संत रोहिदास | Sant Rohidas information in Marathi language

Sant Rohidas information in Marathi language संत रोहिदासांना महाराष्ट्रात ‘रोहिदास’ म्हणून ओळखले जाते. पण देशातील अनेक प्रांतात त्यांना वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. उत्तर प्रदेशातील काशी जवळील मांडूर गावी त्यांचा जन्म झाला, तिथे त्यांना ‘रविदास’ नावाने ओळखले जाते. संत रोहिदास भारतातील एकमेव असे संत आहेत की, त्यांना 16 नावांनी ओळखले जाते. त्यांची स्मारके, पुतळे, त्यांच्या नावाच्या धर्मशाळा देशभर आहेत. त्यांना पूर्ण देश ओळखतो.

संत रोहिदास Sant Rohidas information in Marathi language

ख-या अर्थाने ते एकमेव राष्ट्रीय संत आहेत. संत रोहिदास हे एक कवि संत समाजसुधारक आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी भारतभर भ्रमण करून 15 ते 16 व्या शतकात दरम्यान भक्ती चळवळीचे भारतीय रहस्यवादी कवि असे पद प्राप्त केले. रोहिदास यांच्या भक्तिगीतांचा शक्ती चळवळीवर पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या प्रदेशात गुरु म्हणून कायमचा प्रभाव पडला आहे. या महान कार्यामुळे ते सुधारक संस्थांमध्ये अग्रणी होते. त्यांच्याविषयी आपण माहिती पाहूया.

जन्म

संत रोहिदास यांचा जन्म वाराणसी जवळील शिरूर गोवर्धनपूर गावात झाला. त्यांचे जन्मस्थान श्री गुरु रविदास जन्मस्थान म्हणून ओळखले जाते. त्यांची आई करमा त्यांचे वडील राहू हे आहेत. त्यांचे वडील साबळे यांचे व्यवसाय करीत त्यांनी त्यांचे बहुतांश आयुष्य गंगा नदीच्या काठावर आध्यात्मिक अनुयायांमध्ये आणि सुपी संत साधू व तपस्वी यांच्या सहवासात घालविले. संत रोहिदास यांचा जन्म सन 1398 मध्ये काशी येथे झाला. महाराष्ट्रात ‘रोहिदास चांभार’ म्हणून ओळखले जाणारे संत हेच असावेत, असे दिसते.

जीवन

रोहिदासांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी झाला. त्यांच्या पत्नीचे नाव लोना होते. विजयदास नावाचा पुत्र असल्याचा उल्लेख परमानंद स्वामिरचित रोहिदास त्यांना पुराण ह्या ग्रंथात आढळतो. रोहिदासाच्या भक्तिवेडामुळे धंदा व संसाराचे नुकसान होऊ लागले म्हणून त्याच्या वडिलांनी वडिलोपार्जित संपत्तीचा कुठलाही हिस्सा न देता, रोहिदासाला वेगळे काढले. घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत तो झोपडी बांधून पत्नी बरोबर राहू लागला. गुरू रामानंदांच्या संपर्कामुळे रोहिदासाचे ज्ञानभांडार वाढले. तो प्रत्येक विषयावर प्रवचन देऊ लागला आणि आपल्या प्रवचनातून वेद, उपनिषदे आणि दर्शनशास्त्राच्या व्याख्या सांगू लागला.

चर्मकार समाजाच्या रविदासांचा वडिलोपार्जित धंदाही चामड्यापासून पादत्राणे व अन्य वस्तू बनविणे हा होता. परंतु, रोहितदास लहानपणापासून ईश्वरभक्तीकडेही वळले होते. वाईट कर्म त्यागून परमेश्वर भक्तीकडे जा तोच खरा मार्ग आहे, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांच्या जीवनातील अनेक घटना याची साक्ष देणार्‍या आहेत.

रोहिदासांचे गुरु

रोहिदास संत कबीरांचे गुरूबंधू होते. स्वामी रामानंद हे त्यांचे गुरू. रविदासांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाजाला उपदेश केला. सतमार्गावरून चालण्यासाठी केलेला त्यांचा उपदेश आजही अंगीकारण्यासारखा आहे. विशेष म्हणजे त्यांच्या भक्तीसाहित्यात नेहमीच्या बोलीतले शब्द होते. त्यामुळे त्यांचे साहित्य लोकांना भावले. त्याशिवाय पारतंत्र्याविषयीची बंडखोरीही रविदासांच्या साहित्यातून दिसून येते. ज्यावेळी मुस्लिम आक्रमक भारतात शिरले. त्यावेळी त्यांनी लादलेल्या पारतंत्र्याविषयी स्पष्टपणे लिहून ठेवले आहे.

पराधिनता पाप है जान लेहु रे मीत |
रविदास दास पराधीन तो कौन करे है प्रीत ||

सामान्याने पराधिनतेला दूर करण्यासाठी निर्भय बनले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. गुलाम होणे हे पाप आहे. अशी त्यांची शिकवण होती. रोहिदासांनी कर्म हीच ईश्वररसेवा मानली होती. इथे महाराष्ट्रातल्या गोरा कुंभाराशी ते नाते जोडतात. गोरा कुंभाराने काम करता करता विठ्ठल नाम घेतले आणि त्या नादात स्वतःच्या मुलालाही त्यांनी मातीत कालवून टाकले होते. रोहिदासही काम करता करताच ईश्वरभक्तीत लीन होत होते. एकदा त्यांना गंगेवर चलण्यासाठी काही लोकांनी सांगितले. परंतु, आज एका व्यक्तीला पादत्राणे बनवून देण्याचे वचन दिले असल्याने मी येऊ शकत नाही, असे स्पष्टपणे सांगून काम हीच आपली ईश्वरभक्ती असल्याचे त्यांनी दाखवून दिले होते.

‘मन चंगा तो कठोती में गंगा’

मन चांगले असेल तर गंगा आपल्याजवळच असेल या आशयाचा हिंदी वाक्प्रचारही त्यांच्याच दोह्यातून आला आहे. रोहितदासांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाजाला उपदेश केला. संत रोहिदासांच्या विचारांनी प्रेरीत होवून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘द अनटचेबल’ हा ग्रंथ संत रोहिदासांच्या चरणी अर्पण केला आहे.

‘हिल,मिल चलो जगतमे, फूट पडो दो नही, फूट पडी माची तो, देश नष्ट हो जाई’

एकजुटीला संत रविदासांच्या दृष्टीकोनातून अनन्यसाधारण महत्व आहे.  देशहितासाठी आपआपसात, समाजासमाजात तूट निर्माण होवू देवू नका असा अमुल्य संदेश देत, मतभेदामुळे समाज आणि देशाची अपरिमित हानी होत असल्याचेही त्यांच्या विचार धारेवरून दिसून येते. म्हणजेच, माणुस आणि देशाच्या हितासाठीच संत रोहिदासांचे उपदेश असल्याचे दिसून येते.

संत रोहिदासांच्या विचारधारेत ‘मनुष्य’ हाच धर्माचा केंद्र बिंदू होता. धर्म हा मानवांसाठी असून मानवांच्या सर्वांगीण कल्याणासाठीच धर्माने आपली भूमिका वठवावी, असे त्यांना अभिप्रेत होते. इतकेच नव्हे तर,  मूर्तिपूजे- सारख्या कर्मकांडावर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता. मानवी मनाला सुयोग्य विचार करण्याची दिशा लावणे हेच सर्व सुखाचे उगमस्थान असल्याची धारणा रोहिदासांची होती.

केवळ अन्नाचा अर्थातच पोटपाण्याचा विचार न मांडता, लहान-थोर, गरिब-श्रीमंत, स्पृश्य-अस्पृश्य यांच्यात समानता असावी, सर्वांना समान अधिकार असावेत.  कोणताही भेद नसल्यासच रोहिदास प्रसन्न राहू शकतील, असे समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचेच संत रविदासांचे विचार आहेत. सर्व जीव एकाच मातीतून बनलेली भांडी आहेत. त्यांना बनविणारा ही एकच आहे. एकाच परमात्म्याची ही सारी रूपे आहेत. इथे कोणी छोटा मोठा नाही. मेहनतीलाच प्रभूभक्ती समजतो. त्याचे जीवनच यशस्वी होईल,
असे ते सांगतात.

कार्य

संत रोहिदास हे जातीव्यवस्थेचा सर्वात मोठा विरोधक होते, त्यांचा असा विश्वास होता की, मानवांनी निर्माण केलेल्या जातीवादामुळे माणूस माणसापासून दुरावला जात आहे. आणि जातीने माणसात फूट पाडल्यास काय फायदा?

जाति-जाति में जाति हैं, जो केतन के पात।रैदास मनुष ना जुड़ सके जब तक जाति न जात।।

चमत्कार

संत रोहिदास यांच्या काळात, जातीभेद शिगेला पोचला होता. जेव्हा रोहीदास यांच्या वडिलांचे निधन झाले, त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी लोकांची मदत मिळाली नाही, लोकांचा असा विश्वास होता की, तो शूद्र जातीचा आहे आणि जर त्यांचे अंत्यसंस्कार जर गंगेत झाले तर गंगा देखील प्रदूषित होईल. ज्यामुळे त्यांच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी कोणी येत नाही, मग संत रोहीदास यांनी देवाला प्रार्थना केली, त्याचवेळी वादळ येऊन त्यांच्या वडिलांचे मृत शरीर त्या वादळामुळे गंगेमध्ये विलीन झाले आणि तेव्हापासून असे मानले जाते की, काशीमध्ये गंगा उलट दिशेने वाहते.

संत रोहिदास यांच्या महानतेचा पुरावा आणि भक्ती भावनेच्या शक्तीचे त्याच्या जीवनातील बर्‍याच घटनांमध्ये आढळते. संत रोहिदासांच्या जीवनात अशा बर्‍याच घटना घडल्या आहेत, ज्या आजही जातीवादाच्या भावनेच्या पलीकडे जाऊन आणि खर्‍या मार्गावर चालून समाज कल्याणचा मार्ग दाखवतात. जरी महान संत रोहीदास आज जरी आपल्या समाजात नसले तरी त्यांचे उपदेश आणि भक्तीने समाज कल्याणाचा मार्ग आपल्याला दाखवला आहे. महान संत रोहिदास यांनी आपल्या जीवनातील कृतीतून सिद्ध केले की, माणसाने कोणत्या कुळात किंवा जातीत जन्म घेतला, यावरून तो कधीच महान होत नाही, पण जो मानवाबद्दल आदर आणि भक्ती ठेवतो तोच कायमच महान असतो आणि लोकांच्या मनावर राज्य करतो.

संत रोहिदासांचा मृत्यू

संत रोहिदास 120 वर्ष जगले. चितोडगड येथे सन 1527 मध्ये चितोडगड येथे संत रोहिदास यांचा मृत्यू झाला. चितोडगडातील कुंभश्याम मंदिरात स्वरचित आरती म्हणून ते मंदिराबाहेर पडले, आणि त्याच वेळी संतप्‍त पुरोहितांनी त्यांच्यावर घातक प्रहार करून त्यांचे प्रेत गंभीरी नदीत फेकून दिले असावे. त्यांची पादत्राणे जिथे मिळाली, त्याच ठिकाणी त्यांची समाधी व छत्री बांधलेली आहे.

Sant Rohidas information in Marathi language संत रोहिदास याविषयी माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment