Sant janabai information in Marathi language | संत जनाबाई

Sant janabai information in Marathi language संत जनाबाईसाठी साक्षात विठ्ठल प्रकट होऊन तिच्यासाठी दळण दळीत असे. हे आपण ऐकलं असेल अशा प्रसिद्ध कवयित्री संत जनाबाई यांची संत महिमा आपण पाहूया.

जन्म व बालपण

संत जनाबाई या संत नामदेव यांच्या काळातील संत कवी होत्या. त्यांचा जन्म अंदाजे सन 1258 साली परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरावरील गंगाखेड या गावात झाला. तिच्या वडिलांचे नाव दमा व आईचे नाव करुंड बाई असे होते. उत्कट भक्ती भावाची साक्ष देणाऱ्या भक्त अशा ह्या संत जनाबाई होत्या. संत जनाबाईच्या वडिलांनी जनाबाईला नामदेवाकडे वडील दामाशेटी शिंपी यांच्याकडे नोकरीसाठी पाठवले. तेव्हापासून त्या संत नामदेव यांच्या कुटुंबीयांतील एक घटक बनल्या आणि त्या स्वतःला नामयाची दासी म्हणून घेत असत.

जीवन

संत जनाबाई ह्या अतिशय सामान्य स्त्री अशी त्यांची ओळख होती. पण आयुष्यभर मोलकरणीचे काम करणाऱ्या दासीन एक असामान्य काम केलं ते म्हणजे तिने काळजाचा ठाव ठेवणारे अभंग लिहिले आणि मराठवाड्यातल्या गंगाखेडची जनी संत जनाबाई बनल्या. संत जनाबाईच्या एका अभंगातील “माझ्या वडिलांचे दैवत तो हा पंढरीनाथ” यावरून स्पष्ट होते की, त्यांचे वडील हे देखील वारकरी आहेत. तसेच त्यांच्या आईसुद्धा भगवद्भक्त होत्या. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना, कांडताना संत जनाबाई यांच्या ओव्या गात असतात. संत जनाबाई यांनी याच चुलीवर भाकऱ्या करून विठ्ठलाला जेऊ घातले होते. या भक्तीरसपूर्ण संबंधाची ग्वाही देणाऱ्या मुलीला भावपूर्ण नमस्कार करतात. जनीची भक्ती म्हणजे रोजचं काम करता करता देवाचं नाव घेणं, ” दळीता काढता तुझं गाईन अनंता” हे तत्व तत्व ज्ञान खेडोपाड्यातील अडाणी माणसानाही आपलं वाटतं. दाखवलेला लेकुरवाळा विठुराया संसारात रमलेल्या मूलबाळ सांभाळणाऱ्या आया बाईंना नेहमी भावलेला आहे. नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे. जनाबाईचा अभंग वारकरी गात पंढरीची वाट चालतात.

अभंग

महाराष्ट्राच्या इतिहासात शेकडो वर्षांपासून लोकांच्या मुखात संतांचे दोन अभंग खडी साखरेप्रमाणे लोळतायत आणि ते म्हणजे संत तुकोबाराय आणि संत जनाबाई. यांचे अभंग सावळ्या विठाईच्या नावाने टाहो फोडते. वाट पाहून पांडुरंगाच्या देवळासमोरच झोपडीत राहणार्‍या गरीब जनाबाईने देवाच्या गळ्यातले पदक चोरले असा आरोप तिच्यावर होतो. मग आपण सोन्याची नव्हे तर विठूरायाची चोरी केली आणि त्याला रूदयात बंदिस्त केल्याचे “धरीला पंढरीचा चोर” या अभंगातून ती सांगते, “माझे अचडे बचडे छकुडे ग राधे रुपडे” यासारखे तिची श्रीविठ्ठलाच्या बाळ रूपाचे वात्सल्याने ओतप्रोत भरलेले अभंगरचना मनाला भावून घेणारे आहेत.

संत जनाबाई च्या पाउलखुणा

मराठवाड्यातल्या गंगाखेडची जनी संत जनाबाई ह्या अतिशय सामान्य स्त्री होत्या. पण त्यांनी आयुष्यभर मोलकरिन म्हणून कामसुद्धा केले आणि अशाच सामान्य स्त्रीने असामान्य काम करून दाखवलं. तिनं काळजाचा ठाव घेणारी अभंग रचना केली आणि जनी पासून संत जनाबाई बनली. तत्कालीन खालच्या सामाजिक स्तरातूनवर उठून स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करणाऱ्या संत जनाबाईची ओळख आहे. संत जनाबाई ह्या विठूरायाच्या निस्सिम भक्त होत्या.

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासमोर त्यांचा वाडा असल्यामुळे जनाबाईला विठुरायाचे दर्शन रोज घडायचं. त्यातच नामदेवाच्या घरी विठू भक्तीचा सातत्याने गजर होत असल्याने त्यांच्या जीवनात पंढरपूर, पंढरीनाथा नामदेव यांना विशेष स्थान होतं. नामदेवांच्या सहवासात त्यांनी पांडुरंगाच्या भक्तीचा ध्यास घेतला. ते जनाबाईचे पारमार्थिक गुरू बनले. त्यामुळेच त्यांना नामयाची दासी म्हणून ओळखले जाते. जनाबाईच्या मनातील श्रेष्ठ गुरु भावही तिची शक्ती होती.

आयुष्यभर नामदेवाच्या भक्ती मार्गाच्या पाहुण्यांवर प्रवास करणारे संत जनाबाई अखेरच्या क्षणी देखिल गुरुची सावली बनून राहिल्यात. आषाढ महिन्यात कृष्णपक्ष त्रयोदशीच्या मुहूर्तावर नामदेवांनी देह ठेवला. संत जनाबाई देखील त्याच वेळी नामाच्या पायरीवर विसावून पांडुरंगात विलीन झाल्या. अभंग गवळणी ओव्यांच्या स्वरूपात आजही आपल्याला संत जनाबाई खेड्यातील घराघरात जागती आहे. लाडक्या जनाईच्या आठवणी त्याच्या भक्तांनी जीवापाड जपून ठेवले आहेत.

संत जनाबाई या नेहमी काबाडकष्ट करत आलेले आहेत. पण तिला या कामांमध्ये मदत केली ते प्रत्यक्ष विठुरायांनी. जातं, मडकी, चूल असा सगळा जनीचा संसारच पंढरपूरकरांनी जपून ठेवला आहे. तिचा हा संसार पाहिल्याशिवाय वारकरी पंढरपुरातून परत येत नाही. संत जनाबाई यांचे अभंग खूप लोकप्रिय झाले. दूरदूर पर्यंत त्यांची ख्याती पोहोचली आणि तिच्या या ख्याती कबीरांच्याकानी गेले. इतके सुंदर अभंग असणारी ही स्त्री आहे तरी कोण या उत्सुकतेपोटी संत कबीर जनाबाईच्या भेटीसाठी पंढरीला आले.

तिथे आल्यावर त्यांना कळाले कि, नामदेवाच्या घरी कामास आहे. तिथे गेल्यावर त्यांना कळले की, गोपाळपूरास गौऱ्या थापायला गेली आहे. तिला येण्यास काही वेळ लागेल. दासीचे घरकाम करणारी, गौऱ्या थापणारी बाई अभंग रचते. याचे त्यांना फार आश्चर्य वाटले आणि तिची वाट बघत तिथे न थांबता ते गोपाळपूरास गेले. तिथे नदीकाठावर दोन स्त्रिया एकमेकांशी भांडत असल्याचे दृश्य त्यांना दिसले. त्या दोघींच्यामध्ये गौऱ्याचा मोठा ढीग होता. गौऱ्या रचल्याचा एकमेकींवर त्या आरोप करीत होत्या. कबीर काही वेळ त्यांचे भांडण बघीत तिथेच उभे राहिले.

नंतर मग काही वेळाने त्यांनी त्या दोघींना विचारले की, इथे जनाबाई नावाची कोणी स्त्री आहे का? त्यांच्या या प्रश्नाचे दोघींपैकी एक स्त्री उसळून बोलली हीच की जनी! चोरटी, माझ्या गौऱ्या चोरून माझ्याशी भांडण करते, वरतोंड करून मलाच शहाणपण शिकवते. त्या बाईचे शब्द ऐकताच संत कबीर यांना थोडासा धक्का बसला. कारण त्यांच्या मनात जनाईचे वेगळेच चित्र उभे राहिले होते. तरीही त्यांचा त्या बाईच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही. ते तिथेच उभे राहिले आणि त्यांचे भांडण पाहत होते. त्यांनी न राहवून दुसरीला विचारले, की तू जनी आहे का?

ह्या वरती हातातल्या गौऱ्या खाली टाकून जनाबाई बोलती झाली. होय, बाबा मीच जनी! तुला काही त्रास आहे का माझा? तिच्या या उत्तराने गोंधळून गेलेले कबीर आपली काहीतरी चूक झाली. असा विचार करून तिथून पाय काढता घेण्याच्या मनस्थितीत होते. मात्र जनाईच्या होकाराने दुसऱ्या बाईला अजून बळ आले. ती कबीर यांना म्हणाली, हे बघा तुम्ही कोण आहेसा, मला ठाऊक नाही. पण तुम्ही एक काम करा. आमच्या दोघींच्या गौऱ्या आहेत.

तुम्ही आमच्या दोघींच्याही गौऱ्या निवडून वेचून द्या. तुम्ही एवढं काम करा आणि मग घेऊन जावा. आता गोऱ्या सारख्या दिसतात. शेणाच्या गोल आकाराच्या त्या गौऱ्या कुठली कोणाची गोरी कसं ठरवणार? याचं कोडं पडलं. कबीर विचारत पडलेले बघून जनाबाई म्हणाली त्यात काय इतकं विचार करायचा? अगदी सोपा काम आहे.

आता कबीर जी चकीत झाले होते. सारख्या दिसणाऱ्या शेणाच्या गौऱ्या कुठली गौरी कुणाची आहे. हे ओळखता येणं शक्य नव्हतं. मात्र जनी म्हणते की सोपा आहे. हे कसं काय सोपे असू शकतो किंवा तिच्याकडे या समस्येचं काय उत्तर आहे. हे ऐकण्याकरिता कबीरजी थोडे आतुर झाले. याची आतुरता त्यांच्या चेहर्‍यावर झळकली. कबीरांच्या चेहेर्‍यावरची उत्सूकता बघून जनाई हसून म्हणाली. अहो, महाराज हे अगदी सोप्प काम आहे. सर्व गौऱ्या एक ठिकाणी करा आणि त्यातल्या प्रत्येक गौरीला कानी लावा.

ज्या गौरीतून विठ्ठल-विठ्ठल आवाज येईल. ती गौरी माझी. जिच्यातून आवाज येणार नाही, ती गौरी हिची. कबीरजींचा चेहरा एकदम खुलून गेला. कबीरजी पुढे गेले आणि त्यांनी त्या भागातील दोन गौर्या उचलल्या कानी लावल्या आणि काय आश्चर्य त्या गौऱ्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता. आपण इथे येऊन काही चूक केली नाही. आपण एक महान कवयित्रीला भेटत आहोत. तिच्या विचारात देव वसतो आहे. हे त्यांच्या लक्षात आलं. कबीरांनी साऱ्या गौर्याची वाटणी केली. त्या बाईच्या काही मोजक्याच गौऱ्या होत्या. त्या बहुतांश गौऱ्या जनाबाईच्या होत्या. जनाबाईच्या गौऱ्याच्या ढिगावर त्या बाईने आपल्या काही गौऱ्या लावून तो ढीग आपलाच असल्याची खोटी बातमी केली होती. अन वरून जनाबाईला खोटे ठरवत होते.

गौऱ्यांची वाटणी झाल्यावर कबीरांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते? जनाबाईंनी त्यांच्या मनात शंका ओळखली आणि म्हणाली. या गौर्‍यातून हा आवाज कसा आला, याचा तुम्हाला प्रश्न पडलाय का? एकदम साधी गोष्ट आहे. मी ह्या गौऱ्या थापत असताना, विठ्ठलाचे नाव घेत होते. माझ्या ध्यानीमनी पांडुरंग असतो. तोच या गौऱ्यात सुद्धा असतो की, कबीर चकित होऊन जनाबाईकडे पाहत राहिले आणि मग त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. जनाबाई त्यांना आपल्या घरी घेऊन गेल्या. एकाग्रचित्ताने केलेल्या नामस्मरणात ताकद असते, हे सांगणारी ही सत्यघटना न समजता केवळ एक अख्यायिका असावी, असा जरी विचार केला तरी यातील भावार्थ श्रेष्ठ आणि दीर्घकालीन असाच आहे.
भक्ती कशी असावी याचे नियम नाहीत मात्र ती मनापासून असावी लागते.

Sant Janabai information in Marathi language. संत जनाबाई माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment