Shalecha Shipai essay in Marathi language | शाळेचा शिपाई मराठी निबंध

Shalecha Shipai essay in Marathi language शाळा, बँक, ऑफिस, मॉल इत्यादी क्षेत्रात शिपाई हा अत्यंत महत्त्वाचा कर्मचारी असतो. किंवा कोणतीही संस्था असो त्यामध्ये शिपायाला महत्त्व असतेच. कार्यालयाच्या किंवा संस्थेच्या अधिकाऱ्यांचे आदेश कनिष्ठ कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचविणे हे त्याचे कार्य असते. इतर शाळांप्रमाणे आमच्या शाळेत रामू नावाचा शिपाई आहे. तो आमच्या गावचा राहणारा आहे. त्यामुळे आम्ही त्याला रामुकाका असे म्हणत असो, परंतु त्याचे नाव तर रामजी असे आहे.

त्याची उंची पाच फूट आहे, पण शरीर सुदृढ आहे. तो एक गौरवर्ण व उत्साही मनुष्य आहे.  तो दहावी शिकलेला आहे. सध्या त्यांचे वय 40 वर्ष आहे. तो विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. पत्नी व मुले, व त्यांची आई यांच्यासोबत आपल्या कुटुंबात राहतो. परंतु रामजीला शाळेचा शिपाई असल्यामुळे त्याला शाळेमध्ये राहावे लागते म्हणून रामजीला शाळेतच एक खोली राहण्यासाठी मिळाली आहे. तो तिथेच राहतो व आपल्या घरीही जाऊन मुलाबाळांची भेट घेऊन येत असतो. रामू काकाला अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. शाळा बंद झाल्यावर चौकीदाराचे काम करावे लागते.

सकाळी शाळा सुरू होण्यापूर्वी मुख्याध्यापकाचे कार्यालय झाडून पुसून स्वच्छ करावे लागते. त्यानंतर तो शाळेच्या कार्यालयांची साफ-सफाई करतो. नंतर गणवेश घालून शाळेच्या मुख्य फाटकाशी उभा राहतो. खाकी पँट, शर्ट, घालतो.  त्यांचा बहुतांश वेळ हा शाळेमध्ये येत जातो, त्यामुळे त्यांना शाळेचा एक सैनिकही म्हटले तरी चालेल. शाळेची एवढी काळजी घेणारा माणूस वेळ प्रत्येक विद्यार्थ्यांची काळजी घेणारा, जणू काही तो जर नसता तर शाळेची जी कार्यपद्धती आहे, त्यामध्ये खूप तफावत असते कारण वरिष्ठ व कनिष्ठ कर्मचाऱ्यांमध्ये शिपाई हा एक महत्त्वाचा दुवा असतो.

शाळेमध्ये भविष्यात होणाऱ्या मीटिंगा यांची सूचना सर्व विद्यार्थ्यांना तसेच सर्व शिक्षकांना देण्याचे काम शाळेचा शिपाई करत असतो. शाळेमध्ये कोणताही कार्यक्रम असला तरी त्याचे मॅनेजमेंट जरी वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी पैकी करत असले तरीही त्याच्या हाताखाली शिपायाची गरज भासते. पालकांची मीटिंग असो किंवा शाळेतील शिक्षकांची मिटिंग असो त्याची व्यवस्था ही शिकायलाच करावी लागते. मुख्याध्यापक येताच त्यांची बॅग त्यांच्या कार्यालयात नेऊन ठेवतो. भेटावयास येणाऱ्या पालकांना किंवा इतर व्यक्तिंना बाहेर बसवितो. मुख्याध्यापकांची परवानगी मिळाल्यानंतर क्रमाक्रमाने त्यांना आत पाठवितो. मुख्याध्यापकांचे आदेश तो इतर शिक्षकापर्यंत पोहोचवितो. तास पूर्ण झाल्याची घंटी वाजवितो. मुख्याध्यापकांसाठी चहापाण्याची व्यवस्था करण्याचे कामही त्यालाच करावे लागते.

रामुकाका स्वभावाने अत्यंत नम्र व आज्ञाधारक आहे. तो प्रत्येक शिक्षकाशी व इतर कर्मचाऱ्यांशी आदराने बोलतो. तो मुलांचे लाड करतो. एकदा शाळेत माझी प्रकृती बिघडली तेव्हा त्यानेच मला रिक्षा करून घरी नेले. शाळेच्या आवारात क्वार्टरमध्ये राहणाऱ्या शिक्षकांची कामे करून तो 50-100 रु. आणखी कमावतो. पगाराचा मोठा हिस्सा तो आपले आई वडील बायको मुलांसाठी खर्च करतो किंवा मग उपयोगी पडण्यासाठी बचत करतो. रामजी कर्तव्यतत्पर व प्रामाणिक आहे. जर त्याला कुणा विद्यार्थ्याची किंवा शिक्षकांची एखादी वस्तू सापडली तर तो कार्यालयात जमा करतो.

एकदा एका विद्यार्थ्याच्या आईची पर्स शाळेतच विसरली. घरी गेल्यावर ही गोष्ट तिच्या लक्षात आली ती सरळ रामू काकाकडे गेली. परंतु त्याने पर्स लगेच मुख्याध्यापकांकडे जमा केली होती. रामुकाकांच्या प्रामाणिकपणावर खुश होऊन तिने काकाला पन्नास रुपये बक्षीस म्हणून देण्यास आपल्या पर्स मधून काढले परंतु रामुकाकांनी ते माझे कर्तव्य होते म्हणून बक्षीस घेण्यास नकार दिला. आमचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी सगळ्यांनाच रामू काका आवडतो. खरंच तो अतिशय चांगला माणूस आहे. तो दिवसभर शाळेतील कामांमध्ये व्यस्त असतो. अशा शिपायाची शाळेला खरोखर गरज असते.

मात्र शासनाने तर आता वेगळाच निर्णय घेण्याचे ठरवले आहे त्याविषयी माहिती पाहूया.
शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार राज्यातील प्रत्येक प्राथमिक शाळेत 500 हून अधिक विद्यार्थ्यांमागे एक शिपाई आणि एक लिपिक नियुक्त करणे अनिवार्य आहे. मात्र आता विद्यार्थी संख्येचे गणित मांडून शिक्षण विभागाकडून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अतिरिक्त पदे रद्द करण्याबरोबरच नव्याने ही पदे भरण्यास मंजुरी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील बहुसंख्य ग्रामीण आणि डोंगराळ भागातील प्राथमिक शाळांतील शिक्षकांनाच आता लिपिकासह शिपायाचीही कामे करावी लागणार आहेत. शिक्षण विभागाच्या या निर्णयाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याचे शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी सांगितले. राज्यातील माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थी व तुकडय़ांच्या आधारे लिपिक, शिपाई, प्रयोगशाळा सहाय्यक ही पदे मंजूर केली जातात.

अनुदानित प्राथमिक शाळांमध्ये 500 पर्यंत विद्यार्थी संख्या असल्यास एकही लिपिक अथवा सेवकाचे पद मंजूर केले जात नाही. त्यातही आता ही पदेच कायमची रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने यापुढे ग्रामीण, आदिवासी आणि डोंगराळ भागातील कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनाही कार्यालयीन कामकाज, शाळेची साफसफाई आदी कामे कामे करावी लागणार आहेत. अनुदानित शाळांमधील शिपाई पद यापुढे हद्दपार होणार आहे. शिपायाची नेमणूक न करता अशा शाळांना संबंधित कामे करून घेण्यासाठी शासनाकडून ठरावीक भत्ता दिला जाणार आहे. जिल्ह्यात अशा भत्त्याकरिता शाळांकडून प्रस्ताव मागविण्यात आले असून ते प्रस्ताव तत्काळ पाठविण्याचे आवाहन माध्यमिक शिक्षण अधिकारी बी.जे. पाटील यांनी केले आहे. शाळेतील शिक्षक संख्या पटसंख्यानुसार निश्चित केली जाते. तर आता शाळेतील शिपायाचे पदही विद्यार्थ्यांच्या संख्येनुसारच मंजूर केले जात आहे.

परंतु, यापुढे अनुदानित शाळांमधील शिपाईपदच व्यपगत करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयानुसार, यापुढे कोणत्याही शाळेला शिपाई नेमणुकीसाठी मंजुरी मिळणार नाही. तसेच सध्या कार्यरत असलेले शिपाई मात्र, निवृत्तीपर्यंत कायम राहणार आहेत. ते निवृत्त झाल्यावर मात्र संबंधित जागा भरण्याची परवानगी नाही, अशी जागा भरल्यास त्याचे वेतन अनुदान शासनाकडून दिले जाणार नाही. अनुदानित शाळांमधील शिपाई पद यापुढे हद्दपार होणार आहे. शिपायाची नेमणूक न करता अशा शाळांना संबंधित कामे करून घेण्यासाठी शासनाकडून ठरावीक भत्ता दिला जाणार आहे. जिल्ह्यात अशा भत्त्याकरिता शाळांकडून प्रस्ताव मागविण्यात आले असून ते प्रस्ताव तत्काळ पाठविण्याचे आवाहन माध्यमिक शिक्षण अधिकारी बी.जे. पाटील यांनी केले आहे. शाळेतील स्वच्छता व अन्य शिक्षणेतर कामे पाहता, शिपाईपद महत्वाचे आहे. ही कामे शाळांना करून घेता यावी, या उद्देशाने शासनाकडून ठरावीक भत्ता दिला जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात किती शाळांमध्ये किती शिपाई कार्यरत आहे, किती शाळांमध्ये शिपाईपद रिक्त झाली आहेत, किती शाळांमध्ये ही पदे येत्या काळात रिक्त होणार आहेत, याबाबतचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडून मागविण्यात आला आहे.

अनुदानित शाळांमधून यापुढे शिपाई पद हे हद्दपार होणार आहे, तसे आदेशही काढण्यात आले आहे़. आता शिपाई भत्ता दिला जाणार आहे. त्यामुळे भत्त्यासाठी जिल्ह्यातील शाळांनी तत्काळ प्रस्ताव पाठवावे. म्हणून आता रामुकाका सारखे शिपाई आपल्याला मिळणार की, नाही हे एक भाकीतच आहे. तुम्हाला हा निबंध कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Shalecha Shipai essay in Marathi language.

Share on:

Hey there! This is Supada Bochare, a student of engineering and a blogger. Blogging is my Passion. I love to write articles on different topics. I also like to do things related to WordPress, Digital Marketing and Latest technologies.

Leave a Comment

x