Majhi aaji essay in mrathi माझी आजी निबंध

माझे आई-बाबा कामात व्यस्त असतात. मात्र माझी आजी सर्व काम सांभाळून माझ्या सारख्या हट्टी मुलीचा सांभाळ करणारी आहे, माझी आजी माझ्यासाठी सुपरवुमन आहे. माझी आजी माझ्या आईसारखा माझा सांभाळ करते.

Majhi aaji essay in mrathi माझी आजी निबंध

आई बाबा शेतात गेल्यानंतर माझी आंघोळ करून आजी मला देते. त्यानंतर केस विचरून माझी वेणी घालून देते. कपडे धुते, माझ्या शाळेतील तक्रारी माझ्या आई-बाबांना पर्यंत पोहोचू न देणारी माझी आजी माझ्यासाठी मोठी आहे. माझ्या शाळेचा गणवेशहीच धुवायची. मी आजारी पडल्यावर माझ्यासाठी जागरण करणारीहि तिच. सोसायटीतील मुलांच्या पालकांच्या तक्रारी आजी पळवून लावायची. माझ्यासाठी ती खूप भाग्यवान आहे.

उन्हाळ्याच्या सुट्टीत माझी आजी माझ्यासाठी कैरीचं लोणचं करते आणि संध्याकाळी मला श्लोक, स्त्रोत सांगते, म्हणायला लावते. माझी आजी माझ्यावर योग्य संस्कार व्हावेत म्हणून मला कथा किर्तनाला ही घेऊन जाते. आई-बाबा आपल्या कामांमध्ये व्यग्र असल्याने माझ्याशी गप्पा मारून माझं मन जाणून घेते. तिनेच आम्हाला चुकीच्या मार्गावर जाऊ नये यासाठी वेळोवेळी मोलाचं मार्गदर्शन सल्ले दिले.

ज्या वेळेस मी अभ्यास केला नसल्यास आई ओरडायची त्यावेळेस माझी आजी माझे सांत्वन करायची व आईच्या बोलण्याचे वाईट वाटून घेऊ नको म्हणून मला सांगायची.

माझी आजी मला लहानपणापासून राजे-महाराजांच्या जुन्या गोष्टी सांगते. आजही मला त्या पूर्णपणे आठवतात. माझ्या आजीचे वय जवळजवळ सत्तर वर्षाचे आहे. पण याची आठवण आजीला कुठे आहे. माझी आजी खूप मायाळू आहे. मी तिच्याजवळ गेले असता माझ्या तोंडावरून मायेनं हात फिरवून एक पापा घेऊन मला कडेवर उचलून घ्यायची.

ती सकाळी लवकर उठते आणि आपली स्वतःची सर्व कामे उरकून थोडीशी न्याहरी करून गावातल्या निवारा केंद्रात जाते. तेथे अनेक वृद्ध राहतात. त्यातील काही वृद्ध निराधार आहेत. रोज दोन तास आजी तेथील मंडळींची कामे करत असते. कोणाचे पत्र लिहायचे असते कोणाच्या शर्टाला गुंड्या लावायचे असतात, अशी बारीक-सारीक कामे करताना थकत नाही.

दुपारच्या वेळी काही स्त्रिया आजीजवळ येऊन बसतात. गप्पा करतात. त्यांच बरोबर चांगल्या पुस्तकांचे वाचन, वर्तमानपत्रांचे सामुदायिक वाचन, त्यावर चर्चा चिंतन असे. तिचे कार्य सतत दिवसभर चालू असतात. नंतर ती जवळच्या एका आदिवासी पाड्यावर जाते. त्या आदिवासी स्त्री-पुरुषांना चांगल्या कामात गुंतवून व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी अजित धडपडत असते. आमची आजी घरातील सर्वांना खुप आवडते.

ती नेहमी हसतमुख असते. सगळ्यांशी प्रेमाने वागते. आमची आजी अजिबात आळशी नाही. ती सर्वांच्या आधी उठते आणि रात्री मात्र सर्वात लवकर झोपते. ती आम्हाला नेहमी सांगते लवकर निजे लवकर उठे त्यास ज्ञान आरोग्य त्यास भेटे . सकाळी उठल्यावर स्वतःची सर्व कामे आटोपून मग देवपूजा व पोथी वाचन करते. देवपुजे नंतर जेवण करते. त्यानंतर ती आई सोबत थोडे कामही करते. नऊ वाजेपर्यंत सगळे जण आपापल्या कामावर निघून जातात. मग आजी एकटीच घरी असते तीच मग घराची काळजी घेते.

संध्याकाळी आम्ही घरी येतो तेव्हा ती आम्हाला काहीतरी छानसा खाऊ करून देते. संध्याकाळी ती शंकरजी च्या मंदिरात जाते. तेथे ती 7 पर्यंत रमलेली असते. घरी आल्यावर थोडे फार काही खाऊन घेते ते वाचन करते आणि मग झोपी जाते. अशी ही आमची आजी सर्वांची आवडती आजी आहे.

आजी आजोबांचे प्रेम मिळायला भाग्य लागते. परंतु आज कालचे आई वडील आपल्या आजी-आजोबांच्या जवळ जाऊन सुद्धा देत नाहीत. हे त्या मुलांचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. परंतु माझी आई तशी नव्हती ती मला आजी जवळच ठेवून जायची.

माझी आजी दिसायला उंच, रंगाने सावळी डोक्यावर पदर, कपाळाला रुपये एवढे कुंकवाचा टिळा. धारदार नाक, डोळ्यावर चष्मा व केसांचा बांधलेला गुळा अशी शोभून दिसायची. आईची दुसरे रूप म्हणजे माझी आजी आहे. आपल्या हक्काचं कुणीतरी असतं अगदी मनातलं अगदी आपल्या हृदयात तर ती म्हणजे आपली आजी. आजी म्हणजे गोड आठवणीचा ठेवा.

आजी म्हणजे खरं प्रेमाचं प्रतीक आहे. आजी आपल्या जीवनातील एक मौल्यवान हिरा असतो आणि हा मौल्यवान हिरा म्हणजेच आजी. आज जास्त लोकांकडे उरलेली नाही.

आजी म्हणजे आपली खरी मैत्रीण असते. जिच्याजवळ आपण आपल्या मनातल्या सर्व गोष्टी बोलून दाखवतो. आजी म्हणजे एक प्रेमाचा झरा आहे. आईपेक्षा जास्त प्रेम करणारी वडिलांपेक्षा जास्त काळजी घेणारी दुसरी कोणी नसुन माझी आजी आहे. आजी आपल्या घासातला घास आपल्यासाठी बाजूला काढून ठेवते.

बाहेर गावी कुठे पाहुण्यांकडे फिरायला गेले की, तिच्या लेकीकडे गेली तर माझ्यासाठी माझी आजी येताना गोड खाऊ घेऊन येते. संध्याकाळी वेळ मिळाल्यावर ती मला बाहेर फिरायला घेऊन जाते. माझ्या आजीच्या हाताचा स्पर्श जणू औषधच आहे. जेव्हा ती माझ्या डोक्याला हात लावते, तेव्हा माझे डोके दुखी कुठल्याकुठे पळून जाते. माझ्या आजच्या हाताच्या जेवणाची चव खूप निराळी आहे. जेव्हा ती एखादा नवीन पदार्थ बनते तेव्हा पदार्थाला एक वेगळी चव येते.

तीच अगदी हॉटेलमधील पदार्थांपेक्षा ही खूप छान असते. माझी आजी मला आई समान आहे. रामायणातील महाभारतातील कथा माझी आजी मला एकच असते. माझी आजी मी लहान असताना तिच्या हाताने घास भरवत होती. आई ओरडल्यावर माझी आजी मला प्रेमाने जवळ घेत होती. माझी आजी मला शाळेत सोडविण्यास येत होती. रोज संध्याकाळी घराच्या अंगणात ती माझ्याशी गप्पा मारत बसे. शाळेतून घरी परत आल्यावर न चुकता माझा अभ्यास घेते. मी पुढे काय करावे व काय करू नये हे सर्व निर्णय घेण्यासाठी मला मदत करते. माझ्या आजीच वय झाले असले तरी ती खूप काम करते.

दिवसभर तिचे हात रिकामे नसतात. नेहमीच व्यस्त असते. ती शेतात गेली की, शेतातली सर्व कामे सुद्धा करते. दिवसभर उन्हामध्ये पिके लावत असते आणि खतपाणी घालते.

माझ्या आजीला लहान मुलांच्या आजारावर चांगलीच घरगुती औषधे पण माहित आहे. आमच्या घरामध्ये कोणी लहान मुलं आले की, ती त्या मुलाला अगदी आपल्या मुला प्रमाणे जवळ घेते. त्याला तेल लावून आंघोळ घालून सर्दी खोकल्यावर काढा देऊन तसेच औषधी गुटी देणे अशा सर्व प्रकारची काळजी घेते. माझ्या आजीमुळे आम्हाला डॉक्टरांकडे जायची गरज लागत नाही. तसेच आजूबाजूच्या लोकांना सुद्धा तिच्या औषधांचा फायदा होतो.

माझी आजी कधीही कोणाकडून पैसे घेत नाही. माझी आजी ही एक जणू समाजसेविकाच आहे तिला समाजसेवेचा वारसा तिच्या वडिलांकडून मिळालेला होता. ते एक डॉक्टर होते, वैद्य होते. त्यांना नेहमी गरीबांना मदत करणे आवडायचे. ते गरिबांना फुकट औषधे देत असत. तसेच त्यांनी आपल्या घरी मुलांना ठेवून शिक्षण दिले. माझ्या आजीने सुद्धा गरीबपण पाहिले होते. त्यामुळे ती मुलांना शिकवत होती. त्यांची फी शाळेमध्ये जमा केली. त्यापैकी आज कितीतरी मुले डॉक्टर इंजिनिअर झाली आहेत.

ही सर्व मुले आजही आजीला खूप मानतात आणि भेटायला सुद्धा येतात. माझ्या आजीला मानुसकीची जाण आहे. ती सर्वांना नेहमी चांगला सल्ला आणि मार्गदर्शन करीत असते. अशी मायेचा सागर स्वतःमध्ये असलेली माझी आजी अत्यंत प्रेमळ आहे व माझ्या आजीची मी खूप लाडकी आहे. म्हणून माझी आजी सुद्धा माझ्यासाठी खूपच ग्रेट आहे. माझ्या आजीचा अभिमान मला आहे. हीच आजी मला जन्मोजन्मी मिळावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करेल.

Majhi aaji essay in Marathi कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment