Nisargashi Maitri karu essay in Marathi language | निसर्गाशी मैत्री करू मराठी निबंध

Nisargashi Maitri karu essay in Marathi language – आपल्या जीवनात जेवढ्या आवश्यक गोष्टी आहेत, त्या सर्व आपल्याला निसर्गाने उपलब्ध करून दिले आहेत. लाकूड, अन्नधान्य, कपडे, जमीन, जीवन जगण्यासाठी हवा, पाणी, अन्न आणि निवारा या निसर्गाने दिलेल्या वस्तू ज्याचा आपण रोजच्या जीवनात उपयोग करतो. पण निसर्गाला सुद्धा सांभाळण्याची गरज आपलिच आहे. जर निसर्गाचा आपण अपमान केला तर त्याचा कोप होऊ शकतो. जसे कि त्सुनामी, भूकंप, अतिवृष्टी, दुष्काळ काही होऊ शकतो. निसर्ग आपला गुरु आहे. जो आपल्याला शिकवतो, ज्ञान देतो आणि आपल्याला अज्ञानाच्या अंधारातुन ज्ञानाच्या प्रकाशाकडे आणतो तो म्हणजे गुरु.

निसर्ग म्हणजे काय? तर आपल्या सभोवताली असलेला सूर्य, चंद्र, नदी, झाडे, पशू-पक्षी, समुद्र ही सर्व सृष्टी म्हणजे निसर्ग होय. निसर्ग आपल्याला खूप काही देतो. जसे झाड आपल्याला सावली, फळे, फुले देते. किलबिलणारे पक्षी आपल्याला आनंदी करून टाकतात. निसर्गाचे स्त्रोत हे वेगवेगळे आहेत. जसे की नद्या, समुद्र, डोंगर, जमीन, सूर्य या वस्तू आपल्याला दिसतात परंतु याच निसर्गामध्ये काही अशा अदृश्य वस्तू आहेत, ज्या आपल्याला दिसत नाहीत परंतु या सर्वांचा मिळून निसर्ग बनलेला असतो. अशा निसर्गरम्य ठिकाणी आपण उत्साही होतो. म्हणजेच निसर्ग माणसाचे मन मोहून टाकणारे एक साधन आहे. त्याचबरोबर निसर्ग आपल्याला एक माणूस म्हणून जगायला शिकवतो. मनुष्य हा भाग्यवान आहे की, त्याला निसर्गासारखा मित्र मिळाला आहे.

निसर्ग पशु-पक्षी, मानव इत्यादींमध्ये कोणताही भेदभाव करत नाही. सर्वांना समान वागणूक देतो. निसर्गाने आपल्या मानव जातीला जन्म दिला आहे. तो आपल्याला हवा, पाणी, अन्नधान्य सर्व काही देतो. परंतु त्या बदल्यात तो आपल्याला काहीही मागत नाही. आपल्या जवळ असलेले सर्व काही तो माणसांसाठी उधळून देतो. निसर्ग हा पूर्वजांचा सुद्धा मित्र आहे. पूर्वीच्या साधुसंतांनी आपले संपूर्ण जीवनच निसर्गाच्या सानिध्यात घालवले. संत तुकाराम महाराजांनी निसर्गाला वृक्षवल्ली सगेसोयरे म्हटले आहे.

फुले आपल्याला इतरांना कसे आनंदित करायचे हे शिकवतात. नदी आपल्याला कसे शांत राहायचे हे शिकवतात. पक्षी आपल्याला संकटावर मात कशी करायची आणि आनंदी कसे राहायचे हे शिकवतात. पण हल्लीचे वाढते प्रदूषण यामुळे आपण आपल्या मित्राचा, आपल्या गुरुचा म्हणजेच निसर्गाचा ऱ्हास करत आहोत. आपण सर्वांनी आपल्या सुंदर निसर्गाला जपण्याचा निश्चय केला पाहिजे.

आधी आदि मानव जन्माला आले. त्यांनी निसर्गाचा पुरेपूर फायदा घेतला. त्यांनी दगडावर दगड घासून आग निर्माण केली. जंगलामध्ये मिळणारी फळे खाऊन आपला उदरनिर्वाह केला. झाडाच्या फांद्या, सुक्या काट्या पासून हत्यारे बनवली ज्याने ते शिकार करत. पाण्यातून प्रवास करण्यासाठी झाडापासून छोट्या-छोट्या होड्या बनवल्या. त्या झाडापासून चाके बनवली आणि लाकडाच्या गाड्या बनवलेल्या ज्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी उपयोगी होत्या. निसर्गाने आपल्याला खूप सारे वरदान दिले आहेत.

निसर्गापासून मिळणारे लाकूड याचा उपयोग आपण आपल्याला घर बनवण्यासाठी, स्वयंपाक, घरातील वस्तू यासाठी आणि पेपर व ही पुस्तकेही सुद्धा लाकडा पासून बनवतात. जर झाडे नसती तर या वस्तू आपल्याला मिळाल्या नसल्या. जमिनीवर एवढ्या मोठ्या मोठ्या इमारती उभ्या करून जमिनीची झीज होते. आपणास कधी कळणार झाडे तोडून वातावरणावर किती वाईट परिणाम होतो आहे .

आपल्याला काही दिवसांनी श्वास घेणे मुश्कील होईल म्हणूनच आज सर्वत्र “झाडे लावा झाडे जगवा”चे कार्यक्रम राबवतात. चार महिने पावसाळा असतो पण जमीन आपल्याला पोटात पाणी साठवून ठेवते. म्हणून झाडे बाराही महिने हिरवीगार असतात. जमिनीचे पाणी सुकले तर जमीन दुष्काळग्रस्त होईल आणि जीवितहानी लवकरच होईल. त्यामुळे हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. कारण तो जसे प्रत्येक ऋतू प्रमाणे आपले रूप बदलून आपल्याला आनंदी ठेवतो आणि उपयोगी वस्तूंचे आपल्याला योगदान देतो. तो कधीच थकत नाही. नेहमी चंद्र, सूर्य, झाडेझुडपे आपली कामे करतात म्हणून मी त्याला आपला मित्र मानतो.

निसर्गाची निर्मिती कशी झाली ते आपण पाहूया.
पृथ्वी वर्तुळाकार दिशेमध्ये स्वतः भोवती व सूर्याभोवती फिरते, यामुळेच दिवस आणि रात्र होतात. पृथ्वी ग्रहावर एक जीवनदायी वातावरण आहे, त्यामुळे खूप सारे घटक पृथ्वीमध्ये समाविष्ट झालेले आहेत. पृथ्वीवर असलेल्या घटकांमधील पाणी आणि हवा हे त्याचे मुख्य जीवनदायी घटक म्हणता येईल आणि या घटकांची उपलब्धता ही निसर्गाच्या नियमांवर होत असाते. या पृथ्वीवर असलेले सर्व सजीव घटक एकमेकांशी निसर्गाच्या माध्यमातून जोडलेले असतात.

पृथ्वीवरील सजीवांचे जीवन सुरळीत चालण्यासाठी निसर्ग महत्त्वाची भूमिका बजावत असतो. अन्न, पाणी, हवा यांसारख्या मूलभूत कारण गरजा पूर्ण करण्याची काम निसर्गातूनच होते. या व्यतिरिक्त अग्नी आणि आकाश ही तत्वे सुद्धा निसर्गातून आपल्याला मिळत असले तरी आपल्या जीवनासाठी खूप महत्त्वाचे आहेत.

उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीन ऋतू नुसार होणारे बदल हे आपल्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक असतात. तसेच पाण्याची गरज आणि हवा शुद्धीकरण यासाठी निसर्गचक्र आहे. ज्याद्वारे पृथ्वीवर फिरून फिरून पाऊस पडतो तसेच वातावरणात असलेल्या हवेचे थर ज्यामुळे आपल्याला आवश्यक असणारी हवा आपण श्वास म्हणून घेतो.

या निसर्गात असलेले झाडे, नद्या, नाले, समुद्र यांपासून आपली हवेची आणि पाण्याची गरज पूर्ण झाली. अग्निची गरज हे नंतर निर्माण झाली. याच अग्निमुळे आपण अन्न कच्चे न खाता शिजवून खाऊ लागला. अन्न निर्मितीसाठी आपण शेती व झाडां पासून मिळणाऱ्या फळांचा वापर करू लागलो परंतु ही झाडे किंवा शेती हा एक निसर्गाचाच भाग आहे.

निसर्गाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे झाडे आहेत. याच झाडापासून मानवाला जगण्यासाठी आवश्यक असलेला प्राणवायू म्हणजेच ‘ऑक्सिजन’ मिळतो. तसेच पृथ्वीवर झाडे आहेत म्हणून बहुतांश पाऊस हा झाडा मुळे होतो आणि अन्नाची गरज सुद्धा झाडांमुळेच सांगते. त्यामुळे झाडे ही निसर्गाचा अविभाज्य घटक आहे. माणसाचा जन्म आणि मृत्यू हा सुद्धा निसर्गाचाच भाग आहे. किंबहुना मनुष्य सुद्धा याच निसर्गाचा महत्त्वाचा घटक आहे. या सृष्टीवर आसलेले प्राणी, पक्षी, झाडे, झुडपे, नद्या-नाले, डोंगर सर्व काही निसर्गाचीच देणगी आहे. हा निसर्गातूनच मिळणाऱ्या वस्तूंचा उपयोग करून माणसाने आज प्रगती केलेली आहे.

निसर्गाचे झाडांच्या लाकडांचा वापर करून इमारती बांधल्या जाऊ लागल्या, तसेच झाडाच्या लाकडापासून विविध फर्निचरच्या वस्तू बनवल्या जात आहेत. निसर्गातील औषधी वनस्पतींपासून माणूस औषधे निर्माण करून आपले आयुष्य वाढवू लागला. त्यामुळे मृत्यूदर कमी होऊन जीवन काळ वाढू लागला आहे. वयाचा परिणाम लोकसंख्या वाढ झालेली जाणवत आहे.

निसर्गातून मिळणाऱ्या अनेक वस्तू म्हणजे पेट्रोल, डिझेल, कोळसा, खाण कामातून मिळणाऱ्या मौल्यवान वस्तू यांचा वापर करून माणूस आपल्या गरजा पूर्ण करू लागला. अशाप्रकारे मनुष्य स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निसर्गाला नुकसान पोहोचत आहे. आजचा मनुष्य विसरून चालला आहे की आपले घरी आपली असते परंतु या संपूर्ण सृष्टीचे घर म्हणजे निसर्ग आहे. मानवाने निसर्गात अनेक महत्त्वपूर्ण घटकांच्या आधारावर आपले उद्योगधंदे उभारले आहेत. निसर्गातील झाडांपासून रबर निर्मिती, औषधी निर्मिती, फर्निचर निर्मिती, इंधन म्हणून वापर, समुद्राच्या पाण्यापासून वीज निर्मिती, हवेवर चालणाऱ्या पवनचक्क्या, खान कामातून कोळसा, खनिज निर्मिती असे अनेक महत्त्वपूर्ण उद्योग माणसाने निसर्गातून मिळणाऱ्या कच्चा मालाच्या आधारावर स्थापित केलेले आहेत. मासेमारी, पशुधन, पशूपालन, शेती, मातीपासून विटा निर्मिती या गोष्टीसुद्धा निसर्गातील घटकांवर अवलंबून आहेत. निसर्गात असलेली सुंदर दृश्य माणसाला निसर्गाकडे आकर्षित करतात.

निसर्गातील सुंदर दृश्य यामुळे जगभरातील पर्यटन क्षेत्राचा विकास होऊन आर्थिक मदत होत आहे. भारतातील महाबळेश्वर, केरळ, कोकण, काश्मीर यांसारख्या निसर्गाने परिपूर्ण असलेल्या शहरांचा लाभ घेण्यासाठी जगभरातून लाखोंच्या संख्येने पर्यटक येतात. यावरून तुमच्या लक्षात आले असेल की निसर्ग आपल्यासाठी किती मैत्रीपूर्ण आहे, म्हणून म्हणतो चला निसर्गाशी मैत्री करुया.

Nisargashi Maitri Karu essay in Marathi language. ‘निसर्गाशी मैत्री करू’ मराठी निबंध कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment