Maza Avadta Sant Essay in Marathi | माझा आवडता संत

माझा आवडता संत Maza Avadta Sant Essay in Marathi यामध्ये आपण पाहणार आहोत संत तुकाराम यांचा जिवनमय प्रवास. भारत देशांमध्ये संत एकनाथ, संत तुकाराम, संत कबीर, संत ज्ञानेश्वर, संत गोरा कुंभार असे अनेक संत होऊन गेले. प्रत्येक संतांना वेगवेगळ्या जाती मध्ये वाटून घेतले. परंतु संतांनी जातीजातीमध्ये भेद केला नाही. त्यांच्यासाठी विश्वचि अपुले घर आहे. भारत ही संतांची भूमी आहे. आपल्या देशाला संतांची खूप प्राचीन परंपरा लाभलेली आहे.

Maza Avadta Sant Essay in Marathi | माझा आवडता संत

संतांच्या या पावन स्पर्शाने आपली भूमी पवित्र झाली आहे. भारत देशात संतांना गुरु मानण्याची ही परंपरा आपल्याला दिसून येते. तसेच संतांचे खूप महत्त्व आपल्याला भारत भूमीमध्ये दिसून येते. त्यांनी आपल्या शिकवणीतून किंवा ज्ञानातून लोकांमध्ये जागृती निर्माण केली आहे. त्यांच्या शिकवणीतून एकतेची भावना निर्माण केली आहे आणि एकतेचे महत्त्व सर्वांना समजावून सांगितले आहे. त्यांनी त्यांच्या लेखनातून व कीर्तनातून लोकांना सदाचाराची शिकवण दिली.

जे का रंजले गांजले | त्यासी म्हणे जो आपुले
तोचि साधू ओळखावा || देव तेथेची जाणावा.

ही ओळ संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील आहे. या ओळीतून संत तुकारामांनी असे सांगितले आहे की ज्यांना कोणी नाही किंवा दुःखात आहेत. त्यांना जो आपले म्हणेल तोच साधू-संत आहे आणि त्याच्यामध्ये देव आहे असे समजावे. संत तुकाराम महाराज यांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्होबा अंबिले असे होते. त्यांचा जन्म माघ शुद्ध 5 शके 1528 म्हणजे 22 जानेवारी, 1689 रोजी या ठिकाणी झाला. त्यांच्या जन्म वर्षाबद्दल इतिहासात वेगवेगळ्या नोंदी आपल्याला दिसून येतात. वडिलांचे नाव बोल्होबा आईचे नाव कनकाई अंबिले असे होते.

यांना तीन मुले होती. सर्वात मोठ्या मुलाचे नाव सावजी मधला तुकाराम आणि धाकट्या मुलाचे नाव कान्होबा असे होते. संत तुकाराम महाराज यांचे कार्य व कीर्ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पर्यंत पोहोचली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांनी काही वस्तू तुकाराम महाराज यांच्यासाठी पाठवल्या होत्या. परंतु त्यांनी त्या वस्तूंचा स्वीकार केला नाही. त्यांना कोणत्याही गोष्टीचा लोभ नव्हता. त्यांनी त्यांचे आयुष्य लोकहितासाठी वाहून दिले होते.

संत तुकाराम महाराज यांचे अभंग आजही उपासक ठरतात. संत तुकाराम महाराजांना जगद्गुरु संत तुकाराम महाराज असे संबोधले जाते. वारकरी संप्रदायाचा पाया श्री ज्ञानेश्वर महाराजांनी रचला आणि त्याचा कळस होण्याचा मान संत तुकाराम महाराजांना मिळाला. संत तुकाराम महाराज हे संसारी असून सुद्धा त्यांनी आयुष्य परमार्थाकडे वळविले. संत तुकाराम महाराजांनी समाजातील चुकीच्या परंपरा, प्रथा, रूढी यांच्यावर टीका केली व त्यांनी कीर्तनातून प्रबोधन केले व जनजागृती केली.

तुकाराम महाराजांनी अनेक गोष्टींचा त्याग केला व आपले संपूर्ण जीवन लोककल्याणासाठी अर्पण केले. त्यांच्याजवळ असलेल्या ज्ञानाच्या बळावर त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. गरीब लोकांविषयी त्यांना खूप कळवळा होता. सर्वांनी आनंदी राहावे असे त्यांना नेहमी वाटत असे. समाजातील अनेक लोकांनी त्यांच्या कार्यकर्ते आणण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या सर्व अडचणींवर मात करत ते आपले कार्य करत राहिले संसार करत असताना येणाऱ्या अडचणींवर मात करत त्यात गुंतून न राहता लोकगीत कसे काढावे याचे ज्ञान त्यांनी सर्वांना दिले.

तुकाराम महाराज किशोर वयात असताना त्यांचे आई-वडील वारले. मोठा भाऊ तीर्थयात्रेला गेला. पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई म्हणजेच आवली हिच्याशी त्यांचा विवाह झाला होता. त्यांना एकूण चार अपत्ये होती. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली अशाच त्यांचे मन धार्मिक होऊ लागले. विठ्ठल भक्ती आणि परमार्थ ते साधू लागले. संसारात राहून सर्व जबाबदाऱ्या पार पाडीत विरक्त किंवा संन्यास न स्वीकारता ईश्वर भक्ती केली.

संत तुकाराम यांनी भंडारा डोंगरावर बसून आत्मचिंतन केले आणि स्वतःचे खूप सारे साहित्य रचले त्यावेळी समाजातील लोकांनी तुकारामांना वेडे ठरविण्याचा प्रयत्न केला; परंतु तो यशस्वी होऊ शकला नाही. समाजातील व्यर्थ गोष्टी, वाईट प्रथा आणि परंपरा यांवर त्यांनी परखड भाषेत टीका केली. ईश्वरभक्तीचा मार्ग त्यांनी दाखविला. संत तुकाराम पंढरीच्या वारीला पायी चालत जाऊन प्रत्येक वर्षी आराध्यदैवत विठ्ठलाचे दर्शन घेत असत. त्यांचे विचार भेट सामाजिक आणि वैयक्तिक प्रगती घडवून आणणारे होते.

संत तुकाराम महाराज हे आपल्या कीर्तनातून जनजागृती करत असत. त्यांचे अभंग आणि कीर्तने ही सर्व साक्षात्कारी अनुभवातून अवतरलेली होती. त्यांचा संदर्भ हा वेद, पुराण आणि उपनिषदे यांच्याशी जोडून काही धर्मार्थ व्यक्तींनी त्यांच्या लिखाणाला आणि त्याला मान्यता नाकारली होती. आपल्याला तुकाराम महाराज मानवतेची शिकवण देतात. संत तुकाराम महाराज यांना माणुसकीची जाणीव होती. आपल्याला संघर्षमय जीवनातून स्वतः जवळ असलेले शब्द, धन व्यक्त करणारे संत तुकाराम महाराज हे माझे आवडते संत आहे.

संत तुकाराम महाराज 17 व्या शतकातील वारकरी संत होते. संत तुकाराम महाराज यांच्या घराण्यात वारी करण्याची परंपरा होती. सर्व काही ठीक चालले असतांना त्यांच्या कुटुंबावर एकामागे एक अडचणी येऊ लागल्या. अनेक प्रापंचिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. जीवनप्रवाह बदलून टाकणारे अनेक गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडत होत्या. त्यामुळे ते उदास राहू लागले. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागत होता. त्यांच्या काळात खूप मोठा दुष्काळ पडला होता. दुष्काळ परिस्थितीमुळे घराची व लोकांची झालेली अवस्था पाहून त्यांचे संसारातील लक्ष कमी झाले व मनात विरक्ती दाटून आली.

अशा परिस्थितीमध्ये त्यांनी ईश्वराची भक्ती करण्याकडे मन वळवले श्री विठ्ठल यांच्यावर असलेली आपली भक्ती त्यांनी कायम ठेवले गावाजवळ असलेल्या डोंगरावर जाऊन ते उपासना करू लागले. लहानपणापासून त्यांच्या कानावर कीर्तन अभंग पडत होते. पुढे त्यांनी अनेक ग्रंथांचे वाचन केले. तुकाराम महाराजांना ईश्वरभक्तीचा मार्ग आणि त्यांचे जीवन बदलून गेले. संत तुकाराम महाराजांचे अभंग लोक खूप आवडीने एकत. विठ्ठलाचे नामस्मरण करत असत. विठ्ठल प्राप्तीसाठी त्यांनी विठ्ठलाच्या नामस्मरण करण्याचा मार्ग दाखविला. त्यांचे अभंग सर्वजण आनंदाने ऐकू लागले त्यांची कीर्ती सर्वत्र पसरू लागली.

काही लोकांनी तुकाराम महाराजांना त्रास देण्यास सुरुवात केली. काही लोकांनी त्यांचा छळ केला. परंतु यामध्ये त्यांना यश आलेच नाही व शेवटी संत तुकाराम महाराज यांच्या बद्दल असे मानले जाते की, लोकहिताचे कार्य करत असताना फाल्गुन वद्य द्वितीयेला संत तुकाराम अनंतात विलीन झाले आणि ते वैकुंठात गेले. परंतु संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले का? हा प्रश्न गेली चार शतके महाराष्ट्रात दबक्या आवाजात विचारला जातोय. त्यावर जाहीरपणे सहसा बोललं जात नाही.

संत तुकाराम महाराजांचे अभंग
चित्ता मुळे त्याचा रंग रुचिकर |
शोभविता दूर तो चि भले ||

मेसी परंपरा आली ते चालत |
भलत्याची नीत त्यागावरी ||

हो का पिता-पुत्र बंधु कोणीतरी विजाती | संग्रही धरू नये ||

तुका म्हणे सत्य पाळावे वचन |
अन्यथा आपण करू नये ||

तुकाराम महाराज सामाजिक व्यवहारात सूक्ष्म विश्लेषण करण्याच्या बाबतीत अतिशय कुशल होते. त्यामुळे ते एकाच विषयाचे अनेक पैलू ध्यानात घेत असतात. या अभंगात त्यांनी संगतीचा एक वेगळाच पैलू शब्दबद्ध केला आहे. ज्याचं मन आपल्या मनाशी जुळते. त्याचीच संगत आपल्याला आवडते, आपल्याला आनंद देते म्हणून अशा माणसाची संगत करावी.

जो स्वतःच्या सहवासानं आपल्या मनात शोभा निर्माण करतो, आपलं मन अस्वस्थ करून टाकतो. त्याला दूर ठेवणं हे चांगल आहे. परंपरा चालत आली आहे, ज्यांची संगती भलतीसलती असेल त्याच्या सहवासाचा त्याग करावा. हीच खरी नीती आहे. मग अशी व्यक्ती पिता-पुत्र, सोबतीअसो किंवा आणखी कोणीही असो. त्याचं वर्तन आपल्या मूल्याशी जुळत नाही, त्याचा सहवास धरू नये. आपण सत्यवचन माणुसकीचं पालन करा व त्यापेक्षा वेगळे वागू नये. जो आपल्या सोबत सदाचाराने वागत नाही त्याच्या पासून दूर राहणे चांगले आहे.

Majha avadta Santosh essay in Marathi Tukaram Maharaj विषय निबंध कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment