Sant Gopabai information in Marathi language संत गोपाबाई यांची विहीर याविषयीच्या दंतकथा पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आहेत. त्यामध्ये किती सत्य आहे हे कोणास ठाऊक नाही, परंतु गोपाबाई ही संतरुपी सर्वांच्या लक्षात सदैव आहे. मंगळवेढा तालुक्यातील ही गोष्ट आहे.
Sant Gopabai information in Marathi language | संत गोपाबाई
मंगळवेढा म्हणजे संतांचे माहेरघर पंढरपुर पासून 21 किलोमीटर असणारे या गावाने महाराष्ट्राला व कर्नाटकला नवचैतन्य प्राप्त करून दिले. आज या संतांचे अभंग, काव्य वाचलं जातं किंवा नाही हा अवघड प्रश्न असला तरी गरज पडली की, काळाला सुद्धा इतिहासाची पाने चालाविच लागतात.
जीवनाच्या सात्विकतेचा शोध घेतला जातो. एक हजार वर्षांपूर्वी कल्याणीचे चालुक्य घराण्यातील सम्राटाचे राज्य सन 1060 ते 1121 पर्यंत होते. इथे वेगवेगळ्या पंथाची लोक राहत होते.
संत दामाजी, संत कान्होपात्रा, संत चोखामेळा, संत गोपाबाई, स्वामी समर्थ, संत बसवेश्वर महाराज, बाबा महाराज आर्वीकर, संत बगाडे महाराज, मारोळी संत सिताराम महाराज, माचनुर असे अनेक थोर संत येथे होऊन गेले आहेत आणि विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा चरणस्पर्श संतभूमीला लाभले आहेत.
शिवाजी महाराजांनी मंगळवेढ्यात चार दिवस मुक्काम केला होता. संत गोपाबाई या समकालीन संत आहेत. मंगळवेढ्यात गोपाबाईची विहीर म्हणून अतिप्राचीन काळापासून खूपच प्रसिद्ध आहे. मंगळवेढ्याच्या पूर्वेला एक किलोमीटर अंतरावर काळ्या रानात ती विहीर आहे. तिचे बांधकाम चांगल्या परिस्थितीत आहे.
मंगळवेढे हा गावाला नेहमी दुष्काळी परिस्थितीने ग्रासला असायचा. पाऊस वेळेवर पडत नव्हता त्यामुळे लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. सर्वसामान्य जनता दुष्काळाच्या खाईत अतिशय त्रासून जायची. त्या वेळी मंगळवेढ्यास कासार कुटुंब धनिक होते. त्यांना लोकांचे हाल पहावत नव्हते.
त्यांनी मनात दृढनिश्चय करून कार्यालयात विहीर काढण्याचे ठरविले परंतु विहिरीचे पाणी लागेल का? या भावनेने ते निराश रहायचे व त्यामुळे मनात इच्छा असून सुद्धा मार्ग सुचत नव्हता. ते नेहमी चिंताग्रस्त असायचे अशा प्रसंगी मंगळवेढास तेजस्वी तपस्वी साधू आले. महाराजांची सामर्थ्याची प्रसन्न मुद्रा पाहून लोक त्यांना साष्टांग दंडवत घालत.
साधुमहाराज आपल्या मधुर वाणीने लोकांना दिलासा देत व लोकांच्या अडीअडचणी दूर करून त्यांना सन्मार्ग दाखवत. अशा वेळेस हे धनीकुटुंब सुद्धा त्यांच्याकडे गेले. मंगळवेढ्यातील जनतेचे पाण्यावाचून होणारे हाल त्रास त्यांना साधू महाराजांना सांगितला. महाराज अंतर्ज्ञानी होते.
त्यांनी त्या शेतकऱ्यास विहीर काढण्याची जागा दाखवली अशी पण एक दंतकथा आहे की, या महाराजाने त्या शेतकऱ्याला विहिरीला पाणी लागण्यासाठी त्या शेतकऱ्याच्या बाळांतीन सुनेस विहिरीत जीवदान द्यावे लागले असेही सांगितले जाते. परंतु त्या कुटुंबाला चिंता वाटू लागली की, काय करावे त्यांनी आपली सून गोपाबाई हीला सर्व वृत्तांत कथन केला. तेव्हा गोपाबाईने त्यांना तुम्ही चिंता करू नका? आम्ही या जनतेच्या कल्याणासाठी जीवदान देण्यास तयार आहे. तुम्ही विहीर काढून माझी राहण्याची व्यवस्था करा असे सांगितले.
काही दिवसात विहीर खोदली गेली व त्या विहिरीत गोपाबाईला राहण्यासाठी स्वतंत्र खोली पण बांधली गेली. त्यात संसाराचे सर्व साहित्य ठेवले गेले आणि अशा या खोलीत गुपीबाई जाऊन राहिली व नंतर त्या विहिरीला खूप पाणी लागले. पण त्यासाठी गोपाबाईला आपले जीवदान द्यावे लागले.
अलीकडच्या काळात जेव्हा गोपाबाईच्या विहिरीचे पाणी दुष्काळामुळे पूर्ण आटले तेव्हा मंगळवेढ्यातील लोकांनी गोपाबाईची ती खोली पाण्यासाठी गर्दी केली. ती खोली जशीच्या तशीच त्यांना दिसून आली. गोपाबाई या दिसल्या नाही. तेव्हापासून ती विहीर गोपाबाई ची विहीर या नावाने ओळखले जाते.
येथील भौगोलिक विविधता आढळते. मंगळवेढ्यातील सतत दुष्काळाचे चटके सहन करायला लागले आहेत. मंगळवेढ्याची जमीन ही बहुतेक करून जिराईत आहे. त्यामूळे त्यांना पावसाच्या पाण्यावरच पिके घ्यावी लागतात. प्रामुख्याने ज्वारी, बाजरी, करडई, हरभरा, सुर्यफूल ही पिके मुख्यता घेतली जातात. ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. मंगळवेढा तालुका ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे. मंगळवेढ्याच्या मालदांडी ज्वारीस जी आय मानांकन प्राप्त झाले आहे. तसेच मंगळवेढा तालुका हा ज्वारीचे कोठार असलेल्या ज्वारी वर संशोधन करणारे केंद्र आहे.
हिंदू-मुस्लीम यांचे ऐक्य
मंगळवेढा या गावात सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. प्रत्येक जण आपापला सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या मारोळी या गावांमधील दर्ग्याला मुस्लिमांबरोबर हिंदू भाविकही जातात तसेच हिंदूच्या सर्व सणांमध्ये मुस्लिम बांधव आनंदाने सहभाग घेतात. नवरात्र महोत्सव मंगळवेढ्यात अतिशय आनंदाने साजरा केला जातो. जवळजवळ पंचवीस नवरात्र मंडळ हे या गावात आहेत. डेकोरेशन, हालते देखावे, सजीव देखावे पाहण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील लोक येतात. या तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी या गावांमध्ये सर्वधर्मीय दुर्गा माता नवरात्र महोत्सव तरुण मंडळ आहेत. या मंडळात सर्व समाजाचे लोक एकत्रितपणे सण साजरे करतात. संत दामाजीपंत हे या गावचे रहिवासी होते.
शैक्षणिक संस्था
मंगळवेढ्यात इंग्लिश स्कुल दामाजी हायस्कूल, जवाहरलाल हायस्कूल, ताराबाई गर्ल्स हायस्कूल नूतन विद्यालय इत्यादी प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. तर दामाजी महाविद्यालय, दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालय आहेत. मंगळवेढे नगरीने अनेक गुणवंत विद्यार्थी दिले आहेत. त्यातील अनेक विद्यार्थी विदेशात वास्तव्य करीत आहेत. मंगळवेढ्यात सन 2011 पासून सप्तर्षी प्रकाशन संस्था कार्यरत आहे. ही संस्था अनेक विषयावरील मराठी हिंदी तसेच इंग्रजी पुस्तके प्रकाशित करत आलेली आहे. सप्तर्षी सामाजिक आणि शैक्षणिक संस्था मंगळवेढा ही आहे.
प्रशासन
मंगळवेढा हे जरी निमशहरी असले तरी फार पूर्वीपासूनच हे एक अतिशय महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे मंगळवेढ्याला नगरपरिषद आहेत. शहरांप्रमाणे या तालुक्यातील माचणूर सिद्धनकेरी, मारवाडी, लक्ष्मी दहिवडी या ठिकाणांना सुद्धा धार्मिक तत्त्व आहे. मंगळवेढा तालुक्यात पंचायत समिती कृषी उत्पन्न बाजार समिती नगर परिषद कार्यालय आहेत.
मंगळवेढा गावातील गोपाबाई विहिरी जर तुम्हाला प्रत्यक्षपणे अनुभवायची असेल तर तुम्ही नक्कीच मंगळवेढा या ठिकाणी येऊन त्या गावाला आपली भेट द्या व गोपाबाईच्या इतिहासाची जाणीव करून घ्या.
Gopa Bhai information in Marathi language. गोपाबाई ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करू नक्की सांगा.