Sant chokhamela information in Marathi language संत चोखोबा एक संसारी पुरुष पोटा -पाण्यासाठी कुटुंबाच्या उदरनिर्वाहा करिता कबाड कष्ट करीत असत. पण आपले कर्तव्य करीत असताना, ते ओठावर सतत सावळ्या पांडुरंगाचे नाव घेत असत व त्यांच्या नामात नेहमी दंग असत. नेहमी वाटायचं की, विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन आपणही इतरांप्रमाणे त्याला भेटा व मनोमन विठ्ठलाला पाहायची इच्छा त्यांना झाली. परंतु ते त्या काळातील समाजात पसरलेल्या जातिभेदाच्या खोल दरीमध्ये असल्यामुळे त्यांची इच्छा मनातच राहिली. अशा या भक्तासाठी स्वतः संत चोखोबाला भेटण्यासाठी गेले. संत चोखोबा हे संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावाडीतले संत होते. संत नामदेव हे त्यांचे गुरू होते. त्या काळातील सामाजिक विषमतेमुळे चोखोबा आणि त्याचे कुटुंब होरपळून निघाले. ते शूद्र अतिशूद्र गावगाडा समाज जीवन, भौतिक व्यवहार उच्चनीचता आणि वर्णव्यवस्था यांच्यात अडकले होते.
संत चोखोबा हे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा या गावचे होते. संत तुकोबा हे महार जातीचे असल्यामुळे त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता. त्यावेळी समाजात महारांचा द्वेष करत. त्यांना पाण्याला किंवा त्यांनी कोणत्याही वस्तूला स्पर्श करू देत नव्हते आणि या अशा समाजात त्यांचा श्वास कोंडला जात होता. त्यांना उपेक्षित बांधवाच्या उद्धाराची सतत चिंता होती. त्यांना समान हक्क मिळावेत समाजातील द्वेष कमी व्हावा. जातींमधील संघर्षाची भ्रामक कल्पना नष्ट व्हावी.
भक्ती मार्गाद्वारे प्रयत्न केले. चोखोबा वऱ्हाडातील संत आहे असे म्हटले जातात. त्यांची पत्नी सोयरा आणि त्यांची बहीण निर्मळा तसेच मेहुना बंका व त्यांचा मुलगा कर्ममेळा हे सर्व प्रपंचाचे कुटुंबाचे सदस्य कबाड कष्ट उपसत असताना, नित्यनियमाने व भक्तिभावाने पांडुरंगाचे नामस्मरण व गुण कीर्तन करीत असत. संत चोखोबांना शुद्ध व चांगले वातावरणात राहावे वाटत होते. परंतु उच्च वर्णातील लोक त्यांना त्यांच्या वस्तीत राहु देण्यास तयार नव्हते. संत चोखोबा हे विठ्ठल मंदिराच्या दाराच्या समोर आधारावर उभे होते. परंतु त्यांना मंदिरात प्रवेश मिळत नव्हता. म्हणून त्यांनी चंद्रभागेच्या पलीकडे एक झोपडी बांधून तिथे आपला मुक्काम ठोकला.
जातिभेदाच्या या अमानुषीचे वर्णन ते आपल्या अभंगात करीत असत.
संत चोखामेळा हे प्रापंचिक गृहस्थ होते, ते आपल्या उदरनिर्वाहासाठी काबाडकष्ट करत असेत. पण ते विठ्ठलाच्या नामात सतत दंग राहत असत. गाव वाड्यातील शिवा -शिवीच्या वातावरणात त्यांचा श्वास कोंडला जात होता. दैन्य दारिद्र्य, वैफल्य यामुळे ते लोक जीवनात अस्वस्थ होते. परंतु प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना जवळ केले. त्यांना सत्संग लाभला त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता. श्री विठ्ठलाला त्यांना इतरांप्रमाणे उराउरी भेटावे असं खुप वाटत होते. परंतु ते सावळे गोजिरे रूप महाद्वार आतूनच पहावी लागे. ही खंत संत चोखोबाच्या मनात होती. चंद्रभागेच्या वाळवंटात आध्यात्मिक लोकशाही संत ज्ञानदेवांची मूळे तेराव्या शतकात उदयाला आले म्हणून संत चोखोबा म्हणतात.
“खनटन यावे शुद्ध होऊन जावे | दवंडी पिटी भावे डोळा ||
असा पुकारा त्यांनी वारकरी संप्रदायातील अध्यात्म इष्ट सभेत व्यक्तीची आर्त आपल्या उपेक्षित बांधवांपर्यंत नेऊन पोहोचवले. आत्मविकासाची संधी तत्कालीन समाजरचनेतील अगदी तळातील लोकांनाही मिळावी असे ज्ञानेश्वरादी सर्व संतांना प्रांजळपणे वाटत होते. त्याच वेळी संत चोखोबांनी भक्तिमार्गाचा संदेश आपल्या अभंगातून समाज बांधवांना दिला. संत चोखोबांचे भावविश्व अनुभवण्याचा प्रयत्न केला असता. संस्कार संपन्न संवेदनक्षम भक्ती, आत्मनिष्ठ व्यक्तिमत्वाच्या चोखोबाच्या आयोजनातून त्यांच्या आंतरिक वेदनांची सूर छेडल्याचे जाणवतात.
हीन मज म्हणती देवा |
कैसे घडो तुमची सेवा ||
असा उपरोधक प्रश्न ते देवालाच विचारतात. का म्हणून आम्हासी यातना सहन करावयाच्या भगवंताच्या लेखी सर्व त्याचीच लेकरे आहेत ना? मग असा दुजाभाव का असे प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होऊन ते व्यथित होताना दिसतात. त्यांच्या अभंगरचना हृदयाला भिडणार्या आहेत. त्यांना भोगावे लागलेले दुःख यांची झालेली उपेक्षा मानसिक छळ याचे पडसाद त्यांच्या काव्यरचनेत आपल्याला दिसून येतात. संत चोखोबांचे 350 अभंग आजच्या घडीला उपलब्ध आहेत.
धाव घाली विठू आता |
चालू नको मंद ||
बडवे मज मारिती |
ऐसा काहीतरी अपराध ||
जोहार मायबाप जोहार |
तुमच्या महाराचा मी महार ||
बहु भुकेला झालो |
तुमच्या उष्ट्या साठी आलो ||
आमुची केली हीन याती |
तुज का न कळे श्रीपती ||
जन्म गेला उष्टे खाता |
येते न लाज तुमची चित्ता ||
ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा |
काय भुललासी वरलिया रंगा ||
चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा |
काय भुललासी वरलिया रंगा || विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी |
हे त्यांचे अभंग जनमानसामध्ये आजही लोकप्रिय आहेत. चोखोबांच्या अभंग रचनेत भक्ती तळमळ अध्यात्मिक उंची तर दिसतेच तसेच उपेक्षितांची खंत जाणवते आणि वेदनेचा सूर दिसतो. जो आजही आपल्या अंतकरण हेलावून टाकतो.
“कर जोडूनिया दोन्ही चोखा जातो लोटांगणी महाविष्णूचा अवतार प्राणसखा ज्ञानेश्वर”.
त्यांच्या कुटुंबाविषयी अशी एक कथा प्रचलित आहे. संत चोखामेळा यांच्या कुटुंबातील सर्वजण हरिभक्तिपरायण करत होते. त्या सर्वांचे विठ्ठलावर अनन्यसाधारण प्रेम होते. त्यांची पत्नी सोयराबाई हिचे बाळंतपण स्वतः विठाबाई माऊलीने नणंदेचे रूप घेऊन केले अशी कथा प्रचलित आहे. संत चोखोबांचा मुलगा कर्ममेळा हा पण संत परंपरेत आहे. सोयराबाई व कर्ममेळा यांच्याही काही सुंदर अभंग रचना आहेत. संत चोखोबांचे मेव्हणे बंका महार व बहीण निर्मळा यांचीही काही उत्तम रचना आहेत. संत चोखोबांच्या भक्तीची उंची फार मोठी होती. ते स्वतःला विठू पाटलाचा बलुतेदार म्हणून घेत असत.
संत तुकोबा हे कार्य मग्न असताना सतत विठ्ठलाच्या नामस्मरणात दंग असत आणि संत चोखोबा यांना कायम कामे करावी लागायची असत. असे म्हणतात की, जे काम करताना चोखा दमून जायचा ते कार्य स्वतः पांडुरंग येवून पूर्ण करायचे. संत चोखोबांनी समाज बांधवांना आपल्या अभंगातून भक्तिमार्गाचा संदेश दिला आहे.
मृत्यू
इ. स. 1338 सालातील ही गोष्ट आहे. मंगळवेढा येथे किल्ल्याच्या बांधकामात पूर्वी पूर्व दिशेकडील वेशीचे बांधकाम सुरू होते.
“मंगळवेढ्या भोवती कुसू बांधवाया बोलवया
महाराशि बोलवण्या दूत आले.
महारा समगमे सुखा मेळा आला काम हे लागला करावया”.
संत चोखामेळा यांच्या अभंगात आपल्या या प्रसंगाचा पुरावा देखील आढळतो. त्यावेळी ते बांधकाम अचानक कोसळले आणि त्याखाली संत चोखोबा व अनेक मजूर काढल्या गेले.
संत चोखोबाचा मृत्यू हा गाव कुसाच्या कामात दरड कोसळून झाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या हातून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता. यावरून नामदेवांनी चोखोबाची हाडे ओळखून ती गोळा केली व पंढरपूरला विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली. असे चरित्रकार सांगतात.
संत चोखामेळा यांची अस्ति मंगळवेढा येथून पंढरपूर येथे घेऊन जात असताना, संत नामदेव महाराज यांनी दोन महिलांवर आणि दहा महिलांवर थोडी विश्रांती घेतली होती. पुढे भक्तांनी त्या ठिकाणी संत चोखोबाचे स्मरण म्हणून पादुकांची स्थापना केली आहे. आषाढी वारी दरम्यान आज देखील वारकरी त्या पादुकांवर नतमस्तक झाल्याशिवाय पुढे जात नाही.
Sant Chokhamela information in Marathi language. संत चोखोबा विषयी माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.