संत एकनाथ | Sant Eknath Maharaj information in the Marathi language

Sant Eknath Maharaj information in the Marathi language एकनाथ महाराज महाराष्ट्राचे श्रेष्ठ संतकवी म्हणून ओळखले जातात. जातिभेद नष्ट व्हावा म्हणून ते शेवटपर्यंत कार्य करत राहिले. यांचा स्वभाव अतिशय नम्र होता. पंधराव्या शतकात महाराष्ट्रातील जनता मोगलांच्या शासनाखाली घोरपड होती. तसेच संस्कृतीही रसातळाला गेली होती. अधःपतन वाढला होता. अशा काळात मोक्ष मार्गाची कावळे स्त्री शूद्रांना नाथांनी खुली करून दिली.

संत एकनाथ  Sant Eknath Maharaj information in the Marathi language

संत एकनाथानी  लहानपणातच मनन, चिंतन, अभ्यास, देव, कीर्तने यांच्यामध्ये स्वतःला गुंतवून घेतले. त्यांनी अनेक ग्रंथांची रचना केली. सर्वसाधारणपणे नाथ म्हणूनही ओळखले जाणारे संत म्हणून संत एकनाथ महाराज हे आहे. यांचा जन्म भानुदास यांच्या काळात झालेला आहे. चला तर मग पाहूया आपण संत एकनाथ महाराजांविषयी माहिती.

जन्म

श्री संत एकनाथ महाराज यांचा जन्म श्री सूर्यनारायण व आई रुक्मिणी यांच्या पोटी 1532 मध्ये पैठण या गावी झाला. नाथांचे आई-वडील नाथांच्या बालपणातच मरण पावल्यामुळे आजी-आजोबांनी नाथांचा सांभाळ केला. बालपणापासूनच नाथांना भगवत भक्तीचे वेळ लागेल होते. गुरुकृपेने भगवंताची भेट होते. हे समजल्यानंतर वयाच्या बाराव्या वर्षी आकाशवाणीच्या निर्देशाप्रमाणे कोणालाही न सांगता सद्गुरूच्या शोधासाठी बाहेर पडले व नाथ देवगिरी येथे पोहोचले. तेथे जनार्दन स्वामी नावाचे दत्तभक्त किल्लेदार होते.

नाथांनी त्यांना पाहताच सद्गुरु मानून मनोभावे सेवा गेली. नाथांची सेवा पाहून स्वामींनी त्यांना शिष्य म्हणून स्वीकारले स्वामी प्रत्येक गुरुवारी किल्ल्याच्या शिखरातील गुहेत दत्त ध्यान करीत असत. एके दिवशी स्वामी ध्यानात असताना परकीयांचे आक्रमण झाले. सद्गुरुची समाधी भंग होऊ नये म्हणून हाती तलवार घेऊन घोड्यावर स्वारी झाले. लढाई केली आणि शत्रूंचा पराभव केला. निस्सीम सेवेने नाथ दत्तत्रय दर्शनास पात्र झाल्याचे पाहून सुलिभांजन पर्वतावर त्यांना पहिले दत्तदर्शन स्वामींनी घडविले. त्यानंतर तीर्थयात्रा करून नाथ पैठणास पोहोचले.

गुरु

संत एकनाथांचे गुरु सद्गुरू जनार्दन स्वामी हे देवगड येथे दरबारी अधिपती होते. हे मूळचे चाळीसगावचे रहिवासी होते. त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते दत्तोपासक होते म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन वरले होते. नाथांनी परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले. द्वारपाल म्हणून दत्तात्रय नाथांच्या द्वारी उभे असलेले श्री जनार्दन स्वामी हे नाथांचे गुरु बनले. सद्गुरुच्या आदेशाप्रमाणे पैठण येथे वास्तव्य करून नाद गृहस्थाश्रमात प्रवेश करते झाले.

जीवन

एकनाथ महाराजांचे नम्र स्वभावाचे होते. बालवयात चिंतन-मनन अभ्यास देवभक्ती याकडे त्यांचा ओढा होता. गुरूंच्या आज्ञेवरून त्यांनी तीर्थयात्रा काव्य रचना व विवाह केला. त्यांनी बारा वर्ष तपश्चर्या केली. गुरु विषयी त्यांची इतकी विलक्षण भक्ती होती की, प्रत्येक रचनेत एका जनार्दनी ही नाममुद्रा आढळते. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. नाथांनी पैठणच्या जवळ असलेल्या वैजापूर येथील एका मुलीशी विवाह केला.

नाथांची पत्नी गिरिजाबाई ह्या सुशील आणि तत्पर होत्या. त्यांना तीन अपत्ये झाली. गोंदा, हरिपंडित व गंगा. नाथांचा प्रपंच व परमार्थ हे दोन्ही फुलू लागले. संस्कृतातील ज्ञान सर्वसामान्यांना कळावे या उद्देशाने त्यांनी ते मराठीत सांगण्यास सुरुवात केली. त्यावरून त्यांना अनेकांचा विरोध सहन करावा लागला. परंतु त्यास न जुमानता लोकद्धाराचे कार्य नाथांनी लोकांच्याच भाषेत म्हणजे भारुडे कीर्तने इत्यादी मार्गांनी लोकांना परमार्था मार्गास लावले.

लोकोद्धारासाठी वाढवण्याच्या व आचरणच्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकोपयोगी कार्य केले. कवी मुक्तेश्वर हे नाथांचे मुलीकडून नातू होते. संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे 250 वर्षांनी एकनाथांचा जन्म झाला. “बये दार उघड” असे म्हणत नाथांनी अभंग रचना, भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली.

कार्य

संत एकनाथ महाराजांनी समाजातील अस्पृश्यांचा मेळावा आपल्या घरी भरविला. भेदभाव न मानता माणुसकीने वागा असा उपदेश त्यांनी सर्वांना गेला. गाढवाला गंगा पाजणे, हरी जनाचे पोर हृदयाशी कवटाळणे, श्राद्ध प्रसंगी अस्पृश्यांना जीव घालने यातून सामाजिक भाव प्रगट होतात. त्यांनी संतांची चरित्रही लिहिले. अशा थोर समाज सुधारकाने खूप महान कार्य केले आहे.

संत एकनाथ महाराजांनी विजय नगर भवन श्री विठ्ठलाचे मूर्ती पंढरपुरात परत आणली त्या संत भानुदासाचे एकनाथ हे पंतू आहेत. भगवत भक्ती त्यांच्या घराण्यात पूर्वीपासून चालत आलेली होती. पैठणी तत्कालीन महाराष्ट्राचे काशी क्षेत्र आणि संस्कृत धर्मग्रंथाच्या अभ्यासाचे व्यासपीठ समजले जात होते. या पैठण क्षेत्री एकनाथांचा जन्म झाला. त्यांनी गीता, उपनिषदे, शास्त्रे, पुराणे याबरोबर लेखन-वाचन, भारुडे रचली.

साहित्य

संत एकनाथ यांचा ‘एकनाथी भागवत’ हा लोकप्रिय ग्रंथ आहे. ही एकादश स्कंधावरील टीका आहे. मुळात एकूण 1,367 श्लोक आहेत. परंतु त्यावर भाष्य म्हणून 18,810 ओव्या संत एकनाथांनी लिहिलेले आहेत. एकनाथांनी जिंकलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे 40 हजार ओव्या आहेत. रुक्मिणीस्वयंवर हेही काव्य त्यांनी दिले आहेत. दत्तांची आरती हे त्यांची आहे. गणपती आरती समोर गायीच्या त्यापैकी एक आहेत. महत्त्वाचे म्हणजे एकनाथांनी ज्ञानेश्वरांची प्रत शुद्ध केली. नाथ हे महावैष्णव, दत्तभक्त, देवीभक्त पण होते.

जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांनी अनेक ग्रंथांची रचना केली. नाथांची भक्ती पाहून भगवान श्रीकृष्ण 36 वर्षे श्रीखंड्या, केशव, विठ्ठल नावाने नाथाघरी राबला. भगवान दत्तात्रेयांनी नाथांच्याद्वारे द्वारपाल म्हणून काम केले. नाथवाड्यात नित्य कीर्तन-प्रवचन आधी रोज होत असत. नाथ सर्व संतात श्रीमंत असल्याकारणाने येणाऱ्या प्रत्येकास रोज ओंजळभर साखर वाटत असत. साखरेच्या आशाने तरी लोकांच्या कानी चार शब्द चांगले पडतील. ही त्यामागची धारणा होती. सर्वांना देवाकडे जावं वाटतं परंतु देवाला नाथाकडे यावसं वाटलं. कर्नाटकातील एका सावकाराने बनवलेली श्री विजय पांडुरंगाची मूर्ती म्हणू लागली, मला नाथांची सेवा हवी आहे. तो सावकार ती मूर्ती घेऊन पैठणला आला.

नाथांनी अनुभूती देऊन त्या मूर्तीचा स्वीकार केला. नाम भावार्थरामायण लिहिण्यासाठी प्रत्यक्ष श्रीरामचंद्रांनी माझा पाठपुरावा केल्याचे नाथांनी लिहून ठेवले आहे. नाथांनी विविध देवदेवता एकनाथी अभंग रचना करून भक्तीच्या नाना छटांचे मनोरम दर्शन घडवले आहे. अभंगातून कृष्णजन्म, बालक्रीडा, कृष्ण महिमा, पंढरीचा महिमा विठ्ठल महिमा, राम महिमा, महिमा नाम पाठ किर्तन महिमा, सद्गुरु महिमा, अद्वैत ज्ञान, आत्मभूमी , अशा विविध विषयांवर प्रासादिक सुबोध अभंग रचना करून नाथांनी जनसामान्यांना तसेच भक्तजनांना परमार्थाच्या सहज सुलभ वाटा दाखवून मार्गदर्शन केले आहे. नाथांच्या अभंगाचे प्रमुख गुणविशेष आहे.

असा कसा देवाचा देव बाई ठकडा |
देव एका पायाने लंगडा ||
शिंकेचि तोडितो मडकेचि फोडितो |
करी दह्यादुधाचा रबडा ||
वाळवंटी जातो कीर्तन करितो |
घेतो साधुसंतांसि झगडा ||
एका जनार्दनी भिक्षा वाढा बाई |
देव एकनाथाचा बछडा ||

याप्रमाणे त्यांची बरीच गवळणी व भारुडे प्रसिद्ध आहेत.

समाधी

एक दिवस नाथ सर्वसामान्यांसारखे मरण पावले. लोक म्हणू लागले नाथ सर्वसामान्यांसारखे गेले. मग त्यांच्यात आणि आमच्यात काय फरक? नाथ काठीवर उठून बसले म्हटले, “मी पुन्हा केव्हातरी जाईल”. काही दिवसांनी फाल्गुन वद्य षष्ठी शके 1553 ते 1599 हा दिवस नाथांनी जलसमाधीसाठी निश्चित केला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत नाथांनी लक्ष्मी तीर्थावर शेवटचे कीर्तन केले. कृष्णकमल तीर्थामध्ये नाभीपर्यंत पाण्यात जाऊन आत्मा ब्रम्हांडात विलीन केला. त्यांच्या पार्थिव देहावर हरिपंडित यांच्या हस्ते अग्नी देण्यात आला. दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी गरम राखेवर तुळशी आणि पिंपळाचे रोपटे उगवले. त्यावर नाथपुत्र हरीपंडितांनी चरण पादुका स्थापन केले.

Sant Eknath information in the Marathi language. “संत एकनाथ यांच्याविषयी माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट नक्की सांगा.

Leave a Comment