Veleche Mahatva Essay in Marathi Language | वेळेचे महत्व निबंध

Veleche Mahatva Essay in Marathi Language मानवी जीवनात वेळेचे खूप महत्त्व आहे. आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वेळेत काम करण्याचा प्रयत्न करीत असतो. पण ते कधी कधी शक्य होत नाही. ऑफिसला जायला उशीर होतो. शाळेत जायला उशीर होतो. जेवायला उशीर होतो तर कधी शेतात जायला उशीर होतो. अशी अनेक कारण आपल्याला सांगता येतील.

वेळेचे महत्व निबंध 100 शब्दांत  Veleche Mahatva Essay in Marathi Language

या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनामध्ये मनुष्य सर्व गोष्टींचे नियोजन करताना आपल्याला दिसून येतो; परंतु परत न येणाऱ्या वेळेचे मात्र तो नियोजन करत नाही. पैशाने सर्व काही विकत घेता येते. सोयीसुविधा, अन्नपाणी परंतु गेलेला वेळ हा पैशाने ही आपल्याला परत मिळवता येत नाही. जाणारा एक एक क्षण हा आपल्यासाठी मौल्यवान असतो. जेव्हा सकाळी आपण लवकर उठत नाही, म्हणून आपल्यासाठी सूर्य उगवत नाही किंवा वेळ थांबलेली असते, असे कधीही होत नाही. मानवाचे जीवन हे नदीच्या प्रवाह सारखे आहे. ज्याप्रमाणे नदी उंच-सखल रस्ते ओलांडून जाते. त्याचप्रमाणे मानवाचे जीवन हे सुख दुःख झेलून जात असते.

जीवनाचा मुख्य उद्देश दुःख, संकटांवर मात करून पुढे जाणे हा असतो आणि जीवन जगत असताना आनंदी जीवन जगणे हे महत्वाचे असते. आपण जेव्हा सकाळी उठतो, त्या आधी पक्षी उठून त्यांच्या कामाला लागलेले असतात. आपणास मात्र आपली कामे ही स्वतःहून करावीशी वाटत नाही. झोपेतून उठण्यासाठी ही आई आवाज देते. तोंड धुणे, स्नान करने साऱ्या कामांसाठी आईला सांगावी लागते. पशुपक्षी पहाटेच उठून आपल्या कामाला लागतात. आपण त्यांच्यापेक्षा बुद्धिमान असूनही दररोज नियमितपणे स्वतःहून आपली कामे करत नाहीत.

वेळेचे महत्व निबंध 200 शब्दांत  Veleche Mahatva Essay in Marathi Language

प्राण्यांना वेळ समजते कोणत्या वेळी काय करावे, हे त्यांना फार चांगले माहीत असते. मुंग्यांचं बघा पहाटेपासून रात्रीपर्यंत सारख्या त्यांच्या कामात असतात. अगदी शिस्तीने रांगेत जात असतात, कामे करून शिस्तीने परत येतात. आपणास तर अरे तुला शाळेत नाही का जायचे? अशी आठवण आईने करून द्यावी लागते. वेळेवर शाळेत जाणे वेळेवर घरी येणे वेळच आपल्या जीवनात खूप महत्त्वाचे आहे. वेळीच आपला अभ्यास करणे इत्यादी गोष्टी वेळेच्या आत केल्या गेल्या पाहिजेत. तरच आपणास वेळेचे महत्त्व समजू शकेल पशुपक्ष्यांना समजते ते आपण समजू का नाही?

यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही. गेलेली वेळ कधीच परत येत नसते म्हणतात, धनुष्यापासून सुटलेला बाण, तोंडातून उच्चारलेला शब्द आणि गेलेली वेळ ही कधीही परत येत नाही. काळ कोणासाठी थांबत नसतो. आला क्षण कारणी लागला तर आपण सुखी होतो. मग वेळ फुकट घालायचा. उगाच आळसात वेळ घालवणे, उगाच हिंडत राहणे, आपला अभ्यास सोडून खेळात दंग राहणे. वर्गात झालेला अभ्यास न करता गप्पा मारत बसणे दररोज नियमितपणे अभ्यास न लिहिणे गृहपाठ वेळेस व व्यवस्थित अभ्यास करून लिहिणे ही सारे वेळ फुकट वाया घालवायचे लक्षणे आहेत.

वेळेचे महत्व निबंध 300 शब्दांत  Veleche Mahatva Essay in Marathi Language

आपला बहुमोल वेळ आपण असाच वाया घालवत असतो. मित्रांनो ज्यांनी आपल्या जीवनात चांगले यश संपादन केले आहे, अशा थोर पुरुषांची चरित्रे वाचा. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीशी सामना देत अविरतपणे अभ्यास करून कष्ट करून आपले जीवन यशस्वी केलेले आहे.
संपूर्ण जग जिंकायला निघालेल्या सिकंदराला देखील आपल्या अंतिम क्षणांमध्ये संपूर्ण राज्य दान देऊन सुद्धा एक क्षणही विकत घेता आला नाही. संपूर्ण जग हे वेळेचे गुलाम आहे.

प्रत्येक व्यक्ती घड्याळ्याच्या काट्यावर धावत असतो. वेगवेगळ्या ऑफिस मध्ये काम करणारे लोक यांना रेल्वे, बस वाहतूक साधनांमध्ये प्रवास करताना काही क्षण जरी उशीर झाला, तरी देखील त्यांचे दिवसभराचे नियोजन विस्कळीत होते. एवढेच काय परंतु विविध स्पर्धांमध्ये भाग घेणारी स्पर्धक अवघ्या काही क्षणांनी स्पर्धेतील बक्षिसे गमावून बसतात.

त्यावेळी आपल्याला वेळेचे महत्त्व समजते आणि ज्यावेळी बाळाला जन्म देते. त्यावेळी डॉक्टरांना यायला थोडा जरी उशीर झाला, तरी देखील आपल्याला पळता भुई थोडी होते. परीक्षेमध्ये पेपर लिहितांना आपली नजर सारखी घड्याळाकडे वळत असते. प्रिय आणि जिवाभावाच्या व्यक्तींना भेटी वेळेस वेळ सरता सरत नाही. त्या वेळचा थोडा वेळ देखील खुप मोठा कालावधी सारखा आपल्याला असतो.

वेळेचे अगदी काटेकोरपणे पालन करणारे लोक जसे की, अमिताभ बच्चन, श्री रतन टाटा, धीरूभाई अंबानी ही माणसे अतिउच्च शिखरापर्यंत पोहोचलेत. वेळ ही एक मात्र अशी गोष्ट आहे, जी अनिश्चित आहे. आपल्या येणाऱ्या भविष्यात कधी काय होईल? हे कुणी मोठा ज्योतिषी किंवा मोठा प्रसिद्ध व्याख्याते शास्त्रज्ञ सांगू शकत नाही. त्यामुळे आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण आनंदाने जगता आलं पाहिजे आणि आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी योग्य योजना केल्या पाहिजेत. भूतकाळात झालेल्या चुकांना आठवण करून रडत बसण्यापेक्षा त्या चुका आपण दुरुस्त करून शिकलो पाहिजे. आतापर्यंत अनेक राजे-महाराजे, सम्राट, महान संत,

वेळेचे महत्व निबंध 400 शब्दांत  Veleche Mahatva Essay in Marathi Language

अनेक जिज्ञासू शास्त्रज्ञ होऊन गेले. पण यापैकी कोणीही वेळेवर विजय मिळू शकले नाही. वेळ ही जगातील कोणत्याही हिऱ्या, खजिना पेक्षा अधिक मौल्यवान आहे. कारण एकदा गेलेली गोष्ट कधीही परत येऊ शकत नाही. कोण गरीब, कोण श्रीमंत वा उच्च-नीच, लहान-मोठा असा भेदभाव न करता सर्वांच्या आयुष्यामध्ये समान विभागलेली असते ती म्हणजे वेळच. आपण त्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा याचे नियोजन करायला पाहिजे. वेळेचा फायदा कसा घ्यायचा ते अवलंबून असते आपल्यावर.

ज्या व्यक्ती हुशारीने व चतुराईने संधीचा व वेळेचा फायदा करून घेतात, त्याच व्यक्ती जीवनामध्ये प्रगती करतात. घरातील सर्व कामे वेळेवर करणे, वेळेवर झोपणे व वेळेवर उठणे, ठरवलेले सर्व कामे वेळेवर करून घेतली पाहिजेत. वेळेवर शाळेला ऑफिसला किंवा अन्य कामाला जाणे किंवा येणे. हे योग्य त्या ठरलेल्या वेळीच झाली पाहिजे. आपल्या जीवनात सर्वात मौल्यवान गोष्ट असेल ती कोणती तर ती म्हणजे वेळ आहे आणि आपल्याला आयुष्य हे एकदाच मिळते. याचा आयुष्यामध्ये आपण काय करायच आहे. ते करू शकतो आणि त्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळ वेळेचे योग्य नियोजन करुन आपली कामे त्याच वेळेमध्ये पूर्ण करून त्याचा संदर्भ घ्यावा. आपल्या जीवनातील एक एक क्षण हा मूल्यवान आहे.

वेळेचे महत्व निबंध 500 शब्दांत  Veleche Mahatva Essay in Marathi Language

वेळ वाया घालवणे म्हणजे आपले जीवन वाया घालवण्यासारखे आहे. म्हणून वेळेचे महत्त्व जाणून घ्या आणि जास्तीत जास्त वेळ आपल्या कामाला द्या व वेळेचा सदुपयोग करा. आळस हा माणसाचा शत्रू आहे. जेव्हा आपल्या हातून एखादी वेळ निघून जाते तेव्हा आपल्याला वेळेचे महत्त्व समजते. ज्यावेळेस दुरुपयोग केला जातो. त्यावेळी आपल्या नशिबात दुःख आणि दारिद्र्याचे शिवाय दुसरं काहीच मिळत नाही. आळस हा एक प्रकारचा किडा आहे. जर एखाद्याच्या जीवनामध्ये लागला तर तो त्याचे जीवन नष्ट करून टाकतो. म्हणून विद्यार्थी जीवनामध्ये वेळेचे खूप महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा आल्यावर अभ्यास केल्यापेक्षा आधीपासूनच अभ्यासाला सुरुवात केल्यास परीक्षेत चांगल्या गुणांनी पास व्हाल.

जंगलातील हिंस्र प्राणी देखील आपले भक्ष्य पकडण्यासाठी वेळेचा उपयोग करतात. एखादा भक्ष समोर असेल तर त्यावर एकदम हल्ला चढवतात. त्यांना सुद्धा वेळेचे महत्त्व आहे. भक्ष वेळेत पकडले नाही तर ते दूर निघून जाईल वाघाला उपाशी मरावे लागेल. मग आपल्यासारख्या मानवाला का वेळेस महत्त्व असू नये. सर्व जग वेळेस गुलाम आहे मात्र वेळही कोणाचाही गुलाम नाही किंवा वेळ कुणावरही अवलंबून नसते. ज्याला वेळेचे महत्त्व समजत नाही आणि वेळेचा योग्य वापर करत काही ती व्यक्ती आयुष्यभर रडत बसते.

निष्कर्ष :
मानवाने आपल्या जीवनात वेळेचे महत्त्व जाणून वेळेत कामे करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांचा विकास व प्रगती होईल. तुम्हाला आमचा “veleche mahatva essay in Marathi language” कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment