मला लॉटरी लागली तर मराठी निबंध Mala Lottery Lagli Tar Marathi Nibandh: संपत्तीला आपले अनन्यसाधारण महत्व आहे, परंतु आज पैसाच देव झाला आहे. ज्याला पाहा तो पैशासाठी वेडा आहे. मीही श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहतो. म्हणूनच मी ५० लाखांची लॉटरी विकत घेतली आहे. खरोखर, मला ही लॉटरी लागली तर मजा येऊन जाईल.
मला लॉटरी लागली तर मराठी निबंध Mala Lottery Lagli Tar Essay in Marathi
लॉटरीमुळे जीवनात बदल – जर मला खरोखर ५० लाखांची लॉटरी लागली तर माझ्या या छोट्याश्या घरात आनंदाची त्सुनामी येऊन जाईल. आम्ही रात्रभरात लक्षाधीश होऊन जाऊ. समाजात आमचा आदर वाढेल. माझे वडील कामगार नाही तर शेठ होऊन जातील, त्यांना दरमहा फक्त सातशे रुपयांवर आठ तास काम करावे लागणार नाही. माझ्या आईलाही कमरेला चाव्याचा मोठा गुच्छा ठेवणाऱ्या मालकिणीचे पद प्राप्त होईल. शेजारी आणि आस-पास त्यांची प्रतिष्ठा वाढेल. आज जे आमच्याकडून सलाम करून घेतात, उद्या ते आम्हालाच सलाम करतील. मलासुद्धा जे मन्या म्हणतात ते मनिषराव म्हणतील.
फ्लॅट्स, कार – जर मला लॉटरी लागली तर मी कमीतकमी दहा लाख रुपये निश्चित बँकेच्या खात्यात जमा करेल. जेणेकरून भविष्यात कधीही पैश्याची कमतरता भासणार नाही. दहा-पंधरा लाखांचा एक चांगला फ्लॅट खरेदी करेल, ज्यात सर्व आधुनिक सुविधा असतील. मी नवीन मॉडेलची चांगली कारही खरेदी करेल, जेणेकरुन मला महाविद्यालयात येण्यासाठी बसच्या लाईनमध्ये उभे रहावे लागणार नाही.
गावात मंदिरे, शाळा, दवाखाने, ग्रंथालये – माझ्या गावाला देखील लॉटरीच्या पैशांचा लाभ मिळावा अशी माझी इच्छा आहे. मी गावातील खराब झालेल्या मंदिराचे नूतनीकरण करेल. खेड्यातील शाळेच्या इमारतीलादेखील नवीन रूप देईल. तसेच मी गावात नवीन ग्रंथालयही सुरू करीन. आज परिस्थिती अशी आहे की अगदी गावकऱ्यांनाही किरकोळ आजाराच्या उपचारासाठी शहरात जावे लागते. काही पैशांनी, जर मी खेड्यात आवश्यक उपकरणे घेऊन दवाखाना उघडला तर गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.
परदेशात शिक्षण – शक्य असल्यास मी माझे उच्च शिक्षण इंग्लंड किंवा अमेरिकेत पूर्ण करीन कारण आजही ‘फॉरेन रिटर्न’ लेबलला खूप महत्त्व दिले जाते. अशा प्रकारे, मला माझ्या खरेदी केलेल्या लॉटरीकडून बरीच आशा आहे. माझ्या आशा पूर्ण होतील, माझी स्वप्ने सत्यात उतरतील का?.