संत तुकाराम महाराजांची माहिती, निबंध व अभंग Sant Tukaram Information in Marathi

संत तुकाराम महाराजांची माहिती, निबंध व अभंग Sant Tukaram Information in Marathi: संत तुकाराम हे भारतातील भक्ती चळवळी दरम्यान एक प्रमुख वारकरी संत आणि आध्यात्मिक कवी होते. ते 17 व्या शतकातील हिंदू कवी आणि महाराष्ट्र, भारत मधील भक्ती चळवळीचे संत होते. संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) त्यांच्या भक्तीमय अभंगांसाठी आणि कीर्तनासाठी समाजाभिमुख उपासना म्हणून परिचित आहेत. त्यांचे अभंग (Sant Tukaram’s Abhang) विठोबाला समर्पित होते. संत तुकाराम भारतीय समाजाच्या सांस्कृतिक उन्नतीमध्ये संतसाहित्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संत तुकोबा (Sant Tukoba) हे एक महान समाजसुधारक, तत्त्वचिंतक कवी होते.

नक्की वाचा – माझे स्वप्न मराठी निबंध

Sant Tukaram Information in Marathi

संत तुकाराम महाराजांची माहिती, निबंध व अभंग Sant Tukaram Information in Marathi

संत तुकारामांचा जन्म आणि कुटुंब Sant Tukaram’s Early Life and Family:

अभ्यासकांमध्ये संत तुकाराम यांचा जन्म आणि मृत्यू वर्ष विवादाचा आणि संशोधनाचा विषय बनला आहे. एकतर त्यांचा जन्म 1598 किंवा1608 मध्ये महाराष्ट्रातील पुण्याजवळील देहू गावात (Sant Tukaram birthplace) झाला. महाराष्ट्रातील पुण्याजवळील देहू शहरात झाला. तुकाराम व्हिल्होबा आंबिले असे त्यांचे खरे नाव आहे. परंतु त्यांना महाराष्ट्रात संत तुकाराम म्हणून ओळखले जाते. तर दक्षिण भारतात त्यांना भक्त तुकाराम म्हणून ओळखले जाते.

तुकोबांचे मूळ कूळ मोरे घराणे, आडनाव आंबिले होते. तेजातीने मराठा कुणबी असून त्यांचा वाण्याचा व्यवसाय होता. त्यांच्या पित्याचे नाव बोल्होबा व आईचे कनकाई (father and mother of Sant Tukaram). त्यांचे आई-वडील विठोबाचे भक्त होते. तुकोबांपूर्वी आठ पिढ्यांपासून विठ्ठलाची उपासना त्यांच्या घराण्यात परंपरेने चालत आली होती. मोरे घराण्याचे मूळ पुरुष विश्वंभरबुवा महान विठ्ठलभक्त होते. पंढरीच्या पांडुरंगावर बोल्होबाची परमनिष्ठा होती. वडील संपन्न सावकार होते आणि त्यांच्याकडे महाजनकीही होती.

तुकोबांचे बालपण अगदी सुखात गेले. घरात नित्य हरिकथा, भजन, कीर्तन चालूच असायचे. त्याचे नकळत संस्कार तुकोबावर होत होते. दारात तुळशीवृंदावन, देवघरात विठ्ठलमूर्ती, नित्य भजन, पूजन आणि नित्यनियमाने वडिलांची पंढरीची वारी चालू असायची. अशा घरात तुकोबा वाढू लागले. या सर्व गोष्टींचे संस्कार त्यांच्या बालमनावर खोलवर रुजले. लहानपणापासून गीता, भागवताचे श्रवण घडल्यामुळे या ग्रंथांचा परिणाम तुकोबांच्या बालमनावर झाला.

तुकारामांच्या जीवनातील कठीण काळ Life of Sant Tukaram/ Sant Tukaram Gatha:

तुकाराम किशोरवयीन असतानाच त्यांच्या दोन्ही पालकांचे निधन झाले. संत तुकारामांची पहिली पत्नी (wife of Sant Tukaram) रखमाबाई होती, आणि त्यांना संतू नावाचा मुलगा (son of Sant Tukaram) झाला. पत्नीला दम्याचा विकार असल्यामुळे त्यांच्या वडिलांनी पुण्याचे आप्पाजी गुळवे या धनवंत सावकाराच्या आवडी नावाच्या मुलीशी तुकोबांचा दुसरा विवाह लावून दिला. तथापि, त्यांचा मुलगा आणि पहिली पत्नी दोघेही 1630-1632 च्या दुष्काळात मरण पावले. ह्या स्थितीमुळे त्यांचा जनातील मान गेला. अपमान होऊ लागला.त्यामुळे त्यांच्या मनात वैराग्य निर्माण झाले आणि संसारातून मन उडाले.

तुकारामांच्या वयाच्या २१व्या वर्षी प्रचंड मोठा दुष्काळ पडला. धंद्यात मंदी आली. उधारी वसूल झाली नाही. कर्ज घेतलेल्यांनी पैसे बुडविले, धनकोंनी तगादा लावला. वडिलोपार्जित संपत्तीची वाताहत झाली. संसार चालवण्यासाठी ते दुकान चालवू लागले. अशा पद्धतीने दुकान चार वर्षे चालले. पुढे तेही बंद पडले. सावकार घरात घुसला. घरात होती ती चीजवस्तू मोडली. एकदा आप्तेष्टांनी मदत केली; पण काही स्थिरस्थावर झाले नाही.

तुकारामांचे ईश्वराला शरण जाणे

घरादारावर दुःखाची कळा पसरली. “जग हे दिल्या घेतल्याचे, अंतकाळीचे नाही कोणी” असा तुकोबांना अनुभव आला. अशा जीवनानुभवातून होरपळून निघून तुकोबा एका निश्चित विचाराने ईश्वराकडे ओढले गेले. आयुष्याला वेगळे वळण मिळाले.

पांडुरंगाशिवाय आपले दुसरे कोणी नाही, हा विश्वास मनात निर्माण झाला. ते सर्व वेळ ईश्वरचिंतनात घालवू लागले. ते विठ्ठलाला शरण गेले. या सर्व बिकट परिस्थितीकडे ते मोठ्या निःसंग व अलिप्तपणे पाहू लागले. त्यांच्या जीवनात ज्या घटना घडल्या, त्या कशा फायद्याच्या झाल्या हे त्यांच्या

अभंगावरून समजते Sant Tukaram Maharaj’s Abhang:

बरे झाले देवा निघाले दिवाळे । बरी या दुकाळे हिड केली।।
अनुतापे तुझे राहिले चिंतन । जात हा वमन संसारा ।।
बरे झाले देवा बाईल कर्कशा । बरी हे दुर्दशा जनामध्ये ||
बरे झाले जगी पावलो अपमान | बरें गेले धन ढोरे गुरे ।।

संसाराच्या साऱ्या भावनांना मूठमाती देण्यास उभ्या राहिलेल्या तुकोबांच्या जीवनाचा पूर्वार्ध येथेच संपला. पुढे दुष्काळाचे सावट संपले. जनजीवन पुन्हा स्थिर झाले. अशापरिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह तुकोबा करू शकले असते. पण परत संसारात त्यांचे मन रमले नाही.

मनात वैराग्य असल्यामुळे तुकाराम महाराज ईश्वरभक्तीतच रमले ते शेवटपर्यंत “भेटीलागी जीवा लागलीसे आस, कन्यासासुरासी जाये, विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, आनंदाचे डोही आनंद तरंग” अशा कितीतरी अभंगांतून तुकारामांचे संपूर्ण जीवन विठ्ठलमय झाल्याचे दाखले मिळतात.

नंतरची बहुतेक वर्षे त्यांनी भक्ती उपासना, सामुदायिक कीर्तन (गायनसह सामुहिक प्रार्थना) आणि अभंग कविता रचण्यात घालविली.

दिलीप पुरुषोत्तम चित्रे हे मराठी विख्यात विद्वान आहेत. त्यांनी तुकारामांना मराठीतील पहिले आधुनिक कवी म्हणून संबोधले आहे. चित्रे यांचा असा विश्वास आहे की संत ज्ञानेश्वर नंतर तुकाराम हे दुसरे संत होते ज्यांनी हिंदू धर्मात जातीय पदानुक्रम नाकारला आणि हिंदु धर्मात असलेल्या कर्मकांडांचा विरोध केला.

संत तुकारामांचे आध्यात्मिक जीवन Spiritual Life of Sant Tukaram:

ज्ञान-भक्ती-वैराग्याने परिपक्व असलेल्या तुकारामांना कुठेही अहंकाराचा लवलेशही नाही. कितीनम्रतेने म्हणतात, “वेदांचा तो अर्थ आम्हांसीच ठावा आंतरिक दु:खापासून मुक्ती मिळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अध्यात्म, हे ते जाणत होते. त्यांचे मन एकांतवासात रमू लागले. गावापासून दूर देहूच्या परिसरात असलेल्या भंडारा डोंगरावर जाऊन वाचन, मनन, चिंतनात ते रमू लागले.

संत तुकाराम हे विठ्ठलाचे मोठे भक्त होते. तुकारामांना कोणत्याही गोष्टींचा मोह नहता. कसल्याही किक सुखाची आस नव्हती, हे अनेक गोष्टींवरून आपल्या लक्षात येते. त्यापैकी एक प्रसंग इथे मुद्दाम सांगावासा वाटतो. एकदा शिवरायांची आणि तुकोबांची भेट झाली. त्यांनी तुकोबांसाठी छत्री, घोडे, कपडे व मुलांना इतर भेटवस्तू पाठविल्या. शिवरायांचे शिपाई भेटवस्तू तुकारामांच्या घरी घेऊन आले. तुकारामांनी ते सर्व आल्या पावलीच परत पाठवले.

तुकारामांनी गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत व इतर ग्रंथांचे वाचन केले. तसेच पंढरीच्या विठ्ठलाचे अखंड नामस्मरण करू लागले. त्यांना आलेल्या अनुभवातून ते एका अभंगात म्हणतात-

अवघाचि संसार केला ब्रह्मरूप । विठ्ठल स्वरूप म्हणोनियां ।।

प्रत्येक जीवाच्या ठिकाणी परमेश्वराचे दर्शन घेणाऱ्या तुकोबांवर अन्याय करणारे लोक त्यांच्यासमोर येतात तेव्हाही त्यांच्या अंतकरणात माणुसकीचा झरा आपोआपच निर्माण होतो. तुकाराम महाराजांचा जीवनप्रवास जाणून घेताना आपल्या एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे, विठ्ठलनामाशिवाय कोणत्याही गोष्टीला त्यांच्या चित्ताच्या ठायी जागाच नव्हती.

तुकोबा आपल्या एका अभंगातून माणसाला उद्देशून म्हणतात Sant Tukaram Maharaj Abhang:

चाल केलासी मोकळा | बोल विठ्ठल वेळोवेळा |
तुजं पाप चि नाही ऐसे। नाम घेतां जवळी वसे ।।

याचा अर्थ तुकाराम महाराज सांगतात की, तू परमेश्वराचे नमस्मरण कर. जेव्हा परमेश्वराचे नामस्मरण करशील,त्यावेळेला कोणतेही पाप तुझ्या ठिकाणी उरणार नाही. पाप कसं नाहीसं होईल याची काळजी तू करू नकोस, कारण हरिनामापुढे पाप टिकणारंच नाही. ते आपोआपच नष्ट होईल. परमेश्वर तुझ्याबरोबर असेल तर तुझ्या हातून कुठलेही पापकर्म तो घडू देणार नाही एवढे सामर्थ्य त्या हरिनामात आहे.

संत तुकारामांचे सामाजिक कार्य Social work of Sant Tukaram:

संत तुकारामांचे सामाजिक कार्य सर्वसामान्य लोकांची वैचारिकता बदलून नैतिक अधोगती थांबविणे हे महत्त्वाचे कार्य महाराष्ट्रातील अनेक संतांनी केले. त्यामध्ये संत तुकाराम यांचे कार्य फार महान आहे. जनजागृतीचे महान कार्य तुकाराम महाराजांनी केले.

संत तुकाराम यांनी मानवी मूल्य जपत नम्रतेने, शांतपणे जनसेवा केली. त्यांनी फक्त लोकांना उपदेश दिला नाही तर, तो त्यांनी स्वतःही अंगीकारला आणि इतरांनाही सांगितला. समाजकंटकांनी त्यांना खूप त्रास दिला तरीही त्यांच्याविषयी कटूपणा न ठेवता उलट ते म्हणाले, “कोणाही जीवाचा न घडो मत्सर” करुणा, प्रेम,अहिंसा याची शिकवण त्यांनी सदैव दिली.

काव्यरचना लिहून अभंगातून नामाचा महिमा सांगितला. कर्मकांडामुळे समाज अधोगतीला जातो हे त्यांनी पदोपदी सांगितले. धर्माचे ठेकेदार लोकांना खोट्या गोष्टी, भाकडकथा, थोतांड सांगून अज्ञानात अडकवून ठेवतात, त्यामुळे समाजाची अधोगती होते. धर्माच्या नावाने व्यापार करणारे पंडित खोट्या पांडित्याच्या जोरावर सर्वसामान्य लोकांची दिशाभूल करतात. यावर तुकोबा म्हणतात, मुख्य सांगे ब्रह्मज्ञान, लोकांची कापतो मानज्ञान सांगतो जनास, नाही अनुभव आपणास कथा करितो देवाची अंतरी आशा बहुमोलाची तुका म्हणे तोचि वेडा, त्याचे हाणून थोबाड फोडा अशा प्रखर शब्दांत त्यांनी टीका केली.

तुकोबांची वाणी कधी अतिशय मधाळ तर कधी कठोर झालेली दिसते. सिद्धी, चमत्कार, गंडेदोरे या विषयांच्या नादाला लागलेल्या लोकांविषयी त्यांना प्रचंड चीड होती. कर्मठपणा त्यांना मान्य नव्हता. म्हणूनच त्यांनी या विषयांवरही अभंगरचना केल्या. समाजामध्ये जिथे जिथे ढोंगीपणा आढळला, तिथे तिथे त्यांनी प्रहार केले. खरा धर्म काय आहे? माणसाचे हित कशात आहे? हे त्यांनी वेळोवेळी सांगितले. द्वैतवादाचा पुरस्कार करून समाजातील लोकांना त्यांनी खरा धर्म काय आहे? तो ओळखायला शिकविले.

तुकाराम महारजांचे तत्त्वज्ञान हे सर्वसामान्याच्या उन्नतीसाठी, कल्याणासाठी आहे. मनाचे दार उघडे ठेवून जीवनाकडे पाहायला सांगातात. धश्रद्धेच्या आहारी गेलेल्या लोकांना विचारांची नवी दिशा देऊन त्यांनी समाजप्रबोधनाचे कार्य करत अज्ञान दूर केले. नको ते सोहळे, पांडित्य, भोंदूगिरी यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. अभंग रचले, भजन, कीर्तनातून अडाणी, अज्ञानी लोकांना समजेल, उमजेल अशा शब्दांत नवीन विचार  जनतेच्या मनात रुजविले.

शुद्ध सद्विवेकबुद्धीने त्यांना जे अध्यात्म उलगडलं, समजलं, परमेश्वर चिंतनातून त्यांना जे ज्ञान मिळालं ते अभंगाच्या माध्यमातून त्यांनी संग्रही करूनपुढच्या पिढ्यांना दिलं. जप, तप, ध्यान-धारणेतून जो ज्ञानाचा प्रकाश मिळाला तो त्यांनी समाजातील अज्ञान दूर करण्यासाठी वापरला. परोपकारासाठी संतांचे जीवन असतेहे त्यांना समजले होते. संसारात राहून फक्त दुःखच भोगावे लागले हा त्यांचा अनुभव त्यांनी त्रयस्थ भावनेने सांगितला.

भंडारा डोंगरावर लाभलेल्या एकांतात अंतर्मुख होऊन ते विचार करू लागले, तेव्हा माणसाच्या जीवनात निसर्गाचं स्थान किती महत्त्वाचं आहे, हे त्यांनी जाणलं. झाडं जर लावले नाहीत तर पाऊस पडणार नाही. जर पाऊस पडला नाही तर दुष्काळाचे सावट कायमच पुढील पिढ्यांनाही भोगावे लागेल. या सर्व विचारातून त्यांनी अभंगरचना केली…

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ।
पक्षीही सुस्वरे आळविती ।
येणे सुखे रुचे एकांताचा वास |
नाही गुणदोष अंगा येत ।।

संत तुकाराम हे भागवत हिंदू परंपरेचे महत्वाचे घटक मानले जातात, ज्याची सुरुवात महाराष्ट्रात नामदेव यांच्यापासून झाली आहे. ज्ञानेश्वर, नामदेव, जनाबाई, एकनाथ आणि तुकाराम खासकरुन महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायात आदरणीय आहेत. महाराष्ट्रातील वरील संतांच्या जीवनाबद्दलची माहिती भक्ती-विजय आणि भक्ती-लीलेमृत या महिपतींच्या लेखनातून प्राप्त झाली आहे. तुकारामांच्या मृत्यूनंतर 65 वर्षांनंतर महिपतींचा जन्म झाला. (एकनाथ, नामदेव आणि ज्ञानेश्वर यांच्या मृत्यूनंतर अनुक्रमे 50 वर्षे, 300 वर्षे, आणि 353 वर्षांनी तुकाराम मरण पावले.) अशा प्रकारे, महिपतींनी निःसंशयपणे वरील सर्व संतांच्या जीवनाचे उत्कृष्टतेने रेखाटन केले आहे.

तुकारामांचे गुरु Guru of Sant Tukaram:

संत तुकारामांनी संत नामदेवाला आपला गुरु म्हणून स्वीकारले होते. त्यांचा एक अभंग “नामदेवे केले स्वप्नामाजी जागे….सवे पांडुरंगे येवूनिया” या गोष्टीचा पुरावा आहे. संत तुकारामांनीही त्यांच्या एका अभंगात नमूद केले आहे की त्यांच्या सद्गुरूंचे नाव ‘बाबाजी चैतन्य’ होते. ते 13 व्या शतकातील विद्वान ज्ञानदेवांचे चतुर्थ पिढीचे शिष्य होते. अभंगांच्या त्यांच्या कामात, तुकारामा वारंवार इतर चार व्यक्तींचा उल्लेख करतात ज्यांचा त्यांच्या आध्यात्मिक विकासावर प्राथमिक प्रभाव होता, पूर्वीच्या भक्ती संत नामदेव, ज्ञानेश्वर, कबीर आणि एकनाथ.

आज अस्तित्त्वात असलेल्या देहू मधील तुकारामजींशी संबंधित महत्त्वाची स्थाने अशीः

तुकाराम महाराज जन्मास्थान मंदिर, देहू – तुकारामजींचा जन्म जिथून पुढे मंदिर बांधले गेले ते ठिकाण

संत तुकाराम वैकुंठस्थान मंदिर, देहू – येथून तुकारामजी आपल्या नश्वर रूपात वैकुंठात गेले; इंद्रायणी नदीकाठी या मंदिराच्या मागे एक छान घाट आहे

संत तुकाराम महाराज गाथा मंदिर, देहू – आधुनिक रचना; तुकारामांच्या मोठ्या पुतळ्याला भव्य इमारत; गाथा मंदिरात, तुकाराम महाराजांनी निर्मित सुमारे 4000 अभंग (श्लोक) भिंतींवर कोरले होते.

साहित्यिक कामे Literary work of Sant Tukaram:

संत तुकाराम यांचे अभंग ही साहित्याची एक मराठी शैली आहे, जी छंदात्मक, सरळ, थेट आहे आणि ती लोकांच्या कथांना सखोल आध्यात्मिक रूप देते.

तुकारामांचे कार्य ज्ञानदेव किंवा नामदेव यांच्यासारख्या पूर्ववर्ती ज्यांच्या शैलीच्या कृपेने अशाच विचारांची खोली एकत्र करण्यासाठी प्रख्यात आहेत अशा लोकांपेक्षा भाषेच्या शैलीत अत्यानंदपूर्ण त्याग, अनैतिक शब्दांकरिता प्रसिद्ध आहेत. तुकाराम अभंग लिहू लागले तसा शब्दांचा फुलोरा फुलू लागला आणि पाहता पाहता त्या शब्दांचा परिमळ समाजात पसरला. संसार-परमार्थाच्या  अनुभवांतून जे मनात साठलं होतं ते तुकाराम महाराज भराभर उतरवू लागले.

तुकारामांचे अभंग म्हणजे त्यांच्या निर्मळ वाणी आणि मनाचे प्रतिक होते. आपल्या जीवनातून  आणि अभंगांतून शुद्ध परमार्थधर्माच्या स्थापनेचे कार्य त्यांनी चालू ठेवले. त्यांच्या अलौकिक प्रतिभेतून निर्माण झालेल्या अमृतवाणीने सामान्य आणि प्रतिष्ठित लोकांचा समाज आकर्षित होऊ लागला.

तुकारामांनी अनेक अभंग रचले, त्यापैकी काही

सुपरिचित अभंग Sant Tukaram Abhang in Marathi/ Sant Tukaram Bhajan:

सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवुनिया ।।
तुळसी हार गळा कासे पीतांबर । आवडे निरंतर तेचि रूप ।।
मकरकुंडले तळपती श्रवगी। कंठी कौस्तुभमाणे विराजित ||
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीने ।।

सदा माझे डोळां जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोययिा ।।
गोड तुझे रूप गोड तुझे नाम | देई मज प्रेम सर्वकाळ ||
विठो माउलिये हाचि वर देई | संचरोनि राही हृदयामाजी ।।
तुका म्हणे काही न मागे आणिक | तुझे पायीं सुख सर्व आहे ||

राजस सुकुमार मदनाचा पुतळा | रविशशिकळा लोपलिया ।।
कस्तुरीमळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठी वैजयंती ।।
मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें । सुखाचे ओतले सकळ ही ।।

तुकाराम गाथा हे त्यांच्या मराठी कृतींचे एक संकलन आहे जे कदाचित 1632 ते 1650 दरम्यान रचले गेले आहे. त्यालाअभंगा गाथा असेही म्हटले जाते. भारतीय परंपरेत असे मानले जाते की यात जवळजवळ 4500 अभंगांचा समावेश आहे. प्रवृत्तीच्या संघर्षाविषयी – जीवन, कुटुंब, व्यवसाय आणि निवृत्तीची आवड असणे – त्याग करण्याची इच्छा, वैयक्तिक मुक्तीसाठी सर्व काही मागे ठेवा, मोक्ष या विषयावरील अभंगांचा त्यात समावेश आहे.

तुकारामांचे निधन Death of Sant Tukaram:

अशा प्रकारे अलौकिक व्यक्तिमत्त्व असलेल्या तुकाराम महाराजांविषयी सांगावे, बोलावे तेवढे थोडेच. ज्ञानेश्वरांनी ज्या प्रकारे महाराष्ट्रात भागवतधर्माच्या देवालयाचा पाया रचला, त्यावर संत तुकारामांनी कळस चढविला. त्यांची गाथा वाचता वाचता आपल्या देहात प्रकाश पडतो हे मात्र खरे.

मायबाप स्वतः न्यायला येणार असे त्यांना मनोमनी वाटू लागले. वैकुंठीच्या सनकादिकांनी श्रीहरीचा निरोप आणला. संत तुकाराम वयाच्या अवघ्या बेचाळिसाव्या वर्षी 9 मार्च 1650  रोजी हे जग सोडून गेले.

तुम्हाला संत तुकाराम महाराजांची माहिती, निबंध व अभंग Sant Tukaram Information in Marathi कसा वाटला? नक्की कमेंट करून सांगा…धन्यवाद!

Leave a Comment