Shalech Nirop Ghetana Nibandh शाळेचा निरोप घेताना निबंध

Shalecha Nirop Ghetana Marathi Nibandh जेव्हा मी पहिल्यांदा शाळेत गेलो, त्यावेळीचा पहिला दिवस मला आजही अविस्मरणीय आहे. शाळेतला पहिला दिवस आजही मला तेवढाच आठवतो. ते सर्व रस्ते, मुले, शिक्षक आणि वर्ग, वर्गात गेल्याबरोबर मला भीती वाटू लागली.

Shalech Nirop Ghetana Nibandh शाळेचा निरोप घेताना निबंध 100 शब्दांत

ती म्हणजे आमच्या वर्गशिक्षिका महाले मॅडम यांची! त्यांनी सर्व वर्गातील मुलं व मुलींना बघितलं. त्यानंतर पहिल्याच तासाला त्यांनी सर्वांवर छाप सोडून दिली आणि सर्व मुले शांत बसली. मी एकटेच इकडे तिकडे पाहत होते.

मला करमेना असं झालेलं होतं त्यावेळी बाई माझ्या जवळ येऊन शांततेत बोलल्या व मला म्हणाल्या, ” आज तुझा पहिला दिवस आहे ना, म्हणून तुला वेगळा वाटते परंतु तुला पण सवय होईल.” त्या संपूर्ण पहिल्या इयत्तेतील माझे सर्व दिवस लपुन छपुन आणि सर्वांपासून लांब लांब राहत भित्रेपणातच संपले. मात्र दुसर्‍या वर्षापासून मला थोडी सवय झाली व सर्वांसोबत मिळून-मिसळून वागायला मी सुरुवात केली. शिक्षणात माझी सुद्धा प्रगती होऊ लागली.

आतापर्यंत दहा वर्षातील माझे खूप सारे क्षण अविस्मरणीय आहेत. मी वकृत्व स्पर्धेत तसेच इतर स्पर्धेतही मी सहभाग घ्यायचो आणि प्रत्येक स्पर्धेत मला भाग घेतांना आनंद व्हायचा तसेच काही स्पर्धेत मला प्रथम क्रमांक आल्यामुळे माझा सत्कारही करण्यात आला होता.

पाचवीत असताना मला वर्गमंत्री देखील बनवले होते. तो अनुभव असो किंवा सर्व काही खूपच आनंददायक वाटते.
गेल्या दहा वर्षातील शाळेतील सर्व शिक्षकांचे मला मिळालेले अनमोल मार्गदर्शन व राऊत सर, सोळंके सर यांनी मला नेहमी प्रेरित केले.

Shalech Nirop Ghetana Nibandh शाळेचा निरोप घेताना निबंध 200 शब्दांत

तसेच शारीरिक शिक्षणाचे इंगळे सर हे आम्हाला विशेष व्यायामाचे धडे तसेच इतर खेळ कसे खेळायचे याबाबत दररोज शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तनाव दूर करायचे तसेच रोज खेळणे, व्यायाम करणे, कवायत यांचे प्रकार यांनी आम्हाला सांगितले. शाळेमध्ये असताना, वेगवेगळे प्रश्न पडायचे त्याचे उत्तर आम्हाला शिक्षकांकडून मिळायचे आणि त्याच बरोबर आमचे आयुष्यही घडत गेले.

माझ्याप्रमाणे इतर मित्रांना ही जीवनाची दिशा मिळण्यामागे इथले शिक्षक व इतर कर्मचारी वर्गाला त्याचे श्रेय जाते. शाळेत पाठवल्यावर आपले पालक नेहमीच आपल्या पाल्याला उत्तम घडविण्याचे स्वप्न पाहतात. मी माझे आई-वडील आणि कुटुंबीय देखील माझ्या घडल्याने शाळेबद्दल नेहमी कृतज्ञ असत.

एक विद्यार्थी घडण्यामागे एखादी शाळा खूप प्रयत्नशील असते. सर्वज्ञानी शिक्षकांचा त्या ठिकाणी संपूर्ण मेहनत, श्रम लागलेले असते. शाळेचा निरोप घेतांना गहिवरून येणे. या सर्व शिक्षकांचा तेथील सर्व कर्मचाऱ्यांचा आपल्या मित्र-मैत्रिणींचा आपल्याला लळा लागलेला असतो. त्यामुळे जेव्हा शाळेचा निरोप आपण घेतो, त्यावेळेस गहिवरून येणे सहाजिकच आहे.

स्वतःच्या स्वप्नांना बळ मिळण्याचे काम केवळ शाळेतच होत असते. हे सर्व विचार एकत्र मनात गर्दी करू लागले की, आपल्याला शाळेप्रती व शिक्षकांप्रति नतमस्तक व्हावे असे वाटते.

आमच्या शेवटच्या पूर्वपरीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी आमच्या शाळेने निरोप समारंभ आयोजित केला होता. समारंभासाठी बरोबर दुपारी दोन वाजता आम्ही शाळेत गेलो होतो. शाळा आज मला वेगळीच वाटत होती. प्रवेशद्वारा पुढे शोभिवंत रांगोळी रेखाटली होती आणि सारे शिक्षक आम्हा विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उभे होते.

Shalech Nirop Ghetana Nibandh शाळेचा निरोप घेताना निबंध 300 शब्दांत

त्यांच्या या स्वागताने आम्ही सारे भारावून गेलो सभागृह आज नव्या नवलाईने नटलेली दिसत होते. आज व त्यांनी शाळेत उत्कृष्ट यश मिळवून दिले अशा गुणवंत विद्यार्थ्यांची छायाचित्रे सभोवताली स्टॅन्डवर लावून ठेवली होती. तेवढी कल्पकता होती त्यात! या सार्‍या प्रतिमा आम्हाला जणू प्रेरणा देत होत्या.

जणूकाही हे यश मिळवायचे आहे. शाळेचा लौकिक वाढवायचा आहे असे जणू त्या आम्हाला सुचवत होत्या जागोजागी वेगवेगळ्या सुगंधित फुलांच्या आरास केल्यामुळे सारे वातावरण सुगंधित झाले होते. ठरलेल्या वेळी कार्यक्रमाला सुरुवात झाली. आमचे शाळेचे अध्यक्ष निरोप समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. मुख्याध्यापकांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तेव्हा एक सुखद धक्का बसला कारण शाळेचे अध्यक्ष आमच्याच शाळेचे माजी विद्यार्थी होते व त्यांचे नाव शाळेच्या सन्माननीय विद्यार्थ्यांच्या यादीत झळकत होते.

हा समारंभ अगदी साध्या पद्धतीने पार पाडला गेला. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे या समारंभात भाषणाची आतिषबाजी नव्हती. आमच्या बॅचने गेल्या दहा वर्षात मिळवलेल्या यशाचा आढावा मुख्याध्यापकांनी मोजक्या शब्दात सांगितला. पाहुण्यांनीही अगदी मोजक्या शब्दात आपल्या जीवनातील यशाचे श्रेय शाळेकडे कसे जाते हे विनम्रपणे सांगितले.

विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याकडून एक मताने निवड झालेल्या आदर्श विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांना भाषण करण्यास पाचारण करण्यास सांगितले पण नेहमी वक्तृत्व स्पर्धा गाजवणारे सारे वक्ते मात्र आज भारावून गेले होते. तसेच तेथील वातावरण सुद्धा गंभीर झाले होते. कोणाच्याही कंठातून शब्दच फुटत नव्हते.

सर्वजण एकमेकांकडे कुतुहलाने पाहत होते. सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आले होते. हा वातावरणातील उदास व गंभीरपणा थोडा तरी कमी व्हावा म्हणून काही गमतीदार खेळ सुरू करण्यात आले व नंतर जेवणाचा कार्यक्रम होऊन कार्यक्रमाची सांगता झाली आणि मनात विचार आला आज आम्ही या शाळेचा निरोप घेत आहोत. परंतु यापुढे आम्ही आयुष्यात कधीही या बाकावर विद्यार्थी म्हणून बसणार नाही.

Shalech Nirop Ghetana Nibandh शाळेचा निरोप घेताना निबंध 400 शब्दांत

ज्या शाळेत आम्ही जवळ जवळ दहा वर्ष खेळलो, शिकलो तसेच रडलोही या शाळेत आमच्या पाठीवर शाबासकीची, कौतुकाची थाप बसली. तसेच कधी मार ही बसला, शिक्षाही झाली परंतु या शाळेला सोडून कसं जावे हे कळत नव्हतं. असं वाटायचं की, आपण त्याच शाळेत प्रवेश घ्यावा व पुन्हा त्या बाकावर विद्यार्थी मित्रांमध्ये खेळलो व शिक्षक आपल्याला शिकवायला असावेत परंतु पुढच्या आयुष्याच्या दृष्टीने तस होणे शक्य नाही.

हे ही कळत होतं. ज्याप्रमाणे एखादा कुंभार मडके घडवतो. त्याचप्रमाणे शिक्षक विद्यार्थ्यांना घडवत असतात. जे शिक्षक देतात ते विद्यार्थ्यांची आयुष्यभराची शिदोरी असते. अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारे हे शिक्षकच असतात. याच शाळेने आम्हाला ज्ञान तसेच समाजातील दुर्बल घटकांना आपलं मानून भुकेल्यांना अन्न, निराधारांचा आधार बेघरांना आश्रय देणे हे आमचं कर्तव्य असेल आणि हे कर्तव्य आम्ही योग्यपणे पार पाळू. आंधळ्याची काठी होऊन जगाला तुम्हीच शिकवल्याचा अभिमान आज आम्हाला होत आहे.

समारंभ संपला तरीही आम्हाला तेथून निघून जावे असे वाटत नव्हते. त्या शाळेत आमच्या शालेय जीवनातील अनेक आठवणी निगडित झालेल्या होत्या. त्या स्मृतींना किंवा आठवणींना उजाळा देत गुरुजनांचा आणि मित्रांचा निरोप घेऊन मी शाळे बाहेर पाऊल टाकले मागे वळून पाहिले डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंमुळे शाळेचा सारा परिसर अंधुक दिसत होता. शालेय जीवनातील ते सुंदर दिवस हरपले. या विचाराने उर दाटून आले होते. मात्र पुढच्या यशस्वी जीवनाच्या मार्गाने पुढे पाऊल टाकायचे होते.

आज जे विद्यार्थी शाळेचा निरोप घेऊन जाणार आहे. तेच उद्या निरनिराळ्या क्षेत्रात गरुड झेप घेणार आहेत. असे उंच उंच झेप घेताना त्यांच्या मनात एक जाणिव सतत जागृत राहणार आहे. आपल्या पंखात जे बळ आलय ते आपल्याला आपल्या शिक्षकांनी दिलं आणि आम्हाला ज्ञानामृत तसेच आमच्या चैतन्य व शिक्षकांनी आम्हाला ध्येय पथावर धावायला शिकवलं.

विद्यार्थी कितीही मोठा झाला तरी आपल्या शिक्षकांना तो लहानच असतो. या सर्व गोष्टींचा विचार मनात आला व मन गहिवरून आले. परंतु मनाने एक निश्चय केला की, आम्ही जात आहोत परंतु राष्ट्राला अपमानीत किंवा लाजेने मान खाली जाईल असे एकही कृत्य आम्ही करणार नाही. आमच्या हातून वाईट कृत्य घडणार नाही. ही शपथ मी तेथेच घेतली व शाळेचा निरोप घेतला.

तुम्हाला आमचा ”Shalech Nirop Ghetana Nibandh शाळेचा निरोप घेताना…” निबंध कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. रोजच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या  बातमी मराठी Batmi Marathi या ब्लॉगला अवश्य भेट द्या

Leave a Comment