मी शिक्षक झालो तर निबंध | Mi Shikshak Jhalo Tar Nibandh

Mi Shikshak Jhalo Tar Nibandh प्रत्येक लहान मुलाचं जेव्हा पहिलं पाऊल शाळेत पडतं त्यानंतर त्यातला विद्यार्थी घडायला सुरुवात होते. शाळेत शिकत असतानाच तो सत्याचे अहिंसेचे धडे घेत असतो. तसेच सर्व धर्म समभावाचे शिक्षण घेतो. नाती जपायला शिकतो. एक चांगला व्यक्ती होतो आणि हे सर्व घडण्यामागचे हात असतात ते म्हणजे शाळेतील शिक्षकांचे.

मी शिक्षक झालो तर निबंध 100 शब्दांत  | Mi Shikshak Jhalo Tar Nibandh

मी शिक्षक झालो तर Mi Shikshak Jhalo Tar Nibandh…. मी शिक्षिका झाले तर…. हे सांगण्याचा प्रयत्न मी या निबंधातून केला आहे. काही दिवसांनी शाळेत शिक्षक दिन म्हणजेच 5 सप्टेंबर साजरा होणार होता. त्यामुळे शाळेत सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. शिक्षक दिन साजरा करण्यासाठी एक दिवस शाळेचा संपूर्ण कारभार सगळे विद्यार्थी सांभाळणार होते. अचानक माझ्या ही मनात विचार आला की, मी शिक्षक झालो तर… कारण एक दिवसासाठी शिक्षक होण्यापेक्षा मला कायमस्वरूपी शिक्षक व्हायला जास्त आवडेल.

शिक्षणासाठी स्वतःला झोकून द्यायला आवडेल. लहानपणी शाळेत जेव्हा पहिलं पाऊल टाकलं, तेव्हा इतर रडणार्‍या मुलांकडे बघून मला आश्चर्य वाटायचं. शाळेत येताना कशाला रडायचं? मला तर खूप गंमत वाटायची. मुलांनी भरलेला तो वर्ग, समोर असलेला फळा, फळ्या समोर असलेला टेबल, टेबल वरचा पांढऱ्या आणि रंग बिरंगी खडूचा डब्बा. सर्व खूप गमतीशीर वाटायचं वर्गात शिक्षक आल्यावर होणारी शांतता त्यांना मिळणारा तो आनंद त्यांचा ओरडण्यातला रागवण्यातला तो धाक, गावात आणि सभोवताली शिक्षकांना मिळणारा मान ही सर्वच मला प्रचंड आवडायचं. मी तेव्हाच मनोमन ठरवून टाकलेलं की मी शिक्षक होणार…

मी शिक्षक झालो तर निबंध 200 शब्दांत  | Mi Shikshak Jhalo Tar Nibandh

शिक्षक दिनाच्या Teachers Day दिवशी मला अजिबात झोप लागत नव्हती. मनावर दडपण आल्यासारखे वाटत होते. शाळेत सुद्धा शिक्षक दिनाचे वारे वाहत असल्याने मनात तेच ते विचार येत होते. मी शिक्षक झालो तर… मी शिक्षक झालो तर, मी कसा वागेल, वर्गातल्या मुलांना माझा आदर वाटेल का ? कसा वाटेल, मग माझ्या मनात विचार आला पहिले वर्गात गेल्यानंतर त्यांच्या सोबत प्रेमाने बोलल, त्यांच्याशी मैत्री करीन माझ्या तासिकेत मी अगदी त्यांच्या मनाप्रमाणे वागेल. शिकवत असताना त्यांना समजेल अशा भाषेत सांगण्याचा प्रयत्न करील जेणेकरून मी शिकवलेले त्यांना कळेल त्यांना माझी तासिका संपूच नये असे वाटले पाहिजे, असे वागेल.

मी शिकवलेले त्यांना समजेल की नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न नेहमी करीत राहील. नसेल समजलं तर मी त्या गोष्टींचा सखोल अभ्यास करून आणखीन सोप्या पद्धतीने त्यांना सर्व आकलन होईपर्यंत सांगण्याचा प्रयत्न करील. माझ्या शिकवणीत कोणतीही कमी राहणार नाही याची पुरेपूर काळजी घेईल.

मी शिक्षक झालो तर निबंध 300 शब्दांत  | Mi Shikshak Jhalo Tar Nibandh

मी विद्यार्थ्यांना फक्त अभ्यासाचे पाढे गिरवायला लावणार नाही, मला त्यांना फक्त पुस्तकातील किडा बनवायचे नाही. त्यासाठी मी त्यांना आपल्याला हवाहवासा वाटणारा निसर्ग शिकवेल. प्राणी पक्षी यांची माहिती सांगेन त्यांना कधीतरी कुठेतरी मोकळ्या हवेत घेऊन जाईल आणि तिथेच त्यांना एक दिवसाची निसर्गाचे ज्ञान देणारी तासिका घेईल त्या निसर्गरम्य वातावरणात माणूस म्हणून कसे जगायचे हे पुस्तकका बाहेरचे शिकवेल. मुलांना घेऊन कधीतरी कुठेतरी सहलीसाठी जाईल.

तेव्हा मी ही त्या मुलांमधला एक होईल. त्यांच्याबरोबर नाच-गाणी म्हणेल आणि हे सगळं करत असताना, त्यांना जगण्यातला आनंद शिकवेल. एवढं करुनही त्यांची शिस्त मोठ्या माणसांचा आदर पुस्तकांचे अभ्यासाचे प्रेम कमी होणार नाही याची काळजी घेईल असे म्हणतात की या शाळेचा वर्ग मुलांच्या सुखकर भविष्याची पहिली पायरी असते पालक आपल्या मुलांना त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे म्हणून शाळेत पाठवतात परंतु आज शिक्षण म्हणजे स्पर्धा झाली आहे. लहान लहान मुलांना सुद्धा त्यांच्या स्पर्धेने घेऊन टाकले आहे.

शिक्षक सुद्धा आपल्या शाळेचे नाव बोर्डात यावे म्हणून विद्यार्थ्यांकडून प्रचंड अभ्यास करून घेतात. अर्थात ते वाईट नाही परंतु त्यामुळे मुलांचे बालपण हरवत आहे. शिक्षक म्हणून पालकांच्या आणि शिक्षकांच्या अपेक्षांच्या ओझ्याने खचलेल्या मुलांना मी मनमोकळे -पणाने जगण्याचा आधार देईल माझ्या वर्गात परीक्षा असेल तर ती फक्त पुस्तकावर आधारित नसेल तर ते अनुभवावर आणि ज्ञानावर असेल त्या परीक्षेत कोण पहिला, कोण दुसरा, कोण शेवटी असे नंबर येणार नाहीत.

मी शिक्षक झालो तर निबंध 400 शब्दांत  | Mi Shikshak Jhalo Tar Nibandh

यावरून कोण आयुष्य जगायला सक्षम आहे, हे कळेल जे विद्यार्थी कमी सक्षम आहेत हे लक्षात आल्यास त्यांना अधिकाधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करेल. यामुळे विद्यार्थी यशस्वी तर होतीलच पण त्याचबरोबर ते अनुभवी सुद्धा होतील आयुष्यात येणाऱ्या अनेक अडचणींना सामोरे कसे जायचे हे यावरून त्याच्या लक्षात येईल. कारण शाळेच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी यशस्वी होणारे विद्यार्थीही जीवनाच्या परीक्षेत अपयशी सुद्धा होतात. कारण त्यांना शालेय जीवनातील परिपूर्ण व अनुभवी शिक्षण कमी पडलेले असावे. मी माझे विद्यार्थी आयुष्यात येणाऱ्या अडचणी सोडवताना नापास होणारच नाही. याची त्यांना प्रत्येक क्षणाला काळजी घेईल.

जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी शाळेतून मिळालेल्या अनुभवांच्या जोरावर ते कितीही कठीण मार्ग अगदी सुलभ रीतीने पार करतील मी यांचे वाचन व लेखन सुधारण्या -बरोबरच आचार आणि विचार क्षमता सुधारण्याचा प्रयत्न करेल. शिवाय सुशिक्षित विद्यार्थी घडविण्यात बरोबरच कौशल्यपूर्ण विद्यार्थी व आदर्श माणूस घडविण. आयुष्यात नेमके काय करायचे हा प्रश्न आपण नेहमी स्वतःला विचारतो. पण आयुष्यात नेमके कुठे जायचे आहे हेच कळत नाही,

मी शिक्षक झालो तर निबंध 500 शब्दांत  | Mi Shikshak Jhalo Tar Nibandh

तर आयुष्यात नेमके काय करायचे कुठे जायचे ही दिशा दाखविण्याचे काम तर शिक्षकच करत असतात आणि हेच बघू मोलाचे काम मला माझ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी करायचे आहे. एक शिक्षक म्हणून नाही तर मला माझ्या पुस्तकांनी माझ्या शिक्षकांनी माझ्या अनुभवांनी जे काही शिकवले ते मी मुलांना शिकवेल. मी माझ्या विद्यार्थ्यांचे ध्येय भरकटू देणार नाही. तर ते त्यांच्या ध्येयापर्यंत कसे जातील याचा सदैव प्रयत्न करेल. तुमचा मी शिक्षक झाले तर दीड लिटर आणि खाटीक जमान्यात फक्त विद्यार्थी बनविणारा शिक्षक न होता, विद्यार्थ्यांना चांगला माणूस बनवणारा शिक्षक होईल. कारण मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ आहे असे मला वाटते.

शाळेत शिकवण्याची पद्धत, विद्यार्थ्यांना आवड निर्माण करीत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी अशा प्रकारचे शिक्षण विद्यार्थ्यांना देईल. मी कधीही असा शिक्षक बनणार नाही, जो शिक्षणाची स्थान केवळ कमवायचे साधन मानतो. माझ्या पदाचा अभिमान बाळगून मी माझ्या विद्यार्थ्यांना खूप चांगली शिकविणे मी त्या शिक्षकांसारखा नसेल ते फक्त पुस्तकाची पाने उलटी करण्यातच शिकवणे समजतात. विद्यार्थ्यांना नीट समजत आहे की नाही याची सुद्धा त्यांना कल्पना नसते. मला पण विषय शिकवायचे आहे.

ते मी मनापासून शिकवीन मी शाळेत असे वातावरण करीन तिच्यामध्ये कोणताही विद्यार्थी न घाबरता मला शंका विचारू शकेल आणि शंकेचे निराकरण माझ्याकडून होईल. तसेच मी विद्यार्थ्यांच्या शिस्तीकडे विशेष लक्ष देईल. अभ्यासात कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांकडे मी विशेष दृष्टि ठेवीन. मी माझ्या सामर्थ्यनुसार त्यांची दुर्बलता दूर करण्याचा प्रयत्न करेल. मी हुशार विद्यार्थ्यांसाठी आनंदाने परिश्रम घेईल. विद्यार्थ्यांना थेट ज्ञान देण्यासाठी मी त्यांना ऐतिहासिक आणि सुंदर ठिकाणी फिरायला नेईल. त्यांच्या सर्वागीण विकासासाठी मी त्यांना नाटक, वादविवाद,

चित्रे, निबंध, खेळ इत्यादी स्पर्धांमध्ये भाग घेण्यास व योग्य मार्गदर्शन करण्यास सुद्धा प्रोत्साहित करेल. मी एक शिक्षक बनून माझ्या या आकांक्षा मूर्त रुपात आणू शकल्यास किती चांगले होईल. शाळेत नेहमी मला भाषेचे विषय शिकवायला आवडतील कारण त्याद्वारे मन आणि बुद्धीची दारे खुली होतात. शाळेचा संपूर्ण वेळ हा फक्त आर्थिक शिक्षणात न घालवता शारीरिक शिक्षण, नृत्य, संगीत चित्रकला तसेच विविध उपक्रम साजरे करणे यामध्ये व्यतीत करेन. त्यानुसारच शाळेचे वेळापत्रक असेल. त्यामुळे विद्यार्थी हा केवळ शाळा आणि इमारती मध्ये न राहता आनंदी, मुक्त व स्वतंत्र अनुभव करू शकेल असे मला वाटते.

“तुम्हाला आमचा निबंध मी शिक्षक झालो  तर Mi Shikshak Jhalo Tar Nibandh …. कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

Leave a Comment