संत गजानन महाराज | Sant Gajanan Maharaj

Sant Gajanan Maharaj भक्तांच्या उद्धारासाठी श्री संत गजानन महाराज पृथ्वीवर अवतरले. श्री संत गजानन महाराज मंदिर बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे आहे. गजानन महाराज हे दत्तात्रय परंपरा चे भारतीय गुरु होते. गजानन महाराज मंदिर शेगाव हे गावाच्या मधोमध आहे. हे मंदिर काळा पाषाणाचे आहे. श्रींची समाधी मंदिराच्या गुहेत आहे. वरच्या बाजूला राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे. तसेच मंदिर परिसरात वर्षभर भजन आणि प्रवचन असते.

संत गजानन महाराज Sant Gajanan Maharaj

रोज सकाळी पाच वाजेपासून रात्री साडेनऊपर्यंत पूजा-अर्चना विधी चालत असते. काकड आरतीचे शयन आरती पर्यंत नियमित रूपाने विविध कार्यक्रम तेथे चालत असतात. या मठाचे वैशिष्ट्य म्हणजे तेथे स्वच्छता शांतता शिस्त आणि कर्मचाऱ्यांची तसेच सेवाकर यांची भक्तांशी उत्तम तसेच प्रेमळ वागणूक देवदर्शनाची व्यवस्था अतिशय उत्तम प्रकारे केलेली असून दुपारच्या वेळी सर्व भक्तांना भोजन प्रसाद वाटतात. येथील भोजन देखील निटनिटके व्यवस्थित असून सेवेकरी प्रेमाने भक्तांना हा प्रसाद वाढतात. संत गजानन महाराजां विषयी माहिती..

संत गजानन महाराज यांचा काळ

श्री संत गजानन महाराज यांचा काळ 1878 ते 1910 पर्यंतचा आहे. माग वैद्य 7 शके 1800 म्हणजेच 23 फेब्रुवारी 878 या दिवशी श्री संत गजानन महाराज अठरा वर्षाचे शेगाव जिल्हा बुलढाणा येथील दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले. गजानन महाराज हे श्री देवीदास पातुरकरांच्या घरा बाहेर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळीतील अन्नाचे कण वेचून खाताना व गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पितांना बंकटलाल अग्रवाल यांना सर्व प्रथम दृष्टीस पडले.

श्री गजानन महाराज अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले असे ब्रम्ह, महान संत होते. ते परमहंस संन्यासी होते. त्यांची अवधूत अवस्था असल्यामुळे त्यांना दंड, भगवी वस्त्रे अथवा कोणत्याही अन्य लक्षणांची आवश्यकता नव्हती. त्यांनी स्वतःच्या या संन्यासाश्रमाचा उच्चार अनेक वेळा करूनही दाखविला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी परमहंस संन्याशाच्या रूपाने आपल्या भक्तांना दर्शन दिल्याचेही अनेक उल्लेख श्री गजानन विजय ह्या पोथी मध्ये आलेले आहे. बंकटलालने जेव्हा त्यांना जेवणाविषयी विचारले, त्यावेळी महाराजांनी नुसतीच शून्य दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले.

कारण महाराज त्यावेळी तुर्या अवस्थेत होते. तुर्या म्हणजेच जागे असणे, सुश्रुत ती म्हणजे झोपणे आणि स्वप्नावस्था या तीनही अवस्थांच्या पलीकडील स्थितीस तुर्या अवस्था असे म्हणतात. गजानन महाराज हे एक महान आणि असामान्य असे योगी आहेत, असे बंकटलालला वाटले आणि त्यांनी त्यांना आपल्या घरी आणले. गजानन महाराज ही फार मोठी संत आहेत अशी भावना मनी धरणाऱ्या भक्तांनी बंकटलालाचे घर दुमदुमून गेले होते. काही महिने गजानन महाराज बंकटलालकडे राहिले आणि त्यानंतर त्यांनी त्यांचे वास्तव्य तिथून बदलून गावातील मारुतीच्या मंदिरावर आणले.

बालअवस्था

गजानन महाराज बाल अवस्थेत असताना एक दिवस पहाटेच्या वेळी अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या आश्रमात पोहोचले त्यावेळी अक्कलकोट स्वामी भक्तांना उपदेश करीत होते. महाराज स्वामींना भेटताक्षणी त्यांनी एकमेकांना परस्पर ओळखले. स्वामींनी गजाननाची मूर्ती न्याहाळली सिद्धपुरुष होण्याचा आशीर्वाद दिला. त्या दिवसापासून बाल गजानन स्वामींच्या आश्रमी राहू लागले.

दिगंबर अवस्थेतील बाल गजाननाची मूर्ती आणि त्यांची तेजस्वी मुद्रा बघून दर्शनार्थी भक्त स्वामीं बरोबर बाल गजाननाच्या पाया पडत. अशाप्रकारे स्वामींनी गजाननांना आपल्या जवळ ठेवून त्यांना अध्यात्मिक ज्ञानाचे धडे दिले. नंतर स्वामींनी बाल गजाननास नाशिकला देव मामलेदारकडे जावे असे सांगितले व त्यानंतर नरसिंग महाराजांकडे आले आणि तेथून शेगावला जाऊन भक्तांचा उद्धार करावा असा उपदेश नरसिंग महाराज यांनी दिला व तेथेच देह सोडावा असे सांगितले.

त्यानंतर गजानन महाराज नाशिकला देव मामलेदार यांच्या दर्शनाकरिता गेले. दोन्ही संतांची भेट झाली. त्यांनी बाल गजाननास आपल्याकडे ठेवून घेतले. देव मामलेदार यांनी देह सोडण्या अगोदर संत गजाननांना सांगितले की, स्वामी समर्थच्या वचनानुसार विदर्भातील शेगाव या गावी जाऊन भक्तांचा उद्धार करावा व तेथेच देह सोडावा हे विसरू नकोस. त्यानंतर कानवाई ते गावातील सुप्रसिद्ध कपिलधारा तीर्थावर आले व तेथे बारा वर्षे त्यांनी तपश्चर्या केली.

त्यावेळी त्यांना रघुनाथदास या महंतांनी योगसिद्धी दिली. या योगसिद्धी नंतर ते महंताच्या आदेशानुसार नाशिकला आले व एका वटवृक्षाखाली राहू लागले. त्यावेळी नाशिकला विशाल संत मेळा भरला होता. त्या संत मेळाव्यात विदर्भातील लाड कारंजा या गावचे बाळशास्त्री गाडगे आले होते. त्यांची नजर तेजपुंज अशा बालक गजाननावर गेली आणि त्यांनी त्यांना आदरपूर्वक प्रार्थना करून लाड कारंजा या गावी आपल्या घरी आणले. तेथे बाल गजाननास बघण्यास व त्यांची पूजाअर्चा करण्यास गर्दी होऊ लागली व लोक त्यांना कपडे अलंकार वस्तू भेट देऊ लागले.

बाल गजानन या उपाधीला कंटाळून कपडे अलंकार सर्व तेथेच टाकून बाळशास्त्री गाडगे यांच्या घरून बग्गी जावरा या गावी मनीराम बाबांजवळ आले व चार-पाच दिवस येथे राहिले. गजानन महाराज मनीराम बाबांकडे आल्याची आठवण म्हणून मनीराम बाबांनी तिथे गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली. या दिवसात गजानन महाराज आणि मनीराम बाबा अध्यात्मिक चर्चा झाल्याचा उल्लेख आहे. यामध्ये मनिराम बाबांनी त्यांना अकोटला नरसिंग महाराजांकडे जाण्याची आठवण करून दिली. त्यानंतर गजानन महाराज अकोला नरसिंग महाराजांकडे आले व त्यांना भेटले.

दोघांनीही अंतर्ज्ञानाने परस्परांना ओळखले. गजानन महाराज नरसिंग महाराजांना म्हणाले की, मी आजपर्यंत अक्कलकोट स्वामी समर्थांचे जवळ होतो. त्यांच्या आज्ञेवरून आपल्याकडे आलो आहो. भेट झाल्यावर नरसिंग महाराजांनी आपण समाधी घेणार असल्याची गजानना सांगितले. त्यानंतर तू माझी क्रियाकर्म करून शेगावला भक्तांचा उद्धार करण्यात यावे असे सुचविले. नरसिंग महाराजांनी समाधी घेण्याअगोदर गजानन अष्टसिद्धी प्राप्ति शिकविली व आपल्या काही शक्ती त्यांच्यात समप्रेरित केल्यास अशा प्रकारे गजानन मानसिंग महाराजांच्या विनंतीवरून शेगावला आले.

श्रींचे मार्गदर्शन

गजानन महाराजांनी आपल्या भक्तजनांना बत्तीस वर्ष या परिसरातून मार्गदर्शन केले. चैतन्यमय देहाने सर्वत्र संचार केला. दिगंबर वृत्तीच्या या अवलिया गजाननांनी विविध चमत्कार करून लोकांना साक्षात्कार घडविला. त्यांनी लोकांना भक्ती मार्गाचे महत्त्व पटवून दिले. मानवी जीवनात संकट आल्यावर ईश्वरा वाचून कोणीही तारणार नाही. हे ईश्वरी तत्त्व जाण्यासाठी शास्त्रात कर्म भक्तियोग हे तीन मार्ग सांगितला आहे. या तिन्ही मार्गाचे बाह्य स्वरूप जरी भिन्न असले तरी फलप्राप्ती एकच आहे.

हे या संतांच्या शिकवणीतून आपल्याला दिसून येते. गजानन महाराज त्रीकालतज्ञ होते. त्यांना भूत, भविष्य, वर्तमान याविषयीचे ते अगोदरच जाणून घेत असत, कारण ते ईश्वर यांचे निस्सीम भक्त होते. यामुळेच महाराजांनी अनेक रंजले गांजलेल्यांना मार्गदर्शन केले. योग्य मार्ग दाखविला. “गण गण गणात बोते” हा त्यांचा आवडता मंत्र ज्याचा ते अखंड ते जप करित. किंबहुना त्यामुळेच त्यांनी गिनेगिने बुवा व गजानन महाराज अशी नावे पडली.

चमत्कार

श्री संत गजानन महाराज यांचे काही चमत्कार आपल्याला दिसून येतात. त्यांनी लोकांमधील अहंकाराची पुष्टी व्हावी म्हणून काही चमत्कार केले आहेत. श्री संत गजानन महाराज यांनी चिलमीजवळ केवळ गाडी धरतात चिलम पेटली. तसेच कोरड्या विहिरीत ही गजानन महाराजांनी पाणी उत्पन्न केलेले उसाचे प्रहार झेलूनही अंगावर कोठेही वळ उमटलेले नव्हते. जळत्या पलंगावर बसून नैन दहति पावक सिद्ध केले. गोविंद बुवा टाकळीकर यांचा घोडा गोगलगायी समान शहाणा केला.

गजानन महाराजांच्या दर्शन मात्रेने द्वाड गाय गरीब झाली. श्रीगजानन महाराजांनी कावळ्यांना येथेच्छ खाऊ देले व पुन्हा न येण्यास सांगितले. फक्त पितांबर आणि श्री गजानन महाराजांचा धावा करताच वाळलेल्या वृक्षाला पालवी फुटली. गजानन महाराजांच्या प्रसादाने महारोगी सुद्धा बरी झाली आहे. श्री गजानन महाराजांच्या कृपेने प्रत्यक्ष नर्मदा देवीने सर्वांचे रक्षण केले. श्रीगजानन महाराजांनी पंढरीस बापूं काळ्यास विठ्ठल स्वरूपात दर्शन दिले. अशाप्रकारे श्री संत गजानन महाराजांनी भक्तांना दर्शन दिले.

समाधी

दिनांक 8 सप्टेंबर 1910 रोजी श्री गजानन महाराज शेगाव येथे समाधिस्थ झाले. श्रीगजाननाच्या वास्तव्याने शेगाव अलौकिक चैतन्याचे प्रभावी संत पीठास बनले आहे. Sant Gajanan Maharaj “तुम्हाला आमची माहिती संत गजानन महाराजां विषयी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

Leave a Comment