Shalecha Nirop Ghetana Nibandh Marathi | शाळेचा निरोप घेताना निबंध

Shalecha Nirop Ghetana Nibandh Marathi नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शाळेचा निबंध बघणार आहोत. शाळा म्हटली की आठवते ते बालपण. खाकी पॅंट पांढरा शर्ट, खांद्यावर दप्तर, आणि डबा असे रोज शाळेमध्ये आम्ही जायचो. शाळेचा पहिला दिवस आठवतो.  ओळखीच्या नसलेल्या विश्वामध्ये पाऊल टाकताना  असुरक्षितता आणि मनामध्ये भीती होतीच परंतु यापलीकडे होता तो आनंद किंवा शाळेमधल्या गमती जमती.

Shalecha Nirop Ghetana Nibandh Marathi

शिक्षक म्हटलं की स्वभाव वेगवेगळे आलेच, कोणाचा स्वभाव तापट तर कोणाचा मऊ होता. कोणते शिक्षक बुटके तर कोणते फारच उंच. शिक्षक कशी असो परंतु त्यांनी आमच्या कलागुणांना वाव दिला त्यांच्या अनुभवाची साथ देऊन आम्हाला घडवण्याचं काम केलं.

चार पुस्तके वाचायला मिळाली. कुणी इंग्रजीला घाबरत असते तर कोणी गणिताला. कुणीकुणी तर असेही होते की ज्यांना सर्वच विषयाचा ताप होता. आणि कुणाला कोणताही विषय सोपा जायचा. मग काय आपल्या परीने सर्व चालायचं.

शाळेचा निरोप घेताना निबंध

शाळा मात्र तीच, मुलं बदलले शिक्षक बदलले परंतु ती मात्र आजही आहे त्या परिस्थितीत आहे. आम्हाला ज्ञानाचा झरा असणाऱ्या आमच्या शाळेवर आमचे नितांत प्रेम राहिले. माझ्या वर्ग मित्रांना शिक्षकांना व प्राचार्यांना निरोप देताना मन भरून आले. का देतात हा निरोप, जीवनभर नाही चालणार का शाळा असा विचारही मनात डोकावून गेला.

किती चांगले झाले असते की आपण आयुष्यभर एका शाळेत राहीलो असतो. उद्या आम्ही आमच्या वाटा वेगवेगळ्या शोधणार होतो कारण निरोप समारंभ म्हटलं की त्यानंतर कोणीच कुणाला भेटणार भेटणार नाही.  निरोप मतलब कामं गहिवरुन येत. रंजन शिक्षकांनी आम्हाला घडवलं त्यांना असे अचानक सोडून जाणे कसे काय जमणार, आमच्या शाळेच्या एका भिंतीवर लिहिलं होत. “यावे ज्ञानासाठी आणि जावे देण्यासाठी म्हणजे सेवेसाठी”

आज माझ्या शाळेचा निरोप समारंभ होता. शाळेकडे जावस वाटत नव्हतं. एकमेकांना सोडून जावं लागेल, शाळाही सोडून जावे लागेल या भीतीने शाळेकडे पावलं  वळत नव्हती. मी या शाळेत दहा वर्ष राहलो. पहिलीपासून ते दहावीपर्यंत या शाळेत शिकलो ज्ञान अर्जित केलं. गुरुजनांनी कधी पाठ थोपटली तर कधी बदडलं सुद्धा.

कशी वर्षे निघून गेली कळलंच नाही परंतु आता शाळा सोडून जावं लागणार होतं. दुःख होत होतं आणि आनंदही कारण दुःख अशासाठी की दहा वर्षे राहिलेली शाळा आता सोडावी लागणार आणि आनंद ह्याकरता की कॉलेजला जायला मिळणार, नवीन ज्ञान मिळणार, नवीन वाटा मिळणार. प्रत्येक शिक्षकाचा काही ना काही वैशिष्ट्य होता त्यांच्याशी दोस्ती सुद्धा झाली.

Shalech Nirop Samaranbh

या शाळेमध्ये चांगले मित्र भेटले एकत्र बसून डबा सुद्धा खाल्ला. शाळेमध्ये खूप मस्ती करायचो शाळेची सुट्टी चांगली वाटायची नाही. शाळेच्या निरोप समारंभाच्या दिवशी शाळेने आपल्याला काय काय दिलं शाळेसाठी आपले योगदान काय ज्ञान किती मिळालं चुका किती केल्या या सर्वांची गोळाबेरीज मनामध्ये सुरू झाली.

माझे मन निरोप समारंभा मध्ये लागते ना कारण पुतळा मध्ये काय काय केलं हेच आठवत होतं भूतकाळ किती रम्य होता हे आठवून मन उदास झालं की आता ते दिवस मिळणार नाहीत मित्र मिळणार नाहीत,  शिक्षक मिळणार नाहीत आपुलकीचं बोलनं मिळते किंवा नाही ते ही माहित नाही.

शाळेचा निरोप समारंभ

आता आम्ही दहा वर्ष बसलेल्या बाकांवर बसणार नाही. शिक्षकांनी निरोप समारंभाच्या दिवशी शासनामध्ये आमचं कौतुक केलं काही विद्यार्थ्यांच्या गमतीजमती सांगितल्या मुख्याध्यापकांनी तर आमच्या दहा वर्षाची उजळणी करून टाकली. मुलांनी व मुलींनी भाषणे दिली आपापले अनुभव सांगितले गुरुजनांचा कार्य सांगितलं परीक्षेतील मार्क सांगितले पुढे काय करणार हे सुद्धा सांगितले.

माझा नंबर आला. मी पहिलेच वाक्य बोललो, “विद्यार्थी कितीही मोठा झाला तरी आपल्या ग्रुप पेक्षा तो लहानच असतो”. कारण आमच्या गुरूंनी आम्हाला ज्ञानामृत पाजलं होतं. तेच ज्ञान घेऊन आम्ही पुढे जाउ चैतन्य निर्माण करू आमच्या ध्येय पथावर धावायला तुम्ही आम्हाला शिकवलं. सर्वांनी टाळ्या वाजवल्या.

दहा वर्षाचा उलगडा करून मी सर्वांचा निरोप घेतला तेव्हा डोळ्यांमध्ये खूप अश्रू होते. कारण दहा वर्षाचे सोबती आता माझ्यापासून दूर जाणार होते कोणी कधी भेटलं तर नक्की भेटेल. जीवनात माझी गरज भासली तर नक्की सांगा मी मदतीला हाजीर होईल. असं बोलून मी सर्वांचा निरोप घेतला.

विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शाळेचा निरोप घेताना निबंध Shalecha Nirop Ghetana कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि हो तुमचा अनुभव कसा होता हेही सांगा.

 

Leave a Comment