Sant Sopandev information in Marathi language | संत सोपानदेव

Sant Sopandev information in Marathi language संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर आणि संत मुक्ताबाई यांचे चौथे बंधू संत सोपानदेव यांची अफाट ज्ञानसाधना, विठ्ठल भक्तीचा ठेवा असूनही भावंडांच्या लोकप्रियतेच्या प्रभावळीत सदैव झाकोळलेल्या या भावांना कोटी कोटी प्रणाम. त्यांना वारकरी संप्रदायामध्ये सोपान काका असे म्हटले जाते. त्यांच्याविषयी आपण माहिती पाहूया.

Sant Sopandev information in Marathi language संत सोपानदेव

आळंदीच्या विठ्ठलपंत व रुक्मिणी कुलकर्णी यांचे सोपानदेव हे तिसरे अपत्य. आई-वडिलांनी देहत्याग केला, त्यावेळी ही भावंडे लहान होती. त्यावेळी सोपानदेवांचे त्यांच्या भावंडांचा सांभाळ करणारे श्री निवृत्तीनाथ हेच होते असे म्हणावे लागेल.

जीवन

अगदी लहान वयात संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका हे काव्य रचले. तेव्हा शके 1212 मध्ये त्यांचे वय 15 ते 16 वर्ष होते. सोपानदेव आपले थोरले बंधू निवृत्तीनाथ यांचे पेक्षा सहा वर्षांनी आणि संत ज्ञानेश्वर पेक्षा तीन वर्षांनी धाकटे होते.

तर संत मुक्ताबाई पेक्षा तीन वर्षांनी मोठे होते. संन्याशाची पोरं म्हणून समाजाने केलेल्या हेटाळणीचा त्यांच्या बालमनावर ही झाला होता. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर आणि सोपान यांच्या वयात बरेच अंतर असल्याने आई-वडिलांच्या मृत्यूनंतर ते मोठ्या भावांच्या सानिध्यात वाढले. निवृत्तीनाथांची नाथपंथीय शिकवणुकीची साधना चालू होती.

ज्ञानेश्वर तर प्रकांड पंडित या दोघांबरोबर राहून सोपानदेवांनी नाथपंथ आणि गीता यांचा गहन अभ्यास केला. ज्ञानेश्वर गीतेवर मराठीत टीका करत ग्रंथ लिहीत होते. तेव्हा लेखन आणि टिपणी काढण्याचे काम सोपानदेव करत होते. असा उल्लेख सापडला आहे. सोपानदेवांनी स्वतःही अभंग, ओव्या रचल्या. त्यापैकी सुमारे 50 व्या उपलब्ध आहेत. सोपानदेवी या ग्रंथाचे लेखक श्री संत सोपान देव यांनी 1297 साली या ग्रंथाची निर्मिती केली. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, नामदेव, चोखामेळा, जनाबाई, गोरा कुंभार अशा संत मेळ्याने पदयात्रा केली. त्यात सोपानदेवही समाविष्ट होते.

बालपण

संत जनाबाईंच्या अभंगाचे प्रमाण मानल्यास सोपानदेवांचा जन्म शतक 1196 गृहीत धरावा लागतो. त्यांचे बालपण सुरुवातीला आई-वडील यांच्या सानिध्यात गेले असले, तरी हे प्रेम त्यांना अतिशय अल्प काळ मिळाले होते. त्यानंतर त्यांचे बालपण निवृत्तीनाथ व ज्ञानदेवांच्याच सानिध्यात गेले.

सोपानदेवाला आपल्या आईवडिलांकडून सुसंस्कृत जीवनाचा वारसा मिळाला होताच त्याशिवाय थोरल्या भावंडांनी ही त्यांच्यावर उत्तम संस्कार केलेत. आई-वडिलांच्या समवेत त्र्यंबकेश्वरची यात्रा त्यांनी अतिशय लहानपणी केली. त्यावेळी निवृत्तीनाथांचा गर्भगिरीच्या जंगलात हरवण्याचा प्रसंग त्यांच्या जीवनात अविस्मरणीय ठरला आहे. पुढे भावंडांसोबत शुद्ध पत्र मिळविण्यासाठी त्यांनी पैठणला प्रयाण केले. परतीच्या प्रवासात नेवासा येथे या भावंडांचा प्रदीर्घ मुक्काम पडला होता.

नंतर भावंडांसोबत पंढरपूरची वारी आणि नामदेव त्यांच्यासोबत तीर्थाटन त्यांनी केले. अशा प्रकारे त्यांना बालपणातच एक प्रकारची भटकंती करून जीवन गाठावे लागले. सोपानदेव हे वयाने लहान असली तरी अध्यात्मातील अधिकारी पुरुष होते. निवृत्तीनाथ व ज्ञानदेवांच्या सहवासात राहून त्यांनी अध्यात्मिक व योग्य प्रगती साधली होती. त्यामुळे त्यांच्याकडे वारकरी परंपरेतील अनेक संत आकर्षित होणे हे सहाजिकच होते. काही संत जणांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. याची नोंदही आपल्याला अभंगात मिळते.

सोपानदेवांचे अभंग

संत सोपानदेवांनी निर्मित अभंगातील अर्ध्यापेक्षा जास्त अभंग हे पंढरीचा महिमा, वर्णन करणारे व पांडुरंगाच्या नामस्मरणाचे महत्त्व सांगणारे आहेत. वारकरी संतांना पंढरी म्हणजे भूवैकुंठ आहे. या ठिकाणी आले, पंढरीची वारी केली की स्वर्गाची प्राप्ती होते. ही या संतांची आणि समस्त वारकरी संप्रदाय अनुयायांची श्रद्धा आहे. पांडुरंगाच्या पायाचे दर्शन व नामस्मरण जीवाला मुक्ती मिळवून देण्यास पुरेसा आहे. ही त्यांची श्रद्धा होती. सोपानदेवांनी ही या श्रद्धायुक्त अंतःकरणाने या अभंगरचना केल्या आहेत.

उघडली दृष्टी इंद्रिया सकट |
वैकुंठीची वाटपंढरी जाणा ||

 

दृष्टीभरी पाहे दैवत |
पूर्ण मनोरथ विठ्ठलादेवे ||

हाताची मार्ग सोपा जनासी उघड |
विषयाचे जाड टाकी परते ||

सोपान म्हणे गुपची सर्वथा |
मग नव्हे उत्तथा भक्तीपंथे ||

 

आपली दृष्टी उघडली म्हणजे आपणास नवी भान आले असून पंढरीला जाणे म्हणजे वैकुंठाला जाण्याचा मार्ग प्रशस्त करणे असे आहे. तेथे गेल्यावर आपले आराध्य विठ्ठलाचे दर्शन झाले म्हणजे माझे मनोरथ पूर्ण झाल्यासारखे आहे. यासाठी सोपानदेव सर्वसामान्य जनतेस विनंतीपूर्वक सांगतात की, हाच सोपा मार्ग आहे. वैकुंठाच्या प्राप्तीसाठी सर्वांनी पंढरीची वारी केली पाहिजे.

निवृत्तीनाथांची कृपा

निवृत्तीनाथ हे सर्व भावंडांमध्ये मोठे असल्यामुळे सर्व भावंडांची गुरु होते. ज्ञानदेव सोपानदेव व मुक्ताबाई या सर्वांना त्यांनी गुरुदीक्षा दिली. त्यामुळे या सर्वांनाच निवृत्तीनाथ या बद्दल खूप आदर आहे. या सर्वांनी निवृत्तीनाथांची आपल्यावर असलेली कृपादृष्टी व प्रेम व्यक्त करण्यासाठी अभंग रचना केली आहे. सोपान देवाचे ही असे काही अभंग असून त्याचाच अर्थ आपण जाणून घेऊया.

 

नाही नाही भांडणं दिसते प्रपंच |
रोहिणी आहा व मृगजळ ||

 

सुटलासे साटा वासना चोखाळ |
दिननिशी फळ राम झाला ||

 

रामेविण दुज नाही पै हो बिजे |
बोलतो सहजे वेदु जाणा ||

 

निवृत्ती खुणा विज्ञान देवा हरी |
सोपान झडकरी झोबियेला ||

या अभंगांमध्ये संत सोपानदेव म्हणतात. आम्हाला प्रपंच्याचे भान राहिले नाही. वासणे पासून आम्ही अतिशय दूर आहोत. कारण आमच्या मनात रात्रंदिन रामाचे नाव आहे. रामाशिवाय आम्हाला दुसरे काही सुचत नाही. हेच आम्हाला वेदांतातही सांगितले आहे. हे सारे ज्ञान आम्हाला निवृत्ती कृपेने मिळाले असून सोपान देवाने ते आत्मसात केले आहे.
अशाप्रकारे त्यांनी विविध ओव्यांनी अभंग रचना केलेली आहे.

समाधी

श्री संत श्रेष्ठ सोपानदेव यांनी सासवड येथे मार्गशीर्ष महिन्यात संजीवन समाधी घेतली. या निमित्ताने सासवड येथील सोपानकाका समाधी मंदिरात संजीवन समाधी सोहळा मार्गशीर्ष वद्य अष्टमी ते मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी या काळात साजरा केला जातो. वैद्य त्रयोदशी हा सोपानदेवांच्या समाधी हा सोपानदेवांच्या समाधीचे दिवस आहे. या दिवशी मुख्य मंडपात सकाळी नऊ ते साडेबारा पर्यंत सोपानदेवांच्या समाधीच्या वर्णनाचे किर्तन होते. दुपारी बारा वाजता समाधी वर्णन चा अभंग होऊन श्रींवर गुलाल व पुष्प वृष्टी होते. समाधी वर्णनाचे कीर्तन पूर्वी वहिवाटदार गोसावी घराण्यातील व्यक्ती करत. यामध्ये ह.भ.प. ज्ञानेश्वर वामन गोसावी व ह.भ.प. दत्तोबा ज्ञानेश्वर गोसावी यांनीही कीर्तन सेवा केलेली आहे. आता ही कीर्तन सेवा नामदेवरायांचे विद्यमान वंशज ह.भ.प. केशव महाराज नामदास करतात. यानंतर लगेच काल्याचे किर्तन होते. ही सेवा भोपळे दिंडीकर यांच्याकडे असून, गेली अनेक वर्ष
ह.भ.प. लक्ष्मण महाराज कोकाटे, भोपळे दिंडी तर्फे ही सेवा करतात.

“Sant sopandev” सोपानदेव यांच्याविषयी माहिती कशी वाटली की आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Share on:

Hey there! This is Supada Bochare, a student of engineering and a blogger. Blogging is my Passion. I love to write articles on different topics. I also like to do things related to WordPress, Digital Marketing and Latest technologies.

Leave a Comment

x