Sant Narhari Sonar information in Marathi languageसंत नरहरी सोनार हे वारकरी संप्रदायातील एक संत होते. सुरुवातीला ते केवळ शिवशंकराची आराधना करीत असत. रोज सकाळी उठल्यावर पूजा व ज्योतिर्लिंगावर बेलपत्रे वाहत असत. ते कट्टर शिवभक्त असल्याने दुसऱ्या देवावर त्यांची फारशी श्रद्धा नव्हती यामुळे काही जणांना त्यांच्या या कृतीचा रागही येत असे. वारकरी संप्रदायामध्ये विविध जाती जमातीच्या संस्थांनी एकत्र येऊन वारकरी संप्रदाय वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये अठरा पगड जातीच्या जमातीच्या संतांनी हा वारसा पुढे नेण्याचं काम केला आहे. त्याच प्रमाणे संत नरहरी सोनार यांनी आपल्या महाराष्ट्रभर उमटविला होता. त्यांच्याविषयी आपण माहिती पाहूया.
Sant Narhari Sonar information in Marathi language संत नरहरी सोनार
संत नरहरी सोनार हे जातीने सोनार होते. 1400 वर्षांचे दीर्घायुष्य लाभलेले महान योगी चांगदेव महाराज यांनी नरहरी महाराज यांना आशीर्वाद दिला होता की, हा मुलगा हरी हराचा समन्वय साधणारा थोर संत होईल. याला दीर्घायुष्य प्राप्त होईल व तो शिवभक्त असला तरी विठ्ठलाचा भक्त म्हणून त्रिखंडात प्रसिद्ध राहील. वयाच्या अठरा ते वीस वर्षा दरम्यान नरहरी सोनार यांचा विवाह गंगा नावाच्या संस्कारी मुलीशी झाला. ती ही ईश्वरभक्त होती.
ते वडिलोपार्जित सोन्याचा व्यवसाय करीत असल्यामुळे त्यांचे आडनाव सोनार असे झाले. त्यांचा जन्म हरिहराचा वाद मिटवण्यासाठी झाला. लहानपणापासून नरहरी यांच्यावर घरात असलेल्या शिवभक्ती संस्कार होऊ लागले होते. त्यांच्या वागण्याबोलण्यातून त्यांच्या अंगी असणाऱ्या संतापाची लक्षणे स्पष्ट दिसून येत होते. त्यांना कुशाग्र बुद्धी असल्यामुळे बालपणीच त्यांना अनेक शिव स्तोत्रे पाठ होती.
रोज शंकराच्या मंदिरात जाऊन शंकराची पूजा पाठ करण्यात त्यांना आनंद वाटत होता आणि तेही मनोभावाने शिवभक्ती करू लागले व लहान वयातच ते थोर शिवभक्त झाले. संत नरहरी महाराजांच्या वयाच्या सतराव्या वर्षी नरहरी महाराजांचा यज्ञ पवित्र उपनयन संस्कार संपन्न झाला. नाथ संप्रदायातील गहिनीनाथ महाराज हे नरहरींना गुरू म्हणून लाभले.
त्यांच्याकडून नरहरी महाराजांचा उपदेश व नाथ संप्रदायाची दीक्षा गायत्री मंत्र प्राप्त झाला. नरहरी मोठे होऊ लागले तसतसे त्यांनी शिवभक्ती वर आधारलेले सर्व ग्रंथ वाचून काढले. तेव्हा पासून शिव-पार्वतीचे महत्त्व त्यांच्या नजरेत वाढू लागले. त्यांची शंकरावर निस्सीम श्रद्धा होती. त्यांनी आपला ठसा महाराष्ट्रभर उमटविला होता त्यांचे अंतकरण म्हणजे शिवमंदिर जणू तेथे शिवपार्वती विराजमान आहेत आणि ते इतर देवतांचे दर्शन घेण्यासाठी जात नसत.
नरहरी महाराजांच्या घराण्याचे मूळ पुरुष रामचंद्र सदाशिव सोनार होते असे म्हटले जाते. संत नरहरी सोनार यांचे मूळ आडनाव महामुनी, गोत्र सनातन शाखा यजुर्वेद विश्वब्राह्मण असून त्यांची समाधी पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरासमोर आहे. त्यांना एकदा विठ्ठल आणि शिव एकच आहेत असा साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपला जीवनमार्ग विठ्ठलमय करून टाकला रामचन्द्रदास कृष्णदास हरिप्रसाद मुकुंदराज मुरारी अच्यूत आणि नरहरी अशी त्यांची वंशपरंपरा सांगण्यात येते.
त्यांचा जन्म सन 1313 च्या आसपास पंढरपूर येथे झाला. संत नरहरी सोनार यांची जयंती श्रावण शुद्ध शुक्ल त्रयोदशी या दिवशी आणि पुण्यतिथी माग वैद्य तृतीयेला असते. नरहरीच्या पत्नीचे नाव गंगा व मुलाचे नाव नारायण व मालू असे होते.
नरहरी सोनार हरीचा दास |
भजन करी रात्र दिवस ||
सवंगडी निवृत्ती सोपान मुक्ताई |
शिव आणि विष्णू एकची प्रतिमा ||
देह जन्मला व्यर्थ |
झाले पापाचे पर्वत ||
दानधर्म नाही केला शेवटी |
जन्म व्यर्थ गेला अवघा क्षणभंगुर ||
दिसे स्वप्न नरहरी म्हणे शेवटी |
संगे न येईल लंगोटी ||
नरहरी सोनार यांची शिवभक्ती
संत नरहरी सोनार हे शिवभक्त होते. त्यांच्या विषयी एक चमत्कार घडलेला आहे. पंढरपुरातील संत नरहरी सोनार यांनी आपल्या भक्तीचा ठसा महाराष्ट्रभर उमटवला होता. संत नरहरी सोनार यांचा व्यवसाय दागिने बनविण्याचा होता. त्यांची कलाकुसर त्यावेळेस चांगली प्रसिद्ध होती. त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर पंढरपुरात व्यवसायात चांगला बसवला होता. संत नरहरी सोनार हे एक प्रसिद्ध शिवभक्त होते. त्यांच्या घरात शिवभक्ती परंपरेने चालत आली होती.
या भक्तीची चर्चा पंढरपुरामध्ये मोठ्या प्रमाणावर होती. रोज सकाळी उठल्यावर ते शिव आराधना करीत असत रोज पहाटे ज्योतिर्लिंग बेलपत्र वाहणे ते असे एक कट्टर शिवभक्त असल्याने दुसऱ्या देवावर त्यांची श्रद्धा नसल्यामुळे काही जणांना त्यांच्या या वृत्तीचा खूप राग येत असे. एकदा विठ्ठल भक्त सावकारासाठी त्यांनी सोन्याची साखळी बनवली मंदिरात जाऊन विठ्ठलाच्या कमरेला सोनसाखळी घातली पण ती एक वितभर जास्त होत होती म्हणून सावकाराने आपल्या सेवकाला संत नरहरी सोनार यांच्याकडे पाठवले व साखळीचे माप बरोबर करून आणण्यास सांगितले.
संत नरहरी सोनार यांनी साखळीचे माप त्याप्रमाणे करून दिले. परंतु विठ्ठलाला ही साखळी घातल्यावर पुन्हा माप जास्त झाले. यामुळे नरहरी सोनार गोंधळून गेले. पण माप बरोबर असूनही असे कसे होत आहे. या विचारात ते पडले व शेवटी स्वतः मंदिरात गेले. स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून नरहरी सोनार विठ्ठलाच्या मूर्ती समोर गेले व जेव्हा सोनसाखळी कमरेला बांधून लागले तेव्हा त्यांच्या हाताला व्याघ्रचर्म लागली. ते हात गळ्यापर्यंत गेले तर त्यांना गळ्यात शेषनाग असल्याचे जाणवले. नरहरी सोनार यांनी लगेच आपल्या डोळ्यावर पट्टी काढली बघतात तर काय? समोर विठ्ठलाची मूर्ती होती.
पुन्हा त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली परत पुन्हा तेच यामुळे ते खूपच गोंधळून गेले. शेवटी प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना दर्शन देऊन सांगितले की, पांडुरंग परमात्मा शंकर भगवान आहे. शिव आणि विष्णु भिन्न नाही एकच आहेत. हे सर्व देव विठ्ठलाच सामावलेले आहेत. यानंतर ते विठ्ठलाच्या भक्तीमध्ये बुडून गेले व पांडुरंगाला म्हणाले, “देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार” नरहरी महाराजांचा जन्मच हरिहराचा वाद मिटवण्यासाठी झाला. नरहरी महाराजांच्या घराण्याचे मूळ पुरुष रामचंद्र सदाशिव सोनार हे होते असे म्हटले जाते. पंढरपूर येथे त्यांचे वंशज श्री प्रमोद दिगंबरराव महामुनी यांचे वडिलोपार्जित विश्वकर्मा निवास म्हणून जुने घर आहे. नरहरी महाराजांच्या पादुका आणि देवपूजेतील पितळी विठ्ठल मूर्ती त्यांचेकडे असून षोडशोपचारे पूजा केली जाते.
जग हे अवघे सारे ब्रह्मरूप,
सर्वभूती एक पांडुरंगा,
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी.
समाधी
संत नरहरी सोनार यांनी 2 फेब्रुवारी 1314 साली देवाचे नामस्मरण करता करता समाधिस्थ झाले व आपली प्राणज्योत विठ्ठलामध्ये एकरूप केली. तो दिवस होता माघ वद्य तृतीया सोमवार. अशाप्रकारे संत नरहरी सोनार यांनी आपल्या भक्तीचा महिमा अजरामर केलेला आहे.
Sant Narhari Sonar information in Marathi language. “संत नरहरी सोनार ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून असते सांगा.”