Sant Savata Mali Information in Marathi Language | संत सावता माळी

Sant Savata mali information in Marathi language.महाराष्ट्राच्या मातीत अनेक संतांनी जन्म घेतला. त्यामध्ये संत तुकाराम महाराज संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत सखुबाई, संत गोरा कुंभार, संत सेना, संत जनाबाई यातीलच एक संत तो म्हणजे संत सावता माळी आहे. संत सावता माळी हे एक संत कवी आहेत. ते संत नामदेव, ज्ञानदेव यांचे समकालीन असून पंढरपूर जवळील अरणभेंडी या गावचे ते रहिवाशी होते. त्यांचे वारकरी संप्रदायातील संत जनांमुळेच अभंगरचना करायचे. आपल्या दिवसभराच्या कामात देव असतो व आपल्या भाजीपाल्यामध्ये देव शोधणारा संत सावता माळी हा आहे. त्याच्या विषयी आपण माहिती पाहूया.

जन्म

संत सावतामाळी हे पंढरपूर जवळील अरणभेंडी या गावचे रहिवासी असून त्यांच्या वडिलांचे नाव परसूबा आणि आईचे नाव नांगीताबाई होते. त्यांच्या जीवनाविषयी माहिती सांगायचे झाले, तर ते अरणभेंडी गावातील रूपमाळी भानवसे यांची मुलगी जनाईशी त्यांचा विवाह झाला. त्यांना दोन अपत्ये होती. मुलगा विठ्ठल व कन्या नागाबाई ते गृहस्थाश्रमी असूनही विरक्त वृत्तीचे होते. ते पंढरपूरचे विठ्ठल यांचे अभंगाद्वारे व भक्ती द्वारे महिमा गायत असत. त्यांचा वारकरी संप्रदायातील संत जनार्दनमध्येही मोठा लौकिक होता. विठ्ठल भक्तीने भरलेल्या त्यांच्या अभंग रचनांनी काव्यामध्ये भक्तिभावानेचा मळा ते फुलवीत असतात. त्यांचे अभंग काही प्रमाणात उपलब्ध आहे.

व्यवसाय

आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी संत सावता हे आपल्या शेतात दिवसभर कष्ट करीत असत. तसेच त्याचबरोबर ते ईश्वरभक्ती सुद्धा करत असत आणि ईश्वरभक्तीचा हा अधिकार सर्वांना आहे.
“न लगे सायास न पडे संकट, नामे सोपी वाट वैकुंठाची”

असा त्यांचा रोकडा अनुभव होता. त्यांनी जनसामान्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला होता. काशीबा गुरव नावाचे व्यक्ती त्यांचे अभंग लिहून ठेवत असत आपल्या मळ्यातील भाजीपाल्यामध्ये ही त्यांना विठ्ठलाचे रूप दिसते.

 

आमची माळीयाची जात | शेत लावू बागाईत |
कांदा मुळा भाजी | अवघी विठाबाई माझी ||
लसूण मिरची कोथिंबिरी | अवघा झाला माझा हरी ||

 

या अभंगांमध्ये संत सावतामाळी म्हणतात की, आमची जात माळी आहे आणि आम्ही आमच्या शेतामध्ये कांदा, मुळा, भाजी, लसूण कोथिंबीर आणि मिरची अशी बागायत शेतीमध्ये पीक घेत असतो आणि त्या मध्येच आम्हाला देव दिसतो. देवाला पाहण्यासाठी मंदिरांमध्ये जाण्याची गरज नाही, आपल्या कामांमध्ये देव असतो हेही त्यांना सांगायचं आहे. अध्यात्म भक्ती आणि आत्मबोध आणि लोकसंग्रह कर्तव्य आणि सदाचार याची बेमालूम सांगड त्यांनी घातली. धर्म चरणातील अंधश्रद्धा कर्मठपणा दांभिकता यावर त्यांनी कोणाचीच ठेवली नाही. त्यावर सतत कोरडे ओढले अंतर शुद्धी तत्त्वचिंतन सदाचार निर्भयता नीतिमत्ता संशोधन इत्यादी गुणांनी त्यांनी ईश्वराला प्रसन्न करून घ्यायचे असेल तर योग्य तीर्थव्रत, कौशल्य या साधनांची बिलकूल आवश्यकता नाही. केवळ ईश्वराचे अंतःकरणपूर्वक चिंतन करणे किंवा नामस्मरण करणे यातच देव प्रसन्न होतो असे त्यांचे मत होते.

संत सावता माळी यांच्या विषयी एक आख्यायिका आहे की, संत सावतामाळी हे आपल्या शेतामध्ये खुरप्याने शेतातील काम करत होते. एकदा संत ज्ञानेश्वर, नामदेव आणि पांडुरंग असे तिघे कूर्मदास नावाच्या एका संताच्या भेटीला चालले होते. वाटेत सावतामाळी यांचे गाव अरणभेंडी लागली. तेव्हा पांडुरंगाने तुम्ही येथे थांबा, मी स्वतः भेटून येतो असे सांगितले. पांडुरंगाला गंमत करण्याची लहर आली, तो धावत धावत सावता माळ्याकडे गेला आणि म्हणाला माझ्या मागे दोन चोर लागले आहेत. मला कुठेतरी लपवून ठेव.

संत सावता यांनी बाल रुपी पांडुरंगाला खुरप्याने आपली छाती फाडून हृदयामध्ये लपून ठेवले आणि वरून उपकरणे किंवा कांबळे बांधले. ज्ञानेश्‍वर आणि नामदेव पांडुरंगाची वाट पाहून थकले आणि पांडुरंगाला शोधत सावता माळ्याच्या मळ्यापर्यंत आले. त्यांनी पांडुरंग कुठे आहे याची चौकशी केली. ज्ञानदेव आणि नामदेव दोघेही ज्ञानी होते. त्यांना सावत्याच्या पोटापाशी पांडुरंग आहे. हे समजले आणि मग सावता माळी यांना बरोबर घेऊनच हे तिघेही कुर्मदासला भेटायला गेले. या कथेत एक असा अंतरंगात भाग आहे की सावता माळी यांनी आपले पोट चिरुन आत पांडुरंगाला ठेवले.

ही कथा सत्य सत्याच्या कसोटीवर तपासून पाहणे शक्‍य नसले, तरी पोट चिरुन आत पांडुरंगाला ठेवण्याइतपत ताकदची काही गरज आहे असे वाटत नाही. संत सावता माळी आणि पांडुरंग यांचे अगदी जवळचे संबंध होते. एवढे जाणता आले तरी पुष्कळ आहे. संत सावतामाळी हे आपल्या दैनंदिन कामकाजात विठ्ठलाचे रूप पाहत असत. त्यांच्या सासरवाडीचे लोक एकदा त्यांच्याकडे आले. सावतामाळी भजनात रंगून गेले होते. त्यांनी सासरवाडीच्या लोकांकडे लक्ष दिले नाही. पत्नी संतापली त्यावेळी त्यांनी आपल्या पतीला जो उपदेश केला तो असा की,

 

प्रपंच असुनी परमार्थ साधावा | वाचे आठवावा पांडुरंग |
उंच नीच काही न पाहे सर्वथा | पुराणीच्या कथा पुराणीच ||
घटका आणि परत साधी उतावीळ | वाउगा तो काळ जाऊ नेदी ||
सावता म्हणे कांती जपे नामावळी | हृदय कमळी पांडुरंग ||

 

आपल्या कामातच देव पाहणारे काम हाच देव परमेश्वर अशी दृढ श्रद्धा बाळगणारे आणि स्वतःच्या पत्नीसह हे अधिकार वाणीने परमार्थाचा उपदेश करणारे, सावतामाळी त्यांच्या काळात महाराष्ट्राच्या भक्तीच्या मळ्याची मनोभावे जपणूक करीत होते.

सामधी

त्यांच्या अभंगात त्यांनी म्हटले आहे. सावता म्हणे ऐसा मार्ग धरा |
जेणे मुक्तीद्वार ओळंगती ||

संत सावता माळी यांनी ईश्वराचा नामजप करण्यावर जास्त भर दिला. ईश्वरप्राप्तीसाठी संन्यास घेण्याची गरज नाही. संसारात राहूनही त्यांना ईश्वर प्राप्ती होऊ शकते. असे म्हणणाऱ्या सावता महाराजांना त्यांच्या मळ्यातच पांडुरंग पाहिला. त्यांना 45 वर्षांचे आयुष्य लाभले. धार्मिक प्रबोधनाचे व भक्ती प्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने व्रत म्हणून विचारले त्यांचे 37 अभंग उपलब्ध आहेत. अरण येथे आषाढ वद्य चतुर्दशी शके 1217 दिनांक 12 जुलै 1295 यांनी आपला देह ठेवला. पंढरपूर जवळील अरण येथे संत श्रेष्ठ सावता महाराज यांची समाधी आहे.

आषाढ वद्य चतुर्दशी हा संत सावता महाराजांचा पुण्यतिथी उत्सव असतो. सावता महाराज आपले शेत सोडून कधी पंढरपूरला आले नव्हते असे मानले जाते. पांडुरंगच त्यांना भेटण्यासाठी अरण येथे गेले. आजही संत सावता महाराजांची पालखी आषाढी वारीला पंढरपूरला येत नाही. आषाढी वारी झाल्यावर पांडुरंगाची पालखी संत सावता महाराजांना भेटण्यासाठी अरण येथे जाते. सावता महाराज समाधी मंदिर यांच्या शेताजवळ असून मंदीराजवळ विहीर आहे.

संत सावता महाराज यांचे राहते घर

संत सावता महाराज यांचे जुने अवशेष शिल्लक नसून त्या ठिकाणी नवीन पद्धतीने बांधले आहे. अरण येथील संत सावता महाराजांनी आपल्या मळ्यातच पांडुरंग पाहिला सावता महाराज पंढरपूरला कधीही गेलेली नाही असे म्हणतात. सावता महाराजांना भेटण्यासाठी देव पांडुरंग स्वतः येथे आले. आजही ही परंपरा पाळली जाते. आषाढ वद्य चतुर्दशी हा संत सावता महाराजांचा समाधी दिन तर अमावस्या हा काल्याचा दिवस असतो कालची दिवशी पंढरपूर वरून निघालेली देवाची पालखी अरण येथे आल्यावर दहीहंडी फोडून उत्सवाची सांगता होते.

Sant Savta Mali information in Marathi language. संत सावता माळी यांच्याविषयी माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो आमच्या yoga Tipsbatmi marathi या ब्लॉगला अवश्य भेट द्या

Share on:

Hey there! This is Supada Bochare, a student of engineering and a blogger. Blogging is my Passion. I love to write articles on different topics. I also like to do things related to WordPress, Digital Marketing and Latest technologies.

1 thought on “Sant Savata Mali Information in Marathi Language | संत सावता माळी”

Leave a Comment

x