Rastyache Manogat Essay in Marathi language | रस्त्याचे मनोगत मराठी निबंध

Rastyache Manogat Essay in Marathi language मी रस्ता बोलतोय, मित्रांनो माझं वळण कुठं नागमोडी असते तर कुठे सरळ असते, कुठे खोल तर कुठे सपाट असते. तुम्हाला नेहमी माझी गरज भासते. ज्याप्रमाणे मानवाने आपल्या सुरुवातीपासूनच्या तर आत्तापर्यंतच्या जीवनात खूप हाल अपेष्टा सहन केल्या त्याचप्रमाणे मला सुद्धा खूप हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. आता मी तुम्हाला जसा मोठा छान सुंदर एक्सप्रेस रुंद आणि गुळगुळीत दिसतो तसा मी सुरुवातीला नव्हतो. सर्वात आधी मी एक छोटी पाऊल वाट होतो. पायरस्त्याचे माझे प्रारंभीचे स्वरूप होते.

माझा जन्म कधी झाला, हे जरी मला आठवत नसले, तरी तो रामायण-महाभारत घडण्याच्या आधी नक्कीच झाला असेल, कारण भगवान श्रीराम माझ्या अंगावरूनच वनवासात गेले तर महाभारतासाठी माझाच वापर झाला. मानवाची प्रगती झाली आणि मानवाने बैलगाडी निर्माण केली तेव्हा मी स्वतःला थोडे रुंद केले, कालांतराने मोटर गाडी आली तेव्हा माझ्या अंगावर लहान-मोठे दगड काढून माझ्यावरील खड्डे बुजवण्यात आले. अशा प्रकारे मी कच्च्या रस्त्याच्या रूपात मी तुमच्या सेवेत हजर झालो.

जेव्हा माझे स्वरूप थोडे कच्चे होते तेव्हा माझ्या अंगावरून एखादे वाहन गाडी वेगाने गेले असता सर्वत्र धुळीचे लाट उसळत असे. मात्र जसजसे मानवाचे जीवन सुधारत गेले तसतसा माझ्यात खूप बदल झाला. आजच्या काळात मानवाने जी काही प्रगती केली त्या प्रगतीचा मी साक्षीदार आहोत. मधूनच रस्ता म्हणजे प्रवास रस्ता म्हणजे जीवन अशी व्याख्या तयार झाली आहे.

सुरुवातीच्या काळामध्ये मानवाचे जीवन अतिशय कष्टमय आणि खडतर होते. म्हणूनच माझी रुप हे ओबडधोबड व खडकाळ होते मी काट्याकुट्यांनी भरलेला होतो त्यावेळी माझ्या वरून प्रवास करताना मानवाला खूप त्रास होत असे. माणूस आपला मार्ग भरकटू नये, कोणत्याही संकटामध्ये सापडू नये यासाठी मलाच काळजी घ्यावी लागायची मी त्याला योग्य दिशेने घेऊन जाऊ लागलो.

किंबहुना, तेच माझे जीवितकार्य आहे. मी माणसाला त्याच्या इच्छित स्थळी पोहचवतो. आपल्या इच्छित स्थळी पोहचल्यावर माणसाच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो. तो पाहून आपण केलेल्या कामाचे सार्थक झाल्याचे वाटते. माणसाच्या सुखाच्या वाटेवरचा  मी सोबती आहे. त्याच्या जीवनातील घडलेल्या प्रत्येक घटनांचा मी साक्षीदार आहे. माझ्या शिवाय आत्ता मानवी जीवन अशक्यच आहे.

माझ्या अंगावर या पावसाळ्यात असंख्य खड्डे पडले आहेत. या सर्वत्र पडलेल्या खड्ड्यांमुळे सर्व ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आपल्याला दिसते. अपघातांच्या मालिका पाहायला मिळतात आणि तुमच्या या गैरव्यवस्थेला मला जबाबदार धरता. माझ्या नावाने ओरडत बसता. हे ऐकून  मला किती यातना होत आहेत! एकदा स्वतःला प्रश्न विचारून बघा, तुमच्या या गैरव्यस्थेला मी जबाबदार आहे का?

मी तुमच्यासाठी आपल्या देशासाठी अहोरात्र मेहनत घेत असतो. दिवसभर तुम्हाला एका जागेवरून दुसरीकडे पोहचवत असतो. सकाळ झाल्यावर शेतकर्यांना त्यःच्या शेताकडे घेऊन जातो. कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या दिशेने घेऊन जातो. मी नसतो देश प्रगतीकडे गेला असता काय? मला दिवसभर गाड्यांच्या कडकडात मुळे शांतता मिळत नाही परंतु रात्रीच्या  वेळी सारे शांत होते, तेव्हा काही क्षण डोळ्याला डोळा लागतो न लागतो तोच एखादे वाहन येते आणि मला खडबडून जाग येते.

त्या वाहनाला त्याच्या इच्छित ठिकाणी पोहचवतो पुन्हा जरा  लवंडतो. तोच उशीर झालेला असतो. एखादा वाटसरू आपल्या बायाकोमुलाच्या ओढीने लगबगीने येतो. रात्रीच्या मिट्ट कालोखामध्ये त्याच्या हृदयाची धडधड वाढलेली असते. पण मी त्याल धीर देत त्याची सोबत करतो आणि त्याला त्याच्या घरापर्यंत सुखरूप पोहचवतो.

Rastyache Manogat Essay in Marathi language रस्त्याचे मनोगत मराठी निबंध तुम्हाला कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Share on:

Hey there! This is Supada Bochare, a student of engineering and a blogger. Blogging is my Passion. I love to write articles on different topics. I also like to do things related to WordPress, Digital Marketing and Latest technologies.

Leave a Comment

x