Samarth Ramdas information in Marathi language | समर्थ रामदास

Samarth Ramdas information in Marathi Language समर्थ रामदास यांचे पूर्ण नाव नारायण सूर्याजी ठोसर आसे होते. त्यांचा जन्म एप्रिल 1608 मध्ये महाराष्ट्रातील जांब येथे झाला. ते महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते.

Samarth Ramdas information in Marathi language समर्थ रामदास

रामाला व हनुमंताला उपास्य मानणाऱ्या समर्थ रामदासांनी परमार्थ स्वधर्मनिष्ठा राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारारासाठी महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले ते संत तुकारामांचे समकालीन होते. राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होते. पर्यावरणावर प्रबोधन आणि लिखाणही त्यांनी केले आहे. त्यांच्याविषयी आपण माहिती पाहूया.

बालपण

समर्थ रामदास यांचे वडील हे एक ऋग्वेदी असून जमदग्नी हे त्यांचे गोत्र होते. समर्थ रामदास हे सूर्याचे उपासक होते. त्यांच्या पत्नी म्हणजेच गंगाधर नारायण यांच्या आईचे नाव राणूबाई असे होते.

जीवन

समर्थ रामदास हे भारतात. प्रवास करत असताना वयाच्या 36 व्या वर्षी पैठणला परत आले. पैठणला ते एकनाथाच्या वाड्यातच उतरले. नाथ आणि त्यांची पत्नी या दोघांनी देह ठेवलेला होता. नाथांची पत्नी समर्थांची मावशी होती. पण समर्थांनी कुणालाच ओळख दिली नाही. एक फिरता साधू म्हणून ते त्या घरात राहिले.

मात्र तिथे त्यांना जांब गावातील सगळ्या बातम्या समजल्या. लग्नमंडपातून पळून गेल्यावर 24 वर्षे जांबशी त्यांचा कोणताही संपर्क नव्हता. त्यांच्या वहिनीला दोन मुले झाल्याचे व आई राणूबाई अंध झाल्याचेही त्यांना तिथे कडले. त्यांच्या मनात जांबला जाऊन आईला भेटावे असे येऊन गेले.

समर्थ जांबला पोहोचले पण तेथेही त्यांना कोणीही ओळखले नाही आणि यांनी सुद्धा आपली ओळख दिली नाही. आपल्या घरच्या अंगणात उभे राहून त्यांनी भिक्षा मागितली. त्यांची वहिनी भिक्षा घेऊन दारात उभी राहिली. तिची राम आणि शाम ही दोन्ही मुले भिक्षा मागणाऱ्या गोसाव्याकडे पाहत होती. त्यांना माहीत नव्हते की,

हे आपले काका आहेत. 24 वर्षात दाढी जटा वाढल्याने आणि व्यायामाद्वारे शरीर बलदंड झाल्याने पार्वतीबाई देखील त्याला ओळखू शकले नाहीत. अखेर समर्थांनी आपले खरे रूप प्रकट केले. नारायण आल्याने राणूबाईंना खूप आनंद झाला आणि बऱ्याच वर्षाच्या साधनेने समर्थांना काही शक्ती प्राप्त झाल्या होत्या. त्याद्वारे त्यांनी रामचंद्रांना प्रार्थना करून मातेच्या डोळ्याला स्पर्श करताच राणूबाईंना दिसू लागले असे मानले जाते.

कार्य

समर्थांच्या शिष्य मंडळीमध्ये सर्व प्रकारचे शिष्य होते. समर्थांचे एक वैशिष्ट्य होते. समोरचा मनुष्य ज्या पातळीवरचा असेल त्या पातळीवर जाऊन त्याला ते समजावून सांगत असत. समर्थांची उपदेशाची भाषा अत्यंत साधी सोपी होती .

एकदा त्यांच्या शिष्यांनी त्यांना विचारले, जेव्हा आपण चिंतनाला बसता, त्यावेळेस आपल्या चेहऱ्यावर अतिशय शांततेचा भाव कसा येतो? आपण जराही विचलित होत नाहीत, मनात नेमकं काय असतं? आपण कोणता विचार करत असतात? हे कसं काय शक्य आहे? या प्रश्नाने समर्थांनी शिष्याला सांगितले, एकदा एक राजाच्या महाला बाहेर एक भिक्षुक आला. उभे असलेले पाहिले भिक्षुकाच्या अंगावर संपूर्ण अंग झाकू शकेल इतके ही वस्त्र नव्हते तसेच त्यावर त्याला अनेक ठिकाणी चिंध्या जोडलेल्या होत्या. अनेक दिवसापासून जेवलेला नाही हे स्पष्ट समजत होतं.

मात्र भीक्षुकाच्या डोळ्यात तेच होते. शारीरिक कष्ट सोसलेला भिक्षुक उभा राहणार तरी कसा परंतु ते पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल, केव्हाही हा खाली पडू शकतो अशा स्थितीत तो कसातरी उभा होता. तेवढ्यात सम्राट बाहेर आले आणि त्याला विचारले, “सांग, तुला काय हवे आहे? यावर भिक्षुकाने उत्तर दिले. आपल्या द्वारावर माझ्या पायावर कसा तरी उभा राहण्याचा अर्थ आपल्याला समजत नाही का? जर तुम्हाला अर्थ समजत नसेल तर मला काही बोलायचे नाही.

मी आपल्यासमोर आहे. माझी मागणी काय असू शकेल? याचा आपण अंदाज बांधलेला असेलच माझी उपस्थिती, ही माझी प्रार्थना आहे, असे त्याने म्हटले तेव्हा हा प्रसंग पाहून देवाकडे काहीतरी मागायच सोडून दिले. असे समर्थ रामदास स्वामी म्हणाले, मी परमेश्वराच्या द्वारावर उभा आहे. परमेश्वराचे लक्ष माझ्याकडे जाईल.

या परमेश्वराला अधिक काय सांगायचे. माझी परिस्थिती सर्वकाही कथन करू शकत नसेल तर माझे शब्द सांगायला कसे पुरे पडू शकतील. माझी परिस्थिती समजून घेऊ शकले नाही. तर माझे शब्दही त्यांना कसे समजतील? म्हणूनच भावपूर्ण विश्वासातून परमात्म्याचे केलेले नामस्मरण हेच महत्त्वाचे ठरते. या नंतर काहीच मागणी शिल्लक राहात नाही.

आपण करत असलेली प्रार्थना मनापासून केले नामस्मरण पुरुष असते असे रामदास स्वामींनी सांगितले. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर प्रथमत सामान्य लोकांनाही पारमार्थिक मार्गास लावावे, अशी त्यांची इच्छा होती. पण पुढील बारा वर्षाच्या प्रवासात त्यांनी जे पाहिले ते भयंकर विदारक अनुभव घेतले. त्यांनी त्यांच्या चरित्रात एक वेगळीच कलाटणी मिळाली होती. त्या काळी भारतातील जनता खूपच हीन-दीन,

त्रस्त आणि अपमानित अवस्थेत काळ कंठीत होती. यावनी सत्तेच्या अमानुष जुलुमाखाली भरडली जात होती. लोकांची मालमत्ता, बायका-मुले, आया-बहिणी देव धर्म संस्कृती काहीच सुरक्षित नव्हते. जनतेची ही हृदयद्रावक अवस्था पाहून समर्थ प्रत्यक्ष अस्वस्थ व उद्विग्न झाले.

सर्वस्वी निसत्व आणि दुर्बल झालेल्या आपल्या समाजास परमार्थाचा उपदेश हानिकारकच ठरण्याचा संभव आहे. समाजाला प्रथम संघटित आणि शक्ति-संपन्न बनविले पाहिजे. समाजाचा लुप्त झालेला आत्मविश्वास पुन: जागृत केला पाहिजे अशी त्यांची खात्री झाली.

‘केल्याने होत आहे रे’ आज आपल्या जीवनात अपयश आणि दुःख दिसत असेल, तर त्याला आपले अधीर आणि उतावीळ मन कारणीभूत आहे. बहुसंख्य लोक आज सुख, आंनद यश कीर्ती ऐश्वर्य अधिकार मिळवण्यासाठी अधीर आणि उतावीळ झाले आहेत. परंतु त्यासाठी शांतपणे आणि सातत्याने कराव्या लागणाऱ्या परिश्रमाचा अभाव दिसून येत आहे. आपल्या हिंदुस्थानी, संस्कृतीत विद्या, कला अथवा अन्य कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी बारा वर्षाचे परिश्रम आवश्यक मानले आहेत. या सतत केलेल्या प्रयत्नांना तप असे म्हटले जाते.

 

धिर्धरा धिर्धरा तकवा हडबडूं नका |
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ||

 

त्यांनी रामनवमीचा उत्सव करून मसूर या गावी लोगो उद्धाराचे कार्याचा पाया घातला. शके 1570 मध्ये त्यांनी चाफळास राम मंदिराची स्थापना केली. तसेच वेगवेगळ्या गावी त्यांनी सुरुवातीला मारुतीच्या अकरा मंदिरांची स्थापना केली आणि नंतर गावोगावी समर्थ रामदास यांनी देशभरात स्थापन केलेल्या एकूण अकराशे मठ आहेत.

 

मराठा तितुका मेळवावा |
महाराष्ट्र धर्म वाढवावा ||

 

यासाठी त्यांनी आपली काया झीजवली. हरिकथा, निरूपण, राजकारण, सावधपण व साक्षेप या तत्त्वांच्या आधारे कार्य करणारा ‘रामदासी संप्रदाय’ त्यांनी निर्माण केला. या माध्यमातून संघटना बांधत त्यांनी ठरवलेले कार्य पूर्ण करून दाखवले. धर्मसत्ता व राजसत्ता यांचा अपूर्व समन्वय साधून सशक्त तरुणांची मने राष्ट्रवादाने भारून टाकली.

श्री प्रभू रामचंद्र, आदिशक्ती, तुळजाभवानी आणि शक्ती उपासनेसाठी मारुतीराया या तीन देवतांचा जागर त्यांनी समाजात मांडला. तसेच शैक्षणिक मारुती मंदिरांची स्थापना त्यांनी केली. स्वतः डोंगरदऱ्यात घळीत राहून समाजाचे व देशाच्या कल्याणाचेच चिंतन केले. समाजातील प्रत्येक घटकाला त्यांनी अनाथ निराधार बालकांना स्त्रियांना सन्मार्गाचा आत्मोद्धाराचा मार्ग दाखविला.

समर्थांवर संत एकनाथांच्या अभंगाचा प्रभाव असल्याचे दिसून येते आणि परमार्थ नेटका करण्यासाठी विवेकसंपन्न व्हा, असा उपदेश त्यांनी केला. आनंद अनुभवाचे स्वप्न पाहिले. हिंदुस्थान बलसंपन्न व्हावा यासाठीच क्षात्रतेज व ब्राह्मतेज जागविले हे स्वामी रामदासांनी.

समाधी

समर्थ रामदासांनी ‘दासबोध’ ग्रंथाचे लेखन रायगडावरील शिवघरघळीत बसून केले. चाफळ परिसरात समर्थांची व छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाल्याचे उल्लेख इतिहासात आढळतात. समर्थ रामदासांनी पूर्वसूचना देऊन माग वैद्य शके 1636 व सन 1681 रोजी आपला देह ठेवला व हीच दासनवमी म्हणून आपण साजरी करत असतो.

अशा या संताला कोटी कोटी नमन की, ज्यांनी महाराष्ट्राला जगण्याचे नवीन बळ जागृत करून दिले. Samarth Ramdas information in Marathi language. समर्थ रामदास ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करुन सांगा. आमच्या आई मराठी Aai Marathi आणि अद्भुत मराठी Adbhut Marathi या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

Leave a Comment