भगवानबाबा | Shri Sant Bhagwan Baba

भगवानबाबा | Shri Sant Bhagwan Baba श्री संत भगवान बाबा Shri Sant Bhagwan Baba यांचे खरे नाव आबाजी तुबाजी सानप (जन्म 29 जुलै 1896 ला आणि मृत्यू 18 जानेवारी 1965) ते वारकरी संप्रदायातील एक महान संत आहेत भगवानबाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांमध्ये कीर्तनाच्या माध्यमातून संस्कृती नैतिक सामाजिक शैक्षणिक प्रबोधन केलेले दिसते भक्तिमार्ग ज्ञानमर्ग व कर्ममार्ग यांचा त्रिवेणी समन्वय त्यांनी साधला होता.

त्यांच्या कीर्तनातून हा त्रिवेणी संगम नेहमी दिसायचा ते एक चांगले कीर्तनकार होते त्यांनी कीर्तनातून धर्मभेद जातीभेद अज्ञान अंधश्रद्धा अनिष्ट रुढी-परंपरा यांच्यावर वार केलेला दिसतो.

समाजाचे प्रबोधन करण्यासाठी त्यांनी विदर्भ, मराठवाडा, आंध्रप्रदेश, कर्नाटकातील काही जिल्हे, पश्चिम महाराष्ट्र, तेलंगणा अशा प्रकारे संपूर्ण परिसर पिंजून काढला. त्यांनी आधुनिक विचारांचा प्रचार केलेला दिसतो. त्यामुळेच वारकरी धर्माला आधुनिक रूप देणारे संत म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी वार्षिक नारळी सप्ताहाची स्थापना केली.

जन्म आणि बालपण

भगवान बाबा हे वंजारी जातीत जन्मलेले होते. त्यांच्या आईचे नाव कौतिकाबाई आणि वडिलांचे नाव तुबाजीराव सानप त्यांच्या घरात पाटीलकी होती. म्हणून ते आपल्या आडनावाच्या मागं पाटील असे उपनाम देखील लावत असत. त्यांच्या घराण्यात पिढ्यानपिढ्या विठ्ठल भक्ती आणि पंढरपूरची वारी होती शिकर्डीपारडी हे त्यांचे मूळ गाव परंतु, त्यांचे पूर्वज बीड जिल्ह्यामधील पाटोदा तालुक्यातल्या सुपे घाट सावरगाव येथे स्थायिक झाले होते.

गावामध्ये चौथीपर्यंत शाळा होती. तेव्हा त्यांच्या शिक्षकांच्या सांगण्यावरुन पुढील शिक्षणासाठी त्यांना त्यांच्या मामाच्या गावी लोणी तालुका- शिरूर जिल्हा- बीड येथे पाठवले गेले. जास्तीच्या शिक्षणाची सोय नसल्याने आबाजी पुन्हा आपल्या गावी परतले. नंतर त्यांनी ग्रामीण भागामध्ये रीतिरिवाजानुसार गुरेढोरे राखायला सुरुवात केली. त्यांना गुरांची निगराणी व शेती करणे खूप आवडायचे. त्यांच्या घरामध्ये धार्मिक वातावरण होते. त्यामुळे त्यांना विठ्ठल नामाची आणि अध्यात्माची आवड निर्माण झाली. ते शेतीकाम सांभाळून विठ्ठल भक्ती देखील करत. पंढरपूरच्या दिंडीत जाण्यास त्यांनी सुरुवात देखील केली. प्रख्यात वारकरी गीतेबाबा यांच्यासोबत प्रथम दिंडीत गेले.

पंढरपुरला गेल्यानंतर तेथेच त्यांची भेट नारायणगड येथील माणिक बाबांशी झाली, आणि ते सांप्रदायिक शिक्षणासाठी नारायणगडावर गेले. माणिक बाबा हे त्यांचे गुरू आहेत. त्यानंतर भगवानबाबा पुढील शिक्षण घेण्याकरता आळंदी येथील ह.भ.प. श्री बंकट स्वामी यांच्याकडे गेले. त्यानंतर ते पुन्हा नारायणगडावर आले. भगवान बाबांचे त्या वेळचे वय 21 वर्षे होते. नंतर ते नारायणगडाचे महंत झाले आणि तेथे त्यांनी नारळी सप्ताह आणि वारी असे अनेक धार्मिक कार्यक्रम राबवले.

भगवान बाबांची गुरुपरंपरा भगवानगडाच्या मान्यतेनुसार आपणास पुढील प्रमाणे सांगता येईल.

नारायण> ब्रह्मदेव> अत्रीऋषी >दत्तात्रेय> जनार्दन स्वामी> संत एकनाथ> गावोबा किंवा नित्यानंद> अनंत >दयानंद स्वामी पैठणकर >आनंदऋषी> नगद नारायण महाराज >महादेव महाराज पहिले >शेटी बाबा >दादासाहेब महाराज आपण त्यांना म्हणतो गोविंद महाराज म्हणतो> नरसु महाराज> महादेव महाराज दुसरे> माणिक बाबा> भगवानबाबा.

भगवान बाबांनी पारमार्थिक गुरु संत म्हणून नामदेव बाबांना. मानले होते.

शिक्षण

एकदा बंकट्स्वामी हे नारायण गडावर आले होते. माणिकबाबांनी भगवानबाबांना बंकट स्वामी च्या स्वाधिन करुन टाकले. बंकट स्वामींनी भगवानबाबांना आळंदी येथील वारकरी संस्थेमध्ये नेले. बंकट्स्वामी यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला होता. नंतर त्यांनी तिथे संन्यासी धर्म स्वीकारला.

भगवान बाबांचे कार्य

भगवान गडावर महाराज परत आल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी पंचक्रोशी मधील भाविक येऊ लागले होते. त्या सुमारास बंकट स्वामींच्या कीर्तन प्रचारात साठी वार्ता कानी पडल्याने त्यांनी प्रभावित होऊन समाज प्रबोधन करण्याचा निश्चय केला. भाविकांच्या आग्रहास्तव भगवान बाबा कीर्तन करू लागले.

भगवान बाबांनी 1918 मध्ये नारायणगड पासून पंढरपूर पर्यंत पायी दिंडी चालू केली आणि म्हणूनच तेव्हापासून नारायणगडाला ‘धाकटी पंढरी’ असे सुद्धा म्हणतात.

1927 मध्ये त्यांनी नाथषष्ठी निमित्त पैठण पर्यंत दिंडी सुद्धा चालू केली आणि पुढे सात दिवस अखंड हरिनाम सप्ताह सुद्धा सुरू केला. त्यांनी पहिला अखंड हरिनाम सप्ताह 1934 मध्ये पखालडोह या ठिकाणी केला. भगवानबाबांनी नारायणगडावर होते तोपर्यंत सतरा हरिनाम सप्ताह केले.

माणिक बाबा आजारी असल्याची बातमी भगवानबाबांना कळताच ते ताबडतोब नारायणगडावर आले. माणिकबाबांनी हात वर करून त्यांना जवळ बोलावले आणि म्हटले “भगवान तुझ्यावर गडाची आता सर्व जबाबदारी राहील”. त्यानंतर माणिकबाबांनी आपला देह ठेवला.

भगवानबाबांवर लोभाचा आळ घेण्यात आला. त्यामुळे त्यांनी नारायण गड सोडला. खरवंडी येथील बाजीराव पाटील भगवानबाबांना धौम्यगडावर गडावर घेऊन गेले. भगवान बाबा आसपासच्या गावांमध्ये गेले आणि त्यांनी लोकांना वारकरी संप्रदायाकडे वळविले. त्यानंतर भगवानबाबांनी धौम्य गडाचा जीर्णोद्धार केला याकरता भक्तांनी त्यांना भरघोस मदत केली. गड उभारणीचे काम सुरू झाले. गडाची उद्घाटन मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते 1 मे 1958 रोजी झाले. यावेळी यशवंतराव चव्हाण म्हणाले की, “धर्मरक्षणासाठी भगवानबाबांनी भक्तांना एकत्र करून शास्त्राच्या आधाराने भक्तीचा गड उभारण्याचे काम केले आहे आजपासून धौम्यगड हा भगवान गड म्हणून ओळखला जावा”.

 

 

Leave a Comment