावर प्रखर टीका केली. उच्च जातीतील लोकांच्या हुकूमशाहीतील त्यांना वेळोवेळी कडक विरोध केला असला, तरी सर्व जातींच्या लोकांसाठी त्यांनी त्यांच्या घराचे दरवाजे कायम ठेवले होते.

स्त्री-पुरुष समानतेसाठी त्यांनी त्यांच्या पत्नीला त्यांच्या सर्व सामाजिक कार्यात सहभाग करून घेतले होते. महात्मा फुलेंचे या वागण्याचा तत्कालीन उच्चवर्णीयांना राग येत होता. त्यामुळे सामाजिक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप महात्मा फुले यांच्यावर केला. काहींनी तर त्यांच्यावर ख्रिश्चन धर्माचा प्रचार करत असल्याचाही आरोप केला होता. त्यांच्या स्वतःच्या कुटुंबीयांनीही त्यांना या कार्यासाठी विरोध केला होता. मात्र ज्योतिबा फुले आपल्या विचारांवर ठाम होते. त्यांनी ही चळवळ पुढे चालू ठेवली. त्यांचे आधुनिक विचार पाहून त्यांना त्यांच्या काही ब्राम्हण मित्रांची मदतीचा हात पुढे केला. याशिवाय आयुष्यभर या आंदोलनासाठी त्यांना पाठिंबाही दिला.

त्यांनी ‘शेतकऱ्याचा असूड’ या पुस्तकात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दूरदर्शन आणि दारिद्रयाची वास्तवता विशद केले आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतीकारक म्हणून जोतीरावांची दर्शन होते. नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे. हा विचार मांडणारे ज्योतिराव फुले एक तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्व होते. महात्मा फुलेंनी सामाजिक प्रबोधन करण्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहिला असून सामाजिक प्रबोधन यामधून व्हावे, हा त्यांचा उद्देश होता.

मानवी हक्कांच्या आधारावर विश्व कुटुंब कसे निर्माण होईल व त्याकरिता कशा प्रकारचा वर्तन क्रम व वैचारिक भूमिका स्वीकारली पाहिजे, हे ज्योतिरावांनी ‘सार्वजनिक सत्यधर्म’ सही देत अनेक वाचकांच्या आधारे मांडले आहेत. त्यातील काही महत्त्वाची वचने.
सर्व गावांच्या प्रांताच्या देशाच्या खंडाच्या सर्व संबंधात अथवा कोणत्याही धर्मातील स्वतःच्या संबंध स्त्री आणि पुरुष या उभयतांनी अथवा सर्व स्त्रियांनी एकमेकात कोणत्याही प्रकारची आवड-निवड न करता या भूखंडावर आपले एक कुटुंब समजुन एकमताने सत्यवर्तन करून राहावे.

कौटुंबिक जीवनाची व समाजाची खरी प्रगती परिश्रमाची वाढ होऊनही होणार आहे कष्टाने जगण्याची ज्यांना धमक नाही, असे लोक संन्याशी होतात व प्रपंच खरा नाही, व्यर्थ आहे. असा भ्रम प्रपंचातील लोकांच्या बुद्धीत उत्पन्न करत असतात, असे करण्यात त्यांचा धूर्तपणा असतो हे असे त्यांचे मत होते. आपण सर्वांच्या निर्माण करत त्याने एकंदर सर्व प्राणिमात्रांना उत्पन्न करते वेळी मनुष्य जन्मता स्वतंत्र प्राणी म्हणून निर्माण केले आहे आणि त्या आपापसात साऱ्या हक्काचा उपभोग घेण्यास समर्थ केले आहे. आपल्यापासून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीस नुकसान नाही अथवा जो कोणी आपल्या वरून दुसऱ्या मानवाचे हक्क समजावून इतरांना पीडा देत नाही त्याला सत्यवर्तन करणारे म्हणावेत.

अशाप्रकारे ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी आपले जीवन समर्पित केले आणि 28 नोव्हेंबर 1890 ला त्यांची प्राणज्योत मावळली. Mahatma Jyotiba Phule information in Marathi language. महात्मा ज्योतिबा फुले ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आमच्या आई मराठी aai marathiशेतकरी या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

Leave a Comment