Sant gora kumbhar information in Marathi language | संत गोरा कुंभार

Sant gora kumbhar information in Marathi language. संत गोरा कुंभार हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत आहेत. ते आपले दैनंदिन गरजा भागवण्यासाठी कष्ट करत, काम करीत असत. काम करित असताना सतत पांडुरंगाचे नाम आपल्या मुखी घेत असत. हरीनामा मध्ये एवढे दंग व्हायचे की, त्यांना आपण काय करतो हे सुद्धा भान नसायचे. तर चला पाहूया संत गोरा कुंभार यांच्या विषयी माहिती.

Sant gora kumbhar information in Marathi language संत गोरा कुंभार

तेर गावामध्ये गोरोबाकाका या नावाचा एक काळेश्वर भक्त राहत होता. त्यांचे नाव मधुवबुवा होते. त्यांच्या घराण्याची परंपरा धार्मिक वृत्तीची व सदाचाराची होती. तेर येथील काळेश्वर हे त्यांचे ग्रामदैवत होते व त्या ग्रामदैवताची उपासक गोरोबा काका होते. दोघेही नवरा-बायको कुंभारकाम व कबाळ-कष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असत. यांच्या विषयी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे की, माधवबुवा आणि रखमाई यांना आठ पुत्र झाले होते. परंतु ते आठ ही पुत्र मरण पावले व त्या आठही पुत्रांना काळेश्वर मंदिराजवळील स्मशानभूमीतील गोरीत पुरवले होते. ते आठ ही मुले जिवंत कशी झाली ही ती गोष्ट आहे.

संत गोरोबाकाका चरित्रामध्ये महादेव बाळाजी कुंभार यांनी सांगितले आहे की, ते म्हणतात, श्री माधव बुवा तेर येथील काळेश्वराची उपासना करीत होते. त्यांना आठ पुत्र होते. त्यांना आठ ही पुत्र झाले परंतु ते सर्व एका मागून एक निवर्तले. पुढे कालांतराने परमात्मा पांडुरंग ब्राह्मणाचा वेष घेऊन, त्यांचे घरी आले. तेव्हा त्यांनी खिन्न मुद्रा पाहून देवांनी व त्यांना विचारले की, तुम्ही दु:खी का? मधुबुवांनी सांगितले की, आमची ही मुले देवाने नेले म्हणून दुःखी आहोत.

नंतर देवाने आठही मुलांना जेथे मूठमाती दिली आहे, ती जागा दाखवयाला सांगितले. माधवबुवांनी त्यांना काळेश्वर मंदिराजवळील मशानभुमीत नेले. देवास आठ ही मुले कोठे पुरवली ती जागा दाखवली. देवांनी सर्व मुलांची प्रेत उकरण्यास सांगितले. माधवबुवांनी त्याचप्रमाणे आठही मुलांचे प्रेते बाहेर काढली. देवाने पहिले सात मुलांना आपल्या हाताच्या स्पर्शाने जिवंत केले. नंतर त्यांना स्वर्गात पाठवले आणि आठवा मुलगा जिवंत केला, तोही स्वर्गाच्या मार्गांनी लागला तेव्हा देवाने त्याला जाऊ दिले नाही. भगवंताने त्याला आपल्या हातात घेऊन माधव बुवा व रखुमाई यांच्या स्वाधीन केले. देव म्हणाले तुला

गोरीतून काढले म्हणून तुझे नाव गोरोबा ठेवले. असा हा एक चमत्कार या अख्यायिका मागे आहे. संत गोरा कुंभार हे नामदेव महाराज , संत ज्ञानेश्वर, महाराज यांच्या काळातील आहे असे म्हटले जाते व त्यांचा जन्म शके 1189 इ.स.वी. 1267 साली झाला. संत तुकाराम महाराजांप्रमाणेच गोरा कुंभार यांनी अनेक अभंग लिहीले. संत गोराकुंभार हे श्री विठ्ठल, पांडुरंगाचे मोठे भक्त होते.

गोरा कुंभार यांचा दिनचर्या

गोरोबांच्या मनावर लहानपणापासूनच भगवद्गीतेचे संस्कार झाले होते. गोरोबांना लिहायला वाचायला येत होते. ज्ञानदेव, नामदेव यांच्या पूर्वकाळात पंढरपूर हे शिव उपासकांचे म्हणजेच शिवभक्तांचे केंद्र होते. अनेक शिवभक्त त्या ठिकाणी आपली साधना करीत होते, ते भक्त होते. योगी होते सिद्ध साधकही होते. गोरबा जेव्हा जेव्हा पंढरपूरला जातात, तेव्हा त्यांना या सिद्ध पुरुषांचे दर्शन होत असे. त्यांच्या योग साधनेच त्यांना कौतुक वाटत होतं. असं करता करता गोरोबांचा प्रपंच धार्मिक झाला होता. गोरोबा सकाळी उठून आंघोळ करून देवाची पूजा करत, नंतर नामस्मरण करणे आणि पांडुरंगाचं रूप आपल्या मनात साठवून त्याला मनीमानसी मुरवून घ्यावं आणि मग निहारे करून कामाला लागावं असं त्यांचा दिनक्रम होता.

संत गोरोबा हे दुपारचे जेवण झाल्यावर जरा विश्रांती घेत असत. ही विश्रांती म्हणजे झोप नव्हे तर घराच्या ओसरीवरच्या खांबाला टेकून देवाचे नामस्मरण करीत अभंग म्हणीत विश्रांती घेत असत. त्यामुळे त्यांच्या चित्ताला एकसमान समाधानही मिळत असे.

त्यानंतर पुन्हा संत गोरोबा आपल्या कामाला लागत असत. दिवस मावळेपर्यंत हे काम करत असत. दिवस मावळला नंतर हात पाय धुऊन पुन्हा घराच्या ओसरीवर एकतारीवर चिपड्याच्या साथीने भजन सुरू होते आणि रात्रीच्या जेवणाचे वेळी ते थांबत असे. रात्रीचे जेवण झाल्यानंतर पुन्हा भजन सुरू होई. शेजारपाजारचे मंडळीही त्यात सामील होत असत आणि नंतर परमेश्वराचे नामस्मरण करीत सर्व झोपी जात असत.

 

तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम |
देह प्रपंचाचा दास सुखे करी काम ||

 

सर्व संतमंडळी मध्ये संत गोरोबा हे वयाने मोठे असल्यामुळे त्यांना गोरोबाकाका असे म्हणत. त्यामुळे सर्व संतांनी त्यांना काका ही उपाधी बहाल केली होती. गोरोबा काका हे विरागी पुरुष म्हणून ओळखले गेले, निर्गुण निराकार परब्रम्हाचे लौकिक रूप म्हणजे संत गोरा कुंभार. ते आपला स्वतःचा परंपरागत कुंभाराचा व्यवसाय करीत व आपला प्रपंच्याचा सांभाळत करीत असत.

आलेला दिवस परमेश्वराला स्मरून सार्थकी लावणारा खरा वारकरी असल्याची त्यांच संत गोरा कुंभार हे आपलं नित्यकर्म करत असतांना देखील विठ्ठल नामात तल्लीन असत. कुंभारकाम करत असतांना पांडुरंगाचे गुणगान सतत त्यांच्या मुखी असायचे.

एकदा त्यांची पत्नी पाणी आणायला गेली असतांना, आपल्या रांगणाऱ्या मुलाला अंगणात ठेऊन गेली. त्यावेळी अंगणात गोरा कुंभार माती तुडवीत होते. नाम कीर्तनात ते इतके तल्लीन झाले की, रांगणारे बाळ त्यांच्याकडे येत असल्याचे भान देखील त्यांना राहिले नाही. बाळ जवळ येऊन मातीच्या आळ्यात पडले आणि गोरा कुंभार यांच्या पायाखाली तुडविले गेले. याची जाणीव देखील त्यांना राहीली नाही.

विठ्ठलाच्या भजनात तल्लीन झालेल्या गोरा कुंभार यांना तुडवितांना मूल रडत असल्याचे देखील लक्षात आले नाही. पाणी घेऊन आलेल्या त्यांच्या पत्नीने अंगणात आपल्या चिमुकल्याला शोधले पण तो सापडला नाही. तिचे लक्ष गोरा कुंभार तुडवीत असलेल्या मातीकडे गेले, ती माती रक्ताने लाल झालेली तिला दिसली आणि तिने हंबरडा फोडला, आकांत केला. तिच्यावर आणि गोरा कुंभार यांच्यावर आभाळ कोसळले. प्रायश्चित म्हणून गोरा कुंभार यांनी आपले दोन्ही हात तोडून घेतले.

हात तुटल्याने त्यांचा व्यवसाय देखील बसला. असं म्हणतात की, स्वतः विठ्ठल -रुखमाई त्यांच्या घरी येऊन राहू लागले आणि त्यांचा व्यवसाय पुन्हा बहरला. पुढे आषाढी वारीच्या निमित्ताने संत मंडळी पंढरपुरास निघाली, वाटेत संत ज्ञानेश्वर आणि नामदेवांनी तेरढोकी येथून संत गोरा कुंभार आणि त्यांच्या पत्नीला देखील सोबत घेतलं. गरुड पारावर संत नामदेव कीर्तनाला उभे राहीले. संत ज्ञानेश्वरांसह सकल संत मंडळी कीर्तन ऐकावयास बसली. संत गोरा कुंभार आपल्या पत्नीसह कीर्तनात बसले होते.

त्या दरम्यान वारकरी पांडुरंगाचा नामगजर करीत हात वर करून टाळ्या वाजवू लागले. गोरा कुंभार यांनी देखील अभावितपणे आपले थिटे हात उचलले, त्याक्षणी त्या थोट्या हातांना हात फुटले. सर्वांना अतिशय आनंद झाला. संत मंडळीनी विठ्ठलाचा जयजयकार केला. गोरा कुंभार यांची पत्नी कीर्तनात बसली होती. आपल्या पतीची तुटलेले हात, आधीसारखे झाल्याचे पाहून तिला आनंद झाला, तिने चालू असलेल्या कीर्तनात पांडुरंगाला प्रार्थना केली .

‘पांडुरंगा माझे मूल पतीच्या पायी तुडविले गेले, त्यामुळे आम्ही फार दुःखी-कष्टी आहोत. तुला माझी करुणा येऊ दे, माझे मूल मला परत दे‘ ती पुन्हा पुन्हा पुकारा करू लागली आणि खरंच आश्चर्य! त्या कीर्तनात चिखलात तुडविले गेलेले तिचे बाळ रांगत-रांगत तिच्याकडे येत असल्याचे तिने पाहीले. आनंदाच्या भरात तिनं बाळाला कडेवर उचललं. त्यांना आनंद झाला व सर्वांनी विठुरायाच्या नावाचा जयघोष केला.

गोरा कुंभार यांची समाधी

20 एप्रिल 1317 या दिवशी संत गोरा कुंभार यांनी समाधी घेतली. त्यांची समाधी मंदिर उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरढोकी या गावी आहे. त्या ठिकाणी असलेलं त्याचं घर आणि मुल तुडविलेली जागा आज देखील भाविक मोठ्या भक्तिभावाने पाहतात. Sant Gora Kumbhar information in Marathi language. संत गोरा कुंभार ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment