संत भानुदास महाराज | Sant Bhanudas Maharaj

Sant Bhanudas Maharaj संत भानुदास हे नाथपंथाचे होते. संत भानुदास हे विठ्ठलाचे भक्त होते. विठ्ठलाच्या भक्तीच्या दर्शनासाठी त्यांनी विजयनगरचा राजा कृष्णदेवराय यांच्या महालातून श्री विठ्ठलाची मूर्ती महाराष्ट्रात आणण्याचे महान कार्य केले आहे. संत भानुदास संत एकनाथांचे पणजोबा आहेत.

संत भानुदास महाराज Sant Bhanudas Maharaj

भानुदास यांचे काही अभंग आणि आख्यायिका परंपरेने जपून ठेवल्या आहेत. या अख्यायिकापैकी एक तत्कालीन परिस्थितीस प्रेरणा देणारी आहे. तिच्या अद्भुतता असले तरी इतिहासाचे ते एक पुरानिक म्हणून त्याला महत्त्व प्राप्त होते. चला तर मग पाहूया त्यांच्या विषयी माहिती.

जन्म

संत भानुदास यांचा जन्म इ.स. 1448 साली देवस्थान ऋग्वेदी ब्राह्मण कुळांमध्ये झाला. बालपणीच सूर्यनारायणाची उपासना करून त्यांनी त्यांचे आशीर्वाद प्राप्त केले होते.
नाथ म्हणतात,

 

ज्याने बाळपणी आकळीला भानु |
स्वये जाहला चिभ्दानु ||
जिंकुनी मना अभिमानु |
भागवत्पावनु स्वये जाला ||

 

त्यांनी सन 1468 ते 1475 या काळातील दुर्गादेवीचा दुष्काळ पाहिला होता. त्यावेळी ते सतत विठ्ठलाचे नामस्मरण करीत असत. आमुची एक कुळी पंढरीचा नेम | मुखी सदा नाम विठोबाचे || असे त्यांनी म्हटले आहे. यावरून पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती त्यांच्या कुळात परंपरेने चालत आलेली होती असे दिसते.

बालपण

संत भानुदास यांचे बालपण हे संतांच्या संगतीत गेले. संत भानुदास यांनी आपल्या बालपणीच सर्व अध्ययन पूर्ण केले. ईश्वराच्या भेटीसाठी त्यांनी अनेक दिवस ध्यानधारणा केली. सूर्यनारायणाची उपासना देखील त्यांनी त्यांच्या बालपणीच केली. त्यांचा दृढ निश्चय पाहून सूर्यनारायणांनी त्यांना ब्राह्मणाच्या रूपात दर्शन दिले असे सांगितले जाते. त्यांनी आत्मसाधना केली होती. हे खरे आहे त्याचप्रमाणे सभवतांच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक व्यवस्थेची हि निरीक्षण त्यांनी केले होते. पुढे त्यांचा विवाह झाला. मुलेबाळे झाली. नातेवाईकांनी त्यांना कपड्याचा धंदा घालून दिला. त्यांनी तो अत्यंत निष्ठेने चालविला त्यांच्या सत्य निष्ठेची निर्भयतेची व सरपणाची ख्याती सर्वत्र पसरली होती. संत भानुदास हे एक थोर कीर्तनकार होते.

व्यवसाय

संत भानुदास यांनी आपला प्रपंच चालविण्यासाठी कपड्याचा व्यापार सुरू केला. व्यापाराच्या व्यापात असूनही त्यांनी पंढरीची एकही वारी चुकविले नाही कारण तो त्यांच्या मुळचा धर्म नियम होता. व्यवसाय करून सुद्धा त्यांनी देवाचा विसर पडू दिला नाही.

परकीयांचे आक्रमण

संत ज्ञानेश्वरांच्या काळानंतर महाराष्ट्रवर आलेले भयानक परकीय आक्रमण धार्मिक, सांस्कृतिक दृष्ट्याही अत्यंत भयावाह होते. राजसत्तेच्या आश्रयाने होत राहिलेल्या या धार्मिक आक्रमणामुळे हिंदू लोकांचा स्वधर्मचरणाची निष्ठा ढासाडू लागली होती. उत्तरेकडून येणाऱ्या परधर्मीयांबरोबर हजारो सैनिक दक्षिण उत्तर भारतात राजाश्रयाने धर्मप्रचारकाचे कार्य करीत होते. निजामुद्दीन अवलिया हिंदूंना आपणहून किंवा बलात्कार ए बाटून मुसलमान झाले. देवळे उध्वस्त होऊन त्या जागी पीर, दर्गे, मस्जिद उभ्या राहू लागल्या.

हिंदू सरदारांना याचे काहीच वाटत नव्हते. कारण त्यांना आपापल्या जाहगिरीचा विस्तार करायचा होता. म्हणून ते बादशहाच्या अंकित राहिले. पुणे, पुरंदर, पैठण, वैजापूर, गंगापूर, कंधार, मंगरूळ, उस्मानाबाद आहेत पैठण हे जसे महाराष्ट्राचे सांस्कृतिक केंद्र पण या काळात सुफिंनी महाराष्ट्र पैठण मधील श्रीगणेशाचे, एकवीरा देवीचे व महालक्ष्मीचे मंदिर उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी दर्गे उभे केले. ही गोष्ट इतिहासात नोंदली गेली आहे.

संत भानुदास यांचे साहित्य

संत भानुदास यांचे अभंग आणि आख्यायिका खूप प्रसिद्ध आहेत. असे म्हणतात, आमुचिये कुळी पंढरीचा नेम |
सदा वाचे नाम विठ्ठलाचे ||
संत भानुदास यांच्या मुळचा धर्म हा पंढरीची वारी करणे हा आहे आणि सतत विठ्ठलाचे नाम मुखी घेणे आहे असा या अभंगाचा अर्थ होतो.

कथा

संत भानुदास यांचे विषयी एक कथा प्रसिद्ध आहे आणि या ऐतिहासिक घटनेचे संत भानुदास यांचे विठ्ठलाप्रतीचे प्रेम आपल्याला दिसून येते. असे म्हणतात की, विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय एकदा पंढरीचा श्री विठ्ठला आपल्या राज्यात नेवून प्रतिष्ठित करावी असा त्याच्या मनात विचार आला. त्याने तसेच केले आषाढीवारी जवळ आल्यानंतर पंढरीत वारकरी श्री विठ्ठल दर्शनासाठी जमू लागले. परंतु विठ्ठल दर्शनासाठी आलो आणि विठ्ठलच त्याच्यात जागेवर नाही.

हे पाहून वारकरी आलाप करू लागले. त्या वेळी भानुदास यांनी सर्वांना आश्वासन दिले की, मी विठ्ठलाला परत आनेलं भानुदास निघाले, काही दिवसांनी ते मध्यरात्रीच्या सुमारास विठ्ठला समोर येऊन उभे राहिले, तेव्हा ते म्हणाले, “देवा सर्व भक्त तुझी पंढरीत वाट पाहत आहे चल माझ्याबरोबर”. विठ्ठलाने आपल्या गळ्यातील तुळशीची माळ नवरात्राच्या हारासह भानुदास यांच्या गळ्यात घालून थोडा धीर धरण्याचा सल्ला दिला. भानुदास तेथून बाहेर पडले पहाटे काकड आरतीच्या वेळी जेव्हा पुजारी तेथे आले तेव्हा त्याच्या लक्षात आले की, देवाच्या गळ्यात नवरात्राचा हार नाही राजापर्यंत ही बातमी पोचली जो कोणी चोर असेल त्यास परस्पर सुळावर चढविण्याचे फर्मान राजाने सोडले.

सैनिक सर्वत्र पसरले पहाटेच्या वेळी तुंगभद्रा नदीच्या किनारी भानुदास अंघोळ करीत असताना एका सैनिकास त्याच्या गळ्यात नवरत्नांचा हार दिसला. हाच तो चोर असावा असे गृहित धरून सैनिकाने भानुदास बंदी बनवले. त्यानंतर सुरावर चढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी भानुदास यांच्या मुखातून अभंग प्रगटला.

 

जै आकाश वर पडो पाहे |
ब्रह्मगोळ भंगा जाये ||
वडवानळं त्रिभुवन खाये |
तरी तुझीच वाट पाहेगां विठोबा ||

 

ज्या सुळावर चढविण्यात येणार त्या सुळास पालवी फुटली. हा प्रसंग त्यांच्याच भाषेत पहावयास झाल्यास कोरडी काष्टी अंकुर फुटले येणे तेथे झाले विठोबाचे.

ही बातमी राजापर्यंत गेल्यानंतर राजाचा थरकाप उडाला. ज्याला आपण चोर समजलो तो चोर नसून महान भगवद्भक्त आहे असा राजाला पश्चाताप झाला. माझ्या भक्तांचा छळ झाल्यामुळे मी तुझ्याकडे राहणार नाही, असा इशारा विठ्ठलाने दीला. भानुदास विठ्ठलाला घेऊन पंढरीस निघाले. पंढरी जवळ आल्यानंतर आनंदित झालेल्या वारकऱ्यांनी श्री विठ्ठलाची रथावरून मिरवणूक काढली. तो दिवस होता कार्तिक शुद्ध एकादशी. तेव्हापासून कार्तिकी एकादशी रथ उत्सव होतात व या दिवसाचे स्मरण म्हणून आजही आपल्याला पहावयास मिळतो.

समाधी

कार्तिक एकादशीचा सोहळा झाल्या -नंतर श्री भानुदास यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. त्यांची समाधी श्री विठ्ठल दर्शनास जातांना गरुड मंडपामध्ये उजव्या हाताच्या दरवाज्याजवळ आहे. ज्या आज पादुकांच्या स्वरूपात आहे. आजही त्यांच्या समाधीनिमित्त उत्सव वारकऱ्यांमध्ये साजरा करण्यात येतो. या दिवशी त्यांच्या वंशजांकडून परंपरांनी प्रतिवर्षी समाधीचे पूजन नैवद्य किर्तन आधी करण्यात येते. Sant Bhanudas information in Marathi language.”संत भानुदास ही माहिती कशी वाटली, ते आम्हला कमेंट करून नक्की सांगा.”

Leave a Comment