राका कुंभार | Raka Kumbhar

Raka Kumbhar वारकरी संप्रदायातील संतान पैकी राकाकुंभार हे एक संत आहेत. संत राका कुंभार यांच्या जन्म-मृत्यूची तारीख किंवा समाधीचा काळ कोठेही उपलब्ध नाही. संत नामदेवांच्या काळातील संत राकाकुंभार पंढरी नगरीत राहत होते. नामदेवांचा कौटुंबिक स्नेह राकाच्या कुटुंबाशी होता.

राका कुंभार  Raka Kumbhar

संत महिपतीबुवा तहाराबादकर यांच्या भक्तविजय ग्रंथावरून राका कुंभार मूळ गुजरातचे होते अशी माहिती मिळते. परंतु नंतर विठ्ठलाच्या ओढीमुळे ते पंढरपुरात आले व तेथेच स्थिर होऊन विठ्ठल भक्त झाले. संत राकाकुंभार यांच्याविषयी आपण माहिती पाहूया.

जीवन

राकाकुंभार हे गरीब व मेहनत करून आपला जीवन व्यतीत करणारे संत होते. आपल्या गरजा भागवण्यासाठी रानावनातून लाकडे गोळा करून आणणे, मडके घडविणे व देवाचे सतत नामस्मरण करणे हा त्यांच्या प्रपंचाचा दररोजचा नियम होता. राका कुंभार यांचा काळ अंदाजे इ. स. 1500 असा सांगितला जातो. सर्व कुंभार मंडळींत त्यांचा थोर वैष्णव म्हणून गौरव होत असे. ते पंढरपूरात राहत, त्यांना महीपतीबुवा म्हणतात. वारकरी संतांच्या अभंगांची सर्व वैशिष्ट्ये त्यांच्या अभंगांत दिसून येतात. ते थोर भक्त होते. त्यांच्या प्रपंचात सौख्य, शांती नांदत होती.

संत राका कुंभार हे गुजरात मधून असल्याचे मानले जाते. परंतु ते विठ्ठलाच्या ओढीमुळे पंढरपुरात आले होते. ते स्थिर झाले त्यांची विठ्ठलावर अनन्यसाधारण भक्त होते. त्यामुळेच संत नामदेवांच्या परिवारात ते कायमचे विठ्ठल भक्तीचे स्थिर झाले होते. त्यांच्या कुटुंबात पत्नी कांता व मुलगी बंका होती. त्या दोघेही विठ्ठल भक्त होत्या. त्या कुटुंबियांचे प्राणीमात्रांवर अतोनात प्रेम होते. एकूणच राकाकुंभार जरी नामदेवाच्या समकालीन असले तरी वारकरी संप्रदायात सर्वांच्या संगत सोबत होते. त्यांच्या एकूणच संत सभासदांचा त्यांची चरित्र व अभंग यांच्या संदर्भात सर्वांचे दुर्लक्ष झालेले दिसते. त्यांचा कोठेही उल्लेख नाही.

संत गोरोबा आणि राखा कुंभार हे दोघे समकालीन संत होते. तीर्थ विठ्ठल क्षेत्र, विठ्ठल असे विठ्ठलमय झालेले राका कायम अद्वैती अवस्थेत असत समकालीन संतांचा एक थोर वैराग्यमूर्ती असल्याची प्रचिती येते. राकाच्या व त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर एकही अभंग उपलब्ध नाही. संत नामदेवांनी अभंगांमधून राका यांचे चरित्र लिहिले आहे. त्याच्याविषयी चमत्कार, कथा संत नामदेवांनी लिहिले आहेत.

संत राका यांच्या जीवनावर आधारित चमत्कार

एकदा संत राकाची मुलगी बंका भीमातीरी एकटीच आंघोळ करून नदीच्या काठावर अंग वाळवत होती. तिच्याजवळ संत नामदेवांची मुलगी वस्त्र धूत होती. धूताना कपडे आपटताना पाण्याचे शिंतोडे बंकाच्या अंगावर उडाले. बंका रागाने नामदेव यांच्या मुलीला म्हणाली, “मी आंघोळ करून मानस पूजा करीत आहे. तुला दिसत नाही का?” नामदेवाच्या मुलीला राग आला व ती रागाने म्हणाली, “जातीची कुंभार सोहळे करतेस, तूच बाजूला हो”. बंका काही बोलला नाही.

नामदेवाच्या मुलीला तिचा राग आला तिने बंकाची काढायला सुरुवात केली. म्हणाली, “इतकं असताना सुखाचा संसार सोडून रानावनात दारोदारी हिंडत असता का? तुझे वडील भक्त म्हणवून घेतात. कामीक भक्त स्वार्थासाठी भक्ती करायची संकट टाळण्यासाठी देवाला साकडे घालायचे, स्वार्थ साधायचा ही तर तुमच्या भक्तीची रीत आहे”.

बंका खूप अस्वस्थ झाली. पहिल्यांदा जातीवरून हिणवले आणि आता वडिलांच्या भक्तीचे गुन्हे काढले. ती नामदेवांच्या मुलीला म्हणाली, “तुझे वडील किती निस्पृह भक्त आहे. नेहमी देवा पुढे जाऊन ढसाढसा रडल्या पलीकडे येतच काय? त्यांना देवापुढे बसून आक्रस्ताळी भक्ती करतात”. तेव्हा नामदेवाची मुलगी घरी निघून गेली. नामदेवाची मुलगी घरी आल्यावर तिने राखा कुंभाराच्या मुलीचे नामदेवांना शब्द ऐकवले. तुझे वडील लडका भक्त आहेत.

बौद्धरूप धारण करून बसलेल्या विठ्ठला पुढे आपले डोके आपटून बोलायला लावले. माझे बाबा विठ्ठलाचे विरक्त भक्त आहे. नामदेव म्हणाले विठ्ठलालाच विचारू खरा विरक्त भक्त कोण? नामदेव मंदिरात गेले. विठ्ठलाला विचारले अनेक भक्तांमध्ये राकाकुंभार हा भक्त आहे. तो विरक्त आहे की, सकाम भक्त. नामदेव विठ्ठलाचे श्रेष्ठ भक्त पण नामदेवांच्या मर्यादा विठ्ठलाला माहीत होत्या. नामदेव समकालीन संतांच्या परमार्थिक योग्यतेची जाणीव विठ्ठलाला होती. नामदेवाच्या ठिकाणी अहंकार असे अहंकारातून मुक्त करण्याची संधी परमेश्वर कधीच सोडत नसत.

नामदेवांना ईश्वर म्हणू लागले, “तू श्रेष्ठ भक्त आहेस, पण राका कुंभारासारखा वैराग्य संपन्न भक्त या पृथ्वीवर भेटणार नाही. नामदेवांना विठ्ठलाच्या वाक्याने वाईट वाटले. पण नामदेव म्हणाले, ” मला त्याची प्रचिती द्या. विरक्त भक्त म्हणून सिद्ध करून दाखवा”. “निश्चित दाखवतो”, असे म्हणून ते नामदेवांना व रुक्मिणीला घेऊन रानावनात गेले. की जेथे राका, कांता व मुलगी बंका हे तिघे जण वाळलेली लाकडे गोळा करत होते. ते विकून आपला उदरनिर्वाह चालवीत असत. ते कोणत्याही झाडाची फांदी तोडत नव्हते. ते तिघेही एकमेकांना प्रेमभावाने जीवापलीकडे जपत असत.

ते दोघे पती-पत्नी एकमेकांच्या ठिकाणी असणाऱ्या आत्म तत्त्वावर प्रेम करीत. प्रत्येक प्राणिमात्रात परमात्मा निर्गुण निराकार रूपाने स्थित आहे. अशी त्या तिघांची रूढ प्रथा होती. त्याप्रमाणे ते आचरण सुद्धा करीत असत. विठ्ठलाने नामदेवांना दुरून दाखविली पहा नामदेवा खरा विरक्त भक्त असा असतो की, ज्याच्या अंतःकरणातील विकास वासना जळून पूर्ण खाक झाल्या आहेत. त्याचे निष्काम भक्ती आहे. तरीही नामदेवाच्या जवळ अहंकार होता. त्यांचा विश्वास बसेना.

मग रुक्मिणी मातेस नामदेव म्हणाले, ” माते एवढ्या दारिद्र्यात विचारल्यास कशाचाही लोभ नसावा. तुम्ही त्याची परीक्षा पहा”. रुक्मिणी मातेने, नामदेव अहंकार मुक्त झाला पाहिजे म्हणून आपल्या हातातील सुवर्ण कंकण काढले व ज्या रस्त्याने येत आहे. तेथील लाकडाच्या धिगा जवळ कंगन ठेवले व दुरून पाहू लागले. ते कुटुंब लाकडाच्या डिगा जवळ आले. लाकडे उसळू लागले त्याच्या खाली सुवर्ण कंगन दिसले सत्वपरीक्षा पाहण्यासाठी कोणीतरी ठेवले असावे.

त्यांनी कंकण शेजारीच लाकडे उचलली नाही. ते पाहून विठ्ठलाचे नामस्मरण तिघेही करत पुढे चालू लागले. नामदेव रुक्मिणीला म्हणाले, “माते खरंच धन्य आहे, तो राका खरा विरक्त भक्त शोभतो”. नामदेव म्हणाले, “हे पांडुरंगा तुम्ही एकदा तरी राकाला दर्शन द्या”. हे नामदेवांनी पाहील्यानंतर अभंग रचला.

नामा म्हणे देवा वंदीन चरण | घरा अलिंगुनि तिघा जणा ||

इतकी थोर विठ्ठलभक्ती नामदेवांनी अनुभवली नामदेव राय म्हणाले मी त्यांना वंदन करुन त्यांचा दास होतो. दुसरा चमत्कार राका कुंभार यांचे विषयी घडला. त्यांच्या घरी एक मांजरी होती. तिला सर्वांचाच अत्यंत जिव्हाळा होता. एकदा ती वेदना सहन करीत राकाच्या पायाशी अंग घासत, म्यॉव, म्यॉव करू लागली. नंतर ती मांजर घरात गेली आणि एका कच्च्या डेर्‍याचा आश्रय घेऊन गप्प बसली. तिला तीन सुंदर पिलं झाली. ती सतत आत बाहेर करी, पिलांना चाटत बसे.

विश्वातलं सारं वात्सल्य जणू त्या डेर्‍यात साठवून राहिलं होतं. एकदा रात्री राकानं आवा पेटवला. एका मडक्यात मांजरीची पिलं आहेत याचं भान राकाला राहिलं नाही. राकाने रात्री तो आवा पेटवून दिला. त्या एका मडक्यात मांजरीचे पिल्ले होते. ती मांजर मात्र जोरात ओरडत होती. तिच्या आवाजाने राका जागा झाला व त्याच्या लक्षात आला की, मांजरची पिल्ले एका मडक्यात आहे. म्हणून राकाने अपराधी मनानं विठ्ठलाचा धावा केला. राकानं एकेक डेरा बाजूला केला. तो काय, एका डेर्‍यातून मांजरीची पिलं म्यॉव, म्यॉव करीत बाहेर पडली. मांजरीही धावत आली. सर्वत्र आनंदी आनंद झाला.अशाप्रकारे संत राका यांचा महिमा विख्यात आहे.

Raka Kumbhar संत राका हा लेख कसा वाटला, ते मला कमेंट करू नक्की सांगा.

Share on:

Hey there! This is Supada Bochare, a student of engineering and a blogger. Blogging is my Passion. I love to write articles on different topics. I also like to do things related to WordPress, Digital Marketing and Latest technologies.

Leave a Comment

x